बागकाम अमेरिका -२०१६

Submitted by मेधा on 10 February, 2016 - 15:45

फेब्रुवारीमधे बागकामाचा धागा ? झोन ६ मधून ? आज सकाळी इथे ३-४ इंच बर्फ होतं रस्त्यावर! पण रेडिओवर फ्लावर शो च्या बातम्या सांगत होते. फ्लावर शो बघून आल्यावर कॅटलॉग न्याहाळणे, बिया मागवणे, सीड स्टार्टिंग ची तयारी करणे - एवढे करे पर्यंत माझ्या झोन मधे बहुतेक सीड स्टार्टिंगची घटिका समीप आलेली असते.

तर फ्लावर शो च्या बातम्या यायला लागल्या की मला भाजीपाला उगवण्याचे वेध लागतात म्हणून हा धागा .

http://theflowershow.com/

काही उपयुक्त दुवे
http://www.gardeningknowhow.com/ornamental/flowers/fgen/full-sun-plants.htm दिवसभर प्रखर उन मिळत असेल अशा जागांसाठी फुलझाडे

http://monarchbutterflygarden.net/milkweed-plant-seed-resources/ मोनार्क फुलपाखरे / सुरवंट यांच्या आवडीचे मिल्कवीड - राज्यनिहाय स्थानिक जाती .

स्टेम कटिंग घेऊन नवीन रोपे करण्याची पद्धत https://www.youtube.com/watch?v=hb23IGiL5T8

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

NE मधून एकदम hot weather climate मधे आल्यावर gardening strategy बदलावी लागतेय. इथे जॅपनी मेपल कसा लावता येईल ह्याचा शोध करतोय.

झोन ८बी मध्ये काय काय भाज्या, फुलझाड लावता येतील?
घरात कुंड्यातुन ५ गुलाब आणी जास्मिन लावले आहेत २ वर्षांपुर्वी. छान फुले येतात एप्रिल, मे पासुन. अजुन काय लावता येईल?

तुमच्या झोनप्रमाणे झाडे लावा असामी
शेवगा, विड्याच्या पानांची वेल, मधुमालती , बकुळ , चिकू, गुलमोहर, चिंच, - फ्लोरीडा मधे पाहिलेत . तुमच्या इथे पण लावता येतील . केळी लावल्यास तर केळफुलं , गाभा, कच्ची केळी, रोजच्या जेवणाला केळीचं पान सर्व काही घरच्या घरी मिळेल.

जपानी मेपल झोन ५-६ वाल्यांना लावू देत Happy

अनुश्री, बहुतेक कॉमन भाज्या - वांगी, मिरची, टॉमेटो, कॉर्न, बटाटे, शेंगा, मुळा, गाजर लावू शकता. स्प्रिंग मधे पातीचा कांदा, पालक, अरुगुला , केल, सॅलड मिक्स लावू शकता .

प्रत्येक ( निदान लोअर ४८ मधे ) राज्यात लँड ग्रँट विद्यापीठे county extension नावाचे ऑफिस चालवतात. त्यांच्या वेबसाईटवर किंवा फोन करुन त्यांच्या ऑफिसातून एकदम काउंटी स्पेसिफिक् माहिती मिळेल.

माझे विंटर सोइंग निम्मे झाले. उरलेले मार्चमधे करणार. यावर्षी स्टारबक्सनी दुधाचे जग्ज बॅगेत भरुन तयार ठेवले होते.

जपानी मेपल झोन ५-६ वाल्यांना लावू देत >> नाही ग, जॅपनीज मेपलचे वेगवेगळे कल्टीवार्स आहेत जे इथे वाढतात असे कळलय. आता कुठे मिळणार हे शोधायचे, केळी इथे extreme temp मूळे राहात नाहीत.

केळी डॅलस मध्ये येत नाहीत. शोभेची केळी मैत्रिणीने पुजेसाठी लावली आहे. पण गराज मध्ये आणुन ठेवते.
असामी जॅपनीज मॅपल डॅलस मध्ये सुरेख येतो. माझ्याकडे आता साईट नाही. पण मिळाली कि टाकते.

आम्ही यावेळी पॅटीओ एक्स्टेंशन वगैरे अपग्रेडींग करतोय. रेझ्ड बेड वगैरे फेन्स नविन केल्यामुळ काढून टाकले. त्यामुळ अगदी नव्यान सुरुवात. बघू कसं काय जमतं.

गेल्यावर्षी लावलेले डेलिया, जास्वंद, झेंडू वगैरे सुरेख वाढले. फक्त वेदर वॉर्म आहे नंतर, आणू नंतर करता करता थंडी अचानक वाढली आणि गेलीच ती झाडं !

झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वाळवून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या लावता येतील. शिवाय नवीन झाडं आणू.
स्प्रिंगमध्ये ट्युलिप, डॅफो फुलायची वाट बघतो आहे. (शिवाय मैत्रेयीने सांगितलेले ते अजून एक बल्ब लावले आहेत. नाव विसरलो!! ) फॉलमध्ये लसूण लावायचा प्लॅन होता पण राहीलच.

मला तुळस लावायची आहे. आमच्या इथे रोप मिळत नाही. मंजिर्‍या कुठे मिळतील? अमॅझॉन वर आहेत बिया पण त्यावरच्या प्रतिक्रिया फार चांगल्या नाहियेत. रोप येत नाही अस खूप जण म्हणतायत.
seedsofindia वर अजुन स्टॉक मध्ये नाहियेत. कुठे मिळतील रोपं किंवा मंजिर्‍या?

जवळपासच्या इंडियन स्टोअरमधे, देवळात , किंवा बाल विहार टाइप टिकाणी विचारा तुळशीच्या रोपांसाठी.

गार्डनवेब डॉट कॉम साइटवर सीड एक्सचेंज फोरम आहे. तिथे पण विचारु शकता.

अरे वा मस्त खरेदी.

परागच्या कमेंटवरून आठवलं, फॉलम्ध्ये लावलेला लसूण आणि मागच्या समरमधली केल अजून आहेत. (लसणाच्या पात्या पहा ते मध्येच काही टुक्कार उगवलंय तिकडे दुलर्क्ष करा :P) मला वाटत नाही खाली लसूण वगैरे काही उगवला असेल या गर्दीत पण केव्हा काढू? मला पीज लावायचे आहेत. हा फोटो दोने-तीन आट्।अवड्यापुर्वीचा आहे. kaleandGarlic.jpg

आमच्या काउंटीच्या मास्टर गार्डनर लोकांचं काल एक वर्कशॉप होतं .

पेन स्टेट विद्यापीठाचे एक्स्टेंशन वेगवेगळ्या जातीच्या फुलझाडांचे, भाज्यांचे ट्रायल्स घेत असतात. गेल्या दोन तीन वर्षातल्या ट्रायल्समधे आढळलेल्या आखूडशिंगी , बहुदुधी टॉमेटो जाती सांगितल्या काल एका बाईंनी

अति उष्ण हवामानाचा फारसा ताण न पडणार्‍या जुलै , ऑगस्टमधे या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य चालवून घेणार्‍या , टॉमेटोचे कॉमन पेस्ट / डिझीज या सर्वांसाठी प्रतिकार शक्ती असणार्‍या जाती

Rutgers
Siletz
Roma
Defiant
Mountain Magic
Matt’s wild
Legend

मॅट्स वाइल्ड हे छोटे ग्रेप टॉमेटो आहेत . भरपूर फळे, अतिशय छान चव आहे म्हणे.

दिवसभर सूर्य आग ओकतो अशा कोपर्‍यांमध्ये तगतील अशी फुलझाडं सुचवाल का? एका कोपर्‍यात सुर्यफुलं लावायचा विचार आहे.

सकाळी तास-दोन तास ऊन असेल अशा कोपर्‍यात काय लावावे?

दिवसभर उन असेल अशा जागी मधे ओरिएंटल पॉपीज, पिओनी , ( वसंताच्या सुरुवातीला येणारी फुले) , गुलाब, रोझ ऑफ शॅरन ( ऐन उन्हाळ्यात) , लावू शकता.

अझॅलिया, रोडोडेंड्रॉन हे थोडा वेळ थेट उन अन उरलेला वेळ मॉटल्ड प्रकाश असेल अशा ठिकाणी चांगले वाढतात . मोठ्या वृक्षांची थोडी फार सावली असेल तर हॉस्टा सुद्धा चालतील .

मेधा, यादीसाठी धन्यवाद.

कम्युनिटी गार्डनसाठी रोमा टॉमॅटोची रोपं तयार होत आहेत. चेरोकी पर्पलचे रोपही तयार केलेय. मात्र यावर्षी नवे डेक आणि इतर बागेची कामे त्यामुळे भाज्यांचे वाफे करणार नाही.

सिंडी Coreopsis नि coneflower भयंकर आनंदाने वाढतात सूर्य आग ओकत असेल तर.

अरे वा. लावून बघतो. आग ओक भागच आहे मोस्टली सगळा.
Nasturtium गेल्यावर्षी लावलेला. भरपूर फुलं अगदी फॉल संपेपर्यंत येतात. पाणी घालायला विसरलो तर फार मनावर घेत नाहीत, माफ करून परत ताठ मानेने उभी राहतात.

इतक्या दिवसात काहीच अपडेट नाहीत ? कुठे गेले सगळे माळी - माळीण लोक ?

नव्या घरात अंगणामधे सर्वत्र हरणांचा मुक्त संचार आहे त्यामुळे हर्ब्स सगळे कुंड्यामधे लावून डेक वर ठेवून बघणार आहे .

जुन्या घरच्या अंगणातून बरेचसे होस्टा, थोडे कोलंबाईन, पिओनीज, ब्लीडिंग हार्ट आणून इथे लावलेत.
लायलॅकची कटिंग्स लावलीत . ती रुजली तर मग अजून एक दोन मैत्रीणींकडे सुंदर शेड्स वाले लायलॅक आहेत . त्यांच्या कडे भिक्षांदेहि करणार Happy

आम्ही यंदा नॉक आऊट रोझेस आणली आहेत. नर्सरीतली बाई म्हणे विंटरमध्ये आत आणायची गरज नाही. ते फेब्रुवारीत क्लास घेतात की त्या झाडांचं कटींग वगैरे कसं करायचं.
डेलियाचे कंद लावले, त्याला पानं फुटली आहेत. लिलिचे कंद लावलेत. शिवाय झेंडूच्या पाकळ्या गेल्यावर्षी वाळवून ठेवल्या होत्या, त्याही लावल्यात. जर्बेराला खूप फुलं येत आहेत. त्यांचे रंग खूपच ब्राईट आहेत. फोटो टाकेन आता.
काकडी, टमॅटो लावलेत. त्यांच्या कुंड्यांना केज लावल्यावर भराभर वाढायला लागली झाडं. दोन टमॅटो आले पण.
ह्यावेळी ट्युलिप आणि डॅफोचे कंद तसेच ठेऊन देणारे कुंडीत. "मोस्ट ऑफ देम विल ब्लुम अगेन" म्हणे! बघुया काय होतय.

Pages