खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 13:52

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.

भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.

याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.

वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.

१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?

२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?

३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?

४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?

५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?

६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?

७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?

८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.

तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संताजी धनाजीने मुघलांच्या तंबूचा कळस कापून आणला यावर यांचा विश्वास बसतो, खेमकरणच्या लढाईत केवळ शंभर लोकांनी रणगाड्याची एक पलटन रात्रभर रोखून धरली यावर विश्वास बसू शकतो पण ५०० महारांचे शौर्य म्हणजे जातीय अभिनिवेशातून आलेली फँटसी !

हरुनही ( की हरण्यासाठीच ? ) पेन्शन खाणे हे देशद्रोहाचे लक्षण आहे.

ते पैसे आमच्या खापरपणजोबाने भरलेल्या ट्याक्समधले होते.

कापोचे यांनी पुराव्यासकट खोटारड्यांचे तोंड बंद केले असले, तरी एकेकाने येऊन खोटारड्यांनाच वावा! वगैरे 'शुद्ध वॅक्रण' वापरून म्हणावे, हे पाहून अंमळ गम्मत वाटली.

बाकी पादुकानंदांना संपुर्ण अनुमोदन. अन अजाणतेपणी त्यांना अनुमोदन देणार्‍यांना एक कणवपूर्ण कटाक्ष Wink

हो न पगारे ... मलाही समजत नाहीये. पेशवे खपले उत्तम जाहले! इंग्रज आले अति उत्तम जाहले.
आता इंग्रज गेले ... मगतर फारच छान चाललेय!

बाकी देशासाठी उत्तम झाले ह्यास मी सहमत नाही. अहो ह्या भूभागास एक देश म्हणून ओळख इंग्रजांमुळेच झाली. नाहीतर सगळे राजे आपापले राज्य सांभाळत बसले होते, एकमेकांशी डीला मारून. जनता मरतच होती.

कसलं डोंबल्याचा खोटारडेपणा? सगळेच म्हणताहेत इंग्रजांच्या महार सैनिक असलेल्या फौजेने पेशव्याच्या ३०००० फौजेस अडकवून ठेवले.

हे राकू अन कापोचे ह्ये लंब्या लंब्या पोष्टी टाकून राहिलेत Proud

मला वाटलं होत काल संपला असेल विषय ... आजपण सुरु!!

कपोचे,

शब्दांची फिरवाफिरवी करण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही.

काही तथ्ये देउन नंतर प्रश्न विचारले आहेत. हा काही पीएचडीचा थेसिस नाही की मीच संशोधन करून तुम्हाला बाजीरावाचे पंचवीस हजार सैन्य कोठे होते ते सांगायला. पण तुम्हाला तुमच्या तथाकथित ‘अधिकृत’ माहितीच्या आड दडून बसायचे आहे व ५०० विरूद्ध २५,००० याचे लॉजिकल उत्तर द्यायचे नाही. डोक्यात प्रकाश पडत नसेल तर २५,००० लोक म्हणजे किती असतात, मैदानी लढाईमध्ये त्यांच्यापुढे ५०० लोक (कितीही महापराक्रमी असले तरी) म्हणजे किती कमी दिसतात हे एकदा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि मग कोणतेही संदर्भ न लावता – स्वत:चा शहाणपणा बाजूला ठेवून – विचार करा. हे मला वाटते यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. शेवटचे सांगतो.

विकीतल्या माहितीच्या खाली काही संदर्भ अहेत. ते पडताळून पाहण्याची तसदी तुम्ही घेतली नाही. तुम्ही स्वत: जो गॅझेटचा संदर्भ नंतर दिलात त्यातला मजकूर वाचलात तर खरा, तो समजून घेण्याची तसदी घेतली नाहीत आणि वर मला शहाणपण शिकवायला मात्र एकदम तयार.

संताजी-धनाजीची कसली उदाहरणे देता, मीच तुम्हाला शिवाजीने कमी संख्येच्या बळावर शाहिस्ताखानाला कसे पळवले, चीनविरूद्धच्या युद्धात रेझांग ला च्या लढाईत भारतीय जवान प्रचंड संख्येने आलेल्या चिन्यांविरूद्ध कसे त्वेषाने लढले याची उदाहरणे देतो की. पण प्रत्येक लढाईची काही विशिष्ठ परिस्थिती असते. काही वेळा शोर्य दाखवूनही कमी संख्येने असलेले सगळे सैन्य मारले जाते, गनिमी काव्याने काही विजय साध्य करता येतात. केवळ लॉजिकलच नव्हे तर याबाबतीतले प्रत्यक्ष इंग्रजांनी लिहिलेले संदर्भ देउनही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. येथे इंग्रजच म्हणत अाहेत की 'neither side won decisive victory' तरीही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आणि तुम्ही तुमच्या स्वप्नरंजनासाठी साधा विचार करायलाही तयार नाहीत. तुम्हाला शुभेच्छा.

विजय झालाच नाही, तर विजयस्तंभ उभारू कसा दिला, हा तुमचा प्रश्न तर गडगडाटी हसण्याच्या लायकीचा व विचार करण्याच्या तुमच्या धन्य पद्धतीचा पंचनामा करणारा आहे. लढाईनंतर काही वर्षांनी तो स्तंभ उभारला गेला, तोवर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झालेली होती. तेव्हा अशा परिस्थितीत त्यांना विरोध करणार कोण? तेव्हा असे अतिशय मूर्खपणाचे प्रश्न विचारता व स्वत:च्या विचारसरणीचे समर्थन करता. म्हणूनच “पेशवे जर हरलेच नव्हते तर विजयस्तंभ कसा काय उभारू दिला ? आणि या लढाईत पेशव्यांचा पराभव त्यांनी मान्य केला नाही तर बाजीराव कुठे गेला आणि इंग्रजांचा अंमल कसा काय सुरू झाला याची उत्तरे ना तुमच्याकडे आहेत ना त्या फेसबुक ष्टोरीमधे” या तुमच्या विधानांमध्ये बिनडोकपणा व असंबद्धता पुरेपूर भरलेले आहेत.

तुम्ही दिलेल्या गॅझेटमधलेच उल्लेख इतरत्र आले अहेत. त्यात बाजीराव प्रत्यक्ष लढाईच्या ठिकाणापासून दूर होता. काही ठिकाणी तीनशेच्या तीन तुकड्या तर काही ठिकाणी सहाशेच्या तीन तुकड्या असे संदर्भ मिळतात, त्यावरून आठशे विरूद्ध नऊशे की आठशे विरूद्ध अठराशे (दोन हजार) एवढीच विसंगती आहे. बाजीरावाच्या दृष्टीने ही मुख्य लढाई नव्हतीच. तरीही या कमी संख्येच्या सैन्यापुढे तुमचे २५-३०हजाराचे सैन्य काही करू शकत नाही असे बाजीरावाने म्हणणे म्हणजे सगळे २५हजाराचे सैन्य तेथे प्रत्यक्ष लढाईत होते असा त्याचा अर्थ होत नाही. शिवाय ज्या सरदारांच्या नावांचा त्यात उल्लेख आहेत, ते सगळे किंवा त्यातले कोणीही त्या लढाईत होते असेही दिसत नाही. उद्या पाकिस्तानच्या सैन्याच्या एखाद्या तुकडीने मोठा पराक्रम गाजवला व आपल्या जनरलनी त्यांचा बीमोड होत नसल्याबद्दल जबाबदार अधिका-यांना फैलावर घेतले, म्हणजे हे अधिकारी प्रत्यक्ष लढाईत होते किंवा भारताची सारी फौज तेथे लढाईत सामील होती असा त्याचा अर्थ नसतो. तेव्हा हे सारे समजून न घेता तुमच्या बिनडोकपणाची गाडी भरधाव वेगाने चाललेली पाहताना तुमचे खरोखर कौतुक वाटते.

तुमच्या डोक्यात जी conspiracy theory आहे त्याचे तुम्ही स्वत:च बळी आहात. विकीवरची माहिती कोणीतरी बदलली व माझी पोस्ट आताच का आली यांचा संबंध लावणारी धन्य मानसिकता तुमची आहे आणि तुम्ही दोष मला देत आहात.

सैन्यातल्या अधिका-याने येथे दिलेल्या उत्तराचा अधार घेऊन तुमच्या मूर्खपणाचे समर्थन करण्याचा तुमचा प्रयत्न तर अतिशय केविलवाणा आहे. ही लढाईच मुळात एक प्रकारची unplanned लढाई होती. दोन सैन्ये अचानक समोरासमोर आल्यामुळे झालेली. त्यात डावपेच करायला कोणालाच संधी नव्हती. शिवाय ही मैदानी लढाई होती. अशा लढाईत कितीही पराक्रम गाजवला तरी २५,०००समोर ५०० लोकांचा निभाव लागणे अशक्य आहे हे तुम्हाला कोणीही सांगेल. तेव्हा त्यांच्या उत्तराचा आधार घेताना तुमची वैचारिक दिवाळखोरी तुम्ही दाखवली आहेत.
माझ्या पोस्टमधले प्रश्न हे केवळ या दोन व त्यातही भीमा कोरेगावच्या लढाईबद्दलचे आहेत. तरी बाजीराव कोठे गेला व पेशव्यांचा पाडाव कसा झाला असे अतिशय असंबद्ध प्रश्न तुम्ही विचारता.

प्रचलित कथावरतुमचा जो गाढा विश्वास आहे तो पाहता कोणी प्रश्नच विचारू नये अशी तुमची मानसिकता आहे. त्याचप्रमाणे जायचे तर शिवाजीच्या इतिहासावरही नव्याने प्रकाश पडला आहे. हे करताना जातीय मानसिकता दूर ठेवून ऑब्जेक्टिव्हली विचार करायचा असतो, हे तर तुमच्या गावीही नाही. त्यामुळे नवीन प्रश्न अाले व ते तुमच्या समजुतीच्या विरूद्ध असले की प्रश्न विचारण्याच्या हेतुबद्दलच शंका घ्यायची ही तुमची घाणेरडी सवय मी मागेही पाहिलेली आहे. तेव्हा त्याबद्दल आणखी लिहित नाही.

तेव्हा तुमची विचार करण्याची पद्धत हा निव्वळ बिनडोकपणा आहे. येथे तुमच्या बिनडोकपणाच्या मतांशी प्रतिवाद करतो अहे दिसत असूनही फेसबुक, मायबोलीचे सर्वर, मालकी वगैरे बोलत तुम्ही असंबद्धशिरोमणी आहात हेच तुम्ही दाखवलेले आहे.

बरळणे, पिसाळणे हे तुमचे शब्द आहेत. तेव्हा मला माझी भाषा तपासण्यास सांगण्याचा शहाणपणा करू नका. मागे एकदा तुम्ही तो उद्योग केला आहे, म्हणून आधीच सांगतो.

माझ्या पोस्टच्या हेतुबद्दलच शंका घेण्याची तुमची घाणेरडी सवय पाहता तुमच्या कमेंट्सना प्रतिसाद द्यायचा नाही हे आधीचे धोरण सोडून मी यावेळी उत्तर दिले ही माझी चूक झाली. मात्र त्यामुळे तुमचा पोकळपणा आणखी एकदा सिद्ध झाला असाही त्याचा फायदा झाला.

तेव्हा इतका वेळ बरळत कोण होते हे तुम्हाला समजेल याचीही अपेक्षा मी ठेवत नाही.

सर्वज्ञानी मंडळ मैदानात आलेले दिसते. आपण केव्हा काय बोलत असतो हे आपले आपल्यालाच कळत नसले की असे प्रतिसाद येऊ लागतात. रेव्यू, पादुकानन्द, साधना आणि मी एका किमान मुद्यावर सहमत आहोत की आज हा विखार पसरवणे अनावश्यक आहे व इर्रिलेव्हंट आहे. पण ते काय आहे, की हे म्हणणे म्हणजे 'हार समोर दिसत असल्यामुळे रंग बदलणे आहे' असा भ्रम करून घेण्यात धन्यता मानली जात आहे. ही तीच मानसिकता आहे जी २०१६ मध्ये जातींवरून आगी लावण्यात आयुष्याचे सार्थक मानते. मग कोणी त्या आगी पुरावे देऊन लावू पाहते, कोणी संयमीत धागे काढून, कोणी पिंका टाकून, कोणी विखारी बोलून आणि कोणी अंतःपुरात खलबते करून! हे सगळे सोडून बाहेर पडायला एक किमान सकारात्मकता लागते ती ह्यांच्या गावीच नाही. आणि इथे हे वारंवार होत असूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे हेही आता अजब वाटू लागले आहे.

दीड मायबोलीकर,
तुम्हीही खोडसाळपणा करन्याच्या बाबतित कपोचे यांच्याशी स्पर्धा करणा-यांतलेच आहात. त्यामुळे खोटारडेपणा कोण करते आहे समजण्याची तुमच्याकडून अपेक्षाच नाही.
तरी तुमचे चालू द्यात.

बेफिकीर,

मूळ पोस्टमध्ये मला पडलेले काही प्रश्न दिल्यानंतर
"तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा."

या हेतुनेच केवळ ती पोस्ट होती. पण काहींना त्यात कॉंन्पिरसी थियरी दिसते त्यावर काही करता येत नाही. या लढाईतल्या इग्रजांकडून लढलेल्या महारांच्या पराक्रमाबद्दल मी कोठेही शंका उपस्थित केलेली नाही, कारण मराठ्यांचे अगदी कमीत कमी सैन्य यांच्याशी लढले तरी हा सामना विषमच होता. हे सगळे लिहूनही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा न करता हेत्वारोप करण्याची यांची पद्धत मला नवीन नाही.

मलाही अशा पद्धतीने चर्चा करायला आवडत नाही, पण तुमच्या हेतुबद्दलच शंका घेण्याच्या काविळीने कोणी असे करत असेल तर नाइलाजही आहे.

>>>बाकी देशासाठी उत्तम झाले ह्यास मी सहमत नाही. अहो ह्या भूभागास एक देश म्हणून ओळख इंग्रजांमुळेच झाली. नाहीतर सगळे राजे आपापले राज्य सांभाळत बसले होते, एकमेकांशी डीला मारून. जनता मरतच होती.<<<

तात्या, त्यांच्यामते देश म्हणजे त्यांच्या विचारांचे तेव्हाचे आणि आत्ताचे लोक असलेला भूभाग!

तेच ना तेव्हाचे सत्य आताच्या काही लोकांना पचनी पडत नाही. म्हणून इथून तिथून असे झालेच नाही असा दावा करत आहे. Wink Light 1

एका धाग्यावर एकच मिळेल. पुन्हापुन्हा कणवपूर्ण कटाक्षाच्या अपेक्षेने विभ्रमपूर्ण टंकनर्तन करू नये, कटाक्ष मिळणार नाहीत, असे विनयपूर्वक ध्यानी आणून देतो.

कुलकर्णी, छान पोस्ट्स लिहिताय. फक्त ह्या मुद्यावर तुमचे काय मत आहे की मुळातच हा विषय आज चर्चा करण्याची काही गरजच नाही? उगाच चर्चा वाढत चालली आहे.

(अवांतर - जीवनज्योती वसतीगृहात एक दोन जागा शिल्लक आहेत. )

संदर्भ, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि पुरावे दिल्याशिवाय इथल्या खोटारड्यांच्या थयथयाटाकडे आणि पराभूत मानसिकतेतून केलेल्या बिनबुडाच्या आरोपांकडे लक्ष द्यायला काडीचाही वेळ नाही. चालूद्या. काही कामाचे लिहीले तर विचार करू. बाकी चोरांचे एकमेकांना अनुमोदन देण्याबद्दल आश्चर्य कधीच वाटलेले नाही.

तात्या, कशाला या बोटाची थुंकी त्या बोटावर करता. किमान आधीच्या पोष्टी बदला की. सर्वांनी पहील्यापासून काय लिहीलेय ते इथेच आहे. ते वाचा एकदा.

अवांतर : देवपूरकर उत्तम गझला लिहायचे. त्यांचे गझलविषयक ज्ञान सहन न होऊन काही लोकांनी कृष्णकृत्ये करून त्यांना घालवून दिले.

शनिवआर वाडा हे सामाजिक अन्यायाचे प्रतिक तर बुधवार पेठ हे महिलांच्या शोषणाचे प्रतिक . दोन्ही पेशवाईच्याच देणग्या आहेत.

या पेशवाईचा अस्त १ जानेवारीस झाला.

सामाजिक विषमतेविरुद्ध लढलेल्या व महिला सबलीकरण करणार्‍या सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिन

त्यामुळे जानेवारी पहिला आठवडा हा समता सप्ताह म्हणुन साजरा व्हायला हवा.

मी सगळे संदर्भ वाचल्यानंतर जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. त्यानंतरच त्याच विकीच्या खाली असलेल्या बाँबे गॅझिटीयरची प्रत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून दिलेली आहे. त्यात कुठेही तीनशेच्या तुकड्यांचा उल्लेख नाही किंवा कुणीच जिंकले नाही असा उल्लेखही नाही. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरचे गॅझेट कुणीही वाचू शकतो त्यावरून खोटारडेपणा कोण करतंय हे आणखी स्पष्ट होईल. बॉम्बे गॅझेटीयर संपूर्ण मिळवून मूळ स्वरूपातही दिलेले आहे. माझ्यासाठी हा विषय इथे बंद.

तूर्तास रामराम !

एक जानेवारीलाच भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू झाली होती ना ?
तिथेही आता लोक जात असतात. त्याबद्दलही धागा येईलच. ती शाळाच कशी नव्हती, किंवा सावित्रीबाई फुलेंनी शाळा पहिली चालवली हा अपप्रचार आहे, त्यात ब्रिटीशांचा हात होता इत्यादी इत्यादी.

पेशव्यांच्या राज्यात कसे कुशलमंगलम होते, सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता, अस्पृश्यता नावालाही नव्हती इत्यादी इत्यादी. अस्पृश्यता ब्रिटीशांनी आणली, सतीची प्रथा त्यांनीच चालू केली, पेशव्यांनी ती बंद केली.

मग या लेखास उत्तम लेख, अनुमोदने वाचायला पुन्हा मज्जा येईल.
तोपर्यंत इतकेच म्हणतो की

देवपूरकर उत्तम गझला लिहीत असत. त्यांचे गझलविषयक ज्ञान अचूक होते.

>>>बुधवार पेठ हे महिलांच्या शोषणाचे प्रतिक . दोन्ही पेशवाईच्याच देणग्या आहेत.<<<

पेशवाईपूर्वी हजारो वर्षे स्त्रियांना समानतेची व आदराची वागणूक मिळत असे नाही का?

Proud

मला वाटते वर राकुंनी पुराव्यांचे संयत भाषेत काढलेले धिंडवडे वाचण्याचा विवेक आणि संयम उरलेला नसावा. इतिहास, पुरावे, संदर्भ हे मानवनिर्मीत आहेत. तर्कसुद्धा मानवनिर्मीत असला तरी तर्काने विचार करायला पुरावे लागतातच असे नाही. पुरावे असले तर तर्काला पुष्टि मिळू शकते इतकेच!

संपूर्ण इतिहास तर्काधारीत दृष्टिकोनातून स्मरणात आणून पाहिला तर अनेक थोरामोठ्यांची महान उद्दिष्टे स्वार्थाने लगडलेली दिसतील, अनेक शूर जेते हे केवळ तात्कालीन परिस्थिती फेव्हरेबल असल्याने शूर ठरलेले दिसतील, अनेक बंडखोर क्रांतिकारक ठरतील आणि अनेक राजे दरोडेखोर ठरतील.

(काही बाबतीत मोगांच्या विचारधारेशी सहमत आहे, हेही नोंदवून ठेवतो. त्या बाबी कोणत्या ते चर्चा पुढे गेलीच तर लिहीनही)

कपोचे,

"एक जानेवारीलाच भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू झाली होती ना ?
तिथेही आता लोक जात असतात. त्याबद्दलही धागा येईलच. ती शाळाच कशी नव्हती, किंवा सावित्रीबाई फुलेंनी शाळा पहिली चालवली हा अपप्रचार आहे, त्यात ब्रिटीशांचा हात होता इत्यादी इत्यादी.

पेशव्यांच्या राज्यात कसे कुशलमंगलम होते, सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता, अस्पृश्यता नावालाही नव्हती इत्यादी इत्यादी. अस्पृश्यता ब्रिटीशांनी आणली, सतीची प्रथा त्यांनीच चालू केली, पेशव्यांनी ती बंद केली.

मग या लेखास उत्तम लेख, अनुमोदने वाचायला पुन्हा मज्जा येईल."

जे लिहिलेले अाहे ते तुम्हाला दिसत नाही. न लिहिलेले दिसते. हीच तुमची विक्ृती आहे. त्या सावित्रीबाईंना तरी तुमच्या विक्ृत विचार करण्यातून सोडा.

स्वत:चे डोके लावायची सवय असेल तर अडचणी येत नाही. तो बाजीराव जरी तुमच्या समोर उभा राहिला तरी तुम्ही लढाईपासून दोन मैलावर तुझे सैन्य होते याचा पुरावा काय आणि कोठे फिरायला निघाला होता असे विचाराल. त्यामुळे समोर दिसते ते वाचता अाले तरी त्याचे आकलन करण्यासाठी विचार व तोही स्वत:चा विचार करावा लागतो. तसे तुमच्याकडून घडणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही दुस-यांवर आरोप करत बसा.

Pages