आपली मायबोली भविष्यात कशी असेल?

Submitted by पियू on 21 January, 2016 - 08:49

नमस्कार मायबोलीकरहो..

इथे असणार्‍या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..

तर.. भविष्यात (म्हणजे नक्की कोणत्या वर्षी ते मला ठरवता येत नाहीये.. आपापली कल्पनाशक्ती लढवा) आपली मायबोली (म्हणजे आपलं हे लाडकं संकेतस्थळ) कसं असेल असं तुम्हाला वाटतं? इथे कश्या प्रकारचे लोक आणि लेख असतील? आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन इथे येऊन किबोर्ड बडवत असु का? सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं तशीच चालू असतील का? काय बदल झाले असतील? काही सुचतंय का?

तुम्हाला काय वाटतं? इथे लिहाल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भविष्यातले धागे:
१)प्रवासाच्या धाग्यात मला मंगळावर जायचंय . चंद्रावर जायचंय . कस जाऊ ? असे प्रश्न येतील

२) घर घेण अशक्यातली अशक्य गोष्ट त्यामुळे आम्ही सगळेच मुलाबालान्सकट वृद्धाश्रमात राहतो. आत्ता तिथे कसे वागावे. ( मुलांशी/ नातवंडांशी ) असे प्रश्न विचारले जातील .

३ ) आम्ही सगळेच वृधाश्रमातल्या मेस मध्ये खातो . शी काय भयानक जेवण. अगदी जेववत नाही काय कराव? "पोट "बिघडण्यापासून कशी सांभाळावीत असे प्रश्न विचारले जातील

४ ) परत म्हातारपणी कीर्तन /भजनाला जायची फ्याशन येईल. फक्त भजन /कीर्तनाचे विषय बदलतील .सिनेमातल्या नट /नट्यांच्या कहाण्या कीर्तनात-भजनात ऐकवल्या जातील आणि सगळे जण .त्यावरून गप्पा मारतील आणि भांडतील Happy

५) माय बोली जिवंत ठेवण्यासाठी मायबोलीवर भांडला नाहीत तर रोमातले आयडी उडवण्याच्या धमक्या दिल्या जातील. रोमातले आयडी खडबडून जागे होतील आणि भांडणार्या आयडीनचे क्लासेस लावतील. त्यामुळे भांडणार्या आयडीनची चलती . रोजच्या रोज एक "धुम्मसचक्री "होणारे धागे निघालेच पाहिजेत असा दंडक घातला जाईल . मायबोलीकर सगळेच म्हातारे झाल्याने दुसरा टाईमपास काय म्हणून भांडणात भाग घेतीलच. ऑफिस मध्ये जाणार्या मायबोलीकरांची गळचेपी.( मायबोलीवर पुरेसा सहभाग नाही म्हणून )

मृण्मयी Lol
लिम्ब्या Lol

भविष्यात ऋन्मेऽऽष ची मुले माबोवर त्यांच्या गफ्रें/बॉफ्रें आणि चांगल्या-वाईट सवयींविषयी लिहितील. तसेच त्याची धागा काढण्याची क्षमता ऋ पेक्षा अनंतपटींनी जास्त असेल.

महत्वाची परीक्षा, वैयक्तिक आयुष्यातल्या काही दुर्दैवी घटना यामुळे तसेही इथे काही लिहीत नव्हते. पण नंतर बहुतेक अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी काहींचे प्रतिसाद वाचताना इथे एका ग्रुपचा वरचष्मा झालाय असे वाटल्याने मी त्या वेळी रागाने मायबोली सोडली. त्या वेळी राजकारणाची माहिती असणे हे प्रगल्भ असल्याचे लक्षण आहे असा माझा समज झाला होता. इथे नक्कीच त्या विषयावर दर्जेदार वाचले आहे.

आत्ता शेतकरी आंदोनाच्या वेळी मला मायबोलीची आठवण झाली. त्या आंदोलनावर इथे काही दिसले नाही त्यामुळे जराशी घुश्श्यातच होते. पण थोड्याच दिवसात इतर काही सदस्यांमुळे राजकारण गेले खड्ड्यात या निष्कर्षाप्रत आले. मायबोलीवर येऊन सिद्ध करणे हास्यास्पद आहे. त्या ऐवजी मायबोलीचा उपयोग चांगल्या कारणासाठी केला पाहीजे हे लक्षात आले.

मायबोलीनेही लेखमालेला पहिल्या पानावर स्थान दिले आहे. मला अचानक दिसले. आधी सांगितले असते तर ते स्टेशन रंग लावून दिले असते. Lol

Pages