पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< डोळ्यान्साठी डॉ. रत्नमाला साळुन्के ( एकदम छान) >>

चूक त्या जयमाला साळुंके आहेत. नेत्रतज्ज्ञ आणि त्यांचे यजमान हृदयरोगतज्ज्ञ श्री. दीपक साळुंके.

http://www.justdial.com/Pune/Dr-Jaymala-Salunke-%3Cnear%3E-Behind-Nigdi-...

http://www.justdial.com/Pune/Dr-Deepak-Salunkhe-%3Cnear%3E-Opposite-Jays...

दोघेही उत्तमच आहेत यात शंका नाही.

अतिशय उपयुक्त धागा, धन्यवाद Happy

आकुर्डी, निगडी परिसरातील स्कीन स्पेशालिस्ट ( डॉ. पेठे माहीत आहेत पण खुपच गर्दी असते) आणि लहान मुलांसाठी डॉक सुचवा प्लीज.

लहान मुलान्साठी डॉ. नीलम देशपान्डे, दुर्गा कॉम्प्लेक्स, यमुनानगर, निगडी. निगडी बस स्टॉप कडुन तळवडे कडे जाताना डाव्या हाताला दवाखाना आतल्या बाजूला आहे. यमुना नगर्+भक्तीशक्ती+तळवडे असा जो मधला चौक बजाज कम्पनीच्या मागल्या गेट समोर आहे. तिथे त्याच चौकात आहे. बाजूलाच बरीच दुकाने, गॅरेज, कन्हैय्या स्वीटस वगैरे आहे. वेळ सकाळी ९ ते १ आहे. ह्याच डॉ चिन्चवड स्टेशन जवळच्या युनीक हॉस्पिटल मध्ये सल्लागार आहेत. तसेच डॉ गुजर म्हणून पण आहेत, ते पण चान्गले आहेत.

<< Orthopedician - डॉ. दिवान, निगडी>>

आमचा अनुभव तरी चांगला नव्हता.... एका शेजार्याना पण वाईट अनुभव आला होता...

इथे चांगले डॉ लिहायचे आहेत ना?
लोक आता वाईट धाग्यावर चांगले डॉ आणि चांगल्या धाग्यावर वाईट डॉ अशी सरमिसळ करत चालले आहेत हां! Happy
शेवटी सगळ्या धाग्यावर 'चांगले आणी वाईट डॉ,ईंजिनीयर्,सीए,वकिल्,गायक....' अशी सरमिसळ होईल असं वाटतंय.

ठिकाय अनु.:स्मित: पण लहान मुलान्बाबत डॉ ढेकणे आणी डॉ कदम यान्चे अनूभव नीट नाहीयेत. ( आमचे नातेवाईक आणी मित्र, ओळखीचे असे कुठलेच लोक या डॉ बाबत अनुकूल नाहीयेत)

लहान मुलांसाठी डॉक - डॉ. अमर शहा, तिसरा मजला - हेरिटेज प्लाझा, लिन्क रोड, चिन्चवड... दोन्ही मुलान्साठी चान्गला अनुभव आहे..

रश्मी.. +१...

पि. सौ. मध्ये चांगला ओर्थोपेडिक हवा आहे >>>>

डॉ. अविनाश काटे, जगताप डेअरी चौक.

डॉ.निर्मलकुमार ढेकणे ,ऑर्थोपेडिक आहेत. चिंचवडच्या निरामयमधे असतात.त्यांचे क्लिनिक,चिंचवडमधे आहे.

अविनाश काटेंच City Orthopedic center शिवार गार्डनच्या एक्झॅक्ट मागे आहे. प्रदिप स्वीट पासून आत जाऊन डावीकडे वळायचं.

लहान मुलांसाठी डॉक - डॉ. अमर शहा, तिसरा मजला - हेरिटेज प्लाझा, लिन्क रोड, चिन्चवड
>>>>>>>>>> मला खुप वाईट अनुभव आला. मुलाला तपासण्यासाठी आत घेऊन गेल्यानंतर अक्षरश: ४थ्या मिनिटाला बाहेर होतो चेक अप होऊन. कशाची एवढी घाई असते कुणास ठाऊक. बर गर्दी तर अजिबातच नव्हती, आमच्यानंतर केवळ २ नंबर होते.

लहान मुलान्साठी डॉ. नीलम देशपान्डे, दुर्गा कॉम्प्लेक्स, यमुनानगर,>>>>>>

अतिशय छान अनुभव आला मॅडमचा. खुप अनुभवी आहेत आणि वागणही अतिशय सौजन्यपुर्ण... Happy

पोटविकारतज्ञ माहीती असल्यास सुचवा प्लीज!! अर्जंट आहे.>>>>>>उशिरा उत्तर देतेय, सॉरी. घरचा उत्तम अनूभव आहे.

डॉ. नितीन देशपांडे, कन्सल्टिंग सर्जन ( पण जनरल तपासणी उदा. डेंग्यु वगैरे सुद्धा होते), श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, चैतन्य सभागृहासमोर, पवनानगर, चिंचवड, एस के एफ कंपनी रोडला आहे. आमच्या बाबतीत अनूभव म्हणजे देव माणुस आहे.:स्मित:

आबासाहेब, डॉ. नीलम देशपांडेंचा आम्हाला लहान मुलांसाठी चांगला अनूभव आल्याने त्यांचा पत्ता इथे दिला.:स्मित:

किडनी स्टोन झाला आहे, निगडी आकुर्डी पिंपरी चिंचवड परिसरातील डॉक्टर सुचवा (युरोलॉजिस्ट असेल तर उत्तम)

डान्गे चौक ऑर्थो: डॉ सुधीर लामखडे . उत्कृष्ट निदान आणि खोल ज्ञान. ऑपरेशन तर आहेच पण पाठदुखी, गुडघेदुखी साठी घरातीलच तिघांचा अनुभव उत्तम.
त्यांचीच पत्नी डेंटिस्ट आहे. सोनिगरा अपार्टमेंट डांगे चौक इथे दातांचा दवाखाना आहे. आरतीज डेंटल क्लिनीक. माझ्या मुलींची आवडीची डॉक्टर. (वै. फायदा नसुन इतके चांगले डॉ या भागात आहेत यासाठी लिहित आहे.)

डेंटल साठी डॉ ताम्हाणे , चापेकर चौक बस स्टॉप , लिंक रोड कडे जाताना डावीकडे.
इंप्लान्ट आणि रूट कॅनाल स्पेशालिस्ट आहेत

सर्जन डॉ. शैलेश राव, हे निरामय हॉस्पिटल मध्ये येतात. निरामय हॉस्पिटल, स्टेशन रोड, चिंचवड. हे युरोलॉजिस्ट आहेत.

शाहीर, सोनोग्राफीत खडा किती मोठा होता? जर लहान असेल तर काही दिवस काटेगोखरुचा काढा घ्या. प्रदीप स्वीट मार्ट समोर, निगडी बसस्टॉप जवळ शतायु नावाचे आयुर्वेदीक दुकान आहे, तिथे काटेगोखरुची पावडर मिळेल. ती पाण्यात उकळवुन गाळुन घेणे. आणी २-३ चमचे टाकावी. आणी ते पाणी सारखे प्या, खडा लहान असेल तर पडुन जाईल. ऑपरेशनची गरज पडणार नाही, उगाच ३०-४० हजार घालवु नका. मोठा असेल तर मात्र ऑपरेशन करावेच लागेल.

काटेगोखरु हे छोटे काटेरी फळ आहे. त्याचे काटे टोचले तर फार वेदना होतात, त्यामुळे ते अख्खे फळ लहान मुलांपासुन लांब ठेवावे. काटेगोखरु अख्खे मिळाले तर ते कुटुन त्यची पावडर करावी. दुसरे म्हणजे उपाय होईपर्यंत निरी नावाचे आयुर्वेदीक औषध ( सिरप ) घ्या. याने बाथरुमला साफ होते, उन्हाळ्यातली जळजळ कमी होते, स्वानूभव आहे. कारण मलाही किडनी स्टोन झाला होता. डॉनेच मला हे दिले आहे, त्यामुळे बीनधास्त घ्या. लहान मुलांना पण चालते ( वय वर्शे ८ च्या पुढे )

Pages