खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 13:52

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.

भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.

याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.

वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.

१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?

२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?

३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?

४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?

५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?

६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?

७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?

८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.

तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपोचे,
इंग्रज पुण्यात ठाण मांडुन बसला होता, त्यांनाही बाजीरावाच्या फौजेची भिती वाटत होती, तर पुण्यातल्या इंग्रजांना आणखी फौजफाटा येऊन मिळेल अशी समजूत बाजीरावाची असल्यामुळे तो पुण्याच्या फंदात न पडता साता-याला जाण्याच्या तयारीत होता असे माझ्या वाचण्यात आले होते. बाजीरावाचे इतर सेैन्य त्यावेळी कोठे होते याबद्दल.

तुमच्या वाचनात कुठे काय आले ते आम्हाला संदर्भासहीत समजल्याशिवाय चर्चा कशी होणार कुलकर्णी ? ते संदर्भ वाचले तर शंकासमाधान होऊ शकते.

कुठे वाचले ते सांगत चला की.

माझ्याही वाचनात बरंच काय काय आलंय, पण संदर्भ आठवत नाहीयेत. ते इथे लिहीले तर चालवून घेणार का ? तसं असेल तर बरं होईल.

कुलकर्णींचं सगऴ्ंच एकतर्फी...संदरर्भासहित स्पष्टीकरण ते ऑप्शन ला टाकऊन पेपर सोडवत असावेत Proud

पेशवाई नष्ट होणे नि ब्रिटिशांचे राज्य येणे हा देशाच्या भवितव्याच्या द्रुष्टिने टर्निंग पॉइंट ठरला.

कपोचे,
तुम्हीच म्हणताहात तीनशेच्या तीन तुकड्या तिकडे लढताहेत आणि इतर २३-२४हजार काय करत होते? त्यावरून तरी लक्षात यायला हवे की सगळे सैन्य तेथे नव्हते. ज्यांना ५०० विरूद्ध २५००० वरून अभिनिवेश बाळगायचा आहे त्यांनी तो बाळगू दे. पण पाचशे विरूद्ध पंचवीस हजार व तरीही पाचशेंनी जिंकणे हे समीकरण शक्य नाही विशेषत: दोघांकडेही सारख्याच प्रकारची शस्त्रे असताना हे लक्षात घेतले तरी त्यातले तथ्य लक्षात यावे.
बाकी संदर्भ काय हवे तर तुम्हीदेखील मिळवू शकालच की.
पेशवेदफ्तरावर किंवा इतर 'हिंदुत्वावादी' (म्हणजे काय माहित नाही) माहितीवर विश्वास ठेवत नाही असे म्हटले तरी चमत्कारांवर विश्वास नसेल तर यातले तथ्य व अभिनिवेशाचा भाग लक्षात यावा.

पेशव्यांतर्फे अरब आणि ब्रिटिशांतर्फे महार लढत होते? ऐकावे ते नवलच.
हे म्हणजे राजस्थानतर्फे शेन वॉर्न आणि मुंबईतर्फे सनथ जयसूर्या लढले तसंच वाटतंय.

Light 1

तुम्हाला इतिहास माहीत नाही का सनव ? नसेल तर तिकडे येक यदुनाथ सरकार बसले आहेत त्यांची शिकवणी लावा Happy राजवाडेच म्हणणार होतो पण राजवाड्यानी पूर्वग्रहदूषित इतिहास लिहिला असल्याने तो खरा नाही. सरकार चालतील.

देशाच्या भवितव्याच्या द्रुष्टिने टर्निंग पॉइंट ठरला.
>>
पगारे चांगला की वाईट्ट ? बहुधा चांगलाच म्हणायचे असेल तुम्हाला. कारण पेशव्यांपेक्षा इंग्रज बरे असे तुमचे मत असेल.कारण इंग्रजानी इथल्या घरांवर सोन्याची कौले चढविली.

<<पेशव्यांतर्फे अरब आणि ब्रिटिशांतर्फे महार लढत होते? ऐकावे ते नवलच.>>

हिन्दुस्थान एकसंघ कधीच नव्हता. गझनीचा महंमदाच्या हल्ल्यांनंतर भारताची वेगवेगळी राज्ये वेगवेगळ्या राजांनी चालवली. काही हिन्दु होते, काही मुघल तर काही फिरंगी. त्यामुळे ती राज्ये वेगवेगळी होती. म्हणजे लोक तेच होते पण राज्यकर्ते वेगवेगळे होते. फार कशाला; छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिल निजामाच्या राज्यात सरदार होते. त्यामुळे नवल असायचे कारण नाही.

इतिहास हा नेहमी 'जिंकणार्‍यांनी जसा लिहिला तसा' पुढच्या पिढ्यांना समजतो. त्यामुळे लिहिलेला इतिहास पूर्णतः खरा मानायचे कारण नाही.

मी आर्मीत होतो. आमची खूप कोंडी व्हायची. मी मद्रास रेजिमेन्टचा. आम्ही श्रीरंगपट्टणम् किंवा नागपूरच्या लढाईचा विजय साजरा करायचा की पराजयाचे दु:ख मानायचे? कारण आमचे पूर्वज .. मग ते टिपू सुलतान असो किंवा मराठे असोत हरले... पण आमची आर्मी (ब्रिटिश आर्मी) जिंकली. तीच गत महार रेजिमेन्ट्ची आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे (जास्त सैन्य असेल तर जिंकण्याची शक्यता जास्त असते हे मान्य करूनसुद्धा) सैन्य किती आहे यावर युद्धाचा जय पराजय अवलंबून नसतो. सैन्याचा वापर कसा झाला हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. बाजीराव मस्तानी पाहिलात ना? बुंदेलखंडची लढाई आठवा. शत्रूला गाफिल ठेवणे हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा असतो. सद्दाम हुसेनच्या सैन्यावरचा अमेरिकेचा हल्ला आठवा. मिडियाचा आणि हवाई दलाचा वापर करून अमेरिकेने सगळ्या जगाला भासवले की समुद्रमार्गे हल्ला होणार; प्रत्यक्षात जमिनीवरून मुख्य हल्ला झाला.

जर हरले ते अरब, पेशवे नाहीत हे लॉजिक खरे मानायचे तर खर्ड्याच्या लढाईत पेशवे जिंकले की लढणारी तुकडी? त्या तुकडीत कोण होते?

बाकी संदर्भ काय हवे तर तुम्हीदेखील मिळवू शकालच की.>>> कशासाठी? तुम्हाला सद्य परिस्थितीत प्रचलित असणारी हकीगत मान्य नाही म्हणून हा यज्ञ तुम्ही धडाडून पेटवला आहे, तर तुमचे म्हणणे खरे कसे हे इतरांनी आपणहून पटवून घ्यायचा का?

तुम्ही संदर्भ तपासून मगच विधाने केली असतील ना? ते संदर्भ काय आहेत हे इतरांना कसे कळणार?

मी एक थिअरी मांडतो, त्याचे संदर्भ मात्र तुमचे तुम्ही तपासून घ्या, हे तुम्हाला मान्य आहे का?

मी काय म्हणतो
खरी लढाई इंग्रज आणि अरब यांच्यात झालेली असेल. आणि पेशवे आणि इतर लोक बाजूला उभे राहून प्रेक्षक म्हणून लढाई बघत असतील. लांबून बघणार्‍याला वाटत असेल की हे सग़ळे लढाई करत आहे. म्हणून पेशवे अरब महार इंग्रज असा घोळ झाला असेल.

बघा पटल तर.

पेशव्यांचे सैन्य पुण्यातून निसटले ते पंढरपूरला गेले. तिथून पुण्याच्या पूर्वेकडून गोल वळसा घालून थेट उत्तर दिशेला चाकणला पोहोचले. पेशव्यांचे सैन्य ३०००० होते. चाकणहून ते कुठल्या मार्गाने पुण्यात पोहचेल याचा अंदाज घेत इंग्रजांचे नियोजन सुरू होते. खडकीची लढाई सोपी नसल्याने अधिक कुमक घेऊन कंबरडे मोडावे# म्हणून कंपनीला कळवले होते. पण उत्तर आले नाही, यामुळे निर्णय होत नव्हता. नाकेबंदीची माहीती मिळताच पेशवे शिरुरच्या दिशेने निघाले..
३१ डिसेंबरला सैन्य भीमा नदीच्या किनारी पोहोचले. इकडे शिरूर ला टेहळणीसाठि गेलेल्या पथकाला सैन्य एका रात्रीत पोहोचेल याची कल्पना नव्हती. खडकी आणि शिरुरच्या मधेच पेशव्यांच्या सैन्याचा तळ दिसला. या सैन्याने निर्णायकी तुकडी वर हमला करून कमांडर शीर बाजीरावास पाठवले.

यानंतर सैन्य शरण येईल या अपेक्षेत निवांत झालेल्या या सैन्यावर पाचशे महार सैन्याने रात्रीच्या वेळी कडाडून हल्ला चढवला. याच तुकडीने खर्ड्याची लढाई जिंकली होती. त्यांच्या आवेशापुढे या सैन्याचे काहीच चालले नाही आणि त्यांनी पराभव मान्य करून माघार घेतली.

१, संदर्भ स्वतःच शोधावेत.
२. पेशव्यांच्या जातीय अभिनिवेशातून पाचशे महारांनी केलेला पराभव मान्य नसल्यास विकीत केलेल्या गुपचूप बदलास प्रमाण मानून खुशाल वाटते ते लिहा आणि वाटेल ते प्रश्न विचार.
३. या पोस्टचा गर्भित अर्थ न समजल्यास त्याची जबाबदारी स्वतःची राहील.

कपोचे,
तुमच्याच एका कमेंटमध्ये दुस-या सदस्याने तीनशेच्या तीन तुकड्या म्हटल्यावरचा उल्लेख आहे. मी तसे कोठेही म्हटलेले नाही. “३०० च्या तीन तुकड्या होत्या हे कुठून घेतलंय ? लिंक किंवा संदर्भ मिळेल का ?
बरं ते हरत असताना२५०००० चं सैन्य गंमत बघत का उभे राहीले ? केवळ ५०० च्या सैन्याला घाबरून त्यांनी माघार का घेतली असावी ?” ही तुमचीच कमेंट आहे ना? आता वेड कोणाला लागलेय ते ठरवा.
मी केवळ थियरी मांडलेली नाही. त्याचे संदर्भही दिलेले आहेत. जे या थियरीला पूरक आहेत. तुम्हाला तुमच्या कारणांनी ते मान्य नाहीत. तुम्ही म्हणता ते विकीवरचे बदल मी केलेले नाहीत. तुम्हाला तर त्यात काहीतरी हिंदुत्ववादीही आढळले. मी काही इतिहासकार नाही.
तुम्हाला ५०० वि. २५,००० ही थियरी मान्य असेल तर खुशाल विश्वास ठेवा की. प्रचलित असलेल्या हकिकतीतील त्रुटी दाखवल्या आहेत. स्वत:ची बोटे, डोळे, कान वापरा. योग्य वाटले तर घ्या नाही तर सोडून द्या.
मुळात या लढाईत कोणीच हरले नाही, ती निर्णायक झालीच नाही असे दाखले आहेत. तुम्हाला बसल्याबसल्या कागदावर पेशव्यांना किंवा अरबांना हरवायचे तर तसे करा की. तुमची मर्जी. उगाच त्याला जोडून खर्ड्याच्या वा जगभरातल्या लढायांचे दाखले देऊ नका.
इतर सदस्यांनीही काही संदर्भ दिलेले आहेत. तुम्हाला पेशवे दफ्तर मान्य नाही, सदस्यांनी दिलेले इंग्रजांचे संदर्भ मान्य नाहीत, इतरही अनेक संदर्भ इंटरनेटवर अाहेत. आता तुमच्यासाठी खास कोणी इतिहास लिहायचा?
तुम्हाला प्रचलित हकिकतीपेक्षा वेगळ्या कशाकडे लक्ष द्यायचे नसेल तर प्रश्नच मिटला. कमीत कमी माझीच उलटतपासणी घेणे तरी बंद करा.

तुम्ही प्रतिक्रिया वाचन करत नाहीत का? नीट वाचून मग विधाने करत चला. दुसऱ्याचे विधान कोट् केलेले समजत नाही का तुम्हाला? उलटतपासणी घेणे बंद करा म्हणजे काय? नको असे तर लिहू नका ना.

बरं ते हरत असताना२५०००० चं सैन्य गंमत बघत का उभे राहीले ? केवळ ५०० च्या सैन्याला घाबरून त्यांनी माघार का घेतली असावी ?” ही तुमचीच कमेंट आहे ना? आता वेड कोणाला लागलेय ते ठरवा.>>> तुम्हाला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे.

पादुकानंद, चांगलाच टर्निंग पॉइंट ठरला.इंग्रजांनि सोन्याची कौले चढवली नसली तरी पेशव्यासारखे इतर जातिंच्या कमरेला झाडु, गळ्यात मडके असा हिणपणा केला नाही.

कुलकर्णी
सदस्यांनी संदर्भ दिलेले तुमच्या वाचनात येतात आणि त्याच सदस्याचे कोट केलेले विधान तुम्हाला दिसत नाही हा काय प्रकार आहे.
ज्या सदस्याने संदर्भ दिले त्याला शंका विचारल्या तर संदर्भ मान्य नाही हे कोणते लॉजिक आहे? तुम्ही स्वतः स्वप्न पाहून काहीही बरळत सुटलेत त्याची मात्र उलटतपासणी घ्यायची नाही. ग्रेट!

कपोचे,
तुम्ही मलाच भाषा जपून वापरण्यास सांगत अाहात हे गंमतीशीर आहे. 'वेड लागलय का' ही तुमची प्रथम भाषा होती. की दोन प्रतिक्रियांआधी काय झाले ते लक्षात रहात नाही?
तुमची व माझी मागची प्रतिक्रिया एकाच वेळी पोस्ट झाली होती. पाहू शकता. तेव्हा मी कमेंट करतेवेळी ज्या कमेंट मला दिसत नाहीत त्या मी वाचू शकत नाही. हे तरी पटते का पहा.

संदर्भ कोठे आहेत? संदर्भ कसे पहायचे असतात हे तरी माहित आहेत का?
विकीचे संदर्भ दिलेत. त्याच्या खाली अनेक संदर्भ अाहेत. ते तपासून पहायची तसदी घेतलीत का? त्यातला एक तर _तात्या_ यांनीच दिला. तो वाचलात का? त्यात तीनशेच्या तीन तुकड्यांचा उल्लेख आहे.
विकीमध्येच कुंभोजकरांच्या लेखाचा संदर्भ आहे. त्यात ब्रिटिश इतिहासकार ग्रॅंट डफ (हा काही हिंदुत्ववादी किंवा पेशवे दफ्तराचा इतिहासकार नाही बरे का)
In the words of Grant Duff, who was a contemporary
offi cial and historian, “Captain Staunton was destitute of provisions, and this detachment, already fatigued from want of rest and a long night march, now, under a burning sun, without
food or water, began a struggle as trying as ever was maintained by the British in India. Neither side won a decisive victory but despite heavy casualties Staunton’s troops managed to recover their guns and carry the wounded officers and men back to Seroor.

यात समजायला थोडे अवघड एक वाक्य आहे Neither side won a decisive victory. बाकी तुम्ही रात्रीतून आक्रमन करा व मराठ्यांच्या सैन्याला कापून काढा.

८०० विरूद्ध २००० हा सामनाही विषमच आहे. त्यामुळे इंग्रजांबरोबरच्या महार सैनिकांच्या पराक्रमाबद्दल प्रश्नच नाही. पण तुम्हाला ५०० विरूद्ध २५,०००चीच फॅंटसी अाहे त्याला मी काही करू शकत नाही. वर त्याला प्रचलित हकिकत म्हणून आहेत ते संदर्भही नाकारत आहात. धन्य आहे तुमची.

माझेच नशीब की यातले कोठलेच पुरावे किंवा संदर्भ मी तयार केलेले नाहीत.

माझेच नशीब की यातले कोठलेच पुरावे किंवा संदर्भ मी तयार केलेले नाहीत.
>>

तुम्ही नसले केले तरी तुमच्या हिंदुत्ववादी पूर्वजानी केले आहेत ना? पेश्वे वगैरे. ते कसे ग्राह्य धरता येतील? पेशव्यांचे शत्रु ब्रिटीश त्यांचे चालतील. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र. बिटीशांच्या फोडा आणि झोडा नीतीला बळी जाण्यातही अभिमान आहे. धन्य आहे.

कोट केलेल्या वाक्याचे संदर्भ तुम्ही मला मागत आहात याला काय म्हणणार? की त्या सदस्याची मागील पानावरील पोस्ट एकाच वेळी आली? गमती ते तुम्ही करताय. ज्या विकीचा संदर्भ सुरूवातीला तुम्ही दिला होता त्याचा अवस्था लक्षात आणून दिली आहे.

आता तुम्ही जे संदर्भ देत आहात त्याच्याशी त्या पानावरील सतत बदलणारी माहीती मॅच होत नाही हे सांगितल्यावर तुम्ही गुपचूप बसलात. आताशी ग्रँट डफचं नाव घेत आहात ते तुम्ही पूर्ण वाचले असेल तर सुरूवातीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला कठीण जाणार नाही.

थोड्याच वेळापूर्वी तुम्ही तीनशे सैनिकांची तुकडी याबद्दल अनभिज्ञ असल्याचे कळवले होते. का लक्षात राहत नाही तुमच्या? आता म्हणत आहात की तिथेच उल्लेख होते. म्हणजे तुम्हाला ते स्टेटमेंट सुरूवातापासून करायचेच होते का?

मग या तुकड्या हरत असताना सैन्य काय करt होते ही शंका आहे. निरसन व्हावे.

.

प्रसादराव अनुमोदन...
चर्चेच्या 'इन्फरन्स' ची वाट पाहतोय...त्याने बहुदा बहुदा बहुजन हरिजन आणि त्यातले क्रेडिट लाटणारे प्रश्न सुटणार असे दिसतय.एकंदर काय सगळेच विद्वजन.

Pages