टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम
कांदा : १ मध्यम
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.
कोथिंबीर : थोडीशी
लसूण : ३-४ पाकळ्या
जिरं.
मीठ.
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आमचं फेवरेट तोंडीलावणं आहे. पण आम्ही त्याला भरीत न म्हणता चटनी म्हणतो. >> कोकणी माणसं उगीच पदार्थांना भारी नाव ठेवंत नाहीत. (माणसांना नाव ठेवतांत Wink ). चपातीला चपातीच म्हणतात. Proud

पोळीला चपाती म्हणल्यावर तिची गंमतच निघून जाते. पण कोकणी माणसांना ते कुठले समजायला....
(का ना साईडला टोले हाणणे हा माझा लग्नसिद्ध हक्क आहे! Wink )

आजचं लंच - Bruschetta आणि हे टोमॅटोचं भरीत. एका माणसाच्या स्वयंपाकाचं कंटाळवाणं काम अशा क्वीक रेसिप्स मुळे चमचमीत होतं. Happy

प्रि, करुन बघ. उच्च टेस्टी प्रकार आहे. स्वतःसाठी मायनस लसुण बनवायची डिश.

भ्रमर, भारी नाव ठेवलेलं नाही काही त्यांनी. पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमुळे त्या पदार्थांना वेगवेगळी नावं असावीत (बहुतेक). Happy
भरीत, रायतं आणि चटणी ही तोंडीलावणी त्यांच्या कृतीमुळे वेगळी असतात असं वाटतं मला. भरीत हे नेहमी स्मोक्ड ( डायरेक्ट गॅसवर/चुलीवर भाजुन), रायतं शिजवुन आणि चटणी (मोस्टली) कच्चा पदार्थांची आणि जरा तिखट असा माझा समज आहे.

यक

मनिमाऊ, बरोबर.
भाजून आणि हाताने कुस्करून वस्तू एकत्र करणे(भरीत) आणि वाटून एकत्र करणे(चटणी) यात फरक आहे.
चवीमधे निश्चित फरक पडतो.

Hi sorry for english. Posting from home I pad. I also made it. Came out really good. I toasted two brown bread slices with little olive oil and added this tomato dip on it. My daughter said it tastes like deconstructed pizza. You can also put a dash of grated paneer or haloumi or feta cheese on top. I put the tomato dip through mixer though. And one chilli is just enough. Also added Italian herb mix.

Thanks deed maaybolikar.

पोलंडस्थित मित्राने फेबुवर मी टाकलेला फोटो आणि इथली लिंक पाहून. ताबडतोब हे प्रकरण केले. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया ही एक भर टाकली. हिरवी मिरची नव्हती म्हणून एक प्रकारची पाप्रिका टाकली (म्हणजे काय मला नाही माहिती). आणि ते भन्नाट झालेय असे कळवलेय.
त्याच्या अर्धभारतीय-अर्धपोलिश मुलांनाही प्रचंड आवडले प्रकरण.

पाप्रिका = मिर्चीचाच प्रकार आहे.
अख्ख्या मायबोलीवर आमचं भरीत वर्ल्ड फेमस केल्याबद्दल धण्णेवाद!

35.gif

हाय्ला एकदम मार्क एवढे कसे वाढले? कॅमेरा बदलला की कॅमेरा(वू)मन Wink

डिटेलवार फोटोमुळे ती वांगं भाजायची जाळी आहे तिचा उपयोग करायचा राहून जातोय हे लक्षात आलं आहे. ही रेस्पिपण मस्त आहे. फक्त मला स्वतःला सध्या टॉ आणि मि दोन्ही बंद आहेत Sad आमच्या उन्हाळ्यात घरचे टॉमेटो असतील तेव्हा घरातील तिखट खाणार्^या मेंबरासाठी केल्यास फोटो द्यायचा प्रयत्न करीन. त्या जाळिवर इकडे मिळणारे कलरफुल स्वीट पेपर्स भाजता यावेत म्हणजे महागडे रोस्टेड रेड पेपर्स आणण्यापेक्षा ताजे रो पे मिळतील.

अवांतर - मागची रेस्पी म्हणजे मुंबई युनि.चा इंजिनियरिंगचा टफ पेपर होता. यंदा सोपा पेपर काढल्याबद्द्ल ठ्यांक्स Proud

Ama Happy nice but your recipe is not at matching with this recipe. If you add olive oil and Italian herbs then definitely it will taste like Pizza.

आज केल,मस्त रेसिपी दिमा, विकतचा व्हिनेगरवाला साल्सा आणण्यापेक्षा दरवेळी हेच करा अशी फर्माइश आलिये...छान चविष्ट सोप्या रेसिपीसाठी थॅन्क्यु.

मी परवा केलं होतं हे भरीत. आवडलं मला. आमच्या घरच्या देवकी पंडीतांनी यात एक 'पण' काढलाच - यात टोमाटोचा आंबटपणा कमी व्हायला साखर घालत नाहीत का? मी म्हटलं, नाही आंबटो भरीत असंच नाव आहे. Proud
पण पण जिंकता येईल का?

dima, bharit chan zale. thode uralele fodanichya bhataat ghalun tyacha tomato rice kela tar tohi avadala Happy

मी पण केल काल .
थोडा टोमाटो कच्चा राहिला त्यामुळे तुमच्यासारख मिळून नाही आल .
किती वेळ भाजावा टोमाटो ?

आशू, टो व्यवस्थित पिकलेला असेल तर साखरेची जरूरच नाही. पण दे पं ज्येना असतील आणि गोडघाशे असतील तर पर्याय नाही.
काकडीच्या कोशिंबीरीला गोडाचा पदार्थ बनवून टाकतात पिताश्री आणि हे कुठे गोड आहे अशी टिप्पणी असते. त्यामुळे साखरप्रेमापुढे आपण जिंकू शकत नाही. त्यांना पानात वाढताना वरून साखरपेरणी करून दे. Happy

त्या ज्ये ना नाहीत आणि गोडघाशा नाहीत. (तरीही) (भरीतात)साखरपेरणी जरा अवघड काम आहे. Wink बघूया.

त्यांच्या पानापुरतीच. आपल्याला त्या साखरेचा संसर्ग लावून नाही घ्यायचा.
आणि या देपं ज्युनियर असतील तर त्यांना यालाच गोड म्हणतात हे शिकवा.. Wink

Pages