अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@फार्स विथ द डिफरंस(किती हो तुमचा आयडी मोठा ,कॉपी केला)

भाजी शिजवताना (किंबहुना दुध वगळता इतर सर्व वेळी) मी नेहमी मोठीच आच ठेवतो...शिजते ही बरोबर, त्यामुळे जेव्हा युट्यूबवर व्हिडिओ पहाताना मध्यम आच - मोठी आच ऐकतो त्यामागचे प्रयोजन काय हेच समजत नाही(काहीतरी असणार नक्कीच).>> सायन्स च मला माहित नाही, जेवणातलं जेव्हडं कळतं त्यावरून सांगते,प्रत्येक भाजीचं टेक्श्चर ,आकार ,तिच्यात असलेला पाण्याचा अंश ,करायची पद्धत किंवा हवी असलेली भाजीची कंसिस्टंसी आणि हवी असलेली चव यावर गॅस ची आच कमी, मिडीयम आणि जास्त ठरवतात. जसे की गवार ,फरसबी ,कोबी यासारख्या भाज्या थोड्या फास्ट गॅस वर थोड्या वेळात शिजू शकतात पण तेच दुधी ,वांग यासारख्या भाज्या जास्त वेळ फास्ट गॅस वर ठेवण्यापेक्षा आधी फास्ट परतून पाणी घालून कमी व मिडीयम आचेवर छान शिजतात. ब्रोकोली ,कॅप्सीकम बेबी कॉर्न यासारख्या क्रंची भाज्या बनवण्यासाठी मात्र सॉते ही पद्धत म्हणजेच फास्ट गॅसवर थोड्या वेळासाठी भाजल्या जातात जेणेकरून भाज्या थोड्या क्रंची पण शिजलेल्या व मूळ रंग खुलावणार्या राहाव्यात यासाठी वापरतात.

गुलाबजाम मात्र मंद आचेवरच तळावे लागतात जेणेकरून गुलाबजाम चा रंगही छान येतो व आतून बाहेरून व्यवस्थित शिजले जातात व पाकात भिजल्यावर सॉफ्ट व मॉइस्ट आणि भारी लागतात. आणखी एक गोष्ट म्हणजे भाज्या शिजवताना गॅस जर फास्टच ठेवला तर भाज्या आतून नीट शिजतीलही परंतु बाहेरुन रंग बदलेल व जास्त आच लागल्याने चव जळकी लागेल आणि जर का फास्ट मध्ये करताना जरा लक्ष इकडे तिकडे गेलं तर भाजी जळू शकते हाही एक तोटा आहे.

'सिमर' करणे म्हणजे उत्कलन बिंदूच्या थोडा आधी पदार्थ शिजवणे. Happy
येस्स! मंदाग्नी ! धन्यवाद ॠतुराज. एकदम चपखल शब्द.

सायन्स च मला माहित नाही, जेवणातलं जेव्हडं कळतं त्यावरून सांगते,प्रत्येक भाजीचं टेक्श्चर ,आकार ,तिच्यात असलेला पाण्याचा अंश ,करायची पद्धत किंवा हवी असलेली भाजीची कंसिस्टंसी आणि हवी असलेली चव यावर गॅस ची आच कमी, मिडीयम आणि जास्त ठरवतात.>>> धन्यवाद सिमरन, आयडी तोडा...नुसतं फार्स लिहीलं तरी चालतयं की...असो...मलाही सायन्सपेक्षा त्यामागचं लॉजिक हवं होतं.... दिलेल्या उदाहरणांमुळे प्रश्नचिन्ह नाहीसे झाले....एक गोष्ट जी मी पुर्णपणे दुर्लक्षिली होती ती म्हणजे<<<<तर भाज्या आतून नीट शिजतीलही परंतु बाहेरुन रंग बदलेल>>> कोणताही पदार्थ बनविल्यानंतर जरी तो चवीला व्यवस्थित झाला असेल पण त्याचा रंग अपेक्षेप्रमाणे राहीला नसेल तर तो ही स्वयंपाकी परिपुर्ण नसल्याचा इंडीकेटर आहे.

अमितव Lol

धागा चुकलाय का माहीत नाही. सल्ला हवा आहे.
बटरस्कॉच फ्लेवर फालुदा करायचाय. तर त्यासाठी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम योग्य ठरेल? (व्हॅनिला आणि बटरस्कॉच वगळता, काहीजणांना ते नको वाटतंय. )

१० जणांसाठी इडली सांबार चटणीचा अंदाज कृपया सांगा.
६ मोठे -४ लहान आहेत.
गोडात नारळीभात आहे. त्याचाही अंदाज सांगा.

दोन्ही मुख्य अन्नघटक तांदूळच होईल ह्या मेन्यू मध्ये, नारळीभात किंवा इडली ह्या पैकी एकच पदार्थ तांदूळाचा ठेवा दुसरा कोणता तरी दुसरा करा.
तरी हाच मेन्यू फिक्स असेल तर सत्तर ते ऐंशी इडल्या ( मिडीयम साईजच्या ) दीड नारळाची त्यात डाळं घालून केलेली सरबरीत चटणी आणि अंदाजे दोन अडीच लिटर सांबर एवढ पुरेस होईल. दोन ते अडीच कप तांदळाचा ना भा पुरेल.

सांबारात डीप करून जे इडली खातात त्यांना सांबार बऱ्यापैकी जास्त लागते. आणि तेंव्हा इडल्या कमी लागतात. तर तुम्ही सर्व्ह कसे करणार त्यावर पण प्रमाण ठरेल.
६ मोठे, ४ लहान असतील सरासरी ६ इडल्या पुरतील असे वाटते.

बटरस्कॉच फ्लेवर फालुदा करायचाय. तर त्यासाठी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम योग्य ठरेल? (व्हॅनिला आणि बटरस्कॉच वगळता, काहीजणांना ते नको वाटतंय. )>> काजु-द्राक्ष,पिस्ता किवा कुठलही नटी फ्लेवरच आइस्क्रिम चालाव.

धन्यवाद मनीमोहोर,punekarp
मेनू फिक्स होता.तांदूळ-तांदूळ असे डोक्यात च आलं नाही. पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन.मनीमोहोर- चटणीचा,भाताचा अंदाज परफेक्ट.

सांबारात डीप करून जे इडली खातात त्यांना सांबार बऱ्यापैकी जास्त लागते.>> सांबार भरपूर घेतले सर्वानी.

७० इडल्या बनवल्या,३ लहान वाट्या डाळीचे सांबार (सरसरीत केले)मनीमोहोर यांच्या अंदाजाने चटणी,भात केला.
सांबार, नारळी भात व्यवस्थित पुरले. १५ इडल्या,थोडी चटणी उरली. ते लोकांना डब्यात दिले.

पंधरा माणसांसाठी पावभाजी करायची आहे. भाज्या काय प्रमाणात घ्याव्यात? मी शिजताना कांदा घालत नाही. मटार, बटाटे, फ्लॉवर, भो.मि., टॉमेटो किती लागतील साधारण ?

मला १५ लोकांसाठी पावभाजी करायची आहे. कोणी बटाट्याचा आणि इतर लागणार्‍या भाज्यांचा अंदाज सांगू शकेल का?>> मध्यम आकाराचे 12-15 बटाटे. पाऊण की फ्लाॅवर, 5-6 टो. , 7-8 कां, दोन वाट्या मटार, 4 सि. मि. कमी पडू नये एवढेच बघायचं. उरली तरी संपतेच.

Submitted by मेधावि on 28 January, 2019 - 20:27
लोकांच्या पोटभरीच्या भाजीला एक ते दीड किलो बटाटे; किलोभर टोमॅटो ची ताजी प्युरे (ही चांगली शिजवली तर फारच कमी होते आता वाचायला खूप वाटलं तरी) आणि त्यानुषं(?)नं पुढलं साहीत्य - फ्लॉवर पाऊण किलो, अर्धा किलो कोबी, अर्धा किलो मटार, आणि अर्धा ते पाऊण किलो सिमला. टोटल यील्ड - ३ ते साडेतीन किलो व्हावं असं मला वाटतं. तेव्हढी भाजी १५ लोकांना पुरेल. पावभाजी मध्ये भाजी जास्तच लागते ही बेसलाईन.

Submitted by योकु on 29 January, 2019 - 14:06

मेधावी योकू यांच्या पोस्ट च्या प्रमाणात मी 15 जणांसाठी केली होती पावभाजी ,जरा जास्त घेऊन प्रमाण कारण आमच्या कडे दबाके खाणारे लोकं होती .त्यामुळे खाणारे किती खाणार यावरून प्रमाण ठरवा दुसरा पदार्थ नसेल तर जरा जास्तीची बनली तरी पुरते.पण वरचं प्रमाण बरोबर आहे. टिप्स आणि रेसिपी साठी ही https://www.maayboli.com/node/72251शीतलकृष्णा यांची रेसिपी फॉलो करते.

यावेळी दिवाळीत मी माझ्या मते आतापर्यन्त सर्वात जास्त कुकिंग चा उरका पाडला Happy २८ मोठे आणि ७-८ लहान मुले होते. सर्व मराठी ग्रुप.
माझा मेनू विदर्भ स्पेशल होता. आलेल्यांपैकी १ कुटुंब सोडले तर कुणाला फारसा विदर्भातल्या चवींचा अनुभव नव्हता. लोकांनी मस्त ताव मारला, नंतर पार पेंग येत होती बसल्या बसल्या, म्हणजे जेवण सुपर हिट झाले.
कोणाला हवा असल्यास उपयोगी होईल म्हणून माझे कॉम्बिनेशन इथे देऊन ठेवते.
१)सावजी चिकन - सुमारे ५.५- ६ पाउंड चिकन घेतले. मसाला घरीच केला. मिपावरची एक हमखास रेसिपी आहे ती वापरली.
२)भोपळ्याची बाकर भाजी - रस्सा भाजी, साधारण अडीच पाउंड भोपळा वापरला.
३)मुगवड्यांची भाजी - अंगासरशी ग्रेवी किंवा ड्राय भाजीच म्हणता येईल. मुगवड्या तयार मिळतात त्या घेतल्या. ३ पाकिटे वापरली. २०० ग्रॅ ची असतात बहुतेक.
४) गोळा भात. - साधारण ६.५- ७ वाट्या तांदूळ आणि माणशी २ गोळे असा अंदाज धरला. ममोंचा मागच्या १६व्या पानावरचा मसालेभाताचा अंदाज इथे कामी आला .
५) पुडाच्या वड्या - कोथिंबीर ६ जुड्या घेतल्या. त्यात तीळ खोबरे, दाण्याचा कूट घातल्यामुळे अजून व्हॉल्यूम वाढतो. लांब अशा ३२-३४ वड्या झाल्या त्या सर्व करताना अर्ध्या कट करून ठेवल्या होत्या. व्यवस्थित पुरल्या.
६) कढी - दह्याचे मोठे २ डबे घेतले. दीड लागले.
७) गुलाबजाम - ८० - विकत आणले. बरेच उरले. दिवाळीत सारखेच खूप गोड खाणे होते त्यामुळे लोकांनी कमी खाल्ले असावे.
८) पोळ्या ५०-विकतच आणल्या. अजून १० एक्स्ट्रा घेऊन ठेवल्या होत्या पण लागल्या नाहीत.
९) मुलांसाठी पास्ता - १ हाफ ट्रे.
रस्सा भाज्या आणि कढी गरम ठेवायला इन्स्टा पॉट फार सोपे पडले. लोकांकडून आधी उसने घेऊन ठेवले.
वरचे प्रमाण छान पुरले. म्हणजे काही अगदी संपून गेले असे झाले नाही की ( गुजा सोडता) फार जास्त उरले असेही नाही.

भारी मेन्यू!मुगवडयांची भाजी इंटरेस्टिंग वाटतेय रेसिपी असेल तर द्या ना किंवा फोटो .
आणि सावजी चिकनची सापडली नाही .
https://www.misalpav.com/node/13654ही मिपा वरची सापडली हीच आहे का हमखास वाली.

तेरा मोठे (व्यवस्थित, विनासंकोच पोटभर खाणारे) आणि एक लहान यांच्यासाठी खालील प्रमाणात पावभाजी केली. सोबत दहीभात केला होता.
७-८ मध्यम आकाराचे बटाटे
फ्लॉवरचे दोन गड्डे
अर्धा किलो फ्रोझन मटार
चार भोपळी मिरच्या (मोठ्या)
नऊ टॉमेटो
चारपाच कांदे वरून घ्यायला
बटर (भाजी करायला+ पावांना लावायला) एकूण- अर्धा किलो अधिक शंभर ते दोनशे ग्रॅम
पाव - साठ आणले होते, पन्नास संपले.
थोडी भाजी शिल्लक राहिली. अजून एखाददोघांना पुरली असती.
एकूणात बरोबर जमलं.

मैत्रेयी, मस्तच मेन्यू... एक ही पनीर चा पदार्थ नाही म्हणून छान वाटलं. भाताचा अंदाज Happy
वावे , बरं झालं इथे लिहून ठेवलंस, पुढे खूप उपयोगी पडतं हे.

Pages