'चरित्रपट किंवा एखाद्या सत्यघटनेवर बेतलेला चित्रपट बनवणे' हा एक प्रकारचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हे चांगलं की वाईट, हा प्रश्न नाही. पण मध्यंतरी (हम आपके है कौन) नंतर कौटुंबिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. एक तर संपूर्ण चित्रपटच कौटुंबिक भपकेबाज किंवा कुठून तरी काही तरी करून एखादं लग्नातलं/ 'मंगनी'तलं गाणं वगैरे घुसडायचं, असं चाललं होतं. जे अजूनही अधूनमधून दिसतंच. त्या ट्रेंडने बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपटापासून दूर नेलं. त्यांतल्या बहुतेकांना चित्रपटाकडून जी 'सेन्सिबिलीटी'ची अपेक्षा होती, ती त्याच सुमारास झालेल्या इंटरनेट व केबल टीव्ही क्रांतीमुळे सहज उपलब्ध झालेल्या परदेशी चित्रपटांत मिळाली आणि तो प्रेक्षकवर्ग दुरावला तो कायमचाच. आता हा एक ट्रेंड आला आहे. ठराविक कालावधीनंतर एखादा चरित्रपट येतोच येतो. सत्यघटनेवर आधारित चित्रपट येतोच येतो. आता ह्यातही 'तोचतो'पणा वाटायला लागला आहे. असं वाटायला लागलं आहे की असे चित्रपट बनवत असताना कथानक व बऱ्याच अशी पटकथाही बऱ्यापैकी 'तयार'च असते आणि त्याला सत्यतेची पार्श्वभूमी असल्यावर 'सेन्सिबिलीटी' तर असली/ नसली तरी गृहीत धरली जातेच जाते. मग मिल्खा सिंगवर राकेश मेहरांनी बनवलेल्या लांबसडक चित्रपटात फरहान अख्तर काही दृश्यांत सपशेल तोकडा पडला असतानाही त्याचं कौतुक होतंच. 'मेरी कोम'वरील चित्रपटाला पाहताना, जो विषय आजपर्यंत नेहमीच चित्रपटांनी अव्हेरला आहे, तो - 'ईशान्येकडील लोकांच्या समस्या' - पुन्हा एकदा पूर्णपणे टाळला असतानाही, 'मेरी कोम'चा संघर्ष त्यात पूर्णपणे आला असल्याचीच हवा होते. कधी कधी वाटतं की 'मांझी', 'एअरलिफ्ट' हे चित्रपट 'सत्यघटनेवर आधारित' असं न सांगता बनवले गेले असते, तर ती कथानकं लोकांनी स्वीकारली तरी असती का ? पण मार्क ट्वेनने म्हटलंय, '“Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.” म्हणूनच 'आधारित' शब्दाचा फायदा घेऊन जेव्हा सत्यघटनेला मनासारखं सादर केलं जातं, तेव्हा त्यालाही स्वाभाविकपणे 'सेन्सिबल' मानलं जातं. त्यातूनही जर देश, जातीभेद, स्त्री शक्ती वगैरे संवेदनशील विषय असेल, तर त्याच्या निवडीतच ७५% यश दडलेलं असतं.
राम माधवानी ह्यांनी आपला पहिला (फुल लेंग्थ) चित्रपट करण्यासाठी असाच काहीसा 'सेफ गेम' खेळला आहे.त्यांनी विषय निवडला 'नीरजा भानोट'चा.

१९८६ साली अयशस्वी अपहरण करण्यात आलेल्या 'Pan Am 73' ह्या विमानाची हेड अटेंडंट असलेल्या नीरजा भानोटने आपल्या जीवाची पर्वा न करता विमानातील प्रवासी, सहकर्मचारी ह्यांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिले आणि त्या प्रयत्नात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. ह्या अद्वितीय शौर्यासाठी तिला भारत, पाकिस्तान व अमेरिका ह्या देशांकडून अनेक मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. सर्वोच्च भारतीय सन्मान 'अशोक चक्र' तिला देण्यात आला. वय वर्ष २३. कुठून आलं असेल तिच्यात इतकं मानसिक बळ ? एका अत्यंत बिकट प्रसंगी तिने प्रसंगावधान बाळगून स्वत:चा जीव धोक्यात टाकूनही इतरांचे जीव वाचवले, हे शौर्य कुठून आलं असेल ? संस्कार, शिक्षण हे विचारांची दिशा ठरवतात. पण पराकोटीच्या तणावपूर्ण प्रसंगी निर्णयक्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारं मनोधैर्य हे फक्त आणि फक्त अनुभवांतून येतं. कुठल्या अनुभवातून काय शिकवण मिळेल हे सांगता येत नाही. लहान मुलाला आपण रस्त्यावरच्या गाड्या दाखवत असताना ते दिव्यांना ओळखायला शिकतं. तसंच आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगातून आपण स्वत:सुद्धा काय वेचून, टिपून घेऊ ह्याचा नेम नसतो. जेव्हा दशरथ मांझीने एकट्याने एक पहाड खोदून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता बनवला, तेव्हा वर्षानुवर्षं त्या शुद्ध वेडेपणा वाटणाऱ्या कामासाठी झटताना लागलेलं मनोधैर्य त्याला त्याच्या पत्नीवरील प्रेमातून किंवा त्याच्या जातीमुळे समाजाकडून मिळालेल्या तुच्छ वागणुकीबद्दलच्या असंतोषातून असेल किंवा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाच्या संतापातून मिळालं असेल. 'मांझी' बनवताना केतन मेहतांनी ह्या सर्व विषयांना सूचकपणे सादर केलं. त्यांनी फक्त 'मांझी'चा पराक्रमच दाखवून शॉर्ट कट मारला नाही. 'नीरजा'ची कहाणी दाखवताना मात्र 'नीरजा'च्या संघर्षाला नीट सादर केलं जात नाही. एका अयशस्वी लग्नाबाबतचे संदर्भ फ्लॅशबॅकमध्ये येतात. निकराने विरोध करून उभं राहण्याची मन:शक्ती तिला ह्या अनुभवातून मिळालेली असेल का ? असू शकते. लग्नानंतर होणारे अत्याचार एका स्त्रीला पूर्णपणे ध्वस्त करतात किंवा तिच्यात हजार स्त्रियांचं बळ आणून सगळ्यांविरुद्ध उभं करतात, अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. ह्या व्यतिरिक्तही नीरजाच्या पूर्वायुष्यात असे अनेक संदर्भ असू शकतात, ज्यांची नोंद तिच्या संवेदनशील मनाने घेतलेली असणार आणि ह्या सगळ्याचं एकत्रित फलित ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्यात अपरिमित शौर्याच्या रूपाने आलं असणार. 'सिनेमॅटिक लिबर्टी' हे साधन ह्या सगळ्या विचारमंथनासाठीसुद्धा वापरलं गेलं पाहिजे. जसं ते 'मांझी'मध्ये वापरलं गेलं. मात्र हे सगळं बळ तिला वडिलांच्या फिल्मी संवादांतून मिळालं असल्याची पोरकट थिअरी इथे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. Is this some kind of a joke ? अद्वितीय शौर्याचा आढावा घेताना तुम्ही ह्याहून पुढे विचार करू शकत नाही ?

ह्या सगळ्याच्या जोडीला आहेत अत्यंत सपक संवाद व कमकुवत लेखन. कराची विमानतळावरील अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सुंदर खुलवता येऊ शकली असती. 'गुलजार'च्या 'अचानक' मध्ये ओम शिवपुरींनी साकारलेली 'डॉक्टर'ची छोटीशी व्यक्तिरेखा असो किंवा प्रमोद चक्रवर्तींच्या 'मजबूर'मध्ये 'सज्जन'ने साकारलेली तशीच अतिशय छोटीशी 'डॉक्टर'ची व्यक्तिरेखा असो. १-२ दृश्यांत ह्या दोघांनी आपापली छाप सोडली होती. अतिरेक्यांशी संवाद साधण्यासाठी झटणारा तो कराची विमानतळावरील अधिकारी शेवटी तीच हताशा अनुभवतो, जी ह्या डॉक्टरांनी अनुभवली. पण लेखकाला ते दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातला एकही संवाद लक्षात राहू नये. वजन आणण्यासाठी राजेश खन्नाच्या चित्रपटांतील 'पुष्पा, आय हेट टियर्स' , 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' वगैरे डायलॉग उधार घेऊन त्यातच सार्थक मानावं, काहीच ओरिजिनल देऊ नये ह्याचं वैषम्य वाटावं.
अतिरेक्यांशी संवाद साधणे, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेलेच दाखवणे क्रमप्राप्त होतं कारण घटना त्यांच्या भूमीतली. पण भारत, अमेरिका व इतर देशांकडून पाकिस्तानमार्फत का होईना काही प्रयत्न झाले किंवा न झाले हे दाखवूसुद्धा नये, हेसुद्धा पटलं नाही. 'मिशन'वर निघता एक अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला प्लान सांगतो, हे पाहून तर हबकायलाच होतं.
मुख्य व्यक्तिरेखेपासून अगदी छोट्यातल्या छोट्या सहाय्यक व्यक्तिरेखेपर्यंत कुणीही बारकाईने लिहिल्यासारखं वाटतच नाही.

सोनम कपूरचा चेहरा 'नीरजा भानोट'शी बराच मिळता-जुळता वाटतो. ती दिसलीही सुंदर आणि फ्रेश आहे. 'सांवरिया'पासून 'प्रेम रतन धन पायो' पर्यंत सुमार अभिनयाच्या पायऱ्या चढत गेलेल्या सोनमसाठी 'नीरजा' ही एक चांगली संधी होती, जीनाच बदलण्याची. त्या संधीचं तिने सोनं केलं, असं म्हणता येणार नाही, हे अनिल कपूरचं दुर्दैव. मरतानाचा अभिनय 'अग्निपथ'मध्ये हृतिकला जमला नाही आणि इथे सोनम कपूरला. तिला मरतानाचा काय, झोपतानाचाही अभिनय जमलेला नाही. रात्री एक वाजता तिची आई शबाना आझमी तिला उठवत असताना इतका कंटाळा येतो की वाटतं बादलीभर गार पाणी ओतावं आता ! तुकड्या-तुकड्यांत ती चांगली कामगिरी करते. आपल्याला वाटतं की 'आता हिने पकड घेतली', की लगेच गैरसमज दूर होतो.
'योगेंद्र टिक्कू'नी साकारलेला बापसुद्धा सहज वाटत नाही. विमान अपहरणाची पहिली बातमी कार्यालयात असताना समजल्यावर 'त-त-प-प' करत घरी फोन करुन सांगतानाचा प्रसंग सपशेल नाटकी झाला आहे. कथानक संपल्यावरही चित्रपट सुरूच राहतो. ह्या वाढीव १५-२० मिनिटांत शबाना आझमी पीळ-पीळ पिळतात. 'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. हा सगळा वाढीव भाग फक्त आणि फक्त शबाना आझमींना 'फुटेज' देण्यासाठी जोडलेलं एक निरर्थक ठिगळ आहे. त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.
तीन लहान मुलांना वाचवण्यासाठी स्वत: गोळ्यांना झेलणारी नीरजा दाखवताना कॅमेरावर्क शेवटच्या गटांगळ्या खातं. चित्रपटभर आपण ते सहन करत असतो. पण एक अत्यंत महत्वाचा प्रसंगसुद्धा 'जस्ट अनदर थिंग' म्हणून चित्रित व्हावा ?
'नीरजा'ची कहाणी वाचताना जो रोमांच येतो, तो रोमांच ही कहाणी पडद्यावर पाहताना येऊन पुरेसं नव्हतं. पडद्यावर हे नाट्य दाखवताना प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर आणणं अपेक्षित व शक्यही होतं. फक्त डोळे पाणावणे पुरेसं नव्हतं, तर कित्येक ठोके चुकणं आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना सुन्न मनस्थिती असणं अपेक्षित व शक्यही होतं. असं काही न होता मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते आणि बाहेर पडल्यावरसुद्धा 'चांगला होता मूव्ही' वगैरे पॉपकॉर्नी गप्पा चघळत रस्ता धरत होते.
Neerja deserved more, much more than this.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2016/02/she-deserved-more-movie-review-ne...
आणि अशी कित्येक लोक असतील आणि
आणि अशी कित्येक लोक असतील आणि अशा कित्येक घटना असतील ज्यांबद्दल लोकांना माहिती नाही. असे बायोपिक वारंवार यायला हवेत.
लोकांपर्यंत माहिती पोहोचावी,
लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, असा उद्देश असेल तर सरळ डॉक्युमेंटरी बनवावी की !
आपण बाहुबली बघताना काय
आपण बाहुबली बघताना काय अपेक्षा ठेवुन जातो?
बाजीराव मस्तानी बघताना काय अपेक्षा ठेवुन जातो?
टायटॅनीक बघतना थोडे प्रेमी युगुलाचे चाळे दाखवले तर मुळ विषयाला धक्क कसा लागतो? जहाज बुडायची दाखवायचे सोडुन असे चाळे दाखवले म्हणुन टायटॅनिक वाईट "चित्रपट" ठरतो का?
'भारतीय' 'एवढ्या कमी वयाच्या असलेल्या' व्यक्तीने असे धैर्य दाखवले, त्या सत्य घटनेवरचा चित्रपट बघताना हे "चांगला चित्रपट" असण्याचे सगळे लाड अपेक्षीत करावे का?
या सगळ्या अपेक्षा प्रत्येक चित्रपटाकडुन अगदी त्याच असतात का? का नाही ? चित्रपटाप्रमाणे आणि त्याच्या पार्श्वभुमीप्रमाणे अपेक्षा बदलायला नकोत का?
-----------------------------------------------------------------------------------
रसप, आधी तुमचा निगेटीव्ह रिव्यु वाचुन माझे असे मत झाले होते की कथा तर आपल्याला माहिती आहे. चित्रपटात आणखी काय वेगळे दाखवणार. म्हणुन जाणार नव्हतो. त्यादिवशी रात्री ७:३१ चा ब्रिज ऑफ स्पाइज बुक केला होता.
ऐनवेळी इतरांच्या मताचा मान राखुन ५:१५ चा नीरजा बघायला गेलो. दोन्ही एकाच थेटरात.
बाहेर आल्यावर तुमचा आणि तुमच्या या निगेटिव्ह रिव्युचा खुपच राग आलेला आहे.
इतरांसोबत नसतो, तर माझा हा एवढा चांगला चित्रपट पाहायचा राहुल गेला असता.
काल बघितला मला आवडला , सोनमच
काल बघितला
मला आवडला , सोनमच कामही चांगल झालंय.....
बाहेर आल्यावर तुमचा आणि
बाहेर आल्यावर तुमचा आणि तुमच्या या निगेटिव्ह रिव्युचा खुपच राग आलेला आहे.>>>
बापरे एकदम लेखकावर राग म्हणजे परिक्षण फारच परिणामकारक ठरतात तुला स्पॉक 
जाई, मला एवढंच म्हणायचय की
जाई, मला एवढंच म्हणायचय की ह्या चित्रपटामुळेच नीरजा लोकांना माहित झाली असा सूर लावला जातोय तो तितकासा खरा वाटत नाही. 'नीरजा भानोत' हे नाव हा चित्रपट येण्या आधीपासून परिचीत होते. तिचे साहस आणि तिचा अंत याबद्दल याआधीही वर्तमानपत्रांमधून छापून आलय. जेव्हा एअर ईंडियाच्या विमानाचे १९९९ मध्ये अपहरण झाले होते त्यावेळी सुद्धा तिच्याबद्दल खुप काही वाचल्याचे आठवतय.
जाई, बिंगो. मी पण हेच
जाई, बिंगो. मी पण हेच म्हणते.
मी स्वतः कोणतीही डॉक्युमेंट्री फिल्म बघायला जात नाही( भले मा बु चा दो का असेना पण माझ्या सारखे असंख्य आहेत आणि माझ्यापेक्षा गये गुजरे ही असंख्य आहेत)
माझ्या वयोगटातल्या, माझ्या आसपासच्या लोकांमधे तरी या सिनेमा मुळेच नीरजा पोहचलीये. खरं तर हे दुर्दैवी आहे पण हीच रिअॅलिटीही आहेच
हे पहा आपण भाज्या न शिजवता
हे पहा आपण भाज्या न शिजवता खातो का? नाही ना.. त्यातही तिखट मिठ मसाला हवाच असतो. तसेच सिनेमाचे आहे.
बी, कथा माहिती असतना रिव्युचा
बी, कथा माहिती असतना रिव्युचा आधार घेतला होता.
प्रत्येक चित्रपट मी रिव्यु वाचुन ठरवत नाही.
कथा वाचुन + इतर नावे वाचुन ठरवतो.
पण याबाबतीत मात्र तसे झाले हे खरे आहे.
>> बाहेर आल्यावर तुमचा आणि
>> बाहेर आल्यावर तुमचा आणि तुमच्या या निगेटिव्ह रिव्युचा खुपच राग आलेला आहे. <<
जपून ठेवा हा राग. खूप कामाची चीज आहे.
मला एवढंच म्हणायचय की ह्या
मला एवढंच म्हणायचय की ह्या चित्रपटामुळेच नीरजा लोकांना माहित झाली असा सूर लावला जातोय तो तितकासा खरा वाटत नाही. 'नीरजा भानोत' हे नाव हा चित्रपट येण्या आधीपासून परिचीत होते. तिचे साहस आणि तिचा अंत याबद्दल याआधीही वर्तमानपत्रांमधून छापून आलय. जेव्हा एअर ईंडियाच्या विमानाचे १९९९ मध्ये अपहरण झाले होते त्यावेळी सुद्धा तिच्याबद्दल खुप काही वाचल्याचे आठवतय.>>>> मला तरी हा चित्रपट आल्यावरच नीरजा आणी ह्या घटनेबद्दल माहित झालं. याआधी काहीच माहिती नव्हती.
तसंच एअरलिफ्ट बद्दलही.
अणि आता अलीगढ बद्दल पण.
जरुर, यापुढे माझे आधीचेच -
जरुर,
यापुढे माझे आधीचेच - नेहमी यशस्वी झालेले - कथा वाचुन चित्रपट पहायचा की नाही हे ठरवण्याचे लॉजीक बरोबर आहे हे नेहमी लक्षात राहण्यासाठी तरी, जपुन ठेवेन.
धन्यवाद.
ब्रिज ऑफ स्पाईज माझ्या
ब्रिज ऑफ स्पाईज माझ्या जबाबदारीवर बघितला. आवडला. नेहमीप्रमाणेच - माझे कथेचे लॉजीक + दिग्दर्शकाचे नाव, यु नो!
सस्मित, इतका शोक कशासाठी.
सस्मित, इतका शोक कशासाठी. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाचे आयुष्य एक सिनेमा होऊ शकते. अनेकांना नीरजा भानोत बद्दल अजूनही माहिती नाही. तुला सिनेमा आल्यानंतर तरी माहिती झाले हेही नसे थोडके
शोक नाही. पण मला कधीच काही
शोक नाही. पण मला कधीच काही माहित नसते की काय? असं वाटलं.
>> आपल्यापैकी बहुतेक
>> आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाचे आयुष्य एक सिनेमा होऊ शकते. <<
अगदी खरंय आणि विचार करायला लावणारं वक्तव्य.
ह्याच आशेवर बहुतांश लोक चित्रपट पाहत असतात. की कधी तरी त्यांची कहाणी त्यात दिसेल किंवा दिसलेली कहाणी त्यांची होईल.
वेल सेड... रिअली !
पण मला कधीच काही माहित नसते
पण मला कधीच काही माहित नसते की काय? असं वाटलं.
>> +१
परत तेच अमी .. मी आणि रिया
परत तेच अमी ..
मी आणि रिया काय म्हणतोय ते तुला समजत नाहीये . या घटनेच्या वेळी आमचा जन्मच झाला नव्हता . त्यानंतरही आमच्या( पक्षी आमच्या पिढीच्या ) वाचनातही हे कधीही आलं नव्हतं .
वर सस्मित यांनी म्हणल्याप्रमाणे एअरलिफ्ट ही मलाही चित्रपट आल्यावरच माहिती झालाय . अलिगढ़ माहितेय कारण ती घटना वाचलेली आहे .
माझ्या वयोगटातल्या, माझ्या आसपासच्या लोकांमधे तरी या सिनेमा मुळेच नीरजा पोहचलीये. खरं तर हे दुर्दैवी आहे पण हीच रिअॅलिटीही आहेच>>>> +१०००
असो या विषयावर हेमाशेपो
ह्या मुली कशाहीबद्दल वाद घालत
ह्या मुली कशाहीबद्दल वाद घालत राहतात
एखादी गोष्ट माहित असण्यासाठी
एखादी गोष्ट माहित असण्यासाठी जन्माला येणे हा क्रायटेरीया असतो हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझाच दोष आहे. ठिकाय.
अमि, फेबुच्या युगातील तरुण
अमि, फेबुच्या युगातील तरुण मुली आहेत ह्या. एक सेकंदाआधी काय झाल हे माहिती असत आजच्या पिढीला.
एखादी गोष्ट माहित असण्यासाठी
एखादी गोष्ट माहित असण्यासाठी जन्माला येणे हा क्रायटेरीया असतो हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझाच दोष आहे. ठिकाय.
>>
रु बाळाचा पुढिल धागा:
"मी जन्माला येण्याआधीपासुनच मला सारुक, एमएनसी व सई माहिती होते. तुम्हाला काय काय माहिती होते? "
तिथुन मग अभिमन्यु मग महाभारत मग कृष्ण मग भारतीय संस्कृती असे करत करत बरोबर मोदींवर घेऊन येऊ आपण तो धागा!
.
.
अहो मी अमी सगळी लोक
अहो मी अमी सगळी लोक तुमच्यासारखी हुषार नसतात सगळ्या गोष्टी माहित असायला :-). बर्याच लोकांना बर्याच गोष्टी माहित नसतात...
नीरजाबद्दल मला आधी पासुन
नीरजाबद्दल मला आधी पासुन माहित होते कारण मला ही घटना आठवत होती. पण म्हणुन माझ्याच वयाच्या ब-याच जणांना ही घटना माहित नसेल. सगळ्यांना सगळे कुठे माहित असते? मला तरी माण्झी कुठे माहित होता? तोही तेव्हाचाच की. चित्रपट भला बुरा कसाही असला तरी निदान त्यामुळे ते नाव चर्चेत येते.
आखाती युद्ध तर मी पेपरात वाचत होते नियमित. अमेरिकन युद्धविमानांना भारतीय तळांवर इंधन भरु देण्यावरुन मोठा वाद झालेला तेव्हा. तरीही मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना रेस्क्यु केले ते माहित नव्हते. पेपरात एकदाच तिथुन परतलेल्या लोकांचा विमानतळावरचा एक फोटो पाहिल्याचे आठवतेय. त्यासारखाच एक फोटो चित्रपटात शेवटी दाखवलेला. त्याव्यतिरिक्त काहीही आठवत नाहीय. एअरलिफ्ट मुळे कळले.
बर्याच लोकांना बर्याच गोष्टी
बर्याच लोकांना बर्याच गोष्टी माहित नसतात...
>> आणि आम्ही बाकीचे लोक जन्म पण घेतो माहिती करुन घेन्यासाठी.
(No subject)
त्यामुळे माझाच दोष आहे.
त्यामुळे माझाच दोष आहे. ठिकाय.>>> ओके as you wish
पण म्हणुन माझ्याच वयाच्या
पण म्हणुन माझ्याच वयाच्या ब-याच जणांना ही घटना माहित नसेल. सगळ्यांना सगळे कुठे माहित असते? मला तरी माण्झी कुठे माहित होता? तोही तेव्हाचाच की. चित्रपट भला बुरा कसाही असला तरी निदान त्यामुळे ते नाव चर्चेत येते>>>> साधना, यू सेड इट
बादवे जाई ते तुझे हेमशेपो
बादवे जाई ते तुझे हेमशेपो होते
Pages