'चरित्रपट किंवा एखाद्या सत्यघटनेवर बेतलेला चित्रपट बनवणे' हा एक प्रकारचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हे चांगलं की वाईट, हा प्रश्न नाही. पण मध्यंतरी (हम आपके है कौन) नंतर कौटुंबिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. एक तर संपूर्ण चित्रपटच कौटुंबिक भपकेबाज किंवा कुठून तरी काही तरी करून एखादं लग्नातलं/ 'मंगनी'तलं गाणं वगैरे घुसडायचं, असं चाललं होतं. जे अजूनही अधूनमधून दिसतंच. त्या ट्रेंडने बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपटापासून दूर नेलं. त्यांतल्या बहुतेकांना चित्रपटाकडून जी 'सेन्सिबिलीटी'ची अपेक्षा होती, ती त्याच सुमारास झालेल्या इंटरनेट व केबल टीव्ही क्रांतीमुळे सहज उपलब्ध झालेल्या परदेशी चित्रपटांत मिळाली आणि तो प्रेक्षकवर्ग दुरावला तो कायमचाच. आता हा एक ट्रेंड आला आहे. ठराविक कालावधीनंतर एखादा चरित्रपट येतोच येतो. सत्यघटनेवर आधारित चित्रपट येतोच येतो. आता ह्यातही 'तोचतो'पणा वाटायला लागला आहे. असं वाटायला लागलं आहे की असे चित्रपट बनवत असताना कथानक व बऱ्याच अशी पटकथाही बऱ्यापैकी 'तयार'च असते आणि त्याला सत्यतेची पार्श्वभूमी असल्यावर 'सेन्सिबिलीटी' तर असली/ नसली तरी गृहीत धरली जातेच जाते. मग मिल्खा सिंगवर राकेश मेहरांनी बनवलेल्या लांबसडक चित्रपटात फरहान अख्तर काही दृश्यांत सपशेल तोकडा पडला असतानाही त्याचं कौतुक होतंच. 'मेरी कोम'वरील चित्रपटाला पाहताना, जो विषय आजपर्यंत नेहमीच चित्रपटांनी अव्हेरला आहे, तो - 'ईशान्येकडील लोकांच्या समस्या' - पुन्हा एकदा पूर्णपणे टाळला असतानाही, 'मेरी कोम'चा संघर्ष त्यात पूर्णपणे आला असल्याचीच हवा होते. कधी कधी वाटतं की 'मांझी', 'एअरलिफ्ट' हे चित्रपट 'सत्यघटनेवर आधारित' असं न सांगता बनवले गेले असते, तर ती कथानकं लोकांनी स्वीकारली तरी असती का ? पण मार्क ट्वेनने म्हटलंय, '“Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.” म्हणूनच 'आधारित' शब्दाचा फायदा घेऊन जेव्हा सत्यघटनेला मनासारखं सादर केलं जातं, तेव्हा त्यालाही स्वाभाविकपणे 'सेन्सिबल' मानलं जातं. त्यातूनही जर देश, जातीभेद, स्त्री शक्ती वगैरे संवेदनशील विषय असेल, तर त्याच्या निवडीतच ७५% यश दडलेलं असतं.
राम माधवानी ह्यांनी आपला पहिला (फुल लेंग्थ) चित्रपट करण्यासाठी असाच काहीसा 'सेफ गेम' खेळला आहे.त्यांनी विषय निवडला 'नीरजा भानोट'चा.

१९८६ साली अयशस्वी अपहरण करण्यात आलेल्या 'Pan Am 73' ह्या विमानाची हेड अटेंडंट असलेल्या नीरजा भानोटने आपल्या जीवाची पर्वा न करता विमानातील प्रवासी, सहकर्मचारी ह्यांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिले आणि त्या प्रयत्नात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. ह्या अद्वितीय शौर्यासाठी तिला भारत, पाकिस्तान व अमेरिका ह्या देशांकडून अनेक मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. सर्वोच्च भारतीय सन्मान 'अशोक चक्र' तिला देण्यात आला. वय वर्ष २३. कुठून आलं असेल तिच्यात इतकं मानसिक बळ ? एका अत्यंत बिकट प्रसंगी तिने प्रसंगावधान बाळगून स्वत:चा जीव धोक्यात टाकूनही इतरांचे जीव वाचवले, हे शौर्य कुठून आलं असेल ? संस्कार, शिक्षण हे विचारांची दिशा ठरवतात. पण पराकोटीच्या तणावपूर्ण प्रसंगी निर्णयक्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारं मनोधैर्य हे फक्त आणि फक्त अनुभवांतून येतं. कुठल्या अनुभवातून काय शिकवण मिळेल हे सांगता येत नाही. लहान मुलाला आपण रस्त्यावरच्या गाड्या दाखवत असताना ते दिव्यांना ओळखायला शिकतं. तसंच आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगातून आपण स्वत:सुद्धा काय वेचून, टिपून घेऊ ह्याचा नेम नसतो. जेव्हा दशरथ मांझीने एकट्याने एक पहाड खोदून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता बनवला, तेव्हा वर्षानुवर्षं त्या शुद्ध वेडेपणा वाटणाऱ्या कामासाठी झटताना लागलेलं मनोधैर्य त्याला त्याच्या पत्नीवरील प्रेमातून किंवा त्याच्या जातीमुळे समाजाकडून मिळालेल्या तुच्छ वागणुकीबद्दलच्या असंतोषातून असेल किंवा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाच्या संतापातून मिळालं असेल. 'मांझी' बनवताना केतन मेहतांनी ह्या सर्व विषयांना सूचकपणे सादर केलं. त्यांनी फक्त 'मांझी'चा पराक्रमच दाखवून शॉर्ट कट मारला नाही. 'नीरजा'ची कहाणी दाखवताना मात्र 'नीरजा'च्या संघर्षाला नीट सादर केलं जात नाही. एका अयशस्वी लग्नाबाबतचे संदर्भ फ्लॅशबॅकमध्ये येतात. निकराने विरोध करून उभं राहण्याची मन:शक्ती तिला ह्या अनुभवातून मिळालेली असेल का ? असू शकते. लग्नानंतर होणारे अत्याचार एका स्त्रीला पूर्णपणे ध्वस्त करतात किंवा तिच्यात हजार स्त्रियांचं बळ आणून सगळ्यांविरुद्ध उभं करतात, अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. ह्या व्यतिरिक्तही नीरजाच्या पूर्वायुष्यात असे अनेक संदर्भ असू शकतात, ज्यांची नोंद तिच्या संवेदनशील मनाने घेतलेली असणार आणि ह्या सगळ्याचं एकत्रित फलित ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्यात अपरिमित शौर्याच्या रूपाने आलं असणार. 'सिनेमॅटिक लिबर्टी' हे साधन ह्या सगळ्या विचारमंथनासाठीसुद्धा वापरलं गेलं पाहिजे. जसं ते 'मांझी'मध्ये वापरलं गेलं. मात्र हे सगळं बळ तिला वडिलांच्या फिल्मी संवादांतून मिळालं असल्याची पोरकट थिअरी इथे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. Is this some kind of a joke ? अद्वितीय शौर्याचा आढावा घेताना तुम्ही ह्याहून पुढे विचार करू शकत नाही ?

ह्या सगळ्याच्या जोडीला आहेत अत्यंत सपक संवाद व कमकुवत लेखन. कराची विमानतळावरील अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सुंदर खुलवता येऊ शकली असती. 'गुलजार'च्या 'अचानक' मध्ये ओम शिवपुरींनी साकारलेली 'डॉक्टर'ची छोटीशी व्यक्तिरेखा असो किंवा प्रमोद चक्रवर्तींच्या 'मजबूर'मध्ये 'सज्जन'ने साकारलेली तशीच अतिशय छोटीशी 'डॉक्टर'ची व्यक्तिरेखा असो. १-२ दृश्यांत ह्या दोघांनी आपापली छाप सोडली होती. अतिरेक्यांशी संवाद साधण्यासाठी झटणारा तो कराची विमानतळावरील अधिकारी शेवटी तीच हताशा अनुभवतो, जी ह्या डॉक्टरांनी अनुभवली. पण लेखकाला ते दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातला एकही संवाद लक्षात राहू नये. वजन आणण्यासाठी राजेश खन्नाच्या चित्रपटांतील 'पुष्पा, आय हेट टियर्स' , 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' वगैरे डायलॉग उधार घेऊन त्यातच सार्थक मानावं, काहीच ओरिजिनल देऊ नये ह्याचं वैषम्य वाटावं.
अतिरेक्यांशी संवाद साधणे, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेलेच दाखवणे क्रमप्राप्त होतं कारण घटना त्यांच्या भूमीतली. पण भारत, अमेरिका व इतर देशांकडून पाकिस्तानमार्फत का होईना काही प्रयत्न झाले किंवा न झाले हे दाखवूसुद्धा नये, हेसुद्धा पटलं नाही. 'मिशन'वर निघता एक अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला प्लान सांगतो, हे पाहून तर हबकायलाच होतं.
मुख्य व्यक्तिरेखेपासून अगदी छोट्यातल्या छोट्या सहाय्यक व्यक्तिरेखेपर्यंत कुणीही बारकाईने लिहिल्यासारखं वाटतच नाही.

सोनम कपूरचा चेहरा 'नीरजा भानोट'शी बराच मिळता-जुळता वाटतो. ती दिसलीही सुंदर आणि फ्रेश आहे. 'सांवरिया'पासून 'प्रेम रतन धन पायो' पर्यंत सुमार अभिनयाच्या पायऱ्या चढत गेलेल्या सोनमसाठी 'नीरजा' ही एक चांगली संधी होती, जीनाच बदलण्याची. त्या संधीचं तिने सोनं केलं, असं म्हणता येणार नाही, हे अनिल कपूरचं दुर्दैव. मरतानाचा अभिनय 'अग्निपथ'मध्ये हृतिकला जमला नाही आणि इथे सोनम कपूरला. तिला मरतानाचा काय, झोपतानाचाही अभिनय जमलेला नाही. रात्री एक वाजता तिची आई शबाना आझमी तिला उठवत असताना इतका कंटाळा येतो की वाटतं बादलीभर गार पाणी ओतावं आता ! तुकड्या-तुकड्यांत ती चांगली कामगिरी करते. आपल्याला वाटतं की 'आता हिने पकड घेतली', की लगेच गैरसमज दूर होतो.
'योगेंद्र टिक्कू'नी साकारलेला बापसुद्धा सहज वाटत नाही. विमान अपहरणाची पहिली बातमी कार्यालयात असताना समजल्यावर 'त-त-प-प' करत घरी फोन करुन सांगतानाचा प्रसंग सपशेल नाटकी झाला आहे. कथानक संपल्यावरही चित्रपट सुरूच राहतो. ह्या वाढीव १५-२० मिनिटांत शबाना आझमी पीळ-पीळ पिळतात. 'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. हा सगळा वाढीव भाग फक्त आणि फक्त शबाना आझमींना 'फुटेज' देण्यासाठी जोडलेलं एक निरर्थक ठिगळ आहे. त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.
तीन लहान मुलांना वाचवण्यासाठी स्वत: गोळ्यांना झेलणारी नीरजा दाखवताना कॅमेरावर्क शेवटच्या गटांगळ्या खातं. चित्रपटभर आपण ते सहन करत असतो. पण एक अत्यंत महत्वाचा प्रसंगसुद्धा 'जस्ट अनदर थिंग' म्हणून चित्रित व्हावा ?
'नीरजा'ची कहाणी वाचताना जो रोमांच येतो, तो रोमांच ही कहाणी पडद्यावर पाहताना येऊन पुरेसं नव्हतं. पडद्यावर हे नाट्य दाखवताना प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर आणणं अपेक्षित व शक्यही होतं. फक्त डोळे पाणावणे पुरेसं नव्हतं, तर कित्येक ठोके चुकणं आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना सुन्न मनस्थिती असणं अपेक्षित व शक्यही होतं. असं काही न होता मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते आणि बाहेर पडल्यावरसुद्धा 'चांगला होता मूव्ही' वगैरे पॉपकॉर्नी गप्पा चघळत रस्ता धरत होते.
Neerja deserved more, much more than this.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2016/02/she-deserved-more-movie-review-ne...
हो माहितेय . पण एवढ्या साध्या
हो माहितेय . पण एवढ्या साध्या गोष्टीला तुम्ही माझा दोष वगैरे वळण दिल्याने राहवले नाही .
काल पहिला सिनेमा. आवडला आणि
काल पहिला सिनेमा. आवडला आणि सोनम कपूर ही आवडली. जरी ती मला आवडत नाही तरी. मलाही या घटनेबद्दल माहीत न्हवते. अर्थात याचे वाईट वाटलेच. सिनेमा संपल्यावर आई पप्पां ना विचारले की त्यावेळी पेपर मधे खूप काही आले होते का? यावर त्यांचे उत्तर नकारार्थी होते. आई म्हणाल्या वाचलेले आठवत आहे, पण वर्तमान पत्रात नाही.
निरजा भानोट बद्दल काय लिहावे. शेवटची काही मिनिटे फक्त सुन्न करून गेली.
मला वाटतं नीरजा कोणालाच माहीत
मला वाटतं नीरजा कोणालाच माहीत नव्हती हे सरसकटीकरण कोणीच करत नाहीये त्यामुळे नीरजा सगळ्यांनाच माहीत होतीच हे सरसकटीकरण पण कोणी नका करू रे.
एखादी गोष्ट माहीत असायला जन्म हा क्रायटेरिया असतो की नसतो बाबत मला वाटतं - नजरे समोर घडणार्या गोष्टी लक्षात रहात किंवा त्याबद्दल एक टक्का माहीती तरी असतेच पण ज्या जन्माआधी घडून गेलेल्या असतात त्यांच्याबद्दल कोणी तरी सांगितल्याशिवाय माहीती होत नाही.
उदाहरण द्यायचं झालं तर विरप्पन किंवा हुसेनला मारलं आहे हे मला माहीत आहे. कधी कूथे कसं या गौण बाबी. पण अरुण गवळी किंवा मन्या सुर्वे बद्दल मला काहीच माहीत नव्हतं (सिनेमा आल्यावर कळालं). त्यामुळे काही ठिकाणी जन्म वेळ हा क्रायटेरिया असतोच.
आणखी एक समर्पक उदाहरण म्हणजे २६ जानेवारीचा भुकंप मला चांगलच आठवतो (मी त्याचा एक हिस्सा नव्हते तरीही) पण किल्लारीच्या भुकंपाबद्दल फक्त तो झाला होता हे माहीत आहे ते पण शालेय जीवनात कधी तरी पुस्तकांमधे वाचलेलं म्हणुन
अर्थात नीरजा सारखी व्यक्ती मला आधी माहीत नव्हती याचं प्र चं ड वाईटच वाटतंय
बर आता नीरजाबद्दल माहिती झाल
बर आता नीरजाबद्दल माहिती झाल आहे तर हे लक्षात घ्या की तिने वाद घाला हे तिच्या जीवनातून शिकवलेले नाही. जर तिचा सिनेमा बघून तुम्ही इथे वाद घालत असाल तर तिच्या जीवनपटातून नक्की तुम्ही काय बोध घेतला? !!!!!
http://www.telegraph.co.uk/cu
http://www.telegraph.co.uk/culture/donotmigrate/3653308/I-still-dont-kno...
http://www.washingtonpost.com/wp-dyn/articles/A22394-2004May12.html
http://www.thequint.com/hot-wire/2016/02/26/hijackers-of-the-pan-am-flig...
https://www.fbi.gov/news/pressrel/press-releases/jordanian-hijacker-sent...
तर हे लक्षात घ्या की तिने वाद
तर हे लक्षात घ्या की तिने वाद घाला हे तिच्या जीवनातून शिकवलेले नाही. जर तिचा सिनेमा बघून तुम्ही इथे वाद घालत असाल तर तिच्या जीवनपटातून नक्की तुम्ही काय बोध घेतला? !!!!!>>>>>>>>>.
बघितला. मला आवडला.सोनमच कामही
बघितला. मला आवडला.सोनमच कामही आवडलं.
शेवट काय होणार हे माहीत असतांनाही निरजा मुलांना घेउन उतरत असतांना काहीतरी होउन वाचावी अस वाटले...
एक गोष्ट जरा(शीच) खटकली, अमेरीकन पासपोर्ट लपवायचे होते तरी ४/५ अगदी आयल मधे पडलेले दाखवलेत.
काश त्या हायजकर्स ना एन्ट्रीलाच अडवता आले असते...
http://indiatoday.intoday.in/
http://indiatoday.intoday.in/story/pan-am-hijack-in-karachi-pakistan-sec...
(वरच्या ह्या लिंकमधे हा लेख खूप जुना १९८६ चा आहे. त्या नीरजा भनोतचा उल्लेख नीरजा मिश्रा असा करण्यात आला आहे. तिचे सासरचे सरनेम मिश्रा होते. एका चित्रामधे ती वॅनमधे दिसत सुद्धा आहे जखमी अवस्थेत. )
इथे त्यावेळेसचे फोटो दिले आहेत. खूप लहान आहेत आकारानी आणि त्यात ब्लॅक अॅन्ड व्हाईट.
नीरजाच्या जाहीराती मला आठवतात. तिचे डोळे रामायणातील दिपिकासारखे दिसतात. रामायणातील दिपिका आणि नीरजा दोघीत खूप साम्य आहे फक्त दिपिका थोडी उंचपुरी आहे आणि नीरजा जरा स्लिम आहे.
इन्डिया टुडे चा अकाउंट
इन्डिया टुडे चा अकाउंट नीरजाचं शौर्य फारसं हायलाईट करत नाही.
'एअर हॉस्टेस ने दरवाजा ऑटोमॅटिक ऐवजी मयुअल मोड वर उघडल्याने लोकांना १५ फूट उडी मारुन जखमी व्हावं लागलं' वगैरे लिहीलंय. किती लोकांना अशा अवस्थेत दरवाजा उघडायचा आहे हे तरी आठवेल?
पायलट क्रू गेला नसता आणि ऑटो पॉवर ऑफ झाला नसता (ऑईल संपून) तर नीरजा आणि काही प्रवासी वाचले असते असं वाटलं.
एअर हॉस्टेस ने दरवाजा
एअर हॉस्टेस ने दरवाजा ऑटोमॅटिक ऐवजी मयुअल मोड वर उघडल्याने लोकांना १५ फूट उडी मारुन जखमी व्हावं लागलं <<< काहीही..
पायलट क्रू गेला नसता << पायलट गेले नसते तर अतिरेक्यांनी विमान उडवुन असुरक्शित जागी ने ले असते ना?
पायलट क्रू ने विमान आणि बाकी
पायलट क्रू ने विमान आणि बाकी पॅसेंजर सोडून निघून जाणे या गाईड लाईन्स नाहीत असे बर्याच एअर लाईन्स म्हणतात.
https://en.wikipedia.org/wiki/Aircraft_hijacking
पायलट क्रू जाण्याने असुरक्षित वाटून गुन्हेगार अजून टोकाच्या स्टेप घेऊ शकतात.प्रवाश्यांचे मनोधैर्य खचते.
अनु, तो लेख फार जुना आहे आणि
अनु, तो लेख फार जुना आहे आणि त्यावेळेसचे वातावरण काही और होते. त्यात एक वाक्य आहे ना "की तीन हायजॅकरस मेलेत म्हणून आधी सांगण्यात आले पण ते सर्व जीवंतच होते. "
माझ्यामते सर्वात मोठी चुक ही झाली की ईंधन संपल्यामुळे दिवे जाणार ह्याची जाणिव एक दोन तासाअगोदरच जर हायजॅकर्सना झाली असती तर हा गोळीबार झाला नसता.
कराचीमधे सकाळी ५:१५ मिनिटाला फ्लाईट पोचली.
येथून पुढे १७ तास धरलेत तर रात्रीचे दहा वाजून गेले होते.
विमानतळावर तसेही फार दिवे नसतात जिथे विमान उतरतात तिथे ग्राऊन्ड लाईट्स असतात.
अशा काळोखात आपल्यावर आता अटॅक होणार ह्या भितीने त्या दहशतवाद्यानी गोळीबार सुरु केला. नीरजा भानोतला तर shot in point blank करण्यात आले म्हणजे तिच्या शरिरावर बंदूक ठेवून गोळी चालवली जेणेकरुन नेम चुकणार नाही.
पायलट क्रू जाण्याने असुरक्षित
पायलट क्रू जाण्याने असुरक्षित वाटून गुन्हेगार अजून टोकाच्या स्टेप घेऊ शकतात.प्रवाश्यांचे मनोधैर्य खचते.>> इथेच नीरजा भनोतने स्वतः कॅप्टन बनून १७ तास लोकांचे मनोधैर्य वाढवले.
पायलट्स गेल्याने होणा-या
पायलट्स गेल्याने होणा-या नुकसाना पेक्षा राहिल्याने होणारे नुकसान जास्त असते. विमान पळावुन होस्टाईल देशात नेले तर आहेत त्या लोकांचीही सुटका अशक्य. इथे निदान ते होते तिथेच जमिनीवर उभे असल्यामुळे काहीतरी करता येणे शक्य होते. असे केले गेले की नाही हा वेगळा मुद्दा आहे.
कंदाहार प्रकरणातही ते विमान अमृतसरला इंधनासाठी थांबले असताना त्यांना परत जाऊ दिले ही मोठी चुक झाली असे तज्ञ्यांचे मत होते. त्यावेळेस अॅक्शन घेण्यासाठी सगळे तयार होते. पण वरुन ऑर्डर्स यायला उशीर झाला. तोवर पॅनिक होऊन अतिरेक्यानी विमान इंधन न भरता उडवण्यास भाग पाडले. तिथुन ते थेट अफ्गाणीस्तानात गेले जिथे भारतीय आर्मीला काहीही करणे अशक्य होऊन बसले.
हम्म, पटतंय. मूळ कायदा आणि
हम्म, पटतंय.
मूळ कायदा आणि पायलट गाईड लाईन्स काय आहेत पहायला पाहिजे.
'त्या त्या वेळी अपहरणाचा हेतू ओळखून प्रवाश्यांचा कमीत कमी नुकसान करणारा कोर्स ठरवा' असे असेल.
इथे ह्या लिंकवर नीरजा भनोत
इथे ह्या लिंकवर नीरजा भनोत ह्यांचे मोठे भाऊ अखिल भनोत ह्यांनी स्टार-ईंडियाने मागे ४/५ वर्षापुर्वी जी मालिका दाखवली होती टीव्हीवर ती लिंक दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=OgboMkKO_YU
ह्या मालिकेतून अजून खूप काही वेगळे डिटेल्स मिळतात.
मला इथे बघता येत नाही पण बहुतेक तुम्ही जर भारतात असाल तर ही लिंक पाहू शकता:
his video contains content from Starindia, who has blocked it on copyright grounds.
https://www.youtube.com/channel/UCkrcpNlOxzg4eoi7UPaoAyg
नीरजा भनोत वर एक कॉफी टेबल
नीरजा भनोत वर एक कॉफी टेबल बुक आले आहे नाव आहे : the neerja i knew
http://indianexpress.com/article/lifestyle/books/the-neerja-i-knew-this-...
अजून एक पुस्तक आहे ते एकूणच्य हा प्रसंगावर आहे. माईक थेक्सट्न ह्यांनी लिहिलेले आहे - Mike Thexton
http://www.hippyman.com/reviews.html
इथे तर खूप काही
इथे तर खूप काही आहे:
http://www.hippyman.com/get-out-alive.html
ह्या सिनेमात जी म्हातारी
ह्या सिनेमात जी म्हातारी दाखवली आहे त्या मुलाची आजी ती त्याला मारु नका असे म्हणते तिचा नातू राजेश कुमार पटेलला गोळी घालून ठार मारले पण नंतर शेवटी ती म्हातारी पण गोळीबारात जाते. इथे तिची बातमी आहे. http://articles.latimes.com/1986-09-08/local/me-12984_1_patel-family
किती वाईट की तिचा अंतसंस्कार तिथेच तिच्या कुटुंबियानविना केला आहे. ती आजी पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर जात होती अमेरिकेला आपल्या नातवाकडे
स्पॉयलर... ज्यांना अजून
स्पॉयलर... ज्यांना अजून बघायचा आहे त्यांनी कृपया हे वाचू नये.
मी आताच बघितला. आवडलाही. नीरजाने दाखवलेल्या शौर्याच्या बातम्या लक्षातही आहेत. त्या काळात मी नरीमन पाँईट भागात फार जात असे आणि तिथे पॅन अॅम च्या ऑफिसजवळ तिच्या नावाचा बोर्ड पण बघितल्याचा आठवतोय.
आता चित्रपटाबद्दल.
चित्रपट वेगवान आहे पण सोनम कमी पडली असे वाटत राहिले. याला पटकथाही जबाबदार आहे. शबानाला जास्त फूटेज मिळाले आहे. असे रोल करणे शबानाला अवघड नाही ( पण तिने फार काही थोर कामगिरी केलीय असेही नाही ) नीरजा फ्लाईट साठी निघून गेल्यावर तिची अंगठी शोधणे वगैरे दाखवण्यापेक्षा, नीरजाचे फ्लाईट पर्सर म्हणून रुटीन दाखवले असते तर जास्त योग्य ठरले असते. कारण नीरजाचा स्मार्टनेस कुठेच दिसत नाही.
ती कायम भूतकाळातील अनुभवात गुंतलेली वाटते. तिला पॅन अॅम कडून व्यवस्थित ट्रेनिंग मिळालेच असणार, आणि ड्यूटीवर असताना चेहर्यावर कसे भाव ठेवायचे, याचे भान तिला नक्कीच असणार.
लग्नानंतर परत जॉब करण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच दिसला नाही ( तिने लग्नापुर्वी जॉब केला होता का ? लग्नासाठी तो सोडला होता का ? ते कळत नाही. बहुतेक नसावा . )
मुंबईहून टेक ऑफ करताना तिला सेफ्टी रुटीन करताना दाखवायला हवे होते.
मुंबईला विमानतळावरचा एंट्रन्स मला थोडा वेगळा वाटला, विमानाच्या कॉकपिट्मधून दिसणारी दिसणारी विमानतळाची बिल्डींग ( जूनी ) मात्र योग्य, पण तिच्यावरचा फिरता हिरवा पिवळा दिवा मात्र जाणवला नाही.
त्यावेळी तो दिवा दूरवरुन दिसायचा. ती जूनी बिल्डींग अजूनही आतमधून दिसते.
एअरलाईनच्या क्रू चा प्रयॉरिटी एंट्रन्स असतो ( तेव्हाही होता ) त्या सहसा बाहेर रेंगाळत नाहीत. त्यांच्या बॅगाही एकसारख्या असतात, त्याही नाही दिसल्या.
शेवटचा चकमकीचा प्रसंग लवकर आटपल्यासारखा वाटला. तो सविस्तर दाखवायला हवा होता. स्लो मोशनमधेही चालला असता.
एकंदर फोटोग्राफी प्रचंड निराशजनक वाटली. कॅमेरा अस्थिर ठेवायचे कारण कळलेच नाही. प्रकाशयोजनाही अपुरी होती. विमानात पुरेसा प्रकाश असतो कि.
बी | 29 February, 2016 -
बी | 29 February, 2016 - 14:17
ही १९८६ ची बातमी देतानाची क्लिप आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZW9UdpPzJjE
>>
व्हीडीओ काढून टाकण्यात आला आहे.
अंधार्या डीव्हीडीवर
अंधार्या डीव्हीडीवर पाहिल्यानी फार काही परिणामकारक नाही वाटला , शबाना आझमी उगीच फुटेज घेते
नीरजाच्या वडिलांचा रोल करणार्या अॅक्टरच काम फार फुटेज नसून जास्तं आवडलं !
स्पॉयलर
त्यात ते राजेश खन्नाचे वन लायनर्स वगैरे उगीचच , सिरियस विषयाचा विचका !
अगदी पहिल्या सीन पासूनच अगदी टिपिकल ' जिंदगी बडी होनी चाहिए बाबुमोशाय, लंबी नही' , वगैरे .
सोनम ठिक वाटली , आपण वाचणार नाही यातून याचा अंदाज आल्यावर तिच्या मित्रानी दिलेल् बर्थडे कार्ड बर्थडेची वाट न पहाता शेवटी ओपन करते त्या सीन मधे चांगला अभिनय केलाय !
अगदी पहिलं पार्टीतलं किशोर
अगदी पहिलं पार्टीतलं किशोर कुमारचं गाणं, बाय बाय मिस गुडनाईट.. ओरिजिनल नाही आणि १९८६ मधे रिमिक्स, व्हर्जन साँग्ज अजिबातच नव्हते.
निंबुडा, इथे बघ इथे सगळ्या
निंबुडा, इथे बघ इथे सगळ्या लिंक्स आहेतः
http://www.desirulez.me/threads/441128-Azaadi-Heroes-Life-Ok-13th-August...
त्यापैकी तू "Dailymotion DVD Quality Online Links" खाली ज्या लिंक्स दिसतात त्या बघ. एक लिंक पुर्ण मालिका करते ती शोध जास्त बरे पडेल.
अपर्णा सुद नी ते विमान राईट
अपर्णा सुद नी ते विमान राईट फ्रॉम स्क्रॅच बनवल त्याबद्दल मी माझ्या फेबुवर लिंक डकवली आहे. किती मोठ काम आहे ते आणि तेही फक्त ४८ दिवसात.
पायलट क्रू ने विमान आणि बाकी
पायलट क्रू ने विमान आणि बाकी पॅसेंजर सोडून निघून जाणे या गाईड लाईन्स नाहीत असे बर्याच एअर लाईन्स म्हणतात >>> कॉकपीट क्रूला विमान सोडून न जायच्या गाइड लाइन असणारच आणि मॉरली पण बरोबर नाही.
ह्या केस मधे खुद्द नीरजा भानोतनी कॉ. क्रूला विमान सोडून जायची विनंती केली होती असं वाचण्यात आलं. माझ्या मते तो अतिशय योग्य कॅल्क्युलेटेड निर्णय होता. कारण कुठल्याही हायजॅक सिचुएशनमधे विमान airborne नसावं अथवा होऊ देऊ नये असंही म्हणतात. कॉ. क्रू असता तर त्यांना गनपॉईंटवर विमान उड्वायला लावलं असतं.
नीरजा , पर्सर होती. म्हणजेच कॅप्टन च्या खालोखाल तिचीच अॅथॉरिटी होती.
अशा परिस्थितीत, परिस्थिती
अशा परिस्थितीत, परिस्थिती बघूनच योग्य तो निर्णय घ्यावा असे मला वाटते. पायलट जर तिथे असते तर कथा काहीतरी वेगळीच घडली असती. कदाचित सगळे गेले असते.
दोन तीन तोडगे होते १७ तासामधे अमलात आणता आले असते पण १९८६ चा काळ कितपत लोकांना अवेरनेस होते माहिती नाही.
१) आम्ही पायलट वर पाठवतो तुम्ही तुमचे शस्त्र खाली फेका असे केले असते तर?
२) गोळीबार होणार असे समजून आधीच अॅम्ब्यूलन्स आणि इतर वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात तयार ठेवली असती तर.
३) भारतातून लगेच काही आरमी सेना पाठवता आली असती तर?
४) विमानाच्या खाली बरीच पोकळी असते तेथून काही करता आले असते तर?
५) विमानाच्या शेपटीकडे काय चालले आहे हे दिसत नाही. मागिल बाजूने काही करता आले असते तर?
किती भयाणक .. ३० वर्ष उलटली
किती भयाणक .. ३० वर्ष उलटली तरी अजून पाच पैकी ४ दहशतवादी सापडले नाहीत आणि अमेरिकेने त्यांना शोधून देणार्या व्यक्तिसाठी प्रत्येकी ५ मिलियन बक्षित ठेवले आहे.
इथे वाचा:
https://www.justice.gov/sites/default/files/usao-dc/legacy/2013/08/07/pa...
FBI Most Wanted Terrorists
Wanted Poster - Wadoud Muhammad Hafiz al-Turki
Wanted Poster - Jamal Saeed Abdul Rahim
Wanted Poster - Muhammad Abdullah Khalil Hussain ar-Rahayyal
Wanted Poster - Muhammad Ahmed al-Munawar
आणि ह्या पानावर जर ह्या
आणि ह्या पानावर जर ह्या केसबद्दल कोर्टात काय काय झाले हे वाचले तर थक्क व्हायला होते: किती हा गलथान प्रकार
https://www.justice.gov/usao-dc/victim-witness-assistance/hijacking-pan-...
Significant Events
September 5, 1986 - Hijacking of Pan Am flight #73 in Karachi, Pakistan. Twenty people killed, more than 100 injured.
1988 - Five men are convicted in Pakistan for their roles in the hijacking. Each is sentenced to death. These sentences are later commuted to life sentences.
ह्या एका फाईलमधे प्रीती बुवा
ह्या एका फाईलमधे प्रीती बुवा (वय तेंव्हाचे ११) हिने नीरजाबद्दल खूप काही बोललेले आहे ते अवश्य वाचा:
https://www.justice.gov/sites/default/files/usao-dc/legacy/2013/08/07/pa...
Pages