अखेरचा निरोप !

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2016 - 09:21

सारे काही ठिक असते तर आजच्या तारखेला मी वॅलेंटाईन डे वर धागा काढला असता,
पण सारे काही ठिक नाहीये..
म्हणून हा धागा.. माझा कदाचित अखेरचा धागा.. मायबोलीवरचा.. कदाचित अखेरची पोस्ट ठरेल.
यापुढेही मायबोलीवर ऋन्मेष हे नाव राहील.. पण केवळ आंतरजालीय ईतिहास बनून.. त्यातील ऽऽ आत्मा निघून गेला असेल.

काही वैयक्तिक कारणांमुळे मायबोलीपासून काही काळासाठीच दूर राहावे लागेल असे आधी वाटलेले. पण परिस्थिती अशी उद्भवली आहे की अनिश्चित काळासाठी (किमान तीन-चार वर्षांसाठी तरी नक्की) कायमचा रामराम घ्यावा लागेल Sad

असो, कारण अगदीच वैयक्तिक नसते तसेच ईतर कोणाशी नाही तर फक्त माझ्याशीच संबंधित असते तर नक्की शेअर केले असते.
पण ठीक आहे. काही प्रश्न अनुत्तरीत ठेवून जाण्यातही एक मजा असते.

गेले काही दिवस मायबोलीपासून दूर होतो पण संधी मिळताच एखादी चक्कर टाकली जायची, उपलब्ध असलेल्या थोडक्याच वेळात जमेल तितके अधाश्यासारखे वाचले जायचे, शक्य झाल्यास एखादा चालू स्थितीतील वादविवाद (उदा. धोनीवरील चर्चा) यावर मोजक्याच दोन ओळी खरडल्या जायच्या. पण आता ईतकेही शक्य नसणार.
तरीही पुढे मागे जेव्हा धोनीचा संघ भारताला आणखी एक विश्वचषक मिळवून देईल, महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने स्वप्निल जोशीला मराठीचा अधिकृत सुपर्रस्टार घोषित करण्यात येईल, सई ताम्हणकर हिंदी चित्रपटांमध्येही आपले नाणे खणखणीत वाजवून फिल्मफेअर पुरस्कार मिळवेल, शाहरूख खानचा चित्रपट त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी हजार कोटींचा व्यवसाय करत त्याला राष्ट्रीय पुरस्कार वा गेला बाजार ऑस्कर मिळवून देईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण नक्की येईल. आणि हिच माझी कमाई आहे जी मी इथून माझ्याबरोबर घेऊन जात आहे.

असो,
हा धागा बघताच आणि इथवर वाचताच खालील काही विचार चटकन तुमच्या मनात येतील वा आले असतील..

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
२) काही नाही, फेकतोय साला .......
३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता ....

या चारही विचारांना इथेच अनुक्रमे उत्तरे देतो .. कारण आता कदाचित मी प्रतिसादांतही नसेन

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
मायबोलीवर मी असंख्य धागे काढले. त्या त्या क्षणाला मला त्यात काही गैर वाटले नाही म्हणूनच काढले. पण प्रत्येक जण सारखे मत राखून नसतो त्यामुळे कोणालाही माझा एखादा वा अनेक धागे खटकण्याची शक्यता राहणारच होती. किंबहुना कित्येकदा मलाच नंतर वाटायचे की हा अमुक तमुक धागा काढायची गरज नव्हती, किंवा घाईघाईत काढला वगैरे. बस्स तसेच हा धागाही या अंतिम क्षणाला काढणे गरजेचे वाटले म्हणून काढला. जाता जाता मायबोलीवर मला गेल्या वर्ष-दिडवर्षात जे प्रेम आपुलकी विरंगुळा सन्मान(!) ईत्यादी मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जावेसे वाटले म्हणून काढला. पण नेमके आता शब्द सुचत नाहीयेत ती गोष्ट वेगळी..
तरी एका वाक्यात सांगायचे झाल्यास रोज सकाळी उठल्यावर आपण न चुकता सवयीने आरश्यात आपला चेहरा बघतो बस्स तसेच मायबोलीबाबत झाले होते..

असो, पण तरीही कोणाला हा धागा अनावश्यक वाटलाच, तर येत्या काळात जो कोणी काही काळासाठी वा कायमचा मायबोलीपासून दूर जाईल त्याने आपला अखेरचा निरोप सर्वांना देण्यास या धाग्याचा वापर केल्यास हरकत नाही. तेवढेच माझा धागाही वर येत जाईल, आणि माझ्या पश्चातही माझे नाव पहिल्या पानावर झळकत राहील Happy
जोक्स द अपार्ट, माझा धागा तळाशीच राहिला तरी चालेल पण अशी वेळ ईतर कोणा माबोकरावर येऊ नये.

२) काही नाही, फेकतोय साला .......
आयुष्यात मी माझ्यातील तीनच गोष्टींचा अभिमान बाळगला आहे. माझा समजूतदारपणा, निर्व्यसनीपणा आणि प्रामाणिकपणा.. तर दुर्दैवाने हे ना खोटे आहे ना यात कुठला स्टंट आहे.

३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
मी माझ्या स्टाईलने मायबोलीवर जगलो. ईतरांचा विचार केला नाही. हे माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या चांगले असले तरी काही लोकांना याचा त्रास झाला असणे स्वाभाविक आहे. याची जबाबदारी मला घ्यायलाच हवी. पण आता जायच्या वेळी सेंटी मारल्याचा आव आणत सॉरी बोलण्यात अर्थ नाही.. तर एंजॉय Happy

४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता....
मनापासून धन्यवाद Happy

..

वर मी स्वताला निर्व्यसनी म्हटलेय खरे,
पण आज सोडताना जाणवतेय, साले मायबोलीही एक व्यसन होते.

अलविदा शुक्रिया तकलिया,
शुभरात्री शब्बाखैर खुदा हाफिज
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या ज्या काही समस्या असतील त्या लवकर दूर होवोत अशी प्रार्थना आणि परत येशीलच (ओरिजिनल आयडी ने ), तुला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. Happy

एका गफ्रे साठी कित्ती ते मनाला लावुन घ्यायचे आंतरजालावर......नाय तर मिपा आहेच ! (डो मा:)

अरेरे दोन दिवस इथे आले नव्हते आणि आता माबो उघडुन पाहते तर हि वाईट बातमीच यावी समोर. Sad

ऋन्मेष तु माझ्या माबोवरील आवडत्या आयडींमधला एक आहेस. तुझे धागे जरी कसेही असले तरी मजा येते वाचायला आणि त्यातही त्यावरचे प्रतिसाद मग तुझ्या अजिबात न चिडता आलेल्या प्रतिक्रिया सर्व सर्वकाही... सगळं मिसणार यार..

तुझी जी काही अडचण असेल ती लवकरात लवकर दुर होवो ही प्रार्थना. मिस यु. लवकर परत ये.

अखेरचा निरोप अनिश्चित काळासाठी (किमान तीन-चार वर्षांसाठी तरी नक्की) घेऊन ऋन्मेष निघाला होता.

पण आज आशय गुणे ह्यान्च्या धाग्यावर त्याची पोश्ट दिसत आहे.

होप त्याची वैयक्तिक अडचण दूर झालेली असो व आपणा सर्वास entertain करण्यास त्याचे नविन धागे
प्रसवो Wink

साले मायबोलीही एक व्यसन आहे. Happy

ऋन्मेऽऽष | 20 February, 2016 - 04:33
ईंटरेस्टींग ! किस्से आणि टॉपिक ..
बायबल द्या आणि पॉर्न घ्या.. आपल्याकडे असे काही झाले तर संस्कृतीरक्षक आणि धर्मसंरक्षक मिळून अख्खा देश जाळून टाकतील.

असो, बाकी तसेही मला एकूणच आपल्या देशातील लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य गंडलेले वाटते.

अमेरीकेला गेलो नाही म्हणून तुलना किंवा त्यांच्यावर टिप्पणी करू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांचेही सडकेच आहे स्मित

आज आशय गुणे ह्यान्च्या धाग्यावर त्याची पोश्ट दिसत आहे.>>>> पोश्ट चं काय घेउन बसलात? आख्खा लेख पाडलाय त्याने. थापापन्ती वर.

बाब्बाय कुऋ ! होतं ते चांगल्यासाठीच स्मित>>> हो हो
ह्यातुन चांगलं निष्पन्न झालं ते म्हणजे ऋ ने नवा धागा काढला. ह्या धाग्याला अनुसरुन थापेबाजीचा. Lol

हुश्श! आता त्या रुमालाच्या धाग्यावर " ओ संमं हाकला याला" असे मोठे फ्लेक्श लावणारे पुन्हा माळ्यावर जाऊन ते खाली काढतील ,धूळ झटकून कोणाच्या धाग्यावर लावता येतील याची वाट पाहतील.

..

Pages