Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 December, 2015 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
प्रथम चिरलेला कांदा, खोबर,गुळ, मिरची (चिरून), कोथिंबीर, हिंग हळद आणि मिठ हे एकत्र करून हाताने थोडे कुस्करून ठेवावे.
आता गॅसवर भांडे गरम करून त्यावर राई, जिरे, लसुण पाकळ्या,कढीपत्ता वे मेथी दाण्यांची फोडणी देऊन लगेच त्यावर कुस्करलेले मिश्रण टाकायचे.
हे थोडे परतवले, अर्धवट शिजले की त्यात लगेच चिंचेचा कोळ घालून (गरजेनुसार पाणी घालून) झाकण ठेवायचे. उकळी यायच्या आत गॅस बंद करायचा. उकळी येऊ द्यायची नाही.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
तोंडाला सुटले ना पाणी?
हिच कढी फोडणी न देताही करतात.
ही कढी मटणासोबत घेण्याची पद्धत आहे.
चविला आंबट गोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही मजा येते.
माहितीचा स्रोत:
नणंद
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अय्यो दक्षे साॅरी. अग ती चव
अय्यो दक्षे साॅरी.
अग ती चव नाही येणार ग.
सगळ्यांनी नक्की करुन बघा.
मस्तय.
मस्तय.
Wow.... तोंपासु.. प्राजक्ता
Wow.... तोंपासु..
प्राजक्ता ताई, पुन्हा एकदा उरणची आठवण करून दिलीस :).
शामल तुमच्याइथे येलवण्याची
शामल तुमच्याइथे येलवण्याची कढी पण अशिच करतात ना. खुबड्यांची.
सुनिधी धन्यवाद.
हो. चिंचेची पण अणि खुबड्यांची
हो. चिंचेची पण अणि खुबड्यांची पण.. हिच रेसेपी.
खुबड्यांची.आणि येलवणाची
खुबड्यांची.आणि येलवणाची म्हणजे कसली जागू?
आवडेश...करुन बघणार.
आवडेश...करुन बघणार.
देवकी खुबड्या शेलफिश आहे.
देवकी खुबड्या शेलफिश आहे. त्याची माहीती माझ्या माशांच्या रेसिपीज मध्ये आहे.
नीरा धन्यावाद.
मी करुन पाहिली. मस्तच झाली
मी करुन पाहिली. मस्तच झाली होती. धन्यवाद जागुतै
Pages