आपल्या सर्वांना प्रिय असलेले कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे काल निधन झाले. त्यांच्या प्रकृती संदर्भात ज्या काही बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत त्यामध्ये पाडगांवकर गेली काही वर्षे "नागीण" (Herpes Zoster) या विकाराने त्रस्त होते असे म्हटले गेले आहे.
कांजिण्याचाच हा एक प्रकार असल्याने सहसा लहान वयात याची बाधा होते असा काहीसा समज आहे (तो कदाचित चुकीचाही असू शकेल) पण वृद्धांतही तो नेमक्या कोणत्या कारणास्तव वाढतो....वा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानी सजलेल्या औषधोपचाराच्या काळातही चक्क मृत्यूला कारणीभूत कसा होत असेल याचे विवरण मायबोलीचे सदस्य अमित करकरे यांच्या अभ्यासपूर्ण लेखात दिसत्ये आहे. तो लेख या निमित्ताने मी पुन्हा इथे तमाम लोकांच्या माहितीसाठी देऊ इच्छितो....[आशा आहे की श्री.अमित करकरे आणि मायबोली प्रशासक यांची या कृतीस परवानगी असेल. असे करणे योग्य नसेल तर हा लेख मी लागलीच इथून काढतो.]
===========================================================
अमित करकरे.....२५ एप्रिल २०१३
“डॉक्टर, बाबांना गेले दोन-चार दिवस डाव्या साईडला पाठीत दुखत होतं. काल परवा गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेकलं, पण पाणी बहुदा जरा जास्तच गरम झालं असावं कारण आज शेकल्याच्या जागी लाल छोटेछोटे फोड आलेत आणि थोडी खाज सुटलीये. काय करू?” संजीवचा सकाळी सकाळीच फोन आला होता.
“संजीव, घरी काही करू नको. दहा वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन ये, तिथेच बघुया काय ते.”
बरोबर दहा वाजता संजीव त्याच्या ६४ वर्षांच्या वडलांना घेऊन आला, आणि ते फोड बघताच मला लक्षात आले होते की माझा अंदाज खरा ठरला आहे, “संजीव, अरे ही ‘नागीण’ आहे.”
“नागीण !!!” अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रीया आलीच!, “डॉक्टर, नागीण पूर्ण गोल पसरली तर जीवाला धोका असतो नां?”
“संजीव, अरे या सगळ्या ऐकिवात गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं!”
= =
‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शन ला आपण नागीण (हर्पीस झोस्टर) म्हणतो, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात बरं!. खरं सांगायचं म्हणजे लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्यभरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो.
लक्षणे:
एकदा का हा विषाणू सक्रीय झाला की काही विशिष्ठ लक्षणे दिसू लागतात. संजीवच्या वडिलांना झाली तशी पाठदुखीने याची सुरवात होते. नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे किंवा खुपल्यासारखे वाटत राहते. दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात आणि त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो. त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो. याच बरोबर ‘फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात.
पाठीतल्या ज्या नर्व्हला याचा संसर्ग झाला असेल, त्यां नर्व्हच्या प्रभावित क्षेत्रात प्रामुख्याने याची लक्षणे दिसतात. पुरळ सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या कालावधीत दुखण्याचा जोर सर्वात जास्त असतो. कांजिण्याप्रमाणेच हे पाणीदार फोड पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
प्रचलित उपचार:
सर्वसाधारण विषाणू-संसर्गाप्रमाणेच एकदा लक्षणे सुरु झाली की त्यांना पूर्णपणे काबू करणे शक्य होत नाही. पाण्यासारखे द्रव असलेल्या फोडांमध्ये अजून जीवाणू-संसर्ग होणार नाही यासाठी उपचार केले जातात. ‘असायक्लोवीर’ सारख्या विषाणू-मारक औषधाचा उपयोग होतो. त्वचेची दाहकता कमी करण्यासाठी बाहेरून काही मलमे दिली जाऊ शकतात पण त्याचा सीमित परिणाम दिसतो.
होमिओपॅथिक उपचार:
आजवरच्या अनुभवावरून आढळलेला होमिओपॅथिक उपचारांचा विशेष फायदा म्हणजे लक्षणांची सुरवात झाल्या-झाल्या त्या लक्षण-समुहाला अनुसरून योग्य असे होमिओपॅथिक औषध दिले तर लक्षणांची पुढील वाढ तर थांबू शकतेच पण अगदी कमी कालावधीत संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. प्रामुख्याने ऱ्हस टॉक्स, अर्सेनिक अल्ब, मेझेरीयम, आयरिस, रॅननक्युलस बल्बोसस यांसारख्या औषधांचा यासाठी विशेष उपयोग होतो असे आढळून आले आहे. अर्थात, लक्षणांवरून योग्य औषधाची निवड होमिओपॅथिक तज्ञच करू शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांमध्ये राहणारी वेदना आपण होमिओपॅथिक उपचारांनी नक्कीच घालवू शकतो. होमिओपॅथिक औषधांमधील ब्रायोनिया, कोलोसिंथ, कॉस्टिकम्, सिमीसिफुगा, मॅग फॉस यांसारख्या काही औषधांतील योग्य औषधाची निवड करून ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’वर हमखास मात करता येते.
होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये केवळ आजाराच्या लक्षणावर मात इतकेच मर्यादित लक्ष्य न ठेवता पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करणारी औषधे सुद्धा आहेत, ज्यामुळे आरोग्याचे रक्षण होतेच पण पुढील संसर्गाचाही अटकाव होतो.
===================================================================
अन्य अशा एका लेखात विशिष्ट वयानंतर होत असलेल्या पित्तासारख्या आजाराला वा व्याधीला लागलीच पथ्यपाणी चालू करून ते आटोक्यात ठेवल्यास नागीण विकार होण्यापासून रोखले जाऊ शकते असा उल्लेख आहे.
सर्वांच्या माहितीसाठी....धन्यवाद
मी वाचलेल्या तोकड्या
मी वाचलेल्या तोकड्या माहितीवरुन, माधवचा मुद्दा बरोबर आहे.
पण अमडिटेक्टेड कांजिण्या झाल्या असतील, झालेल्या लक्षात नसतील, मला कांजिण्या झालेल्या का गोवर का नुसतंच पुरळ होतं अशा संभ्रमित कांजिण्या असतील... अशा सगळ्यांमुळे लस देत असतील.
कांजिण्या आणि नागिण एकाच विषाणू मुळे होत असल्याने परत लस दिली तर ती नागिणीवर काम न करता भविष्यातील कांजिण्यांवर करेल. ते ही काही वाईट नाही... असं लॉजिकल आणि गणिती मेंदूला वाटतंय.
कांजिण्या येऊन गेलेल्या
कांजिण्या येऊन गेलेल्या व्यक्तीलाच नागिण होऊ शकते ना? इतरांना नागिण होणारच नसेल तर त्यांनी लस का घ्यावी - असा माझ्या प्रश्नामागचा उद्देश होता.
>>>
माझी आई ,साबा, साबू सर्वाना सत्तरीत नागीण झाली. त्यापैकी कुणालाच आधी कांजिण्या झालेल्या नव्हत्या.
आम्ही माहिती घेतली तेव्हा त्यांनी एक तक्ता दिला होता. कधी घ्यावी, कुणी घ्यावी इत्यादी. त्यात 'कुणी घ्यावी' कॉलममध्ये फक्त ५०+ हा वयाचा उल्लेख होता, इतर काहीही लिहिलेलं नव्हतं, असं मला म्हणायचं होतं,
ममोने लिहिलंय तसं नागीण हा भयंकर आजार आहे. त्यापासून सुटका म्हणून लस घेतलेली केव्हाही चांगली.
उतारवयात प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. माझ्या साबुना हाताला नागीण झाली. तो हात त्यानंतर पुन्हा १०० टक्के पूर्ववत झालेला नाही.
घरात नात्यात अशा अनेक नागिणी पाहिल्या/ऐकल्या आहेत.
https://youtu.be/a6rOyDzA9EA
https://youtu.be/a6rOyDzA9EA?si=h0UuNW2UbX6e54Dc
अमिताभ बच्चन यांची एक जाहिरात
Shingles= Herpes zoster
>>घरात नात्यात अशा अनेक
>>घरात नात्यात अशा अनेक नागिणी पाहिल्या/ऐकल्या आहेत. >> ऑ!!!

अमितव
>>कांजिण्या येऊन गेलेल्या
>>कांजिण्या येऊन गेलेल्या व्यक्तीलाच नागिण होऊ शकते ना? इतरांना नागिण होणारच नसेल तर त्यांनी लस का घ्यावी <<
कांजण्या येउन गेलेल्या व्यक्तिच्या शरीरात तो जीवाणु डॉरमंट असतो. पुढेमागे, इम्युनिटि कमी झाली कि तो परत मान वर काढु शकतो. साधारण पन्नाशी नंतर इम्युनिटि कमी होत अस्ल्याने सरसकट सगळ्यांनी शिंगल्सचे शॉट्स घ्यावे असा सल्ला सिडीसि देते. इथे इंशुरंस कवर करत असल्याने इथल्या मंडळींनी शिंगल्सचे दोन शॉट्स न चूकता घ्यावे...
सत्तरीत नागीण झाली. त्यापैकी
सत्तरीत नागीण झाली. त्यापैकी कुणालाच आधी कांजिण्या झालेल्या नव्हत्या. >>> ओह, असं होऊ शकतं हे माहित नव्हतं.
सर्वांना शुभेच्छांबद्दल
सर्वांना शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
पहिल्या पानावरील कुमार यांच्या पोस्ट मधुन:
During the acute phase, patients are contagious & should be counseled to avoid direct skin contact with immunocompromised persons, pregnant women, and individuals with no history of chickenpox infection.
म्हणजे कांजण्या न झालेल्यांना अशा संसर्गाने होऊ शकतो असे दिसते.
अमित
अमित
मानवजी कसे आहात? आता बरे झाला
मानवजी कसे आहात? आता बरे झाला असाल ना.
अगदी लंपन. आज सकाळपासून इथे
अगदी लंपन. आज सकाळपासून इथे येऊन विचारायचे मनात घोळत होते.
माझ्याही. मानव कसे आहात?
माझ्याही. मानव कसे आहात? अशक्तपणा आहे का अजुन? असेल तर आराम करा.
मानव,चांगले असालच.
मानव,चांगले असालच.
विचारपुशीबद्दल धन्यवाद
विचारपुशीबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
डोळा सुरक्षित आहे, व्हिजन लॉस वगैरे काही नाही.
अशक्तपणा वगैरे आला नव्हता, तापही अगदी सौम्य - काही तास होता. पुरळ आता पूर्ण ठीक झालेत.
पण नर्व्ह डॅमेजमुळे post herpetic neuralgia (त्वचेची बधिरता, प्रचंड खाज, जळजळ, त्वचा हुळहुळत राहणे, डोळ्यातही खाज, पाणी येणे) तीन चार दिवसांपासून रोज फार वाढत आहे.
काल पासून न्यूरॉलॉजिस्टची ट्रीटमेंट सुरू केलीय. त्याने जरा आराम मिळेल अशी आशा आहे. कळेल दोन तीन दिवसात.
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
सामोला मम.
सामोला मम.
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!
बरे नसताना, आवर्जुन प्रतिसाद
बरे नसताना, आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल, आभार.
मी ही आले नागिणीच्या फेऱ्यात.
मी ही आले नागिणीच्या फेऱ्यात. माझ्या पाठीवरून सुरुवात होऊन दोन दिवसांत पोटापर्यंत पसरली. काल डॉक्टरांकडे जाऊन आले. मला अप्लास्टिक ऍनिमिया असल्याने फार वेगाने पसरली म्हणे डॉक्टर. त्यांनी गोळ्या दिल्यायत आणि एक स्प्रे दिलाय, जळजळ आग कमी होण्यासाठी. पण माझी नागीण अजगरासारखी पसरलीय तरी खाज, आग, जळजळ असली काहीच लक्षणं नाहीयेत फक्त प्रचंड वेदना मात्र होतायत. बसणं, झोपणं पण कठीण झालंय. आठवड्याभरात बरी होईल. होप सो.
ओह निधी!!
ओह निधी!!
औषधांचे डोसेज बरोबर आहे ना याची एकदा खात्री करून घ्या. मी येत्या काही दिवसात इथे त्याबद्दल लिहिणार होतो.
Aclyclovir 400 mg दर चार तासांनी दिवसातून ५ वेळा.
कारण Acyclovir चार तासांपर्यन्तच काम करते जास्त डोस असला तरी.
किंवा
Famicilovir 500 mg दर आठ तासांनी दिवसातून ३ वेळा. हा ५०० पेक्षा जास्तही देतात काही वेळा. हे आठ तासांपर्यंत काम करते.
असा डोस नसेल तर स्वतःः न बदलता सेकंड ओपिनियन घ्या.
मला दोन डॉक्टरांनी जनरल फिजिशियन आणि दुसऱ्या दिवशी ऑप्थल्मोलॉजिस्ट- ayclovir dose कमी दिला होता दिवसातून ३ दा. तो पर्यँत ५ दिवस निघून गेले होते. मग माझ्या डॉक्टर मित्राने मला फोन केला माझा मेसेज पाहुन आणि त्याने हे डोसिंगबद्दल समजावून लगेच करेक्ट केला. नंतर आणखी डॉक्टर्स कडुन, इथे अलिबाबा म्हणुन आहेत त्यांनीही डोसबद्दल हेच सांगितले.
काळजी घ्या, व्यवस्थित प्रथिनयुक्त आहार घ्या, बरे होण्यास शुभेच्छा.
Aclyclovir 400 mg दर चार
Aclyclovir 400 mg दर चार तासांनी दिवसातून ५ वेळा.>> मला 800 mg दर चार तासांनी दिवसातून पाच वेळा सहा दिवस दिलाय. वेदनांसाठी काही दिलं नाही..आणि त्याच खूप जास्त होतायत.
ओके, डोस बरोबर आहे मग.
ओके, डोस बरोबर आहे मग.
चौथ्या पाचव्या दिवशी peak वर असते नागीण मग एक दोन दिवसात खपली धरायला सुरवात होऊन कमी होत जाते.
पुरळांच्या वेदनेसाठी मला त्यावर calamine lotion दिलं होतं. (हे alcohol free असावं, अन्यथा त्यामुळे उलट irritation होऊ शकते.) पण मला त्याने विशेष फरक जाणवला नाही, वापरलं नाही फारसं.
अँटीहिस्टामाईन घेऊन बघा डॉकच्या सल्ल्याने. काही drowsiness न येणारे असतात उदा. Allegra. डॉकना विचारून मगच घ्या. (याने जरा कॉन्स्टिपेशन होऊ शकते.) इतर नर्व्ह सूदिंग क्रीम - Lidocaine, Gabapentin याबद्दलही विचारून बघा डॉकना. हे बहुतेक खपली धरू लागल्यानंतर देतील.
Hypercium Perforatum cream (गोळ्या नव्हे) ने मला आराम वाटतो काही तास तरी, पण ते मी Neuralgia झाल्यावर काही महिन्यांनी वापरू लागलो. पुरळ सुकण्यापूर्वी लावावे की नाही माहिती नाही.
निधी काळजी घे. वेदना अति
निधी काळजी घे. वेदना अति होतात याचा अनुभव आहे. तुझ्या लेकराला लांब ठेव. माझं लेकरू ऐकत नव्हतं, जवळ येत होता तर त्याला कांजिण्या झाल्या.
थॅन्क्स मानवदा. पेनकिलर
थॅन्क्स मानवदा. पेनकिलर डॉक्टरांना विचारून बघते. मला एक स्प्रे दिलाय Hydroheal silwash त्याने थोडावेळ आराम मिळतो. पण तो दिवसातून तीनदाच वापरायचा आहे. सतत वापरू शकत नाही.
अंजूताई, श्लोकला लांबच ठेवलंय. जरा घाबरलाय तो पण नंतर समजावेन त्याला.
फार लाहीलाही होते असे ऐकून
फार लाहीलाही होते असे ऐकून आहे.
>>>व्यवस्थित प्रथिनयुक्त आहार घ्या
+१
<<जरा घाबरलाय तो>> मी सुद्धा
<<जरा घाबरलाय तो>> मी सुद्धा घरच्या एका अनुभवात बघून घाबरलेलो आणि लहान सुद्धा नव्हतो. फक्त पहिल्यांदाच असे काही बघत होतो. काळजी घ्या.
ओहह निधी, लहान आहे तो
ओहह निधी, लहान आहे तो त्यामुळे स्वाभाविक आहे.
पुरळांच्या वेदनेसाठी मला
पुरळांच्या वेदनेसाठी मला त्यावर calamine lotion दिलं होतं. ..... मी caladril लावीत असे.
डिलिव्हरीनंतरच्या 15 दिवसात पाठीवर हलके पुरळ उठले होते. खूप आग होत होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. नशिबाने मुलाला काही झाले नाही.
पुरळ वाळायला लागलेली जरा जास्त खाज/आग होते.
अरेरे.
अरेरे. नशीब बाळाला काही झालं नाही.
भयानक अंगदुखी, ताप नंतर नागीण उठून सर्व बरं होईपर्यंत कमीत कमी महिना जातोच.
निधी, काय अपडेट्स झालीय ना
निधी, काय अपडेट्स, झालीय ना कमी नागीण?
Pages