आवळ्याचे लोणचे (उकडुन)

Submitted by सायु on 13 January, 2016 - 03:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे - १ की.
मीठ - पाऊण वाटी
कलौंजी - १/२ वाटी
जाड शोप - १/२ वाटी
केप्र आंबा लोणच्या चा मसाला - १ पाकीट
तेल -३ वाट्या

क्रमवार पाककृती: 

आवळा आरोग्याला छानच. हिवाळ्याच्या दिवसात छान ताजे हिरवे, मगजदार भरिव आवळे मिळतात.या दिवसात हे लोणचे खाण्याची मजा काही औरच आहे..

तर कृती कडे,...

आवळे धुवुन एका भांड्यात (पाणी न ठेवता) कुकर मधे एक शीटी होऊन वाफवुन घ्या..
थंड झाले की, अलगद सुरीने पाकळ्या वेगळ्या करुन घ्या..
मीठ हलक भाजुन घ्या.
आता शोप आणी कलौंजी पण भाजुन घ्या आणि मिक्सर मधुन जाडसर दळा.. (भुकटी नको)
कढईत तेल तापवुन घ्या.
एका परातीमधे मीठ, केप्रे आं.लो. मसाला आणि शोप + कलौंजी ची भरड रचा. त्यावर दोन पळ्या गरम तेल घाला, व्यवस्थीत एकजीव करुन घ्या. आवळ्याच्या फोडी/ पाकळ्या घालुन नीट कालवुन एका काचेच्या दगडीत / बाटलीत ४ ते ५ तास ठेवा. नंतर उरलेल तेल घालुन हवा बंद बरणीत ठेवा..

लोणच खाण्यासाठी तय्यार..:)

पोळी, ब्रेड, पराठे, वरण भात कशाबरोबरही छानच लागते..

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु
अधिक टिपा: 

कुकर ची एकच शीटी करा, जास्त गहाळ नको,
हे लोणच फ्रीज मधे ठेवले तर, फोडीचा करकरीत पणा जास्त दिवस रहातो..(फीजच्या बाहेर पण टीकते)
मी फ्रीज मधेच ठेवते..हवे तेवढे एका वाटीत काढते.

माहितीचा स्रोत: 
धाकटी बहिण दिपा नगरकर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिती, दिनेश दा आभार..
दा, Happy

कलौन्जी म्हणजे काय ? कांद्याचे बी, काळ्या तीळा सारखे असते.. कुठल्याही वाण्याच्या दुकानात हमखास मिळतात..

मस्त

आहा..
मस्त दिसतय..
आईला दाखवते रेस्पी..घरी आवळे आणले कि लोणचं मुरांबा केला जातोच तसाही Happy

मस्त गं सायु.....कलौंजी माझ्या स्वयंपाकात फारशी नसायची. पण आता हळूहळू वापरायला लागलीये. सध्या बाजारात भरपूर आवळे आहेत. बरंच काही करायचंय आवळ्याचं.....वेळ झाल्यावर.
आणि एक गंमतः
एकदा (म्हणजेच पुरातन कालात) आईला लिहिलेल्या पत्रात(यावरून काळ लक्षात आलाच असेल) आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी विचारली. तिने एका इन्लॅन्ड लेटरवर(आता नवीन पिढीला इन्लॅन्ड म्हणजे काय ते माहिती नसण्याची शक्यता आहे का?) आवळा लोणच्याच्या तीन चार प्रकारच्या रेसिपीज लिहून पाठवल्या होत्या. ते पत्र अजूनही ठेवलंय!

टीना, साती,वर्षु दी, राधिका, मानुषी ताई, ए सगळ्यांना खुप खुप धन्स!!!!
वर्षु दी, डन....:)
मानुषी ताई, व्वा, मस्तच ग, तुझ्या आईच्या रेसिपीज पण टाक ना प्लीज..:)