अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर माझ्या पोस्ट मधे हे लिहायचे राहिले ( आता एडिट करण्याची वेळ गेली) - पाहुण्यांपैकी सगळेच नॉन व्हेज खाणारे नव्हते, व्हेज ओन्ली ८ तरी असतील. सगळेच खाणारे असते तर चिकन चा अंदाज बदलेल. आणि शिवाय जेवणात इतर भाज्या, गोळाभातसारखी इतर अट्रॅक्शन्स नसतील तरी बदलेल. आत्ता स्वातीने प्रश्न विचारला तेव्हा हे लक्षात आले. अंदाज घेण्याचा बाफ आहे त्यामुळे हे मुद्दाम लिहितेय.

मला 25 मैत्रिणी साठी (सगळ्या 40 च्या आसपास) रगडा पॅटिस घरीच बनवायचा आहे. मध्यम आकाराचे 35/40 पॅटिस बनवायचे आहेत.. तर 2 किलो बटाटे पुरतील का आणि सफेद वाटाणे एक किलो पुरतील का ? ( किंवा किती लागतील ? आणि पॅटिस मध्ये थोडे मटार घालेन.) आणि गोड आणि तिखट चटण्या किती लागतील. आणि ज्यांना आवडते त्याना दही पण. ( मला एकटीलाच करावे लागेल हे सर्व बाकी कोणी नाही आहे घरी करणारे ) आधी एकच पॅटिस सर्व्ह करेन.. नंतर कोणाला हवा असेल तर देईन परत... मला उगाचच कोणी प्लेटमध्ये घेऊन फेकलेले आवडत नाही.. आणि पॅटिस खाऊन झाल्यानंतर कुल्फी.. आणि मग जाताना हळदीकुंकू लावून गिफ्ट बॅग देईन.. (संध्याकाळी 4.30 ची वेळ दिली आहे.. म्हणजे 5.00 पर्यंत येतील आणि 7.00 पर्यंत घरी जातील. ) म्हणजे मग मला जरा पसारा आवरून रात्रीच्या जेवणाची तयारी करता येईल.
माझ्या नवीन घरी पूजेला बऱयाच जणी आल्या नव्हत्या तर त्यांना माझे नवीन घर बघायचे आहे. मग म्हटले पूजेच्या दिवशी गप्पा टप्पा पण नाही झाल्या.. तर ज्यांनी नाही बघितले घर त्यांना घर पण बघता येईल आणि थोडेसे खाणे पिणे पण होईल.

कशाला इतका घाट घालतेस श्रवु?
एकटीच आहे म्हणतेस ना?
भेळ कर छान चटकदार! किंवा मिसळ.
एकदम करून ठेवता येते.
एकेक करून सर्व करायची गोष्ट ठेवूच नको.

श्रवु, प्रमाण तुला एक्सपर्टस सांगतीलच. रगडा पॅटीस च्या पॅटीसमध्ये मटार घालू नकोस.
मी रगडा करताना त्यात आले लसणीबरोबर हिरव्या मिरच्या वाटून घालते.त्यामुळे वेगळी हिरवी चटणी करत नाही.चिंचेच्या चटणीमध्ये तिखट ( मिरची पावडर) असतेच.पाव किलो चिंच ,तितकाच गूळ,जिरे आणि हलकीशी मिरची पावडर यांची चटणी तुला पुरावी.

पॅटीस अडल्या दिवशी करून तांदळाच्या पिठात घोळवून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवता येतील. चटणीही आधी करून फ्रीजमध्ये ठेव.

मैत्रिणी यायच्या अगोदर पॅटीस तळून ठेव. आयत्यावेळी मावेतून काढता येतील.

स्वानंदी +१
रगडा पॅटीस २५ माणसांसाठी करायचं हे खूपच जास्त काम आहे. मिसळ किंवा भेळ हे जास्त सोयीस्कर पर्याय आहेत.

एकेक करून सर्व करायची गोष्ट ठेवूच नको. >>> १०००+++

मिसळ बेस्ट आहे. वाढण्यापूर्वी एकदा गरम करायची.

किंवा चाट आयटम ठेवायचाच असेल तर पाणीपुरी ठेव. फिलींग उकडून ठेवायचे. चटण्या व पाणी मांडून ठेवायचे.

रगडा पॅटिस पण एकदा करुन मोठ्या ट्रे मध्ये ठेवले, बाजुला रगडा, कांदा, शेव इ. ही बाऊल्स मध्ये काढून ठेवले की प्रत्येकजण आपापले करुन घेईल ना?

अलीकडेच आमच्याकडे एका समारंभासाठी रगडा पॅटीस, उपमा, तिळाची वडी , केक आणि चहा/कॉफी असा बेत होता. तिळाची वडी सोडून सगळं ऑर्डर केलं होतं त्यामुळे अंदाज नाही सांगता येणार मला पण अमित म्हणालाय सगळं टेबलावर मांडून ठेवलं होतं आणि प्रत्येकानी घेतलं, वाढण्याचा झोल नाही झाला.

जरा बेत बदलुन समोसा चाट केलस तर फक्त छोले करावे लागतिल समोसे विकत आणता येइल...किवा तुमच्याकडे हॅश ब्राउन पॅटि मिळतात का त्याने रगडा पॅटिसच काम एकदम सोप होत..
किवा गरम करा भानगड नको असेल तर दाबेली करता येतिल..आधि बनवुन ठेवता येते...गारसुद्धा चान्गली लागते.

मध्यम आकाराचे 35/40 पॅटिस बनवायचे आहेत.. तर 2 किलो बटाटे पुरतील का आणि सफेद वाटाणे एक किलो पुरतील का ? ??
तंगम फिलिप्स यांच्या पुस्तकात ६० टिक्की साठी अडीच किलो बटाटे आणि ५०० ग्रॅम ब्रेड असे माप दिलेले आहे.

सत्तर ते ऐंशी अप्पे करायचे असतील तर रवा किती घ्यावा लागेल? मी मध्यम रवा घेऊन त्यात पाउण पट साखर घालून पाच सहा तास नारळाच्या दुधात भिजत ठेवते. पाऊण किलो रवा पुरेल का? कृपया सांगावे.

मागच्याच महिन्यात भिशीसाठी मी कॉर्न कटलेट केले होते. त्यावेळी सव्वा किलोच्या थोडेसेच वर बटाटे घेतले होते. दोन कणसं घेतली होती. माझ्या नशिबाने लोक कमी आले म्हणून त्यामुळे पुरले. मोजले नाहीत पण 40 च्या घरात झाले.
बटाटा तेलात विरघळत होता,घरात कॉर्न फ्लोअर नव्हते.तांदळाचे पीठ+ बेसन घातले होते.घट्ट असे कटलेट करता येत नव्हते.त्यामुळे कसेबसे कटलेट जन्माला आले.चवीला मस्त झाल्यामुळे बरं वाटले.

तेव्हा रगडा पॅटीससाठी बटाटे सव्वादोन किलोपेक्षा जास्त घ्या. वाटाण्याचा अंदाज नाही. घरात ब्रेड किंवा कॉर्न फ्लोअर आवर्जून आणा. पॅटीस आदल्या दिवशी करून तांदळाच्या कोरड्या पिठात घोळवून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.

आप्प्याचा अंदाज वाचायला आवडेल.

धन्यवाद रानभुली. अप्पे मोठे नाहीतर मध्यम साइजचेच करणार आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेत तसेच प्रमाण घेऊन करीन.

मला तूर+चणा+मूग+उडद डाळींच्या २:१:१:१ प्रमाणातल्या मिश्रणाचे एकूण १ किलो डाळीचे घट्ट वरण करायचे आहे कूकरमध्ये. रोज लागते तेवढ्या साईझच्या पॅक्स मध्ये फ्रीज करायचे आहे तेव्हा किती माणसे आहेत हा प्रश्न नाही.
यासाठी पाण्याचे प्रमाण किती घ्यावे?
१. डाळी भिजवत ठेवल्या नाहीत तर
२. आठतास भिजत ठेवून ते पाणी काढुन फ्रेश पाणी घालुन शिजवायचे असेल तर.

डाळी भिजत ठेवल्यात तर डाळी बुडून अगदी बोटाचं अर्धा पेर वर इतकं पाणी पुरेसं होईल.
भिजत ठेवल्या नाहीत तर दुप्पट लागेल पाणी.
मध्यम गॅस ठेवा आणि दोन शिट्ट्या आल्यावर दोन पाच मिनिटे गॅस कमी ही ठेवा.
एक वाटी डाळ प्रयोग म्हणून अशी शिजवून पहा.

ममो धन्यवाद. १/२ कप मिश्र डाळींचे करून पाहिलेय आणि एक अंदाज आलाय.
१ किलोचे करताना सारखेच प्रमाण घेतले तर जास्त होईल असे वाटले (किंवा ओव्हर थिंकिंग म्हणा). थोडे करतो तेव्हा थोडे जास्त पाणी लागते - शिटी लावण्यापूर्वी थोडी वाफ जाऊ देणे, शिट्टी होताना बाहेर जाणारी वाफ झाकण आणि कुकरच्या वरच्या बाजुला कंडेन्स होऊन राहिलेले पाणी. एक किलोचे करतानाही एवढ्याच पाण्याचा लॉस होईल तो प्रमाणानुसार वाढणार नाही.
तुमच्या सांगितलेल्या प्रमाणात पाव किलो, मग अर्धा किलो करून बघतो आधी.

-----

अर्धा किलो किन्वा एका वेळी कुकर मध्ये शिजवून ठेवताना लागणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात असा फरक जाणवला थोडा शिजवतो त्या तुलनेत. मउ झाला होता बराच. मग त्याचा उपमा रव्याचे उप्पीट आहे असे समजुन संपवला होता. (अर्धा+ किलोस त्याचे प्रमाण १:१ आणि थोडा क्रंची ठेवण्यास १ शिट्टी, जास्त क्रंची ठेवण्यास ०.९ शिट्टी - म्हणजे शिट्टी होण्याच्या जस्ट आधी गॅस बंद करणे हे पुढल्या प्रयोगांती कळले.)

बिंगो मानव!
कुकरमध्ये शिजवताना पाणी हे जिन्नस बुडून अधिक अर्धा पेर/ एक-दीड पेर अशा प्रमाणातच घ्यावे. वजनी प्रमाणात घेऊ नये. भांड्याचा घेर कमी जास्त झाला, उदा जास्त निमुळते किंवा पसरट भांडे असेल तरी ढोबळ मानाने एक पेर नियम लागू पडतो, कारण वाफ होण्याचा वेग आणि तुम्ही जी वर कारणे सांगितली तीच.
त्याच भांड्यात वजनी प्रमाणात पाणी घेतले तर नक्की अंदाज चुकेल.
यावर क्रिस अशोकने पुस्तकात छान विश्लेषण केले आहे. तुम्ही जी कारणे सांगितली तीच कारणे आहेत. यात आजी/ परंपरा जे एक पेर सांगते त्यात खरंच 'शास्त्र असतं ते!' म्हणण्यास जागा आहे. Happy

२ वाट्या रोल्ड ओट्स (स्टील कटचे ही केलेले आहेत) मिक्सर मधुन बारीक करुन घ्यायचे.
त्यात मिरचीचे बारिक तुकडे, बारिक चिरलेला कांदा, किसलेलं आलं आणि तीन टेबल स्पून दही, मीठ आणि (ऐच्छिक) एक-दीड चमचा रवा, आणि लागेल तसं पाणी घालुन कालवून घ्यायचं. वेळ असेल तर तासभर भिजवुन ठेवायचं. नसेल तर १५-२० मिनिटे ही पुरते.
आयत्यावेळी हवा असेल तर चिमुटभर सोडा चालुन (नाही घातला तरी हलके होतात) आप्पेपात्रात तेल घालुन नेहेमीप्रमाणे आप्पे करायचे. पेप्पर रसम बरोबर अशक्य भारी लागतात. चटणी बरोबर किंवा नुसते ही छान लागतात. तेल जरा सढळ घातलं की एकदम क्रिस्पी होतात.
पोटभरीचा नाश्ता/ जेवण होतं. कॉम्प्लेक्स कार्ब्स + फायबर जातात.
वनडिश मील करुन त्यातच भाज्या वगैरे घालण्यापेक्षा रंगित सिमला मिरची, काकडी, गाजर, सॉटे केलेली फरसबी, ब्रॉकोली बरोबर खावी. यात प्रोटिन जात नाहीत. त्यासाठी इतर उपाय करावे.

Pages