Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजी शिजवताना (किंबहुना दुध
@फार्स विथ द डिफरंस(किती हो तुमचा आयडी मोठा ,कॉपी केला)
भाजी शिजवताना (किंबहुना दुध वगळता इतर सर्व वेळी) मी नेहमी मोठीच आच ठेवतो...शिजते ही बरोबर, त्यामुळे जेव्हा युट्यूबवर व्हिडिओ पहाताना मध्यम आच - मोठी आच ऐकतो त्यामागचे प्रयोजन काय हेच समजत नाही(काहीतरी असणार नक्कीच).>> सायन्स च मला माहित नाही, जेवणातलं जेव्हडं कळतं त्यावरून सांगते,प्रत्येक भाजीचं टेक्श्चर ,आकार ,तिच्यात असलेला पाण्याचा अंश ,करायची पद्धत किंवा हवी असलेली भाजीची कंसिस्टंसी आणि हवी असलेली चव यावर गॅस ची आच कमी, मिडीयम आणि जास्त ठरवतात. जसे की गवार ,फरसबी ,कोबी यासारख्या भाज्या थोड्या फास्ट गॅस वर थोड्या वेळात शिजू शकतात पण तेच दुधी ,वांग यासारख्या भाज्या जास्त वेळ फास्ट गॅस वर ठेवण्यापेक्षा आधी फास्ट परतून पाणी घालून कमी व मिडीयम आचेवर छान शिजतात. ब्रोकोली ,कॅप्सीकम बेबी कॉर्न यासारख्या क्रंची भाज्या बनवण्यासाठी मात्र सॉते ही पद्धत म्हणजेच फास्ट गॅसवर थोड्या वेळासाठी भाजल्या जातात जेणेकरून भाज्या थोड्या क्रंची पण शिजलेल्या व मूळ रंग खुलावणार्या राहाव्यात यासाठी वापरतात.
गुलाबजाम मात्र मंद आचेवरच तळावे लागतात जेणेकरून गुलाबजाम चा रंगही छान येतो व आतून बाहेरून व्यवस्थित शिजले जातात व पाकात भिजल्यावर सॉफ्ट व मॉइस्ट आणि भारी लागतात. आणखी एक गोष्ट म्हणजे भाज्या शिजवताना गॅस जर फास्टच ठेवला तर भाज्या आतून नीट शिजतीलही परंतु बाहेरुन रंग बदलेल व जास्त आच लागल्याने चव जळकी लागेल आणि जर का फास्ट मध्ये करताना जरा लक्ष इकडे तिकडे गेलं तर भाजी जळू शकते हाही एक तोटा आहे.
सिमरन, गॅस किती ठेवायचा
सिमरन, गॅस किती ठेवायचा ह्याची पोस्ट तुमच्याकडून येणं अगदी नावाला साजेसं आहे
(No subject)
अमितव
अमितव
गॅस किती ठेवायचा ह्याची पोस्ट
गॅस किती ठेवायचा ह्याची पोस्ट तुमच्याकडून येणं अगदी नावाला साजेसं आहे Happy>>>मला नाही कळला जोक ,प्लिज समजवा.
सिमर न Simmer मंदाग्नी
सिमर न
Simmer मंदाग्नी
'सिमर' करणे म्हणजे उत्कलन
'सिमर' करणे म्हणजे उत्कलन बिंदूच्या थोडा आधी पदार्थ शिजवणे.
येस्स! मंदाग्नी ! धन्यवाद ॠतुराज. एकदम चपखल शब्द.
आता समजलं इंग्लिश लगेच लक्षात
सायन्स च मला माहित नाही,
सायन्स च मला माहित नाही, जेवणातलं जेव्हडं कळतं त्यावरून सांगते,प्रत्येक भाजीचं टेक्श्चर ,आकार ,तिच्यात असलेला पाण्याचा अंश ,करायची पद्धत किंवा हवी असलेली भाजीची कंसिस्टंसी आणि हवी असलेली चव यावर गॅस ची आच कमी, मिडीयम आणि जास्त ठरवतात.>>> धन्यवाद सिमरन, आयडी तोडा...नुसतं फार्स लिहीलं तरी चालतयं की...असो...मलाही सायन्सपेक्षा त्यामागचं लॉजिक हवं होतं.... दिलेल्या उदाहरणांमुळे प्रश्नचिन्ह नाहीसे झाले....एक गोष्ट जी मी पुर्णपणे दुर्लक्षिली होती ती म्हणजे<<<<तर भाज्या आतून नीट शिजतीलही परंतु बाहेरुन रंग बदलेल>>> कोणताही पदार्थ बनविल्यानंतर जरी तो चवीला व्यवस्थित झाला असेल पण त्याचा रंग अपेक्षेप्रमाणे राहीला नसेल तर तो ही स्वयंपाकी परिपुर्ण नसल्याचा इंडीकेटर आहे.
अमितव
धागा चुकलाय का माहीत नाही.
धागा चुकलाय का माहीत नाही. सल्ला हवा आहे.
बटरस्कॉच फ्लेवर फालुदा करायचाय. तर त्यासाठी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम योग्य ठरेल? (व्हॅनिला आणि बटरस्कॉच वगळता, काहीजणांना ते नको वाटतंय. )
१० जणांसाठी इडली सांबार
१० जणांसाठी इडली सांबार चटणीचा अंदाज कृपया सांगा.
६ मोठे -४ लहान आहेत.
गोडात नारळीभात आहे. त्याचाही अंदाज सांगा.
दोन्ही मुख्य अन्नघटक तांदूळच
दोन्ही मुख्य अन्नघटक तांदूळच होईल ह्या मेन्यू मध्ये, नारळीभात किंवा इडली ह्या पैकी एकच पदार्थ तांदूळाचा ठेवा दुसरा कोणता तरी दुसरा करा.
तरी हाच मेन्यू फिक्स असेल तर सत्तर ते ऐंशी इडल्या ( मिडीयम साईजच्या ) दीड नारळाची त्यात डाळं घालून केलेली सरबरीत चटणी आणि अंदाजे दोन अडीच लिटर सांबर एवढ पुरेस होईल. दोन ते अडीच कप तांदळाचा ना भा पुरेल.
सांबारात डीप करून जे इडली
सांबारात डीप करून जे इडली खातात त्यांना सांबार बऱ्यापैकी जास्त लागते. आणि तेंव्हा इडल्या कमी लागतात. तर तुम्ही सर्व्ह कसे करणार त्यावर पण प्रमाण ठरेल.
६ मोठे, ४ लहान असतील सरासरी ६ इडल्या पुरतील असे वाटते.
१/२ किलो नारळाचे किती मोदक
१/२ किलो नारळाचे किती मोदक होतील?
बटरस्कॉच फ्लेवर फालुदा
बटरस्कॉच फ्लेवर फालुदा करायचाय. तर त्यासाठी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम योग्य ठरेल? (व्हॅनिला आणि बटरस्कॉच वगळता, काहीजणांना ते नको वाटतंय. )>> काजु-द्राक्ष,पिस्ता किवा कुठलही नटी फ्लेवरच आइस्क्रिम चालाव.
धन्यवाद मनीमोहोर,punekarp
धन्यवाद मनीमोहोर,punekarp
मेनू फिक्स होता.तांदूळ-तांदूळ असे डोक्यात च आलं नाही. पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन.मनीमोहोर- चटणीचा,भाताचा अंदाज परफेक्ट.
सांबारात डीप करून जे इडली खातात त्यांना सांबार बऱ्यापैकी जास्त लागते.>> सांबार भरपूर घेतले सर्वानी.
७० इडल्या बनवल्या,३ लहान वाट्या डाळीचे सांबार (सरसरीत केले)मनीमोहोर यांच्या अंदाजाने चटणी,भात केला.
सांबार, नारळी भात व्यवस्थित पुरले. १५ इडल्या,थोडी चटणी उरली. ते लोकांना डब्यात दिले.
Pages