बागकाम अमेरिका -२०१६

Submitted by मेधा on 10 February, 2016 - 15:45

फेब्रुवारीमधे बागकामाचा धागा ? झोन ६ मधून ? आज सकाळी इथे ३-४ इंच बर्फ होतं रस्त्यावर! पण रेडिओवर फ्लावर शो च्या बातम्या सांगत होते. फ्लावर शो बघून आल्यावर कॅटलॉग न्याहाळणे, बिया मागवणे, सीड स्टार्टिंग ची तयारी करणे - एवढे करे पर्यंत माझ्या झोन मधे बहुतेक सीड स्टार्टिंगची घटिका समीप आलेली असते.

तर फ्लावर शो च्या बातम्या यायला लागल्या की मला भाजीपाला उगवण्याचे वेध लागतात म्हणून हा धागा .

http://theflowershow.com/

काही उपयुक्त दुवे
http://www.gardeningknowhow.com/ornamental/flowers/fgen/full-sun-plants.htm दिवसभर प्रखर उन मिळत असेल अशा जागांसाठी फुलझाडे

http://monarchbutterflygarden.net/milkweed-plant-seed-resources/ मोनार्क फुलपाखरे / सुरवंट यांच्या आवडीचे मिल्कवीड - राज्यनिहाय स्थानिक जाती .

स्टेम कटिंग घेऊन नवीन रोपे करण्याची पद्धत https://www.youtube.com/watch?v=hb23IGiL5T8

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे की प्रोड्यूस.

दुधी काय व्हरायटी ? पिवळे टॉमेटो पण एकदम मस्त.
बिया साठवणार ना पुढच्या वर्षासाठी

आमच्या इथली फ्रॉस्ट डेट १५ तारखेची आहे . पण काल काही काही भागात फ्रॉस्ट झालं Sad

मागच्या आठवडाभर हळू हळू मोगरा, अबोली, कडीपत्ता , जास्वंद वगैरे घरात आणले. शनिवारी आयरिसेस, क्रॉकोस्मिया, ब्लॅक आयड सुझन वगैरे लावले अंगणात.

आता पुढच्या वर्षीचा धागा निघे पर्यत फक्त घरातली बाग Happy

मी पण आणली सगळी झाडं घरात. दर वर्षी करते तो 'आता आणखी ट्रॉपिकल झाडं घ्यायची नाहीत' निश्चय पण करून झाला. आणि आता मेधाची पोस्ट वाचल्यावर लक्षात आलं की जास्वंद जळाली ती घ्यायची राहिलीच या वर्षी, प्राजक्त आहे यादीत बर्‍याच वर्षांपासून, जाई आणि कुंदा पण नाहीयेत. अरारा! मला आवरा Proud

ग्रीनहाउसचे कुणाला काही अनुभव? कॉस्कोच्या साइटवर बर्‍याच वेगवेगळ्या साइझचे आणि किंमतीचे बघितले पण नाही जमलं तंत्र तर इतकी वर्ष सांभाळलेली झाडं मरतील अशा भितीनं घेतलं नाही.

>>> मी पण आणली सगळी झाडं घरात. दर वर्षी करते तो 'आता आणखी ट्रॉपिकल झाडं घ्यायची नाहीत' निश्चय पण करून झाला.
+१
(सिंडीच देते ट्रॉपिकल झाडं मला - तिचीच चूक आहे! :P)

मंडळी, जमिनीत बल्ब लावायचे असतील तर खड्डे भरायला कुठली माती वापरायची ? पॉटींग सॉइलच का, की अजून काही वेगळं असतं ?

फॉल प्लँटींग झालं का?
आम्ही नवीन फक्त ट्युलिप आणलेत. गेल्यावर्षीचे ट्युलिप, डॅफो आणि hyacinth येतील परत बहुतेक.
आणि लसूण पण लावणार आहे यंदा.

पराग, गार्डन सॉईल वापर. मला वाटतं ट्युलिपसाठी वेगळी मिळते. मिळाली नाही तर गार्डन सॉईल.
गेल्यावर्षीचे ट्युलिप, डॅफो आणि hyacinth येतील परत बहुतेक.>>> जमिनीत असतील तर नक्की येतील. आमचे दरवर्षी येतात.

ओके थँक्स अंजली. बघतो माती. Happy

जमिनीत असतील तर नक्की येतील >>>> नाही कुंडीत आहेत. त्या कुंड्या वर्षभर बाहेरच होत्या. त्यांच्यात नवीन माती भरली आहे.

बल्ब प्लांटिंग साठी एक हॉलो सिलिंडर शेप टूल मिळते . ते खूपसून उचलले की त्यातच माती अडकून बाहेर येते. खड्डयात अर्धी मूठ बोनमील घालायचे. त्यावर बल्ब ठेवायचा. त्यावर टूल मधली माती परत घालायची.

बोनमील नको असेल तर चमचा भर स्लो रिलीझ फर्टिलायझर घालू शकता

टूल https://www.lowes.com/pd/Garden-Plus-5-in-Steel-Hand-Bulb-Planter/3035846 असे दिसते.

माझ्या कडच्या काही कुंड्यांत आणि एका छोट्या जागेतील मातीत जापनीज बीटलचे लारवाझ झाले आहेत, कर्लि ग्रब्जही म्हणतात त्यांना, हे लारवा पुर्ण वाढले कि झाडांची मुळं खाऊन टाकतात. कुणाला माहीत असेल तर प्लीज काहीतरी सोल्युशन सांगा. खुप आहेत. लोकल नर्सरीत जाणार आहे.

If the potting soil in the planters has grubs, your best option is to toss the soil. In the garden, Scotts and other companies have grub weed and feed products that include grub control ingredients. You can try to use those.

Call or email your local county's extension hotline. They should be able to provide zone specific information about timing and weather condition for application of grub control products.

आम्ही नवे घर घेतले. त्यात बॅकयार्डमध्ये तीन पाम ट्रीज आहेत. त्यातली दोन सॅन्ता अ‍ॅना विंड्स मुळे पार वाक्डी झाली आहेत. त्यातले एक छोटे आहे ते होम डीपोतील लोखंडी सळ्यांच्या आधारे उभे राहिले आहे परत. दुसरे आहे ते बरेच मोठे आहे. माळी म्हणतो कापावे लागेल. ते सळ्यंच्य आधारे उभे राहिल का? की खरेच कापावे लागते? :/

Pages