बागकाम अमेरिका -२०१६

Submitted by मेधा on 10 February, 2016 - 15:45

फेब्रुवारीमधे बागकामाचा धागा ? झोन ६ मधून ? आज सकाळी इथे ३-४ इंच बर्फ होतं रस्त्यावर! पण रेडिओवर फ्लावर शो च्या बातम्या सांगत होते. फ्लावर शो बघून आल्यावर कॅटलॉग न्याहाळणे, बिया मागवणे, सीड स्टार्टिंग ची तयारी करणे - एवढे करे पर्यंत माझ्या झोन मधे बहुतेक सीड स्टार्टिंगची घटिका समीप आलेली असते.

तर फ्लावर शो च्या बातम्या यायला लागल्या की मला भाजीपाला उगवण्याचे वेध लागतात म्हणून हा धागा .

http://theflowershow.com/

काही उपयुक्त दुवे
http://www.gardeningknowhow.com/ornamental/flowers/fgen/full-sun-plants.htm दिवसभर प्रखर उन मिळत असेल अशा जागांसाठी फुलझाडे

http://monarchbutterflygarden.net/milkweed-plant-seed-resources/ मोनार्क फुलपाखरे / सुरवंट यांच्या आवडीचे मिल्कवीड - राज्यनिहाय स्थानिक जाती .

स्टेम कटिंग घेऊन नवीन रोपे करण्याची पद्धत https://www.youtube.com/watch?v=hb23IGiL5T8

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा१, गुलाबाचा रंग छान आहे.

दरवर्षी मास्टर गार्डनर्सचे स्प्रिंग क्लिनीक्/गार्डन शो असतो. या शनिवारी शो पार पडला. माझ्या मैत्रीणीने भाजीच्या वाफ्यात कंपॅनियन प्लॅन्ट्स आणि त्यावर वाढणारे उपयोगी बग्ज यांचा वापर यावर प्रेझेंटेशन दिले. यावर्षी नवीन झाडे घ्यायची नाहीत असे ठरवले होते पण क्युबन ओरेगानो मिळाला त्यामुळे खरेदी झाली. जोडीला शेड गार्डनसाठी अर्ली स्प्रिंग -निळी फुलं वाला लंगवर्ट घेतला. माझ्याकडे अर्ली स्प्रिंगमधे पिवळी फुलं येणारी बॅरन स्ट्रॉबेरी आहे त्यासोबत लावेन.
यावर्षीच्या विंटरसोइंगमधून सेज, बॅकबेरी लिली, यारो. शर्ली पॉपी आणि बॅचलर्स बटन हे नवे पाहूणे. जोडीला नेहमीचे पाहूणे - कोलंबाइन रुबी पोर्ट आणि बार्लो पिंक, ड्वार्फ डेझी, कोरीऑप्सिस डॉमिनो आणि टिंक्टोरीया, यलो कोनफ्लॉवर, पिंक्स.
सध्या बागेत अ‍ॅलियम्स आणि कोलंबाइन फुललेत.

सेज आणि कोलंबाइन्स असतील तर हमिंग बर्ड्स येत असतील ना ?

इकडे १२ तारखेला हर्ब सोसायटीचा सेल असणार - तिथून सेज, मिंट च्या व्हरायटीज आणि नेटिव्ह कोलंबाइन आणणार आहे.

पुदिना घरी आणलेल्या काड्या लावून येतो का? मला असे सान्गितले होते की येतो. लावला पण सर्व काड्या जळुन गेल्यासारख्या वाटत आहेत. आणि कोथिम्बिर धणे पेरून येईल का? सध्या बॉस्टन मधे आहे. थन्डि आता कमी होत आहे.

विद्या.

पुदिन्याच्या काड्या थोडे दिवस पाण्यात ठेवा. खालून मुळं दिसायला लागली की मातीत लावा.
अंगणात लावणार असाल तर पुदिना इतस्ततः पसरतो हे लक्षात ठेवून लावा.

>>
सेज आणि कोलंबाइन्स असतील तर हमिंग बर्ड्स येत असतील ना ?>> मला एकदाच दिसला हमिंगबर्ड गेल्यावर्षी.

मंडळी,
ओरेगॉन स्टेट युनिवर्सिटीचा इंट्रो टु पर्माकल्चर कोर्स आजपासून सुरु होतोय. फ्री आहे. मी रजिस्टर केले. अजून कुणाला इंटरेस्ट असेल तर लाभ घ्यावा.
http://open.oregonstate.edu/courses/permaculture/

आणि कोथिम्बिर धणे पेरून येईल का? >>> हो. आणि त्याची फक्त पानं तोडत राहिलं तर नविन पानं फुटतात. आपण कोथिंबीरीची जुडी आणतो देठांसकट तशी नाही तोडायची.

शोनू स्वाती२,
-हर्ब्सची रोपं पेरेनियल असतात का? विंटरमध्ये आत आणावी लागतात ?
- तुमच्या बागांची वर्णन भारी असतात. फोटो पण बघायला आवडतील. नक्की टाका. Happy

माझ्या झोन मधे ( ६ ब) सेज, ओरेगानो, मिंट पेरेनियल आहेत.
लॅव्हेंडर, टॅरगॉन, थाइम - टेंडर पेरेनियल - म्हणजे दर वर्षी यायचे चांसेस विंटर किती इंटेंस होता, रोपं शेल्टर्ड होती का यावर अवलंबून असतात.

तुमच्याइथे हे सर्व + रोझ मेरी पेरेनियल असणार बहुतेक .
इथे पहा बरीच माहिती मिळेल http://extension.uga.edu/publications/detail.cfm?number=B1170

अगं यंदा नको. भाजी पॅच बनवायचा आहे पण आधी बरीच उठाठेव करावी लागणार आहे. पुढल्या वर्षी सांगेन.

मागच्या वर्षी लावलेली पॅंन्जीज आणि रोझमेरी. मी पहिल्यांदाच माझ्या अंगणात रोझमेरीची फुलं पाहतेय. इकडे तिकडे दिसली असती तर मला लॅव्हेंडर्सची जात वाटली असती. रोज चहा घेताना हे रंग पाहणॅ हा सध्या आवडीचा छंद आहे.

एंजॉय.
pansies (1).jpgRosemary.jpg

वेका मस्तच. तुमच्याकडे यार्ड च्या ऐवजी किंवा यार्डसोबत डेकही आहे का? डेकला असं फुलझाडांनीं लाईन केलेलं मस्त वाटतं.

आमच्याकडे ग्रीन लॉट असल्यामुळे फेन्स्ड यार्डचा पर्याय नाही पण यार्ड आहे. डेक होताच. आम्ही आळशीपणामुळे ओपन यार्डात लॉन वगैरे भानगड केली नाही आहे. नुसतीच मल्च. शेजार्^यांनी त्यांच्याकडे कुत्रे असल्यामुळे टर्फ केलंय.

तुमच्याकडे पावसापाण्याचा प्रश्न नाही तेव्हा एझी मेन्टेनन्स म्हणून टर्फ का?

यंदा आमच्याकडे तसा बर्‍यापैकी पाऊस झाला म्हणून मग त्या उत्साहात आम्च्याकडे जी काय जागा आहे तिकडे तीन गुलाबाची झाडं, एक हनीसकल, एक कॅलालिली, जॅपनीज् रेड मेपल, आणि समर पुरती छोटी छोटी फुलझाडं असं काय काय लावलंय. मला घाणेरी ची फुलं (ह्याचं इंग्लिश नाव विसरले, भारतात त्याला तणाचा दर्जा आहे कारण अनकंट्रोलेबली वाढतं म्हणे) आवडत आली आहेत पहिल्यापासून म्हणून त्याची रोपं, काही सक्युलन्ट्स हे ही लावलंय. बघू कितपत निभावता येतंय ते. मागचा फेल गेलेला प्रयत्न ह्या वर्षी परत एकदा करणार. लिलीज् ऑफ द व्हॅली चा. आता ह्याही वर्षी फेल गेला तर मात्र गिव्ह-अप.

मला घाणेरी ची फुलं (ह्याचं इंग्लिश नाव विसरले >> Lantana

लिलीज् ऑफ द व्हॅली >> आमच्या बॉस्टनमधल्या घराजवळ त्यांचा मळा होता एका भागामधे. मस्त मंद सुगंध दरवळत असायचा फुले येत तेंव्हा.

लिलीज् ऑफ द व्हॅली चा >> त्या इथे तणासारख्या वाढतात. गटग ला आलीस तर मी तुला पाहिजे तितकी रोपं फुकट देईन Happy

रोझमेरी, हार्डी जास्वंद, , लेमन्स, डाळिंब वगैरे तुमच्या इथे चांगली वाढावीत

विड्याचं पान, कढीपत्ता हे सुद्धा कदाचित बागेत व्यवस्थित सर्व्हाइव्ह् होतील .

मी आज patio containers साठी रेनबर्ड ड्रिप इरिगेशन लावले. backflow valve शोधायला लागणारी कटकट वगळता एकदम सुटसूटीत प्रकरण .देशाच्या वारीमधे पण ताप नाहि.

मेधा, Happy गटग ला येता आलं असतं तर आधी रेड मेपल घेतला असता मग लिलीज् ऑफ द व्हॅली Happy

असामी, धन्यवाद. लँटाना च. मला तर माहितही नव्हतं की इकडे नर्सरीत वाढवत असतील त्याची रोपं Happy

टर्फ इझि मेंटेनन्स म्हणून नाही. कुत्र्यांचे चिखलाचे पाय तसेच आतमध्ये येऊ नये म्हणून. ही माहिती कदाचीत तुला जास्त उपयोगी पडेल नंतर Wink

लिलिज ऑफ द व्हॅली काय आहे पाहायला पाहिजे. मी एका जातीची जास्मिन मोगरा न मिळाल्यामुळे लावलीय तिला दुकानातली फुलं संपल्यावर फुलंच आली नाहीयेत.

जास्मिन कॅटेगरी एकदाच बहरते ना? तो बहर ओसरला की परत वर्षभर नाही? तू पिंक जास्मिन म्हणतेस का?

हे रेनबर्ड ड्रिप इरीगेशन बघायला हवं. व्हेकेशन जवळ येत आहे.

लिलीज् ऑफ द व्हॅली पहिल्यांदा रे मध्ये (फक्त) ऐकलं, मग ब्रेकींग बॅड मध्ये रोप दिसलं आणि त्याच्या फुलांचा इल इफेक्ट कळला. मग प्रत्यक्ष फुलांचा फोटो बघून मात्र अगदी आपल्याकडे हवीतच असं वाटायला लागलं. पण लागतील तर शपथ. किंवा मग हे कॉस्ट्को मधल्या बल्बज् (?) चा प्रॉब्लेम असेल. पुढच्या वेळी नर्सरीतून आणून बघेन.

मोगर्‍याला, जाई-जुईला फुलं आली की एक संपूर्ण सीझन फुलं येत रहातात. इथे मी जो मोगरा घेतला आहे होमडिपोतून त्याला पण एकामागून एक फुलं येतात फॉल लागेपर्यंत.

इकडे बे एरियात पिंक जास्मिन पॉप्युलर आहे (कळ्या गुलाबी असतात पण फुलं पांढरी). ही जास्मिन अतिशय लो मेन्टेनन्स आहे आणि वर्षातून एकदाच बहरते.

मी फेन्स वर स्टार जास्मिनचा वेल लावला आहे तो पण लो मेन्टेनन्स आहे. पिंक जास्मिन एव्ह्डा घमघमणारा सुगंध नाही आहे पण मंद सुवासाची भरपूर फुलं येत राहतात संपूर्ण सीझन.

>>डेलियाचे कंद लावले, त्याला पानं फुटली आहे>> पग्या, कॉस्कोतून कंदांची पिशवी आणली का? माझ्याकडे पिशवी आली आहे पण मुहूर्त नाही लावायला.

माझ्या घरच्या मदन बाण मोगरा आणि अबोलीला यावर्षी एप्रिल पासूनच फुलं यायला लागलीत.

मास्टर गार्डनर क्लास मधे ऐकलं होतं की सी वीड मधे प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स जास्त प्रमाणात असतात. म्हणून हे पॅकेट ऑर्डर केले होते. घरातल्या सर्व झाडांना रीपॉट करताना हे पण मिक्स करते आहे .

http://www.amazon.com/Down-Earth-5-Pound-1-0-1-2-7813/dp/B000COBZBM?ie=U...

डेकला असं फुलझाडांनीं लाईन केलेलं मस्त वाटतं. >> +१

Pages