खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 13:52

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.

भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.

याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.

वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.

१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?

२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?

३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?

४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?

५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?

६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?

७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?

८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.

तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रिटीशांची मदत घेतली हा देशद्रोह असेल तर...

टिपू सुलतान ने ब्रिटीशांची हकालपट्टी निश्चित केली असताना पेशव्यांनी ब्रिटीशांची मदत केली याला काय नाव असेल?

पेशव्यांचे दप्तर म्हणून फेसबुकवर एकच पोस्ट काल हजारांनी शेअर केले आहे. त्यातील गमतीजमती ब्रेक के बाद.

पण विकी चे पेज एडीट करणे, फेसबुकवर मोहीमा चालवणे आणि तीच माहिती इथे येणे हा विलक्षण योगायोग आहे.

टिपू सुलतान ने ब्रिटीशांची हकालपट्टी निश्चित केली असताना पेशव्यांनी ब्रिटीशांची मदत केली याला काय नाव असेल?
<<

कायपोचे, तुम्ही संजय खानची 'दि सोर्ड ऑफ टिपु सुलतान' नावाची टिव्ही मालिका पाहलेय का ओ.

परशादभाई असल्या सिरिअल्स इव्हिडन्स अ‍ॅक्ट मध्ये ग्राह्य धरल्या जात नाहीत. विकिपिडियातील सोइस्कर ओळी चालतील.

फेसबुकवर काल ग्रुप्स ने शेअर केलेली ही पोस्ट. मूळची पोस्ट कौस्तुभ कस्तुरेची आहे. ती एका ग्रुपमधील असल्याने लिंक देत नाही कारण सेटींग्ज प्रायव्हेट असतील तर इतरांना दिसत नाही. ही लिंक पेशवाई, हिंदू, ग्रेट मराठा, गर्व आहे हिंदू असल्याचा, पुण्याचे पेशवे, आम्ही ब्राह्मण अशा प्रोफईल्सकडून नंतर अनेकांनी सेव्ह केली आहे. या पोस्टमधील विरोधाभास सांगण्याचीही आवश्यकता नाही. ही पोस्ट शेअर करत असताना जिथे जिथे बदल करता येतात त्या सर्व ठिकाणी बदल झाले आहेत हे विशेष !!

https://www.facebook.com/bhushan.k.raut.3/posts/1106701812676234

यातल्या खालच्या कमेन्ट्स मनोरंजक आहेत.

गंमत अशी आहे की जातीय अभिनिवेशातून एक जानेवारीस विजयस्तंभाला जाणा-यांची कथा, जी १९२७ पासून प्रचलित आह,, मान्य नाही म्हणून तथाकथित पेशव्यांचे दफ्तर दावणीला बांधून काल ही कथा व्हायरल झालेली आहे. तर इथे आणखी एक.

या कथेत दिल्याप्रमाणे पेशव्यांचा तळ कोरेगाव भीमा इथे पडला होता तर तात्या आणि राकु म्हणतात दोनच हजार सैन्य होते, कधी म्हणतात तीनशेच्या तीनच तुकड्या होत्या. यांनीही पेशव्यांचे दफ्तर हाच संदर्भ घेतला आहे. ते म्हणतात प्रचंड सैन्य तळ ठोकून बसलेले होते. तर बाजीराव जेव्हां पंढरपूरला पळून चालला होता तेव्हां ब्रिटीशांना झुलवण्यासाठी तीनशेच्या तुकड्या झुलवण्यासाठी मागे ठेवीत असे. ते विरुद्ध दिशेला ब्रिटीशांना घेऊन जात आणि बाजीरावाचा मार्ग निर्धोक झाल्यानंतर जंगलात लपून बसत.

तेव्हां तीनशे सैनिक झुलवण्यासाठी होते की कोरेगाव भीमेच्या लढाईत होते हा गोंधळ का आहे हे इथे विचारतो आहे. ज्यांनी संदर्भ तपासलेले आहेत त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यायला अडचण का असावी ?

दुसरा प्रश्न स्वाभाविकपणे कुणीही विचारेल की या कथेत पेशव्यांचा प्रचंड तळ होता असे लिहीले आहे. तर दोनच हजार सैन्य होते असे इथे म्हटले आहे. तर मग बाकीचे सैन्य कुठे होते आणि काय करत होते. अगदी शिरूरला होते असे म्हटले तरी चाकणहून एका रात्रीत शिरूर गाठलेल्या सैन्यास शिरूर ते कोरेगाव भीमा हे अंतर कितीसे असणार ? पाचशेच सैनिक भारी पडत असताना ते शिरूरलाच थांबून राहीले हे कसे काय ? किंवा कोरेगाव भीमालाच तळ असेल तर मग दोन हजार सैन्य बॅटींगला गेले असताना बाकीचे आमची बॅटींग नाही म्हणून बसून राहीले काय हे काही समजले नाही अद्याप.

इथे कुणाचे संदर्भ मान्य करणे न करणे हा लांबचा प्रश्न आहे. या बेसिक शंका आहेत. शिवाय पेशव्यांच्या दफ्तरातून आलेल्या कहाणीत देखील अनेक विरोधाभास आहेत .

एक साधा प्रश्न त्या काळात लेखनकला कोणास अवगत होति? इंग्रजांनि किंवा परकियांनि लिहीलेल्या इतिहासात तथ्य असावे.

इतिहास हा नेहमी जेते लिहीतात असं लिहीणा-यांना प्रश्न आहे की पेशव्यांच्या दफ्तरातल्या नोंदी अचूक असतील तर उर्वरीत सैन्य काय करीत होते या प्रश्नाची उत्तरे का मिळत नाहीत ?

बाँबे गॅझेटीअर चे जे पेज विकीपीडीयावर दिले आहे, ते दिसू शकत नाही. पण त्यातले उल्लेख महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटमधे आहेत.

त्याची लिंक खालीलप्रमाणे.
http://pune.gov.in/punecollectorate/gazette/poona-ii/history_british.html#.

इथे ३०००० सैन्यास माघार घ्यायला लागली असाच उल्लेख आहे. लढाईच्या ठिकाणी हे सैन्य प्रत्यक्षात हजर होते. प्रत्यक्ष मैदानात किती जण लढले यापेक्षा एव्हढ्या मोठ्या सैन्यास माघार घ्यावी लागली हा उल्लेख महत्वाचा आहे. आता बदल केल्याप्रमाणे पूर्वीच ठरवल्याप्रमाणे पेशव्यांनी ठरवून माघार घेतली वगैरे अभिनिवेशातून आलेल्या कहाण्या दिसताहेत. यानंतर बाजीराव कुठे गेला हे देखील आपणास या संस्थळावर कळते. महाराष्ट्र शासन हे आपलेच शासन आहे हे मान्य असेल तर ठीक. नाहीतर या शासनावर देशद्रोहाचा खटला खुशाल दाखल करू शकता.

जी कथा एक जानेवारीला जाणारे लोक सांगतात त्यात आणि या अधिकृत कथेत काडीचाही फरक नाही. त्यांनी कधीही कुठेही ३०००० जणांची कत्तल झाल्याचे म्हटलेले नाही. एव्हढे मोठे सैन्य असताना केवळ पाचशे सैनिकांनी रात्रभर थोपवून धरले. हा पराक्रम झाला. सकाळी कुमक येणार होती, त्यामुळे या रात्रीचे महत्व निर्विवाद होते. अन्यथा इतिहास वेगळा असता.

जातीय अभिनिवेश कुणाचा आहे हे आता वेगळे सांगण्याची आवश्यकता उरलेली आहे काय ?

कपोचे ऐष करा एवढेच म्हणतो.
२५,०००चे सैन्य या लढाईच्या वेळी कोठे होते हे तरी तुम्हाला एव्हाना कळले असेल असे समजतो.
उपाशी असलेले पायदळ एकास पन्नास या प्रमाणात असताना रात्रभर रोखून धरते म्हणजे काय असते हो? एकीकडे मराठ्यांचे पाच-सहाशेच मारले गेलेत अशी नोंद आहे मग रात्रीतून पंचवीस हजारांना रोखून धरले म्हणजे काय त्यांच्यासमोर भांगडा डान्स करून त्यांना गुंतवून ठेवले, की त्यांच्याशी पत्ते खेळले, की गोष्टी सांगितल्या, की पंचवीस हजार मराठे एकदम अंगावर अाले तेव्हा इंग्रजांच्या अधिका-याने रात्रभर टाइम प्लिज म्हणून त्यांना रात्रभर नुसतेच बसवून ठेवले, की त्यांच्या मुसक्या बांधून ठेवल्या आणि सकाळी सोडून दिले अशी तुमची कल्पना आहे? तेही नदीचे पात्र कोरडे असताना, गनिमी काव्याची लढाई शक्य नसताना. कदाचित पंचवीस हजारांना रांगेत उभे केले असेल आणि त्यातल्या हव्या त्या पाच-सहाशेंना मारले असेल आणि सकाळी बाकिच्यांना सोडून दिले असेल.

एकटा बच्चनही सिनेमात एकावेळी दहापेक्षा जास्त लोकांशी लढताना दाखवत नाहीत. येथे एक जण रात्रभर पन्नास जणांना थोपवून धरतोय. कमाल आहे तुमच्या विचाराच्या अचाट झेपेची. प्रचलित कथांना मान्यता देण्याची तुमची पद्धत अफलातून आहे.

तुमच्या कमेंटचा शेवट तर जबरी. तुमच्या अशा दिव्य लॉजिकने ५०० व २५,०००ची प्रचलित गोष्ट सिद्ध होते असे सांगता आणि जातीय अभिनिवेशाचा आरोप करता?
तसेही माझ्या पोस्टमध्ये महारांच्या पराक्रमाबद्दल संदेह नाही हेही स्पष्ट लिहिले आहेच. पण तुम्हाला चमत्काराच्या सुरस कल्पनांनी इतके पछाडलेले आहे, की तुम्ही प्रचलित कथांच्या पुढे जाऊच शकत नाही हा जणु माझाच दोष.
वर महाराष्ट्र शासनावर खटला भरण्याचे आव्हान देता. ही तर कुचाळकेपणाची हद्दच झाली. सरकार सांगते तो सगळा खरा इतिहास म्हणता की काय? या निकषाने तर भविष्यात तुमचीच पंचाईत होईल. मग त्या ग्रॅंड डफने सांगितले त्याचे काय करायचे? गो-या इतिहासकारांनी त्यांच्या गो-या अधिक-यांच्या पराक्रमाबद्दल सांगूनही या लढाईबद्दल जे सांगितले त्याचे काय करायचे? तेव्हा 'अधिक््रत' इतिहासाबद्दलची तुमची बनवेगिरी पुरे झाली. एकीकडे उपलब्ध असलेल्या माहितीत विरोधाभास आहे म्हणता आणि दुसरीकडे स्वत:चा असा काही विचार न करता एकास पन्नासची थियरी सरळ मान्य करता. कमाला आहे की नाही? शिवाय विरोधाभास काय तर तीनशेच्या तीन तुकड्या म्हणजे जेमतेम हजार. काही संदर्भ दोन हजार सांगतात. मराठ्यांचे पाच-सहाशे मारले गेले म्हणतात त्यात पाचशे की सहाशे यात तुम्हाला विरोधाभास दिसणार नाही. तसेच एक(-दोन) हजार की पंचवीस हजार यांच्यातही विरोधाभास दिसणार नाही. तेव्हा तुमचे चालु द्या.
बाकी तो सुरूवातीला केवळ स्मारकस्तंभ होता व नंतर इंग्रजांनी खोटेपणाने त्याचा विजयस्तंभ केला वगैरे तपशीलात तर मी जातच नाही.
तुमची विचार करून बोलण्याची शक्तीच संपल्यामुळे तुम्ही या वल्गना जरूर करत रहा. तुमच्यावर तर कसला आरोपही करायची इच्छा नाही इतके तुमचे लॉजिक भयंकर आहे.
तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे ऐष करा. फॅंटसीत रमण्यातच तुम्हाला आनंद मिळतो हे स्पष्ट दिसते आहे.
बाकी त्या कटाप्पाने कोणाला तरी का मारले या प्रश्नाच्या उत्तराप्रमाणे तुम्ही बाजीरावाच्या २५हजारापैकी सगळ्यांनाच येथे कामाला लावले म्हणजे तुमच्यापुरते तरी उत्तर तुम्हाला मिळाले याचा आनंद मला आहे, भलेही ती तुमची फॅंटसी का असेना.

आता आले कुलकर्णी जागेवर.
अधिकृत संदर्भानिशी लिहीलेले आहे. जे प्रश्न मी उपस्थित केले आहेत तेच तुम्ही विचारत आहात. तुम्ही हा लेख लिहीताना या सर्व प्रश्नांची उत्तरे आधी जमवून मगच लेख लिहायला हवा होता. आता माझेच प्रश्न रिपीट करून नेमके काय सिद्ध झाले हे कळत नाही.

जर हे सैन्य भांगडा करत नव्हते तर काय करत होते हे कळवा. तोपर्यंत मी ऐष करत आहे. जोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत तुमच्या असल्या बडबडीकडे लक्ष द्यायला वेळही नाही आणि अर्थही. हे पहीलं लिखाण नाही जे संदर्भाविना केलेलं आहे. अशा लिखाणाकडे लक्ष न देण्याचे कारणच हे आहे की केवळ तुम्हाला वाटते या सदराखाली तुम्ही लिहीत सुटता. प्रश्न विचारले की पिसाळता, उत्तरे देण्याऐवजी दुरुत्तरे करत असता. अशा लेखांमधे अभ्यासाची आवश्यकता असते एव्हढे जरी कळाले तरी भरपूर झाले.

तुमच्या लिखाणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता का नाही हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. माझ्या लॉजिकबद्दल तुम्ही काहीही लिहा, ते पराभूताचे लक्षण आहे. तुमच्या ष्टोरीमुळे जे प्रश्न उपस्थित होतात त्याबद्दल तर्कशुद्ध रित्या आधी विवेचन केलेले आहे. तुम्हाला अद्याप पेशव्यांचे सैन्य कुठे होते आणि काय करीत होते हे सांगता येत नाही, ते सांगण्याची तयारी दिसली नाही. फक्त कल्पनारंजन एव्हढया शिदोरीवर ५०० सैनिकांनी थोपवून धरले नाही एव्हढेच तुणतुणे चालू आहे.

आजच का बरं हे सगळं लिहावंसं वाटलं ? आजच विकीपीडीयावर बदल का झाले ? आजच फेसबुकावर मोहीमा का चालल्या ? या आधी या कथा का नाही प्रकाशात आल्या ? पेशवे जर हरलेच नव्हते तर विकयस्तंभ कसा काय उभारू दिला ? आणि या लढाईत पेशव्यांचा पराभव त्यांनी मान्य केला नाही तर बाजीराव कुठे गेला आणि इंग्रजांचा अंमल कसा काय सुरू झाला याची उत्तरे ना तुमच्याकडे आहेत ना त्या फेसबुक ष्टोरीमधे.

की आपोआप पेशव्यांचा पाडाव झाला ?

तुमच्याशी तसेही वाद घालण्यात अर्थ नसतो.
हे फेसबुक नाही. ही तुमची वॉल नाही हे माहीत असतानाही उगीचच अडाण्याचे सोंग घेऊन प्रतिक्रिया येऊ नयेत अशी अचाट भूमिका तुम्ही घेत असता. ही मायबोली या सर्व्हरची जागा आहे. इथे कुणीही लेख लिहीला तरी त्याला क्रॉस क्वेश्ननिंग होणारच. जर तुमच्या लिखाणात पुरावे किंवा तर्कशुद्ध विवेचन नसेल तर तुमची धडगत नाही. तुम्हाला वाटले म्हणून तुम्हाला कुणी प्रश्न विचारू नये असे होत नाही. मायबोलीच्या मालकांची ही जागा आहे. जोपर्यंत तसे धोरण अस्तित्वात येत नाही तोपर्यंत लिखाणाखालची जागा ही सार्वजनिकच राहणार आहे. अगदी ज्या लोकांनी पैसे देऊन स्वतःचे रंगीबेरंगी पान घेतलेले आहे ते सुद्धा वादग्रस्त लिखाण करून प्रतिक्रियांपासून अलिप्त राहू शकत नाहीत.

तुम्हाला वेगळा सिद्धांत मांडायचा तर ते सिद्ध करा. पाचशे सैन्य पंचवीस हजारांना थोपवून धरू शकते याला वर सैन्यातील एका अधिका-याने दुजोरा दिलेला आहे. इतके पुरे.

बाँबे गॅझिटीयरचे संपूर्ण लिखाण खालील लिंक वर आहे.

https://archive.org/stream/cu31924070623685/cu31924070623685_djvu.txt

अनुक्रमणिकेमधे पाहून कोरेगाव भीमेच्या लढाईचा तपशील इथे मिळेल जो महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमधे समाविष्ट आहे. ग्रँट डफचे संदर्भ दिलेले आहेत . अधिकृत म्हणून हा संदर्भ दिला. या प्रमाणे लढाईनंतर बाजीरावाचे पुढे काय झाले, पेशव्यांचे उर्वरीत सैन्य काय करीत होते या प्रश्नांची उत्तरे मिळत असल्याने समाधान झाले.

जातीय अभिनिवेशातून अन्य कहानी रचणा-यांनी या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पुढे काहीही बरळू नये.

रेव्यु
बरं. वेळ नाही म्हणून लोकांचे फावते. आजवर राकुंच्या लिखाणावर त्यांना इतका वेळ कसा म्हणून कुणीच प्रतिसाद दिलेला वाचनात आलेला नाही. रोज कुणीही उठून काहीही लिहीत सुटेल त्याला प्रश्न विचारायचे नाहीत का ? उद्या मायबोलीच्या याच बाफचा संदर्भ म्हणून वापर होईल त्याला मान्यता असेल काय ?

किमान संदर्भ देऊन तरी लिहावे ना !

राजेश कुलकर्णी,

लेटेस्ट पोस्ट अतिशय आवडली. आवडण्याचे कारण हे की आजही एखादा विचार जनतेच्या माथी मारण्यासाठी काहीतरी अद्भुत कहाणी रचावी लागतेच ही मानसिकता आपल्यात उरलेली आहे हे त्यातून सरफेस होत आहे. सरळ विचार करणे किंवा मी तर म्हणेन १९७ वर्षांनंतर ह्या गोष्टींचा विचारच न करता पुढे मार्गक्रमण करणे इतका शहाणपणा काही सामाजिक घटकांकडून अपेक्षिता येत नाही हे आपले दुर्दैव आहे. तुम्ही व तुमच्याशी (अजिबात वेळ नाही असे म्हणत) चर्चा करणारे, अश्या दोन्ही बाजूंनी दिलेले तपशील, त्यांचे संदर्भ ह्याबाबत माझे म्हणणे तर असे आहे की कोणतेच तपशील पूर्ण खरे अथवा खोटे नसोत व नसावेतही. करायचे काय आहे आज त्या गोष्टीचे? एकीकडे सगळे समान असा विचार प्रसवताना दुसरीकडे ह्या दर्‍या वाढतील असे विचारही पेरत आणि फोफावू देत राहायचे हे आपल्या एकुण सगळ्याच समाजाच्या अक्कलशून्यपणाचे लक्षण आहे, मग ते कोणत्याही बाजूकडून केले गेलेले असो. खरेच २५००० अपयशी ठरलेले असोत किंवा खरेच ५०० च्या बाजूने खोटा इतिहास लिहिला गेलेला असो. आज २०१६ चालले आहे. ज्यांना पुढे जायचे आहे त्यांना पुढे जाऊदेत की? फँटसीत रमायचे आहे त्यांनी रमावे (कोणत्याही बाजूच्या) पण त्या फँटसीज समाजाच्या माथी मारण्याला तेवढा लगाम घातला जावा.

रेव्यू, वेळाचा प्रश्न नाही आहे. प्रचाराचा प्रश्न आहे. पुढच्या पिढीची आपल्या बाजूने कशी दिशाभूल करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करताहेत. हे धर्मकार्य आहे . जिहाद आहे. त्याला ते इतिहास असेही म्हनतात. इतिहासाचे इंतरप्रिटेशन सापेक्ष असते. खलिस्तान झाले असते तर भिंद्रानवाल्याला भगत्सिंगाचा दर्जा मिळाला असता.ज्याना दोन्ही पैकी कोणत्याही बाजू चा प्रचार करायचा नाही त्याना सत्य न उमजू देता कन्फ्यूज करण्याची ही चाल आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे आपल्याला समजू देणार नाहीत.प्रचाराचे महत्व अगाध आहे. तुम्ही आझाद कश्मीरच्या वेब्साईट्स १५ दिवस वाचल्या तर त्यांचे म्हनने पटू लागते. ज्या वकीलाचे व्याकरण चांगले तो वकील नक्कीच यशस्वी होतो.

बाँबे गॅझेटीयर आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संस्थळ यातील संदर्भ ज्यांना मान्य नाहीत त्यांनी ते सप्रमाण खोडून दाखवण्याची आणि शंका निरसनाची पूर्ण जबाबदारी घेऊनच बरळाबरळी करावी. विषय संपला.

दर्‍या वाढतील असे विचारही पेरत आणि फोफावू देत राहायचे हे आपल्या एकुण सगळ्याच समाजाच्या अक्कलशून्यपणाचे लक्षण आहे
>>
ऑब्जेक्शन मिलॉर्ड !
हे अक्कलशून्यपणाचे लक्षण नसून बुद्धिकौशल्य वापरून केलेल्या कॅल्क्युलेटेड बेरकीपणाचे लक्षण आहे.

>>>हे अक्कलशून्यपणाचे लक्षण नसून बुद्धिकौशल्य वापरून केलेल्या कॅल्क्युलेटेड बेरकीपणाचे लक्षण आहे.<<<

हम्म्म! खरे आहे.

प्रोफेसर देवपूरकर यांनी गझलेचे जे सिद्धांत मांडले होते त्याला काही लोकांनी आपले स्थान डळमळीत होते म्हणून विरोध केलेला आठवला. तेच काही लोक उपटसुंभाप्रमाणे जिथे तिथे संदर्भाविना काहीही बरळत सुटलेले पाहून अंमळ मौज वाटली. बाकी आपला तर पाठिंबा देवपूरकरांनाच.

त्यांना सन्मानाने पुन्हा मायबोलीवर बोलावण्यात यावे. त्यांच्याइतक्या दर्जेदार गझला पाहण्यात आल्या नाहीत गेल्या चार पाच वर्षात. कदाचित हेच तर धडकी भरण्याचे कारण नसेल ना ?

बेफिकिर, तुमच्या 3 January, 2016 - 09:16 या पोस्टीशी सहमत.

मलाही पेशवे/इतर कोणीही भारतीय जिंकले/हरले, त्यांना कोणी जिण्कले/हरवले या गोष्टीची आज अशी कुत्सितपणे, केवळ एकमेकांना तुच्छ लेखण्यासाठी चर्चा करुन आज अस्तित्वात असलेल्या समाजाचा उत्कर्ष किंवा अपकर्ष कसा होणार आहे हे कळत नाही.

घडलेल्या इतिहासाची बरी वाईट, सर्वांगाने, कुठल्याही बाजुची तळी उचलुन न घेता, निपक्षपाती चर्चा करा, कोण कसे चुकले हे कुठलाही अभिविनेष न बाळगता बघता येते का हे पाहा, त्या चुकांमधुन धडा घ्या आणि सर्वांनीच पुढे चला. पण हे सोडुन आज आपण जो इतिहास घडुन गेलाय तो परत परत तसाच घडावा यासाठी प्रयत्नशील आहोत असे दिसतेय. असो. यावर काहीही उपाय नाही. हा रोग भारतीय रक्तातलाच आहे. इथले लोक कायम एक्मेकांशी लढुन मेले, पुढेही मरत राहतील. आपल्यामुळॅ कोणाचा फायदा होतोय हे त्यांना कधीही दिसणार नाही.

Pages