खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 13:52

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.

भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.

याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.

वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.

१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?

२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?

३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?

४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?

५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?

६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?

७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?

८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.

तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोनशे वर्षांपुर्वी नेपाळच्या गोरखा लोकांना ब्रिटीश राजाने आपल्या ब्रिटीश सैन्यात
सामावुन घेतले

ब्रिटीश २ रे राजे किंग एडवर्ड ७ वे ह्यांनी सिर्मुर रायफल्स
नावाने गोरखा रेजिमेंट सुरु केली. ह्या पलटणी मध्ये सगळे सैनिक नेपाळचे गोरखा होते. ( १८१५ ते १९९५ )

त्यानंतर १८१७ मध्ये ६व्या राणी एलिझाबेथच्या स्वतःच्या सैन्यात वेगळ्या
गोरखा रेजिमेंटला जागा मिळाली.

साल १८३५ मध्ये ७व्या ड्युक ऑफ एडींबर्गच्या स्वतःच्या सैन्यात वेगळ्या
गोरखा रेजिमेंटला जागा मिळाली.

साल १८९० मध्ये १०व्या प्रिंसेस मेरीच्या स्वतःच्या सैन्यात वेगळ्या
गोरखा रेजिमेंटला जागा मिळाली.

ह्या सर्व रेजिमेंटस एकत्रीत करुन १९९० साली ब्रिटीश रॉयल गोरखा रायफल्स निर्माण झाले,

या निमित्ताने या चर्चेतले मुद्दे सोडून नवी माहीती, इथे देतो. ही माहीती ऐकीव आहे हे सुरूवातीलाच स्पष्ट करतोय. याचा कुणाच्याही पोस्टशी कसलाही संदर्भ नाही, पण उगीच नवीन धागा नको म्हणून या विषयावरच्या धाग्यावर लिहीले.

बाबासाहेबांना जेव्हां भीमा कोरेगावला विजयस्तंभ आहे असं समजलं तेव्हां त्यांनी काही सहका-यांकडे चौकशी केली. त्यांनी या माहीतीला दुजोरा दिला. भीमेच्या पंचक्रोशीतल्या काही लोकांना घेऊन बाबासाहेब तेव्हां विजयस्तंभाकडे गेले. इतका मोठा विजयस्तंभ तर खडकीच्या लढाईतल्या शहीदांचाही नाही. म्हणून स्थानिक साथीदारांकरवी आजूबाजूच्या परिसरात जेव्हां चौकशी केली तेव्हां इथे खूप मोठी लढाई झाल्याचे कळत गेले. पाचशे सैनिक विरुद्ध पंचवीस हजार फौज होती. भीमेच्या पात्रापासून ते आजूवाजूच्या शेतांमधे तळ पडला होता.

तेव्हां बाबासाहेबांनी याचे संदर्भ अभ्यासायला सुरूवात केली. तेव्हां खरेच अशी लढाई झाल्याचे आढळून आले. ही ऐकीव कहाणी आहे, पण बाबासाहेबांच्या भाषणात किंवा स्फुट, अग्रलेखांमधे वगैरे संदर्भ मिळू शकतील. त्यांनी जेव्हां भेट दिली तेव्हां जेमतेम शंभरेक वर्षे झालेली होती. फारतर दोन पिढ्या म्हाता-या झाल्या. त्यामुळे मोठी लढाई झाल्याचे संदर्भ मिळणे हे अगदी स्वाभाविक वाटते.

दुसरी गोष्ट जी ऐकली आहे ती म्हणजे खर्ड्याची लढाई जिंकून देणारे वीर अपमानाचा बदला घेण्याच्या इराद्याने या लढाईत लढले. शिरूरला आठशे सैन्य होते. त्यातले पाचशे महार होते. ते पुढे निघालेले होते. मागच्या तीनशे जणांवर हल्ला होऊन कमांडरचेस शीर बाजीरावास धाडले गेले हा उल्लेख तर पेशव्यांच्या दफ्तराचा हवाला दिलेल्या फेसबुक पोष्टीतही आहे. पाचशे जणांच्या या तुकडीस जेव्हां हे कळाले तेव्हां त्यांनी माघार घेण्याचे सोडून लढण्याचे ठरवले आणि तळ ठोकून बसलेल्या सैन्यावर त्याच जागी हल्ला केला. रात्रीच्या अंधारात या पाचशे जणांचा अंदाजच नसल्याने आणि कुमक आली असा समज होऊन पळापळ माजली. त्या पळापळीत सैन्य मारले गेले. या पाचशेपैकी अडीचशे मेले नसून हानी आधीच्या तीनशेच्या तुकडीची झाली. पाचशे लोक पेशव्यंच्या सैन्यात घुसून मारत होते आणि काहीच समजत नसल्याने सैन्य पळत होते. झोपेत असलेले जागे होईपर्यंत पळ काढण्याच्या अवस्थेपर्यंत सैन्य आले होते. दीड वर्षे हे सैन्य पळतच असल्याने मोठा पराक्रम करण्याच्या मनःस्थितीत अजिबात नव्हते. हे पराभवाचे प्रमुख कारण दिसते.

तरी देखील ही माहीती ऐकीव असल्याने यावर विश्वास ठेवावा असे म्हणता येत नाही. आणि संदर्भ न देता विश्वास ठेवा असे म्हणायला वेड लागलेले नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की बाँबे गॅझेटीयरमधे हीच कहानी आहे हे समोर आल्याने ब्रिटीशांनी झोडा आणि फोडा नीतीनुसार कहाणी रचली या कहाणीला आधार नाही . फोडायला आणि झोडायला पेशव्यांनी आणि तत्कालीन समाजाने खूप प्रेमाची वागणूक दिली आणि एकदिलाने सारे नांदत होते अशी परिस्थिती होती का ? ब्रिटीशांना एव्हढा मोठा विजयस्तंभ उभारण्याची का आवश्यकता वाटली असावी ? या विजयस्तंभाने नेमकी कशी काय फोडा आणि झोडा नीती यशस्वी झाली या शंका आहेत. म्हणून ऐकीव कहाणी द्याविशी वाटली, अन्यथा तिचे इथे काहीच काम नाही.

मात्र त्यावर विश्वास ठेवावा यासाठी आटापिटा चालू आहे. सुरूवातीला एक जानेवारीला जमणा-यांची कुत्सित शब्दात निर्भत्सना होत होती, पुढे देशद्रोहाचे लेबल लागले. आणि आता काही कहाण्या जन्माला आलेल्या आहेत. त्याला ठोस पुराव्यांची जोड असेल तर ते मान्य व्हायला काहीही हरकत नसावी.

इंग्रजांच्या सैन्यात महार होते म्हणून ते देशद्रोही ? हे लेबल लावणार कोण ? उच्चवर्णीय ?

आणि इंग्रजांच्या ताटाखालची मांजरं होउन बसलेल्यात कोण होते ? उच्चवर्णीयच ना ? इंग्रजाकडॅ कारकुनी नोकर्‍या कोण करत होते ?

त्यामुळे फोडा अन झोडा ही नीती उच्चवर्णीयांचीच होती , इंग्रजांची नव्हे.

.....
एकेकाळी देशातील राजे महाराजे , वतनदार हे उच्चवर्णीय होते. मुस्लिम व इंग्रज आल्याने त्याना सत्तेत स्पर्धक निर्माण झाले . म्हणुन त्यानी व त्यांच्या भाटानी हिंदु राजे म्हणजे देशप्रेमी , देवाचे अवतार , देव देश धर्मासाठी लढणारे अशा प्रतिमा उभ्या केल्या. आणि इतराना खलपुरुष रंगवले.
....

या लढाईच्या निमित्त्याने जनता राजा ठरवू शकते , यावर शिक्कामोर्तब झाले... इंग्रजानी भले सोनं हिरे नेले त्यांच्या देशात , तरी काही सुधारणा व काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती करुन मग ते गेले.

देश संस्थानिक आणि तथाकथित राजे पेशवे यांच्या ताब्यात राहिला असता तर आजचे दिवस दिसले नसते. हे या लढाईचे महत्व.

पाचशे जणांच्या या तुकडीस जेव्हां हे कळाले तेव्हां त्यांनी माघार घेण्याचे सोडून लढण्याचे ठरवले आणि तळ ठोकून बसलेल्या सैन्यावर त्याच जागी हल्ला केला.
>>

ह्यास अनुमोदन कापोचे. मी दिलेल्या लिंकमध्ये शीर धाडले गेल्याचा उल्लेख नसून Pattinson नावाचा कमांडर जो मैदानात पडला होता, तो परत शुद्धीवर आला आणि त्याने प्रतिहल्ला केला व सोबत त्याच्या तुकडीने प्रतिहल्ला चढवून पेशव्याच्या ताब्यात असलेली तोफ परत मिळवून तिच्या साह्याने हल्ला चढवला असा उल्लेख आहे.

Pattinson, the adjutant of the 2nd Battalion of the 1st Regiment, was one of those who lay wounded on the ground. He was a man of gigantic stature, but, mortally stricken, he had been left for dead. At this supreme crisis his heroic spirit returned once more to its earthly tenement. His men, who idolized him, fancied that to save them he had come back from another world, and followed him joyfully to the counter-attack. So inspired, it carried everything before it. In vain the Arabs refused to quit the captured gun. They were bayoneted where they stood. The gun was retaken and fired point blank into the advancing reinforcements. Pattinson was again shot down, but his men, uplifted by his example and the dauntless soul of their commander, successfully defended the hamlet until after dark. Next morning the attack was not renewed, and Captain Staunton the following evening marched back with his wounded and with his weary but unbeaten detachment to Sirur.

बाकी ऐकीव माहिती बरोबर असूही शकते. त्यास कोणी नोंदी ठेवल्या नसल्याने त्यांना तेवढा लाभ दिला गेला पाहिजे. जर कोणी त्या सैनिकांना देशद्रोही ठरवत असेल तर निव्वळ दुर्दैव.

वा.. चांगला कीस पाडालात... 'खोटे बोल पण रेटुन बोल' वाल्यांना फार खुपत असणार.. पण सत्य कधीतरी बाहेर येणारच..!!

कौस्तुभ कस्तुरे यांचा लेख म्हणजे उत्तम विनोद आहे.

''आपल्याच जातीजातींमध्ये फुट पाडण्याची हि नीती आम्हाला तेंव्हा तरी कळली नाही''.

या वाक्यात किती विरोधाभास आहे, हे आम्हाला काय माहित नाही का! या महोदयांना अस सुचवायचं आहे कि त्या काळात सर्व समाज एकमेकांच्या मांडीवर बसून दुधभात खाऊ घालत होता. या महोदयांचा अजेंडा काहीतरी वेगळाच आहे.

माझ्या आठवणीप्रमाणे १९८५ पर्यंत माझ्या गावी जेंव्हा अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या समाजातील व्यक्ती घरी (म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर) यायची तेंव्हा त्यांचे चहाचे पेले वेगळे घराच्या बाहेर ठेवलेले असायचे. ते त्यांनीच नेउन धुवायचे आणि मग घरातील व्यक्ती त्या पेल्यांमध्ये वरून चहा ओतायची. हि आमची जातीजातीमधील प्रेमभावना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत जिवंतच होती आणि आताही आहे.

हि प्रेमभावना मोडीत निघण्याचे कारण सवर्ण समाजाला उपरती झाली आहे असे नसून अस्पृश्याच्या पुढच्या पिढीने आमच्या घरी येण्याचे बंद केले.
उद्या तो स्तंभ पाडण्यासाठी देशद्रोहाच्या नावाखाली आंदोलन उभे केले गेले तरी मला नवल वाटणार नाही.

हरलात तर मान्य करा ना!

सुनटुन्या अगदी Wink हार पचनी पडत नाही.

लाठ्या घेऊन पुण्यात फुशारक्या मारण्यापेक्षा पठाणकोट मधे काल गेले असते तर..

असोच Wink

.

.

मी दिलेला प्रतिसाद मला उडवायचा आहे… प्रयत्न केला पण नाही जमले . कुपया माझा प्रतिसाद काढून टाका.

आम्हाला इतिहासात कायम हिंदवी स्वराज्य असच शिकवलं गेले आहे. आणि त्यातही हिंदुनी मुसलमानांवर मिळवलेला विजय.

मग जेंव्हा पूर्वाश्रमीच्या हिंदूअंतर्गत महार जातीने बहुसंख्येने आलेल्या अरब मुसलमानांवर विजय मिळवला तर आम्हाला तो विजय अपमानास्पद का वाटावा?
निदान माझ्यासाठी तरी ती लढाई अभिमानास्पद आहे.

कधी नव्हे ते राकु चे अभिनंदन करावेसे वाटते ,,,त्यांनी हा धागा काढला.
आनि कपोचे तुम्ही दिलेल्या सगळ्या लिंका बुकमार्क करुन ठेवेल्या आहेत.वेळ मिळेन तसा वाचत जाईन.मला एवढी डिटेलवार माहिती नव्हतीच.माझ्या पुढच्या पिढीला सांगायला नक्की उपयोगी येईल. Happy
बाकी सगळ्याच चालु द्या.

Pages