गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह),(इबुक लिंक सह)

Submitted by अवल on 31 January, 2016 - 10:33

ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले Happy
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले Happy
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
मनात आणलं तर महिला काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. चेन्नईच्या सुबश्री नटराजन यांचे समर्थ नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल प्रशासनाखाली अनेक अनोळखी महिला एका झेंड्या खाली एकत्र आल्या; मदर्स इंडिया क्रोशे क्विन्स! फेसबुक, व्हॉट्स अप अशा माध्यमांतून आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून हा समान धागा गुंफला गेला, आणि त्यातून विणले गेले हे जगातील सर्वात मोठे, महाप्रचंड ब्लँकेट!
सुरूवातीला केवळ 5000 स्क्वेअर मीटरचा टप्पा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा टप्पा सहज ओलांडला गेला, नव्हे दुपटीपेक्षा जास्त संख्येने पार पडला.
या सोहळ्याची ही काही क्षण चित्रे!
सुबश्री मॅम, चेन्नईची टीम आणि जगभरातील सर्व सख्यांना खूप खूप अभिनंदन आणि खुप सगळे धन्यवादही___/\___ Happy
IMG-20160131-WA0023.jpgIMG_20160131_210701.jpgIMG-20160131-WA0019.jpg

आणि ही काही प्रकाशचित्रे मोठे ब्लँकेट डिटॅच्ड करून डोनेट करतानाचे Happy
IMG-20160201-WA0066.jpgIMG-20160201-WA0065.jpg

दान केलेल्या संस्थांचे तपशील
12654109_465844260274772_4125609257434619208_n.jpg
अधिक फोटो फेसबुकवरती पाहू शकता.

या गिनिज रेकॉर्डचे इबुक इथे बघता येईल:

https://www.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fdrive.google.com%2Ffile%2...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मधे लोकर असतो तो असा मधेच कापला तर उकलून जाईल ना?>>>>>>>>छोटी छोटी एकाच मापाची ब्लँकेट करून जोडलेली आहेत. ती वेगळी करता येतील. अशीच योजना आहे. Happy

अवल खूप खूप अभिनंदन तुझं आणि समस्त स्त्रियांचं ज्यानी या उपक्रमात भाग घेतला.

हा विक्रम करण्याची कल्पना कोणाची?
त्यासाठी नियोजन कसं केलं गेलं?
त्यासाठी विविध राज्यातील्/देशातील स्त्रियांना सामिल करून घेण्यासाठी काय आखणी केली?
विविध स्त्रियांनी विणलेली विविध आकाराची ही ब्लॅंकेट्स कशी जोडली? आणि कुठे जोडली?
इतक्या मोठ्या ब्लँकेटचे पुढे काय करणार? (बहुधा विविध भाग करून गरिबात वाटणार असं वाचल्याचं आठवतं आहे)
या उपक्रमात भाग घेतलेल्या स्त्रियांना लोकर्/सुया पुरवल्या गेल्या होत्या की त्यानी हे स्वखर्चाने केले?

ह्या बद्दल माहिती वाचायला आवडेल.

पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन.. Happy

धन्यवाद सर्वांना Happy
बी तुम्हाला समजते न विणताही, तर विणणाऱ्या व्यक्तींना तर नक्कीच इतके समजेल ना Lol रच्याकने http://www.maayboli.com/node/55428?page=1 इथली माझी 7 सप्टेंबरची पोस्ट वाचा. समजेल

अवल, तुमचा गैरसमज होतो आहे. तुम्ही स्त्रियांनी जे काही केले ते वि. वि. करुनच केले असेल ह्यात शकांच नाही. मी फक्त पुढे ह्याचा उपयोग कसा होई ह्याबद्दल विचारत होतो. जर छोटे तुकडे केले तर मधेच लोकर कापल्या जाईल असा प्रश्न उभा राहिला. उपयोग कसा झाला ह्याबद्दल सचित्र वाचायला आवडेल.

पुन्हा एकदा अभिनंदन.

लिंक वे.वे. काढून वाचेन.

वि.वि. == विचार विनिमन
वे. वे. = वेळात वेळ

अभिनंदन! अभिनंदन!

तुमच्या पूर्ण टीमला आणि त्या टीमच्या नेतृत्वाला सलाम!

डोनेशनचे फोटो देखिल मस्त.

Pages