अखेरचा निरोप !

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2016 - 09:21

सारे काही ठिक असते तर आजच्या तारखेला मी वॅलेंटाईन डे वर धागा काढला असता,
पण सारे काही ठिक नाहीये..
म्हणून हा धागा.. माझा कदाचित अखेरचा धागा.. मायबोलीवरचा.. कदाचित अखेरची पोस्ट ठरेल.
यापुढेही मायबोलीवर ऋन्मेष हे नाव राहील.. पण केवळ आंतरजालीय ईतिहास बनून.. त्यातील ऽऽ आत्मा निघून गेला असेल.

काही वैयक्तिक कारणांमुळे मायबोलीपासून काही काळासाठीच दूर राहावे लागेल असे आधी वाटलेले. पण परिस्थिती अशी उद्भवली आहे की अनिश्चित काळासाठी (किमान तीन-चार वर्षांसाठी तरी नक्की) कायमचा रामराम घ्यावा लागेल Sad

असो, कारण अगदीच वैयक्तिक नसते तसेच ईतर कोणाशी नाही तर फक्त माझ्याशीच संबंधित असते तर नक्की शेअर केले असते.
पण ठीक आहे. काही प्रश्न अनुत्तरीत ठेवून जाण्यातही एक मजा असते.

गेले काही दिवस मायबोलीपासून दूर होतो पण संधी मिळताच एखादी चक्कर टाकली जायची, उपलब्ध असलेल्या थोडक्याच वेळात जमेल तितके अधाश्यासारखे वाचले जायचे, शक्य झाल्यास एखादा चालू स्थितीतील वादविवाद (उदा. धोनीवरील चर्चा) यावर मोजक्याच दोन ओळी खरडल्या जायच्या. पण आता ईतकेही शक्य नसणार.
तरीही पुढे मागे जेव्हा धोनीचा संघ भारताला आणखी एक विश्वचषक मिळवून देईल, महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने स्वप्निल जोशीला मराठीचा अधिकृत सुपर्रस्टार घोषित करण्यात येईल, सई ताम्हणकर हिंदी चित्रपटांमध्येही आपले नाणे खणखणीत वाजवून फिल्मफेअर पुरस्कार मिळवेल, शाहरूख खानचा चित्रपट त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी हजार कोटींचा व्यवसाय करत त्याला राष्ट्रीय पुरस्कार वा गेला बाजार ऑस्कर मिळवून देईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण नक्की येईल. आणि हिच माझी कमाई आहे जी मी इथून माझ्याबरोबर घेऊन जात आहे.

असो,
हा धागा बघताच आणि इथवर वाचताच खालील काही विचार चटकन तुमच्या मनात येतील वा आले असतील..

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
२) काही नाही, फेकतोय साला .......
३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता ....

या चारही विचारांना इथेच अनुक्रमे उत्तरे देतो .. कारण आता कदाचित मी प्रतिसादांतही नसेन

१) मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला .......
मायबोलीवर मी असंख्य धागे काढले. त्या त्या क्षणाला मला त्यात काही गैर वाटले नाही म्हणूनच काढले. पण प्रत्येक जण सारखे मत राखून नसतो त्यामुळे कोणालाही माझा एखादा वा अनेक धागे खटकण्याची शक्यता राहणारच होती. किंबहुना कित्येकदा मलाच नंतर वाटायचे की हा अमुक तमुक धागा काढायची गरज नव्हती, किंवा घाईघाईत काढला वगैरे. बस्स तसेच हा धागाही या अंतिम क्षणाला काढणे गरजेचे वाटले म्हणून काढला. जाता जाता मायबोलीवर मला गेल्या वर्ष-दिडवर्षात जे प्रेम आपुलकी विरंगुळा सन्मान(!) ईत्यादी मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जावेसे वाटले म्हणून काढला. पण नेमके आता शब्द सुचत नाहीयेत ती गोष्ट वेगळी..
तरी एका वाक्यात सांगायचे झाल्यास रोज सकाळी उठल्यावर आपण न चुकता सवयीने आरश्यात आपला चेहरा बघतो बस्स तसेच मायबोलीबाबत झाले होते..

असो, पण तरीही कोणाला हा धागा अनावश्यक वाटलाच, तर येत्या काळात जो कोणी काही काळासाठी वा कायमचा मायबोलीपासून दूर जाईल त्याने आपला अखेरचा निरोप सर्वांना देण्यास या धाग्याचा वापर केल्यास हरकत नाही. तेवढेच माझा धागाही वर येत जाईल, आणि माझ्या पश्चातही माझे नाव पहिल्या पानावर झळकत राहील Happy
जोक्स द अपार्ट, माझा धागा तळाशीच राहिला तरी चालेल पण अशी वेळ ईतर कोणा माबोकरावर येऊ नये.

२) काही नाही, फेकतोय साला .......
आयुष्यात मी माझ्यातील तीनच गोष्टींचा अभिमान बाळगला आहे. माझा समजूतदारपणा, निर्व्यसनीपणा आणि प्रामाणिकपणा.. तर दुर्दैवाने हे ना खोटे आहे ना यात कुठला स्टंट आहे.

३) बरे झाले, ईडा पीडा गेली .....
मी माझ्या स्टाईलने मायबोलीवर जगलो. ईतरांचा विचार केला नाही. हे माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या चांगले असले तरी काही लोकांना याचा त्रास झाला असणे स्वाभाविक आहे. याची जबाबदारी मला घ्यायलाच हवी. पण आता जायच्या वेळी सेंटी मारल्याचा आव आणत सॉरी बोलण्यात अर्थ नाही.. तर एंजॉय Happy

४) अरेरे, श्या, च्चचच, तसा बरा मुलगा होता....
मनापासून धन्यवाद Happy

..

वर मी स्वताला निर्व्यसनी म्हटलेय खरे,
पण आज सोडताना जाणवतेय, साले मायबोलीही एक व्यसन होते.

अलविदा शुक्रिया तकलिया,
शुभरात्री शब्बाखैर खुदा हाफिज
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जायची गरज नाही ऋन्मेष! वाचनमात्र राहता येईल.

बाकी निवड तुझी!

मायबोली हे असे संकेतस्थळ आहे जेथे मुक्तपणे व्यक्त होता येते. तू ह्या परवानगीचा मुक्तपणे वापर करताना कोणालाही दुखावले नाहीस. धाग्यांच्या दर्जाबाबत येथे काही खास निकष नसावेत, जोपर्यंत सांसदीय भाषेत धागा काढला जात आहे. मागे एकदा वेबमास्टरही कुठेसे म्हणाले होते की 'नवीन धागा काढण्याच्या प्रकाराचा बाऊ करू नका'. त्यामुळे खूप धागे काढलेस ह्याबाबत इतर सदस्य जे काही बोलले त्याचे वाईट वाटून घेऊ नकोसच. बाकी शाहरुख खानचा पिक्चर धंदा करेल, सई ताम्हणकर, स्वप्नील वगैरे काही भन्नाट करतील ही तुझी स्वप्ने धादांत खोटी ठरोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना! Wink Light 1

आणि येस्स, तू नेहमीच आठवशील. 'आत्ता तो असता तर' हे अनेकजण अनेकदा म्हणतील. Happy

बाकी हा धागा ट्यार्पीसाठी असला तर तो मी वाढवला असे समजून कोतबोमध्ये पुढचाही धागा काढून टाक आणि त्याचे शीर्षक ठेवः

'काहींना सगळे खरे कसे वाटते?'

-'बेफिकीर'!

अरेरे, असे रे काय ऋन्मेष?
तू माझा फेवरिट नं २.५ होतास.
नंबर २ तसा गेला, नं २.५ असा जातोय.
आता मी काय करू?

बरं, जाशील तिथे आनंदात रहा.
तुला ७८६ शुभेच्छा!
परत यावंसं वाटलं तर माबोवर नक्की ये.

खुदा हाफिज!

अरे अरे काय झालं याला? थोड्या काळाकरता माबोसंन्यास घेणार आहेस तर "अखेरचा..." असं म्हणू नये रे ॠन्मेष!

तुझी जी काय मजबूरी असेल ती लवकर दूर होवो!

अरे बाप रे..
कारण सांगुन जायच मित्रा..
तू पण ना, उगा काबरे असं केल असेल अशी कोडी टाकुन जातोय..
कोण पर्सनली धमक्या बिमक्या तर दिल्या नै न तुला ? नाही म्हणजे खरच इतक मनावर घेतलस म्हणुन विचारतेय.. बाकी तूला इथल्या लोकांनी विसरण अशक्य आहे हे मात्र नक्की..
थुज्जा जरा वेळासाठी करायची रे..अखेरचा वगैरे शब्द कशापायी ?

अरे वा बेफि इतक्या दिवसांनंतर दिसलात. कसे आहात?

बाकी शाहरुख खानचा पिक्चर धंदा करेल, सई ताम्हणकर, स्वप्नील वगैरे काही भन्नाट करतील ही तुझी स्वप्ने धादांत खोटी ठरोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना! Biggrin Biggrin Biggrin

तुझी वैयक्तिक अडचण लवकरात लवकर दूर होवो!
शक्य असेल तर रोमात रहा (म्हणजे सदस्यखाते रद्द होणार नाही).

प्रामाणिकपणा हा प्रामाणिक मनुष्याचा सर्वात मोठा अलन्कार आहे. त्याचे सर्वात जास्त महत्व केवळ स्वत:लाच असते (जगाला काही घेणे देणे नाही)... ऋन्मेश निरोप देताना माझे डोळे खडावले (डोळ्यातुन खडे बाहेर पडतात असा एक अज्ञाताच्या विज्ञानाचा धागा होता.... पाणी नाही पण दगडे/ मोती पडत आहेत) आहेत....

जाता जाता सर्व मायबोलीकरान्ना चटका लावुन गेलास. जगात जिथे आहे तिथे आनन्दाने रहा. मायबोलीवरुन गेले म्हणजे यायचे नाहीच असे नाही, परत ये, हवे तर दुसर्‍या किव्वा चौथ्या आय डी ने ये. तु परत आल्यास तुला कुणीच काही बोलणार नाही याची आम्ही सर्व खात्री देतो. तुला आमच्या सर्वान्तर्फे शुभेच्छा....

नको जाऊस, थांब ना.
प्लीज यार
सवय झालीय रे तुझी लिखाण आवडायचं रे तुझं मजा यायची वाचायला नव्हे अजूनही येते

उडावे परी ड्युड्युरुपू उरावे
- तुमच्या राकुंनी तुमच्या ऋन्मेषचा ट्यारपी तर नाही ना खाल्ला ?

टॉमी, चल बाळा कोरड्या नयनांनी शतपावली करून येऊ.

ऋन्मेष, खरोखर जात असशील तर अभिनंदन करावे इतका चांगला तुझा हा निर्णय आहे. खरेच इथे काहीही पडले नाही.
world is far better and romantic place outside. So enjoy your real life outside Maayboli. Best wishes forever!!!

गुड बाय , काळजी घे स्वतःची आणि गर्लफ्रेंडची सुद्धा ..;) ;-
जिथे राहशील तिथे आनंदात रहा
तुझ्या ज्या काही समस्या असतील त्या लवकर दूर होवोत अशी प्रार्थना
जमल तर परत ये , तुला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

मेला जाता जाताही नवा धागा काढून गेला >>> हा खरा ऋन्मेष. Happy

जे काही वैयक्तिक कारण अथवा समस्या आहे त्याचे लवकर निराकरण होवो ही सदिच्छा.

All the best! काळजी घे. आणि लवकर सगळ्या समस्या संपवून परत ये!

वर ताईंनी म्हंटले तसे,
७८६ शुभेच्छा!

जाता जाता एवढ तरी सांग कि तुझा ड्यू आयडी कोणता ?;) Wink Wink
बर ड्यू आयडी च नाव नको सांगूस पण एक गोष्ट खरी खरी सांग तुझा मायबोलीवर आणखी एक आयडी आहे ना ?

हे काय? दुकान बंद केलं?

जे काही वैयक्तिक कारण अथवा समस्या आहे त्याचे लवकर निराकरण होवो ही सदिच्छा. >>> नंदिनी + १

बरेच दिवस माबो वर दिसला नव्हतास म्हणून चुट्पुट वाटत होतीच तर आजचा हा धागा बघुन वाटल हं आला बाई नवा धागा ऋ बाळाचा.

पण वाचल तर काय डायरेक्ट निरोपाचीच भाषा. कारण काही ही असु दे जाण्याच पण तुझी आठवण तर येत राहिलच. निदान रोमात रहुन वाहच तरी रहा.

केअरला टेक ऑलवेज.

हे ड्यूआडी प्रकरण आहे तरी काय? जेव्हापासून मायबोली वाचतोय तेव्हापासून हा शब्द कधीना कधी वाचनात येतोच.

>>> ऋन्मेऽऽष | 13 February, 2016 - 19:51

सारे काही ठिक असते तर आजच्या तारखेला मी वॅलेंटाईन डे वर धागा काढला असता,
पण सारे काही ठिक नाहीये..<<<

>>> maitreyee | 13 February, 2016 - 22:49 नवीन

बाब्बाय कुऋ ! होतं ते चांगल्यासाठीच स्मित
<<<

मैदेवी, काहीतरी व्यक्तीगत असू शकेल.

ड्यूप्लिकेट आय डी
रूंमेस अरे राहू दे आता।बदल निर्णय।
आमची तुझ्याबद्दल असलेली मते जाणून घेण्यासाठी काढलेला हा धागा इ का??
;p

ए बाबा कायतरी काय बोलतोस? तुझी वै अडचण खरच असेल तर ती लवकर दूर होऊ दे. आणी आम्ही तुला छळायचो त्याबद्दल वाईट वाटुन घेऊ नकोस. काय आहे मला कोणी लहान भाऊ/ बहीण नाही त्यामुळे सतावायचे कोणाला? मग त्यातुन तू आयता जाल्यात गावला.

बाकी हजार साईट वर मी गेले तरी माबो नसेल तर मला करमणार नाही, तसेच तुझे होईल. म्हणून अलविदा वगैरे करु नकोस. मन शान्त होई पर्यन्त रोमात रहा. मग नवीन जोमाने परत ये. तुला अनेक शुभेच्छा.

बऽरं.

I hope it is not something health related. डिप्रेशन मधे लिहिले असशील कदाचित. असो.
Hope you get your issues resolved. All the best.

लिटल टॉमी बघ बघ
मायबोलीक्कर असे आहेत ना ! जर त्यांनी प्रतिसाद दिले नसते तर धागा पळालाच नसता. इतक्या वर्षात तुमच्या ड्युआयडीला पोरंबाळ होत नाहीत का ? एक दशांश लेंढारांनी पण हजेरी नाही लावली अजून ...

<<खरेच इथे काहीही पडले नाही.
world is far better and romantic place outside. So enjoy your real life outside Maayboli. Best wishes forever!!!>>
------ या मताशी मी असहमत आहे...

ऋन्मेश याने "काही वैयक्तिक कारणांमुळे मायबोलीपासून काही काळासाठीच दूर राहावे लागेल" असे वर स्पष्ट लिहीले आहे. <इथे काही पडले नाही > अशी कडवट कॉमेन्ट वाचुन मला अतिशय दु:ख झाले. असे मत का घडले असावे, येथे काय मिळत नाही ? असा प्रश्न मीच स्वत: ला विचारला...

माझ्या मते मायबोली खुप चान्गली आहे, आणि हे जग पण तेव्हढेच चान्गले आहे. मायबोली हे जगाचे छोटे प्रतिबिम्ब आहे असे माझे मत बनले आहे.... असे मला का वाटते?

गेल्या अनेक दशकातल्या (काही लोक शतकातल्या म्हणतात) सर्वात महत्वाच्या शोधाची घोषणा कुठे, कधी होणार आहे हे मला तसेच माझ्यासारख्या अनेकान्ना सर्वात प्रथम येथे म्हणजे मायबोलीवरच कळाली. माझा ग्रॅव्हिटी-वेव या विषयाशी शुन्य समन्ध आहे, त्यातले खुप काही कळते असेही नाही पण मला कमालीचे औत्सुक्य नक्कीच आहे. त्या बातमीचा मला आधी गन्धही नव्हता.
http://www.maayboli.com/node/57546

अनेक चान्गले धागे आणि विविधततेने नटलेले विषय येथे हातळले जात आहे.
(१) पर्यावरणा बद्दल जागृकता निर्माण व्हावी, माहिती मिळावी म्हणुन जिज्ञासा यान्चा
http://www.maayboli.com/node/53442
निकीत यान्चा धागा
http://www.maayboli.com/node/55970

(२) डॉ. शिन्दे यान्चे अनेक धागे. किती सोप्या शब्दात आणि ओघवत्या भाषेत ते किचकट अशा गोष्टीन्ची माहिती देतात.
http://www.maayboli.com/node/47839

डॉ शिन्दे यान्चे अनेक उपयुक्त माहितीने ओतप्रोत भरलेले धागे,
http://www.maayboli.com/user/30512/created

(३) आन्तरराष्ट्रीय घडामोडीन्वर चर्चा करायला अश्विनी यान्चा धागा,
http://www.maayboli.com/node/53273

(४) राजकीय घटनान्चे सर्व पडसाद येथेच बघायला मिळतात... दोन व्यक्ती, विचारात मतभेद आहेत आणि ते आहेत हे नाकारण्यात अर्थ नाही. वाद होतात, काही आय डी बाद होतात, बाद झालेले आय डी पुन्हा येतात (आणि मला त्यान्च्या येण्याचा आनन्दच आहे).

(५) हजेरी लावायला नको असे वाटणारा तरी तेथे दोन शब्द लिहायला लावणारा दु:खद घटनान्चा धागा...
http://www.maayboli.com/node/44524

(६) जगातल्या प्रत्येक देशाचे लक्ष वेधुन घेणारी निवडणुक (प्रत्यक्ष किव्वा अप्रत्यक्ष झळ बसणार आहेच)
http://www.maayboli.com/node/55037

(७) पाक कृतीचे, बागकामाचे शेकडो धागे... याचे किती लोकान्ना फायदे होत आहेत ?

(८) अडचणीत सापडल्यावर "कुणाशी तरी बोलायचे आहे" मधे विचारलेले भोळे प्रश्न आणि त्याना तितक्याच तत्परतेने आणि उत्साहाने येथे मिळालेली उपयुक्त मदत....

(९) वन्ध्यत्व या विषयावर साती यान्चा धागा
http://www.maayboli.com/node/35029

(१०) बेफिकीर, गायकवाड यान्च्या अनेक गझला...

(११) स्वच्छतेच्या बैलाला हा निधप यान्चा धागा....

(१२) श्रद्धा- अन्धश्रद्धा यावर निघालेले अनेक धागे...

(१३) ऑटिझम वर मवा यान्चे अनुभव...
.
.
.
(५६ - पन्चावन्नच का नाहीअशी शन्का आहे?) हे सर्व कमी होते म्हणुन मागच्या ७० वर्षातल्या बारिक सारिक घटन्नाचा आढावा घेणारे फुसके धागे आहे..... येथे काय नाही आहे ?
.
.
.

मला माहित असलेले अजुन किमान शम्भर धागे येथे लिहीता येतील. सारान्श किती विविध विषय येथे सहजगत्या हाताळल्या जातात. विविध, वेगळे विचार येथे वाचायला मिळणे ह्याला मी मला मिळालेली अत्यन्त दुर्मिळ अशी सन्धी समजतो. मराठी भाषा आवडते आणि हे सन्केत स्थळ मला मोठा आधार वाटतो. येथे मैत्री होते, अनेक लोक वैद्यकीय सल्ला विचारतात (साती, दिमा, शिन्दे आणि अनेक वैद्यक क्षेत्रातले जाणकार तज्ञ- धन्यवाद). कुठली वस्तू कुठे मिळेल, व्हेज जेवण कुठे मिळेल, आजी -काका -मामा गावाला जाणार असतील तर त्यान्नी प्रवासात कुठे काय बघावे, अमक्या गावी तमक्या गल्लीत व्हेज जेवणाची तसेच रहाण्याची उत्तम पण स्वस्त सोय यावर सल्ले हवे असतील तर सर्वात आधी मायबोलीच आठवते. मायबोलीकर तेव्हढ्याच तत्परतेने उत्तरे देतात. असे असताना कडवटपणा का निर्माण व्हायला हवा?

मायबोली वर काही त्रुटी जरुर आहेत आणि असतील तरी मला हे स्थळ त्याच्यात असलेल्या त्रुटीन्सकट कमालीचे आवडते आणि त्यात होणार्‍या चर्चेचा मी निर्भेळ आनन्द घेतो.

Pages