आपली मायबोली भविष्यात कशी असेल?

Submitted by पियू on 21 January, 2016 - 08:49

नमस्कार मायबोलीकरहो..

इथे असणार्‍या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..

तर.. भविष्यात (म्हणजे नक्की कोणत्या वर्षी ते मला ठरवता येत नाहीये.. आपापली कल्पनाशक्ती लढवा) आपली मायबोली (म्हणजे आपलं हे लाडकं संकेतस्थळ) कसं असेल असं तुम्हाला वाटतं? इथे कश्या प्रकारचे लोक आणि लेख असतील? आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन इथे येऊन किबोर्ड बडवत असु का? सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं तशीच चालू असतील का? काय बदल झाले असतील? काही सुचतंय का?

तुम्हाला काय वाटतं? इथे लिहाल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)मंगळावरचे आय्डी एकमेकांना हिणवताना 'क्या पृथ्वीसे आये क्या?' असे म्हणतील. त्या काळात अलिबाग समुद्राखाली गेलेले असेल .
२) होसूमीही या घ. चा ४०००(की ५०००?) पोस्टींचा विक्रम अबाधित असेल. कारण अशी मालिका पुन्हा होणे नाही.
३) मायबोलीवरच्या सर्व लिखाणाचा बॅक अप एका कालकुपीमध्ये पुरून ठेवलेला कुणाला तरी सापडेल. आणि त्यावर संशोधनामुळे मराठीच्या प्राध्यापकांना धडाधड पीएच्ड्यांची घबाडे मिळतील. त्या काळच्या मराठीला पुन्हा 'अभिजात' असा दर्जा मिळण्यासाठी ह्या उत्खननाचा पुरावा दिला जाईल. ऋन्मेष आणि राकु या आय्ड्यांवर विशेष संशोधन होऊन हे दोघे समकालीन नव्हते आणि विभिन्न संस्कृतीतले होते असा निष्कर्ष निघेल. त्यासाठी त्या दोघांच्या भाषेवर प्रचंड संशोधन होईल. प्रत्येक शब्द आणि वाक्य 'अ‍ॅनलाय्ज़र'मध्ये टाकून तपासले जाईल. गफ्रे संस्कृती आणि धागासंस्कृती या दोन्ही संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होत्या असेही म्हटले जाईल.

चुकलं.फुसके बार-साहित्य संमेलन असं धाग्याचं नाव असतं तर लक्ष गेलं असतं.पण आता उशीर झाला आणि कवित्व उरलंय.

भांडणे, खेचाखेची Biggrin
हेल्मेट, टोप, मेक अप Lol
पुण्याला या Proud

अरे अजिबात रोमँटीक नाहीत माबोकर
या सुविधेचा वापर करून ऋ ला गर्लफ्रेण्डशी गप्पा मारता येतील असा विचार करून बघा ना !
लेखात गर्लफ्रेण्ड या शब्दावर कर्सर गेला की गर्लफ्रेण्डची विण्डो ओपन होईल.
मग काय, उतरवायचे का - या मेन्यूवर क्लिक केलं की तिची परमिशन घेऊन मायबोलीचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर तिला थेटच उतरवून घेईल..

बाकि, अशा आयड्या न सुचता हाणामा-याच पहिल्यांदा डोक्यात येतात म्हणजे मायबोलीवर अ‍ॅडमिनच्या जोडीला बाऊन्सर असे पद निर्माण केले पाहीजे (यांना कुणाच्याही चॅट विंडोतून विदाऊट परमिशन हवे तिथे उतरता आले पाहीजे )

या पदासाठी अर्हता - पीळदार शरीर, एका बुक्कीत दगड फुटला पाहीजे.

२०५० साली गप्पांच्या धाग्याला तयार करताना तिथे "वाहते पान" असे लेबल लावायचे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले असेल......कदाचित....

२०५० पर्यंत, रंगिबेरंगी दालनांसारखीच अजुन एखादी सुविधा उपलब्ध करुन दिलेली असेल, ज्यात मजसारखे सभासद आगाऊ बुकिंग करुन स्वतःचा, चंदनाचा हार वगैरे घातलेला, उदबत्ती लावलेला फोटो योग्य वेळेस कायमस्वरुपी प्रकाशित करुन ठेवण्याची तरतुद करू शकतील. Proud
त्या विभागास "राजघाट" वा तत्सम नाव देता येईल.
दरवर्षी तिथे कोण कोणत्या आयडीज श्रद्धांजली वहायला येतिल त्यावरुन मागे अड्ड्यावर गॉसिप रंगेल.
बरीच भवतीनभवती होऊनही, भीमाकोरेगावच्या इंग्रजांच्या युद्ध विजयस्तंभाचेही दालन उघडले जाईल. Wink
अन जर ते दालन उघडले, तर नथुरामचे का नको असाही प्रश्न तेव्हाही निर्माण झालेला असेल.

याव्यतिरिक्त, इतर बाबी सुरळीत झाल्या, तर पुणे/मुंबई इत्यादिंसोबतच, कराची लाहोर ढाका ते काबुल कंदाहार इत्यादि शहरांचे/प्रांतांचे धागेही इथे निर्माण झालेले असतील. Proud

जर काही विपरीत घडले, तर मात्र धार्मिक विभाग पूर्णतया नाहिसा होऊन त्या ऐवजी माओवाद विभाग तयार होऊन, पेकिंग, तियानमेन, वगैरे नावाने धागे निघालेले असतील. Wink

स्वतःचा, चंदनाचा हार वगैरे घातलेला, उदबत्ती लावलेला फोटो >> ये बात हजम नही हुई जी !!

आप हमारे जानी दुश्मन हो |

कापोच्या, पण त्यास इलाज नाही रे.
रंगिबेरंगी च्या "पेड पेजेसची" तत्कालिन सूचना व आग्रह माझाच होता.
त्यानंतर आज आठ/दहा वर्षांनी ही "राजघाटाची" सूचना करतोय. (रंगिबेरंगीसारखीच ही देखिल अंमलात येऊ शकेल).
अहो खुप खुप पूर्वी लोक "पिरॅमिड" उभे करायची...... Proud आपण साधे वेबपेज नै राखुन ठेवू शकत स्वतःकरता? Wink
तेव्हाच्या मायबोलीच्या प्रसिद्धपणामुळे नविन म्हणही तयार होईल मराठीत, "मरावे परी वेबपेजरुपी उरावे".. Lol

Lol

धम्माल धागा आहे.
पियू, जियो.. Happy

कुणीतरी अ‍ॅडमिनसाहेब स्वतः भाग घेतील असं म्हणलंय त्यांच्यासाठी आपण भविष्याकडे बघतोय. भूतकाळाकडे नाही. भूतकाळात वेमा (जे अ‍ॅडमिन होते) आणि अ‍ॅडमिन (जे एस्व्हिस्या होते) हे दोघेही भरपूर (त्यांच्या व्याख्येप्रमाणे भरपूर) गप्पा मारायचे.

भविष्यात अ‍ॅडमिन त्यांची कामे outsource करतील, नाहीतर माबोवर artificial intelligence असेल. एखाद्या बीबी वर कोणी चूकिची भाषा वापरली वगैरे तर अ‍ॅडमिनना system created notification जाईल.

एखाद्या बीबी वर कोणी चूकिची भाषा वापरली वगैरे >> म्हणजे तेव्हांही "चुंबन" ऐवजी दोन फुले एकमेकांना...... हेच चालू असेल कि कै... Sad

>>>> एखाद्या बीबी वर कोणी चूकिची भाषा वापरली वगैरे तर अ‍ॅडमिनना system created notification जाईल. <<<< ह्ह्या........ अ‍ॅडमिनना नोटीस कशाला जायला हवी? त्या युजरला नोटीस जाईल....

अगदी अगदी कदाचित असेही होईल, की त्याच युजरला इथे लिहिता येईल, ज्याचा वेबकॅम ऑन आहे व तो सर्वांना दिसतो आहे.

>>>> म्हणजे तेव्हांही "चुंबन" ऐवजी दोन फुले एकमेकांना...... हेच चालू असेल कि कै... <<<<
नसावे बहुधा..... सध्याचीच या विषयातील प्रगती (अन अधोगतीही) बघता, २०५० मधे ललितात कदाचित अशी वर्णने येउ श्कतील की.... "त्या स्लम लॅण्ड मधे अस्ताव्यस्त पडलेल्या, चिखलमातीत लोळणार्‍या गंजुन लालीलाल झालेल्या त्या नाजुकशा तारेच्या रॅकला काळ्याकभिन्न थोराड चुंबकाने आवेगाने जवळे ओढले..... व तारेची ती रॅक काहीच करु शकली नाही" वगैरे वगैरे... ! Proud
अन यावर चर्चा घडतील, जशा त्या फ्रेडी बाबत घडल्या होत्या...... Wink

अ‍ॅडमिनना नोटीस कशाला जायला हवी? त्या युजरला नोटीस जाईल....>>>>>>>

नोटीस नव्हे लिंबुदा, ईकडे लक्ष द्या असे नोटीफीकेशन.

ओके अतरंगी, मग आता असे वाचा...
>>>> अ‍ॅडमिनना नोटीफिकेशन कशाला जायला हवी? त्या युजरला नोटीस जाईल.. <<<<

हास्यधागा! Happy

अस्सा धागा सुरेख बाई, मायबोली लिहावा,
अश्शी मायबोली सुरेख बाई, हसाया लावते,
अस्स हसणं सुरेख बाई, सर्वांना आवडते,
अश्शी आवड सुरेख बाई, सर्वांना जोडते.

>>>> अ‍ॅडमिनना नोटीफिकेशन कशाला जायला हवी? त्या युजरला नोटीस जाईल.. >>>>>>>

नोटीस द्यायची कि नाही ते अ‍ॅडमिन ठरव्तील. Artificial intelligence नाही.

मराठी भाषा वळवावी तशी वळते. Artificial intelligence ला सगळेच कळत नाही.

लिंबू, पुर्वीची "तोंड ओळख" विसरलास काय ?
आपले थोबाड दाखवा आणि (मगच) दुसर्‍यांचे पहा, अशी स्कीम होती... जळ्ळ्या डू आय वाल्यांमूळे निकालात निघाली.

लिंबू, पुर्वीची "तोंड ओळख" विसरलास काय ?
आपले थोबाड दाखवा आणि (मगच) दुसर्‍यांचे पहा, अशी स्कीम होती... जळ्ळ्या डू आय वाल्यांमूळे निकालात निघाली.

>> म्हणजे?

Pages