जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||
वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.
अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||
कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.
तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||
ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,
बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही
पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :
१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.
उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला
याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.
२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.
ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||
३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.
तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |
४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.
मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||
तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.
सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||
५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.
सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |
६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.
You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!
७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे
८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!
९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.
तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा
१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.
अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |
तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.
तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!
त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.
मी ओरिजिनल आहे की डुप्लिकेट?
मी ओरिजिनल आहे की डुप्लिकेट?
दोन आय ड्यांची होते धाग्यावर
दोन आय ड्यांची होते धाग्यावर भेट
पासवर्ड बदलून करती पुन्हापुन्हा गाठ
मी मान्य करते की मी आहे ड्यु
मी मान्य करते की मी आहे ड्यु आयडी , पण अश्या आयडीची की ज्याने मी एकही पोस्ट केलं नाहीये आणी कायम रोमातच असते, पण कायकी ईथली कंपुबाजी बघुन कधी कधी फार चिड चिड होते आणी मग अश्या अवैध मार्गाचा स्विकार करावा लगातो भावना व्यक्त करन्यासाठी,
असो फार लिहलं.
(No subject)
मीब्ररा.... धन्य आहे ! एवढे
मीब्ररा.... धन्य आहे !


एवढे उद्योग करायला वेळ तरी कसा मिळतो रे तुला...?
या धाग्यावर्ची चर्चा वाचून मी स्वत:ला अगदीच बावळट समजायला लागलो आहे, खुश्शाल स्वतःच्याच नावाचा आय डी घेऊन फिरतोय....
मलाही आता एक डू आय घ्यावासा वाटू लागले आहे, कुणीतरी सुचवा बरं एखादा आय डी माझ्यासाठी....
काय घ्यावा बर्र.....
-जर्जर
-अललडूर्र
-भंगारवाला
-अजाण,
-दुर्लभ,
-ढ
-टोण्या
-ऊढाणटप्पू
-आलस्यानंद
-बोचरा
-भयंकर
-अरेरे
-अरेच्या
-फदफद्या
अललडूर्र<< कैक वर्षांनी ऐकला
अललडूर्र<<
कैक वर्षांनी ऐकला हा शब्द.
पण मला पुरुषवाचक च आय डी हवा
पण मला पुरुषवाचक च आय डी हवा बर का, बाई च्या अवतारानं, नावानं लिहिणं वैगैरे आपल्याला नाय ब्वॉ जमणार...
तेव्हा अजून काही डु आय फॉर एक्झांपल-
दोडक्या, फोपश्या, डंबलडोर, ग्रंबल्डू, डूडायडु, डूआय्डू, टमाट्या, बटाट्या, फंगस, दिवट्या, राजरोस, चेंगट, पिचकू, पीचपीच्या, पीचकारु, गंडभेरुड, बाष्कळ, नरक्या, टाळकुट्या, बत्तमीज....
पूरे पूरे नंतर पाहू....
>>पण मला पुरुषवाचक च आय डी
>>पण मला पुरुषवाचक च आय डी हवा बर का, बाई च्या अवतारानं, नावानं लिहिणं वैगैरे आपल्याला नाय ब्वॉ जमणार...
खरं आहे गिरीश, ते बेअरिंग सांभाळण्याचं सातत्य म्हणजे लैच तपश्चर्या लागते राव. ते आपल्यासारख्यांचे काम नोहे
खरय मंदार, मोदक
खरय मंदार, मोदक
या धाग्यावर दोन चार जण सोडले
या धाग्यावर दोन चार जण सोडले तर माझे बरेचशे फेक हजेरी लावून गेलेत..
मामी काय अभ्यासपूर्ण लेख
मामी काय अभ्यासपूर्ण लेख लिहीलाय... श्लोक तर एकदम परफेक्ट मॅच!!!
झक्काSSस!!! मस्त! अप्रतिम!!! आवडेश!!!!
ड्रिमगर्ल हा मामींचा ड्यू आडी नव्हं बर्का मंडळी (नैतर फार्फार स्तुती केली बघून तुमाला तसं वाटेल बिटेल
), माझा वरीजनल आय्डी आहे आणि आशाकुना ;)!!!
पूर्वी एक पार्ल्याचे बाबा आले
पूर्वी एक पार्ल्याचे बाबा आले होते, या त्यांच्याच आई का?
बर्याच आयड्या आणि
बर्याच आयड्या आणि ड्युआयड्यांनी मनमोकळेपणे आपलं मन, मनापासून इथे मोकळं केलं त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
ड्युआयड्यांचे आठवावे रूप, ड्युआयड्यांचा आठवावा प्रताप!
गिरिश, तुला एक फेक आयडी हवाय
गिरिश, तुला एक फेक आयडी हवाय ना...... मग "ड्युड" घे...
म्हणजे मूठ पण उघडली आणि काही दाखवलं पण नाही
मामी, शेवटच्या दोन पानांत
मामी, शेवटच्या दोन पानांत ओरिजिनल ड्युआयडीं ना कसलं भरतं आलय गं.....

तू म्हणजे अगदी त्यांच्या भावनांनाच हात घातलास........:डोमा: हल्ली कोण करतं ग कोणासाठी एवढं
मामी, मला वाटतं की, ड्युआयडींच्या सहाय्याकरिता झटणारी एखादी NGO सुरू कर तू....... "मैत्र ड्युआयडींचे"

सगळे ओरिजिनल आणि फेक गुण्यागोविंदाने एकत्र येऊन सभासदत्व स्वीकारतील......
फेक आय डी... आय डी घ्या आणि
फेक आय डी...
आय डी घ्या आणि प्रतिसाद फेका..
लिंग बदलून येणार्या
लिंग बदलून येणार्या ड्युआयड्यांप्रित्यर्थ :
इस लिंग बदलती दुनिया में, ड्युआयडियों की नियत ठीक नही
बकबक ना करो तुम बाफोंपर, अॅडमिन की भी नियत ठीक नही
मामी GR8 शेर मारलात !
मामी GR8 शेर मारलात !
मी आता लौकरात लौकर एक डू आय
मी आता लौकरात लौकर एक डू आय घेणाराय .. डुआयडुआयडु...
भूंगा, थान्कू
भूंगा, थान्कू
मामी अशक्य आहात
मामी
अशक्य आहात

आता मामी फॅन क्लब असा एक बा फ
आता मामी फॅन क्लब असा एक बा फ उघडायला हवा
आता मामी फॅन क्लब असा एक बा फ
आता मामी फॅन क्लब असा एक बा फ उघडायला हवा
>>>>
पहेले ये तो पता चलने दो की "मामी" वरिजिनल है के ड्युआयडी.....
मामी, लेख सुफळ, संपूर्ण झाला
मामी, लेख सुफळ, संपूर्ण झाला कि वो. आता साहित्य संमेलनात कशी वेगळी चूल मांडतात तशी डू मायबोली, सुरु करावी का ? तिथे मयसभेसारखे सगळेच फेक.
म्हणजे कविता तर वाटेल, पण तो लेख असेल.
फोटो वाटेल ते चित्र असेल.
चित्र वाटेल तो फोटो असेल.
तारिफ वाटेल तो टोमणा असेल.
टोमणा वाटेल तो प्रेमाचा सल्ला असेल.
शिव्याशाप वाटतील त्या शुभेच्छा असतील.
आणि मामी वाटतील त्या चक्क काकी असतील.... किंवा काकाही असतील..
>>>> तारिफ वाटेल तो टोमणा
>>>> तारिफ वाटेल तो टोमणा असेल.
टोमणा वाटेल तो प्रेमाचा सल्ला असेल.
शिव्याशाप वाटतील त्या शुभेच्छा असतील.
<<<<
हे म्हणजे अगदी पुण्यात आल्यासारखे वाट्टय! नै?
लिंबूकाका
लिंबूकाका
दिनेशदा, लई भारी कल्पना आहे
दिनेशदा, लई भारी कल्पना आहे की!
लिंबू >>>>>>

आणि मामी वाटतील त्या चक्क काकी असतील.... किंवा काकाही असतील >>> अरेच्चा दिनेशदा, बाकीच्या बर्याच जणांसारखी तुम्हाला पण मी ड्युआय वाट्टे की काय????
दिनेशदा लई भारी.
दिनेशदा लई भारी.
मामी, इथे नाही हो तिथे ! तिथे
मामी, इथे नाही हो तिथे !
तिथे तूम्ही काका व्हायचं.
लिंबू, सगळं पुणं म्हणजे डू आय आहे का ? *£$&()_)*"£%&&*(*
दिनेशदा, लीं टिं मामी ला
दिनेशदा, लीं टिं

मामी ला मिश्या असतील तर मामा म्हणावे लागेल
Pages