कॉन्टॅक्ट लेन्स

Submitted by गजानन on 11 December, 2015 - 05:04

कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्यांच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणी / त्रास / उपाय यावर चर्चा करण्यासाठी...

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anyway, the person who sells you the lenses i.e. the Optometrist is supposed to TEACH you to wear those lenses.

कॉन्टॅक्ट लेन्सेसचे अनेक तोटे आणि गैरसोय यांची चर्चा झाल्यावर मला लेन्सचा एक जोरदार फायदा सांगायलाच हवा. किंवा 'हे करुन पहा' सिरिजमधे ही टीप लिस्ट करायला हवी.
कितीही.....अगदी कितीही.... तिखट कांदा असला तरी लेन्स लावुन कांदे कापल्यावर डोळ्यात एक टिपुस पाणी येत नाही किंवा डोळे किंचितही झोंबत नाहीत. ट्रायच एकदा. Wink

काहीच्या काही आहे हे. Lol

खरं की काय?
लेन्साने कांदे न कापता पण सुरुवातीला त्रास होऊन पाणी येणं अपेक्षित ना बर्‍याच अनुभवांप्रमाणे? इथे म्हणजे कांदे कापून पण पाणी येत नाही?

हे लेन्स पुराण वाचून खूप बरे वाटले परत एकदा लेन्स लावण्याची इच्छा निर्माण झाली आहे. १८ वर्षे झाली चष्मा वापरात आहे. वेगवेगळे प्रकारचे चष्मे, काचा वापरून झाल्या. आत्ता हि एक इच्छा पूर्ण करावयाची आहे. बघू कधी होते.
पण मला एक सांगा लेन्स मुले AC मध्ये काम करताना त्रास होतो का? फौर व्हीलर driving करताना काही काळजी घ्यावी का?
मी अनु - सुरवातीला लावताना डोळ्यांना काही त्रास झाला का? लाल होणे इ.

त्रास काहीच नाही झाला.
प्रचंड वेळ लागणे आणि लेन्स काढताना लेन्स नक्की घातले की ते कुठे पडले अशी शंका निर्माण होऊन ते शोधून डोळ्यातून काढायला १५ मिन इतकेच.
माझी एक मैत्रिण काल १ चष्मा नंबर आहे लेझर करते म्हणत होती. दिमांचे प्रतीसाद आठवूनो तिला परावृत्त केले.(नंबर ५-६ होईपर्यंत थांब मग लेझर ची रिस्क घे सांगितले Happy )

आणि साथीत डोळे येत नाहीत Happy

Anyway, the person who sells you the lenses i.e. the Optometrist is supposed to TEACH you to wear those lenses.>> माझं ट्रेनिंग तब्बल दीड महिना चालू होतं, सिटी लाईटला डॉ. कार्येकरांकडे.

प्लीज हेल्प.. आज मी एका हवनाला (गणेश याग) जवळपास ४-५ तास लेन्स घालुन बसले होते. नंतर कळले कि आगीजवळ लेन्स घालुन बसायचे नसते. डोळे चुणचुणत आहेत. आणि त्याहीपेक्षा भिती वाटतेय. Sad
घरी आल्याबरोबर लेन्स काढून गार पाण्याचे हबकारे डोळ्यात मारलेत. एनीथिंग एल्स आय कॅन डू?

आज सकाळी बघते तर उजव्या डोळ्यातली एक शीर आणि तिच्या आजूबाजूचा भाग लाल झाला आहे.
काय करावे सुचत नाहीये. Sad

घाबरू नका.

लेन्सेस चेंज करायला लागतील बहुतेक. धूर प्याल्यात त्या.

डॉ.ला दाखवलेले बरे राहील.

बॉश अँड लॉम्ब चे प्युअर व्हिजन एच डी लेन्सेस कधीकधी वापरते.
नंबर -०.५ दोन्ही डोळे, एका डोळ्याला अ‍ॅक्सीस.
चष्मा कधीकधी वापरते, बरेचदा सारखा साफ करावा लागतो म्हणून वापरत नाही.
डोळे आता परत तपासले होते तर अ‍ॅक्सीस वाढलेला होता, नंबर तोच होता. असा सारखा अ‍ॅक्सीस वाढला की सारखा २०००+ चा चष्मा बदलायचा की काय?
लेन्सेस बोअर होत आहेत.रिजीड लेन्सेस नावाचा प्रकार असतो ना?आर जीपी? तो या नेहमीच्या लेन्सेस सारखा सारखा घडी होणे टाळून सोपेपणाने डोळ्यात घालता येतो का? अ‍ॅक्सीस का वाढतो?
मिसिंग दीमा.

मी 8 ते 10 दिवसापासून सॉफ्ट लेन्स वापरत आहे. अगोदर वाटल नवीन असल्यामुळे रुतत असाव पण आता लेन्स घातली की वरच्या बाजूला रुतल्या सारखं होतय आणि दृष्टी पण चष्म्या इतकी स्पष्ट वाटत नाही. मग लेन्स बदलायला पाहिजे की वापरायला नाही पाहिजे की मला लेन्स लावता येत नसावा????
>>>

लेन्स ठेवण्यासाठीच लिक्विड रोज बदला. त्यात काटकसर नको. स्वच्छता महत्त्वाची. मग नाही त्रास होणार.

जिथून लेन्स घेतली आहे तिथे विचारा.लेन्स ठेवण्यासाठीच्या लिक्विडमधे एक टॅब्लेट घातली की परत लेन्स स्वच्छ होते.

Pages