चिंचेची कढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 December, 2015 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लिंबा एवढ्या चिंचेचा गोळा
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
१ वाटी ओल खोबर खरवडून,
१-२ मिरच्या
थोडी कोथिंबीर चिरून
थोडस हिंग,
अर्धा चमचा हळद,
४-५ मेथीचे दाणे,
४-५ लसुण पाकळ्या चिरुन,
राई, जीर, प्रत्येकी अर्धा चमचा (छोटा)
कढीपत्ता
चवीनुसार गुळ चिरून,
चवीनुसार मिठ,
फोडणीसाठी तेल.


(वरील फोटोत हळद राहिलेय)

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिरलेला कांदा, खोबर,गुळ, मिरची (चिरून), कोथिंबीर, हिंग हळद आणि मिठ हे एकत्र करून हाताने थोडे कुस्करून ठेवावे.

आता गॅसवर भांडे गरम करून त्यावर राई, जिरे, लसुण पाकळ्या,कढीपत्ता वे मेथी दाण्यांची फोडणी देऊन लगेच त्यावर कुस्करलेले मिश्रण टाकायचे.

हे थोडे परतवले, अर्धवट शिजले की त्यात लगेच चिंचेचा कोळ घालून (गरजेनुसार पाणी घालून) झाकण ठेवायचे. उकळी यायच्या आत गॅस बंद करायचा. उकळी येऊ द्यायची नाही.

तयार आहे चिंचेची कढी

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

तोंडाला सुटले ना पाणी?

हिच कढी फोडणी न देताही करतात.

ही कढी मटणासोबत घेण्याची पद्धत आहे.
चविला आंबट गोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही मजा येते.

माहितीचा स्रोत: 
नणंद
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी खुबड्या शेलफिश आहे. त्याची माहीती माझ्या माशांच्या रेसिपीज मध्ये आहे.
नीरा धन्यावाद.

Pages