आपली मायबोली भविष्यात कशी असेल?

Submitted by पियू on 21 January, 2016 - 08:49

नमस्कार मायबोलीकरहो..

इथे असणार्‍या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..

तर.. भविष्यात (म्हणजे नक्की कोणत्या वर्षी ते मला ठरवता येत नाहीये.. आपापली कल्पनाशक्ती लढवा) आपली मायबोली (म्हणजे आपलं हे लाडकं संकेतस्थळ) कसं असेल असं तुम्हाला वाटतं? इथे कश्या प्रकारचे लोक आणि लेख असतील? आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन इथे येऊन किबोर्ड बडवत असु का? सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं तशीच चालू असतील का? काय बदल झाले असतील? काही सुचतंय का?

तुम्हाला काय वाटतं? इथे लिहाल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर यांच्या लिस्टपासुन पुढे...

११. डु आयडी पैकी कोणितरी आयडींची सेंचुरी मारलेली असेल (यु नो हु)
१२. वृद्धाश्रमात माबोवरील धाग्यांचं सामुदायिक वाचन, आणि त्यावर हिरीरीने वाद घातले जातील
१३. पगारेंचा नातु, सचिनच्या नातवाच्या बॅटिंगची पिसं काढत असेल
१४. आणि ऋन्मेष - मोबायल बेस्ड प्रतिमायबोली काढायच्या विचारात असेल... Happy

१) २०५० पर्यंत संशोधन करुन निर्माण केलेल्या भाज्या व फळे हे मानवजातीला चांगले की वाईट हे वमन करुन तपासायचे तंत्रज्ञान विकसित झाले असेल.

२) निसर्गाच्या गप्पांचा कमीत कमी ५ अंकी धागा निघाला असेल.

३) ऋन्मेष "माझ्या मुलाच्या वाईट सवयी" ही सिरीज लिहित असेल.

४) ते "डोसा रेस्टॉरंट साठी नाव सुचवा" वाले रेस्टॉरंट खरोखर भारतात उघडलेले असेल.

५) कदाचित माबोवरुन रेसिपीच्या धाग्यावरुन पदार्थ डाऊनलोड करुन चाखायला मिळेल. त्यामुळे पदार्थ नुसताच दिसायला चांगला आहे की चवीला पण चांगला आहे हे कळेल.

६) दुसर्‍या ग्रहावर गेलेले माबोकर "परतोनि पाहे" धागा काढतील नि एक कोटी रुपये महिना या पगारात पृथ्वीवर भागु शकेल का? असे विचारतील.

७) रतीबाच्या धाग्यांसाठी माबो एक वेगळी सर्वर रुम राखुन ठेवेल.

८) टंकायच्या तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने लिंबूटिंबू कमीत कमी एक गिगाबाईटचा प्रतिसाद सहज छापू शकतील.

९) होणार सुन मी याच महिन्यात संपतेय नाहितर त्यावरच्या चर्चेचा धागा अजुनही पहिल्या पानावर असेल असे लिहिता आले असते.

१०) जुनी मायबोली असे आपण आता म्हणत असतो, पण हिच मायबोली जुनी झाली असेल. लोक या सध्याच्या मायबोलीवरुन धागे उकरुन काढुन हे जुन्या माबोवर होते असे म्हणत असतील.

अरेच्चा मी एवढे टंकेपर्यंत राज यांनी मुद्दे अ‍ॅड केले सुद्धा! Happy

११) अ‍ॅडमिनने नवीन स्मायल्या दिल्या असतील.

मंगळावरचे आणि पृथ्वीवरचे मायबोलीकर एकमेकांशी हिरीरीने भांडत असतील. मंगळावरचे एखादे जख्खी पृथ्वीवरच्या आळशी, कामचुकार लोकांबद्दल लिहित असतील. पृथ्वीबद्दल बोलणार्‍या मंगळावरच्या मायबोलीकरांना पृथ्वीवरची सिटीझनशीप असली तरच इथल्या समस्यांबद्दल बोला असे खडसावले जाईल Proud Light 1

सिरीयसली सांगायचं तर रामराज्य अवतरलेलं असेल. त्यामुळे इथे ही शांत शांत असेल.
प्रधानमंत्री मोदीच असतील फक्त त्यांना हेर मोदी म्हणत असतील. मतांतरं नाहीत त्यामुळे कुठेही वाद नाहीत. त्यामुळे इथेही सोज्वळ वातावरण असेल. रोज सकाळी आरत्यांचा कार्यक्रम होईल. तसा प्रोग्राम सर्वच संस्थळांमधे असेल. त्यानंतर निष्ठा व्यक्त करणे आणि शपथ घेणे हे कार्यक्रम झाले की देशाच्या प्रगतीबद्दल गुणगाण असेल.

सिनेमाच्या धाग्यावर जय श्रीराम या बिग बजेट मूव्हीत मोदींचा अभिनय चांगला कि शहांचा यावर फड रंगेल. अर्थात लुटुपुटीचीच भांडणे असतील.

कॅतरिना कैफ आणि सनी लिओनी यांच्या कन्यांचे सती चव्हाण या सिनेमातील सतीच्या भूमिकेबाबत चर्चेचे धागे निघाले असतील.

गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणपद्धतीतील कुठले गुरुकूल चांगले यावर एका ग्रुपात सार्वजनिक चर्चा चालू असेल. आचार्य भरत की तपस्वी दिनेश याबाबत निर्णय घेणे जड जात असेल.

पतंजली आरोग्यवर्धिनी योजनेमधे परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशी मिळेल यावर माहिती हवी आहे मधे धागा चालू असेल.

इतिहास या ग्रुपात भारतात पूर्वी निरनिराळ्या धर्माचे लोक होते अशा खळबळजनक माहीतीवर गदारोळ उडाल्याने आणि तसे पुरावे न देता आल्याने अ‍ॅडमिनचा हस्तक्षेप झालेला असेल. थरथरत्या दीड हाताने मग एक माबोकर अत्यंत खडूस पोस्ट लिहीत असेल. त्यानंतर मुस्लीम, शीख , जैन, बौद्ध , पारशी असे लोक अस्तित्वात होते यावर लोकांचा (कठीण असला तरी) विश्वास बसू लागेल.

सर्वांना काम असेल. जात इतिहास जमा झालेली असेल. फक्त पूर्वेकडच्या वस्तीचे आधारकार्ड नंबरचा सुरूवातीचा आकडा, पश्चिमेकडील वस्तीचा सुरूवातीचा आकडा यावरून कामे देण्यात येतील. स्क्लिड लेबर डेव्हलपमेंट कार्यक्रमा ची माहीती देणा-या एका लेखात ही माहीती आलेली असेल.

सदस्यांना व्हिडीओफोन प्रमाणे ओपन फोरम व चॅट बॉक्स मधे चॅट करता येत असेल. मधेच एखादा बीडी काडी सदस्य २००७ साली याहू ची अशी सेवा होती अशी माहिती देईल, त्याला गुड जोक असे संबोधण्यात येईल...

शहीद आफ्रिदी - एक झाड नावाचा गुप्त बाफ असेल त्यावर काही अमानवीय आकृत्या खिदळत असतील तिथे लहान मुले, कमजोर हृदये असणा-यांना जाण्यास मनाई असेल.

५) कदाचित माबोवरुन रेसिपीच्या धाग्यावरुन पदार्थ डाऊनलोड करुन चाखायला मिळेल. त्यामुळे पदार्थ नुसताच दिसायला चांगला आहे की चवीला पण चांगला आहे हे कळेल.
>>>>

हे भारी आहे. पदार्थ बनवणारा अपलोड करणार आणि वाचक हे चाटक बनून लगेच त्या पदार्थाची चव चाखून बघणार. फक्त कोणी शाकाहारी नाव देत मांसाहारी पदार्थ अपलोड केला तर बुडाला धर्म..

***इथे असणार्या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..***

-मायबोली म्हणजे मराठी नव्हे हा खुलासा आवडला.साहित्य संमेलनावर एकही धागा निघाला नाही!
मराठी माध्यमातील पिढी दहा वर्षांत संपेल आणि पल्लेदार लेख नाहिसे होऊन फक्त शहरागणिक वाहती गप्पांची पानं चिल्लर खरडींनी भरतील.

एस आर डी, हा तुम्ही आमच्या राकुंचा केलेला धडधडित अपमान आहे.
त्यांनी एक अख्खाच्या अख्खा धागा (त्यांच्या भाषेत फुसकेबार) साहित्य संमेलनावर काढला.
त्याला एकही प्रतिसाद मिळाला नाही ते सोडून द्या. पण धागा निघालाय.
Happy

Lol मस्त विषय आणि धम्माल प्रतिक्रिया!

(काही अपेक्षित कुजक्या प्रतिक्रिया देखिल आल्या(च) आहेत(च).)

मृण्मयी ... भारी.

एक राहीलेच ( असे अनेक राहीलेले नंतर येतीलच Proud )

हल्ली मायबोलीवर यावेसे वाटत नाही असे म्हणत मायबोलीवर सर्वात अधिक काळ सक्रीय राहीलेल्या सदस्यांचा सत्कार शनिवारवाड्यावर जीवनगौरव सोहळ्यात करण्यात येईल. या सत्कार समारंभाला कारवाई होऊन बाहेर गेलेले आयडीज, त्यांचे ड्युआयडीज आणि कारवाई न झालेले आयडीज आणि त्यांचे ड्युआयडीज अशा सर्वांना आमंत्रण असेल.

या प्रसंगीच्या लाईव्ह भाषणाची झलक मायबोली साप्ताहिकी या कार्यक्रमात आगाऊ दाखवण्यात येईल.

ऋन्मेऽऽषची गर्लफ्रेंड ५० वर्षानी तरी माबोवर येईल. आणि मी अजुनही ऋन्मेऽऽषची गर्लफ्रेंड आहे हे जाहीर करेल.

पाचअंकी नि.ग. Lol
ते पदार्थ डायरेक्ट आपल्याला मिळतील हे काय भारी आहे.

अजुन एक धम्माल विनोदी धागा.

हो पण स्माईल्या बदलल्या असतील. कदाचीत खरे चेहरे दिसतील हसताना. >> असे झाल्यास ड्यू आय वाले ड्यू आय साठी असहिष्णू वातावरण झाले म्हणून आयडी परत करतील :p

अथवा वेगवेगळे टोप मिश्या घेऊन ठेवतील. प्रत्येक आयडी साठी एक बॉक्स आणि त्यावर आयडी च्या नावच लेबल आणि आतमध्ये मेकअप च सामान.
आयडी उडाला कि सामान olx वर रवाना. किंवा असलेल्याच सामानाचे वेगवेगळे कॉम्बिनेश्न्स वापरले जातील.

स्कोर सेटलमेंट साठी लोक मग इतरांच्या घरात गुसून त्यांच्या ड्यू आय बॉक्स मधले सामान आदला बदल करून ठेवतील :p

चाट विंडो तून आयडीला खाली उतरून घ्यायची सुविधा सुरू झाली असेल. >> मायबोलीवर हेल्मेट सक्ती लागू होईल तीपण उत्स्फूर्तपणे .
हेल्मेट नाही वापरल्यास तोंड ला), काळे, निळे होईल मारामारी ने. (शाईने सुद्धा होऊ शकते)

मग माबोवर दवाखाने सुरु होतील. अधूनमधून बाहेर डॉक् ला कशी मारहाण होते तशी इथे पण होईल. इथल्या डॉक्सचा activeनेस पाहता फ्रिक्वेन्सी जास्त असेल Light 1

चाट विंडो तून आयडीला खाली उतरून घ्यायची सुविधा सुरू झाली असेल.>>>>>नोबिता पहात नाही ना तुम्ही?:फिदी::दिवा:

नोबिता-डोरेमॉनच्या एका एपिसोड मध्ये दाखवले होते या टाईपचे.:फिदी: नुसतेच उतरावयचे कशाला? नाही पटले तर दोन रट्टे हाणायची पण सोय असली पाहीजे.............................................फक्त अ‍ॅडमीनसाठी.:खोखो:

Pages