अखेरचा निरोप !

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2016 - 09:21

सारे काही ठिक असते तर आजच्या तारखेला मी वॅलेंटाईन डे वर धागा काढला असता,
पण सारे काही ठिक नाहीये..
म्हणून हा धागा.. माझा कदाचित अखेरचा धागा.. मायबोलीवरचा.. कदाचित अखेरची पोस्ट ठरेल.
यापुढेही मायबोलीवर ऋन्मेष हे नाव राहील.. पण केवळ आंतरजालीय ईतिहास बनून.. त्यातील ऽऽ आत्मा निघून गेला असेल.

काही वैयक्तिक कारणांमुळे मायबोलीपासून काही काळासाठीच दूर राहावे लागेल असे आधी वाटलेले. पण परिस्थिती अशी उद्भवली आहे की अनिश्चित काळासाठी (किमान तीन-चार वर्षांसाठी तरी नक्की) कायमचा रामराम घ्यावा लागेल Sad

असो, कारण अगदीच वैयक्तिक नसते तसेच ईतर कोणाशी नाही तर फक्त माझ्याशीच संबंधित असते तर नक्की शेअर केले असते.
पण ठीक आहे. काही प्रश्न अनुत्तरीत ठेवून जाण्यातही एक मजा असते.

गेले काही दिवस मायबोलीपासून दूर होतो पण संधी मिळताच एखादी चक्कर टाकली जायची, उपलब्ध असलेल्या थोडक्याच वेळात जमेल तितके अधाश्यासारखे वाचले जायचे, शक्य झाल्यास एखादा चालू स्थितीतील वादविवाद (उदा. धोनीवरील चर्चा) यावर मोजक्याच दोन ओळी खरडल्या जायच्या. पण आता ईतकेही शक्य नसणार.
तरीही पुढे मागे जेव्हा धोनीचा संघ भारताला आणखी एक विश्वचषक मिळवून देईल, महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने स्वप्निल जोशीला मराठीचा अधिकृत सुपर्रस्टार घोषित करण्यात येईल, सई ताम्हणकर हिंदी चित्रपटांमध्येही आपले नाणे खणखणीत वाजवून फिल्मफेअर पुरस्कार मिळवेल, शाहरूख खानचा चित्रपट त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी हजार कोटींचा व्यवसाय करत त्याला राष्ट्रीय पुरस्कार वा गेला बाजार ऑस्कर मिळवून देईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण नक्की येईल. आणि हिच माझी कमाई आहे जी मी इथून माझ्याबरोबर घेऊन जात आहे.

असो,
हा धागा बघताच आणि इथवर वाचताच खालील काही विचार चटकन तुमच्या मनात येतील वा आले असतील..

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
२) काही नाही, फेकतोय साला .......
३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता ....

या चारही विचारांना इथेच अनुक्रमे उत्तरे देतो .. कारण आता कदाचित मी प्रतिसादांतही नसेन

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
मायबोलीवर मी असंख्य धागे काढले. त्या त्या क्षणाला मला त्यात काही गैर वाटले नाही म्हणूनच काढले. पण प्रत्येक जण सारखे मत राखून नसतो त्यामुळे कोणालाही माझा एखादा वा अनेक धागे खटकण्याची शक्यता राहणारच होती. किंबहुना कित्येकदा मलाच नंतर वाटायचे की हा अमुक तमुक धागा काढायची गरज नव्हती, किंवा घाईघाईत काढला वगैरे. बस्स तसेच हा धागाही या अंतिम क्षणाला काढणे गरजेचे वाटले म्हणून काढला. जाता जाता मायबोलीवर मला गेल्या वर्ष-दिडवर्षात जे प्रेम आपुलकी विरंगुळा सन्मान(!) ईत्यादी मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जावेसे वाटले म्हणून काढला. पण नेमके आता शब्द सुचत नाहीयेत ती गोष्ट वेगळी..
तरी एका वाक्यात सांगायचे झाल्यास रोज सकाळी उठल्यावर आपण न चुकता सवयीने आरश्यात आपला चेहरा बघतो बस्स तसेच मायबोलीबाबत झाले होते..

असो, पण तरीही कोणाला हा धागा अनावश्यक वाटलाच, तर येत्या काळात जो कोणी काही काळासाठी वा कायमचा मायबोलीपासून दूर जाईल त्याने आपला अखेरचा निरोप सर्वांना देण्यास या धाग्याचा वापर केल्यास हरकत नाही. तेवढेच माझा धागाही वर येत जाईल, आणि माझ्या पश्चातही माझे नाव पहिल्या पानावर झळकत राहील Happy
जोक्स द अपार्ट, माझा धागा तळाशीच राहिला तरी चालेल पण अशी वेळ ईतर कोणा माबोकरावर येऊ नये.

२) काही नाही, फेकतोय साला .......
आयुष्यात मी माझ्यातील तीनच गोष्टींचा अभिमान बाळगला आहे. माझा समजूतदारपणा, निर्व्यसनीपणा आणि प्रामाणिकपणा.. तर दुर्दैवाने हे ना खोटे आहे ना यात कुठला स्टंट आहे.

३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
मी माझ्या स्टाईलने मायबोलीवर जगलो. ईतरांचा विचार केला नाही. हे माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या चांगले असले तरी काही लोकांना याचा त्रास झाला असणे स्वाभाविक आहे. याची जबाबदारी मला घ्यायलाच हवी. पण आता जायच्या वेळी सेंटी मारल्याचा आव आणत सॉरी बोलण्यात अर्थ नाही.. तर एंजॉय Happy

४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता....
मनापासून धन्यवाद Happy

..

वर मी स्वताला निर्व्यसनी म्हटलेय खरे,
पण आज सोडताना जाणवतेय, साले मायबोलीही एक व्यसन होते.

अलविदा शुक्रिया तकलिया,
शुभरात्री शब्बाखैर खुदा हाफिज
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>उत्तम पण स्वस्त सोय यावर सल्ले हवे असतील तर सर्वात आधी मायबोलीच आठवते. मायबोलीकर तेव्हढ्याच तत्परतेने उत्तरे देतात. असे असताना कडवटपणा का निर्माण व्हायला हवा>> उदय, इथे वर बी 'मायबोलीवर काय पडलंय' म्हणतोय खरा पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याने ज्याने ज्या ज्या विषयावर शक्य असेल त्या त्या विषयावर धागे उघडून मायबोलीकरांचे सल्ले मागितले आहेत. त्यालाही सगळ्यात पहिली मायबोलीच आठवत असणार नक्कीच. पण काही काही कडवडपणाला आपण स्वतःही तितकेच जबाबदार असतो, सगळा दोष नेहमी दुसर्‍यांकडे जात नसतो हे त्याला लक्षात येत नाही.

Kittee to maanbhavi paNa!

runmesh ya id che bearing suruvateelach sutun tyacha Abhishek zala hota he chaNaksh ids nee tenvhach jaNale hote. Parawa tar tashee charcha eka vahatya panavar pan vachali. Tee charcha aikun ru ne aapale avatarkarya sampavale asa mala daaT sanshay aahe.

KaraN kaheehee aso... Tu jatoyes he chanach. Shubhecchaa! Happy

मायबोली वर काही त्रुटी जरुर आहेत आणि असतील तरी मला हे स्थळ त्याच्यात असलेल्या त्रुटीन्सकट कमालीचे आवडते आणि त्यात होणार्‍या चर्चेचा मी निर्भेळ आनन्द घेतो.>>

अगदी अगदी!
तो एक 'वाहता धागा की न वाहता धागा नविन लेखन करताना न कळणे ' हा प्रकार सोडल्यास मला माबोवर कुठलीही त्रुटी दिसत नाही.
Happy

तुमचा इथवर प्रवास छान झाला.
यापुढेही संशोधक वृत्ती अशीच टिकून राहो, ही सदिच्छा !

निरोप तो ही अखेरचा ?

जाण्यापूर्वी अ‍ॅडमिनकडे लकडा लावून चॅटबॉक्सची सुविधा सर्वांना मिळवून दिली असतीस तर बोलता आले असते. आता ही शेवटची पोस्ट आहे हे जाहीर केल्याने काहीही लिहीले तरी ते व्यर्थच, नाही का ?

महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने स्वप्निल जोशीला मराठीचा अधिकृत सुपर्रस्टार घोषित करण्यात येईल, सई ताम्हणकर हिंदी चित्रपटांमध्येही आपले नाणे खणखणीत वाजवून फिल्मफेअर पुरस्कार मिळवेल, शाहरूख खानचा चित्रपट त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी हजार कोटींचा व्यवसाय करत त्याला राष्ट्रीय पुरस्कार वा गेला बाजार ऑस्कर मिळवून देईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण नक्की येईल. आणि हिच माझी कमाई आहे जी मी इथून माझ्याबरोबर घेऊन जात आहे.

अस असेल तर तुझी आठवण कधीच येणार नाही .......:G Biggrin Biggrin
कारण तू वर लिहिलेल्या गोष्टी कधीच घडणार नाहीत
तसही मला माहितीये तू कोणाचा ड्यू आयडी आहेस

ड्यु आयडी वगैरे काय स्कँडल आहे माहिती नाही, पण 'सोशल साईट्/मराठी संकेतस्थळ वावर नको, मन विटले' अशी फेज आयुष्यात येते आणि काही काळाने जातेही Happy
त्यामुळे ऋन्मेष, बाय फॉर नाऊ अँड हॅव नाईस व्हेलंटाईन विथ युवर लव्हड वन्स!! लिकिंग फॉरवर्ड टु रिड यु अगेन!

उदय, तुमच्या पोस्टला पुर्णतः अनुमोदन.

ऋन्मेष,
तुमच्या वाईट सवयींची सिरीज पुर्ण केली असती तर बरे झाले असते. पण असो.

तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुन्हा कधी मायबोलीवर यावेसे वाटले तर जरुर या, याच आयडीने किंवा नवीन आयडी काढुन! Wink

---

जाताजाता ऑनलाईन लिलाव पद्धतीने यूजरआयडी विकायला ठेवायचा होता. जास्तीत जास्त बोली लावणार्‍याला पासवर्ड बहाल करून टाकायचा. चांगला भाव मिळाला असता.

एका गोष्टिसाठी रु च कौतुक ! लोकानी त्याला धागे काढण्यावरुन कितीही बोलल तरी त्याचा तोल कधीही सुटला नाही.. (त्याने एखाद्या आयडीला अद्वा-तद्वा बोलल्याच माझ्या तरी वाचनात नाही. )

जे काही वैयक्तिक कारण अथवा समस्या आहे त्याचे लवकर निराकरण होवो ही सदिच्छा. >.>>>+१

भविष्याकरता शुभेच्छा

मि मानिनि,

(किती या व्याकरणाच्या चुका नावात तुमच्या, ते एक असो!)

तर मायबोलीच्या अभ्यासक माभप संत मामीदेवी यांनी तुमच्या सातख्या नाव्यानवेल्या माबोकरांसाठी ड्यू आयडी लक्षणांचा समास लिहून ठेवला आहे.
मामीदेवींना मनातल्या मनात एक जोरदार साष्टांग दंडवत घालून ड्यू आयडीविषयी पुढिल माहिती

या धाग्यावरवाचा. (निळ्या शब्दांवर क्लिक करा!)

मामी माझ्याकडूनही एक जोरदार सा दं!

अरे नको जाऊस ऋन्मेष ! पण ठीक आहे तुझं अवतार कार्य समाप्त झालं आहे , आता नवीन अवतार घे .
तुझी उणीव नक्कीच भासेल , अरे हो एक संशोधक पण मायबोलीवर आलाय कदाचीत तो तुझी उणीव भरुन काढु शकेल.

ड्यूआयडी म्हणजे ड्यूप्लिकेट आयडी हे विज्ञानदासू यांनी कालच सांगितले आणि मामीचा धागा आणि त्याखालचे प्रतिसाद वाचून बाकीच्या शंकाचेही निरसन झाले.

ओ भाव काय झालं ? एकदम टाटा बाय बाय?? गफे नको म्हणाली वाट्ट. Happy

ओके. जे काही असेल ते . कम बॅक अगेन.
बाकी माबो व्यसन आहे हे बरोब्बर म्हणालास. मलाही हे व्यसन लागलंय. कदाचित न सुटणारं.

<<<<<<<<<अभिनंदन करावे इतका चांगला तुझा हा निर्णय आहे. खरेच इथे काहीही पडले नाही.>>>> बी, हे तुम्ही लिहावं हे खरंच सरप्राय्झिंग आहे.

काहीही काय ..... तु सध्या जिथे असणार आहेस तिथे नेट एक्सिस नाहिये का?...

Pages