कॉन्टॅक्ट लेन्स

Submitted by गजानन on 11 December, 2015 - 05:04

कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्यांच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणी / त्रास / उपाय यावर चर्चा करण्यासाठी...

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांचे अनुभव, प्रतीसादातून कॉपी पेस्ट.
========================================
दीड मायबोलीकर | 11 December, 2015 - 03:43
क्वचित कोरडे वाटले डोळे तर ते सोल्यूशन घालते.
<<
प्रिझर्वेटिव्ह फ्री कृत्रीम अश्रू घालत जा. किंवा सरळ नॉर्मल सलाईन अथवा रिंगर लॅक्टेट. लेन्स स्टोरेज सोल्युशन डोळ्यात घालू नये. त्यात थोऽड्या प्रमाणात 'साबण' असतो, क्लिनींगसाठी.
========================================
गजानन | 11 December, 2015 - 03:43
लोक कधी कधी चष्मा आणि कधी कधी लेन्सेस असं पण वापरु शकतात का? <<< हो. मी वापरतो.
========================================
दीड मायबोलीकर | 11 December, 2015 - 03:46

सध्या चष्मा वापरत नाहीये,तो न वापरताच जास्त बरं आणि मोकळं वाटतंय पण हे नक्कीच चुकीचं असावं.
<<
अर्धा पाव नंबर प्रत्येकाला असतो. शून्य नंबर असलेला माणूस विरळा (रेअर). तेव्हा डोंट वरी. चष्मा न वापरण्याने दिसायला त्रास वा डोकेदुखी असेल तरच तो वापरा. नैतर नाही वापरल्याने काही आभाळ कोसळणार नाही.
चप्पल रोज वापरून तिचा नंबर कमी होत नाही, तसा चष्मा "वापरल्याने" नंबरला फरक पडत नाही.

लोक कधी कधी चष्मा आणि कधी कधी लेन्सेस असं पण वापरु शकतात का?
<<
हो.
इन फॅक्ट थोडावेळ लेन्स अन बाकी वेळ चष्मा असं रोज करायचं असतं.
========================================
वरदा | 11 December, 2015 - 03:50

दीमा, मी ते लेन्स वेटिंग सोल्यूशन मिळतं ते वापरलंय. गेले दीडदोनवर्षे लेन्सचा वापर बर्‍यापैकी कमी झालाय त्यामुळे आणायची गरज पडली नाहीये. होप ते मिळत असावं अजून. क्लीनिंग सोल्यूशन कधीच नाही वापरलं...

हो अनु, मी एरवी चश्माच वापरते.

तो रात्री मोबाईलवर कामाच्या, अवांतर पीडीएफ्स मी पण वाचते. त्यामुळे मला आता बहुदा प्लस नंबर (चाळिशी) लागणारे असं वाटतंय
========================================
mi_anu | 11 December, 2015 - 03:53

इथे माहिती वाचून बरं वाटलं. अर्थात लेन्स वाल्यांकडे चक्कर टाकून किमतीचा अंदाज घेतेच. थोडे लेन्स थोडा चष्मा थोडे नुसते डोळे असं काहीतरी करेन.
========================================
नंदिनी | 11 December, 2015 - 04:01

थोडे लेन्स थोडा चष्मा थोडे नुसते डोळे असं काहीतरी करेन.>> असंच जास्त योग्य. लेन्स वापरायची एकदा सवय झाली की काही त्रास पडत नाही. मला चष्मा सहावीत लागला. दरवर्षी अर्धा पाव असा वाढत वाढत नंबर दोन वर्षे साडेतीनवर कॉन्स्टंट राहिल्यावर लेन्सेस केल्या. आता घरात एरवी चष्मा. बाहेर जाताना लेन्स. नुसते डोळे केवळ झोपतानाच.
========================================
दीड मायबोलीकर | 11 December, 2015 - 04:06

त्यामुळे मला आता बहुदा प्लस नंबर (चाळिशी) लागणारे असं वाटतंय
<<
४० वर्ष वय झालं की जवळचा नंबर लागतोच. त्याचा वाचनाशी संबंध नाही.
========================================
दीड मायबोलीकर | 11 December, 2015 - 04:10 नवीन

अर्थात लेन्स वाल्यांकडे चक्कर टाकून किमतीचा अंदाज घेतेच.
<<
शक्यतो ऑप्टोमेट्रिस्टऐवजी डॉक्टरला विचारून मग लेन्स घ्या. डोळ्याच्या काही आजारांत लेन्स लावणे निषिद्ध असू शकते, जे आजार ऑप्टोमेट्रिस्ट (लेन्सवाले) डायग्नोज करू शकत नाहीत.
========================================
वरदा | 11 December, 2015 - 04:10 नवीन

दीमा धन्यवाद
उगाचच रात्रीचं वाचन बंद करायला लागणार नाही आता
========================================

मी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला लागून सात-आठ वर्षांपेक्षाही जास्त वर्षे झाली. अगदी नियमित नाही तरी अधून मधून वापरतो. आणि डोळ्यांच्या बाबतीत तडजोड नको म्हणून दर्जाच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांची वापरतो. नंबर बदलला अथवा लेन्सेसची एक्स्पायरी तारीख आली तर नंतर पुन्हा नवे मागवे पर्यंत खंड पडतो.

पण लेन्स वापराची सगळी काळजी घेऊनही मला लेन्ससोबत खास कम्फर्टेबल वाटले नाही. साधारण चारपाच तासांनंतर लेन्सेस डोळ्यात रुतायला लागतात. लेन्ससाठी डोळ्यांत घालायचे द्रावण घातले तरीही. मध्यंतरी डोळ्यांच्यां पटलांना ऑक्सिजनची कमतरता भासू न देण्याचा दावा करणारी लेन्सही वापरून बघितली. पण खास फरक जाणवला नाही.

याउलट काही लोक कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी बिनधास्त बारा-चौदा तास नियमित वापरताना दिसतात. मग आपल्यालाच त्रास का व्हावा हे कळले नाही.

असा अनुभव तुम्हाला येतो का? त्यावर तुम्ही काय करता?

मी गेली १२-१३ वर्षे वापरत आहे लेन्सेस. पहिली ९ एक वर्षे yearly disposable वापरल्या. सध्या monthly disposable. सध्या Bausch & Lomb च्या वापरत आहे. आधीचा ब्रॅण्ड आठवत नाहीये. जास्त नंबर असेल तर लेन्स बर्‍या. माझा सध्या ६ आहे दोन्ही डोळ्यांसाठी. चश्म्यापेक्षा लेन्स बर्‍या वाटतात. तुम्ही दिवसातून किती वेळ लेन्स वापरणार त्यानुसार लेन्स मिळतात. समजा तुम्ही १२-१३ तास वापरणार असाल तर डॉक्टरला तसे सांगा. दर ६ महिन्यांनी नंबर आणि ईतर डोळे तपासणी (जसे की पटल) मस्ट जर नंबर जास्त असेल तर. डबीतले लेन्स सोल्युशन रोज बदलावे. आठवड्यातून एकदा लेन्सडबी स्वच्छ धुवायची. घरी असताना मी कटाक्षाने चश्माच वापरतो (शनिवार, रविवार पूर्ण दिवस चश्माच). ऑफिसमधे सोल्युशन आणि एक extra लेन्सडबी ठेवायची अगदीच डोळे दुखत असतील त्यासाठी. सोल्युशन थंड ठिकाणी (उन्ह पडणार नाहीत अशा) ठेवायचे.

yearly disposable लेन्स तर फार जपून लावयची. घाईत जर लेन्स खाली पडली तर पहिले ५ एक मिनिट काही सुचत नाही. गेले ३ एक हजार पाण्यात हा विचार काही सुचू देत नाही Proud

तर हे झाले माझे लेन्सपुराण. Happy

घाईत जर लेन्स खाली पडली तर पहिले ५ एक मिनिट काही सुचत नाही. >>>+++१११
मी पण वापरत होते लेन्स, सध्या चष्माच वापरतीये. आता परत लेन्स वापरायला सुरुवात करणार आहे.
ए. सी. ऑफिस असल्याने, लेन्स लावली असेल तर डॉ. ने दिलेले एक सोल्युशन अधुन मधुन डोळ्यात घालते.
ए. सी. ने लेन्स कोरडी पडते असे मला सांगितले होते.

मी १९९५ पासून काँटॅक्ट लेन्सेस वापरायला सुरुवात केली. २००५-६ पर्यंत सेमी सॉफ्ट. मग काही वर्ष गॅप. आता गेली तीन वर्षे मल्टिफोकल डिस्पोजेबल.

आधीच्या डॉक्टरकडूनच बनवून घ्यायचो. आताच्या दुकानातूनच घेतोय.

सेमी सॉफ्टचा डोळ्यात धुळीचा कण गेल्यास होतो तेवढा सोडला तर काही त्रास नव्हता. अनेक वर्षे या लेन्सेस मी सकाळी ७:३० संध्याकाळी ७:३०/रात्री १०:३० अशा सलग वापरल्यात. डॉक्टरभाऊ आणि ताईंनी इतका सलग वेळ लेन्स न वापरण्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं.
माझ्या लेन्स (हरवल्या , पडल्याने खराब झाल्या नाहीत तेव्हा) अगदी मस्त टिकायच्या असं डॉक्टरनीच सांगितलेलं.

मला कधीपासून वेगळं लेन्सपुराण लिहायचं आहे. इथे लेन्स गायब होण्याचे आणि मग परत मिळण्याचे जास्त किस्से लिहीत नाही. Wink

अडचणी, त्रास, उपाय हे सगळं लेन्सप्रदानकर्त्यांकडून समजून घेणं अधिक योग्य. पण प्रत्येकाला होणारा त्रास वेगळा असू शकतो.
मला लेन्सचा मुख्य फायदा : ट्रेनमध्ये चढता उतरताना चष्मा पडायची भीती असे. गर्दीत लोकांचे हात विशेषतः कोपर चष्म्यावर आपटत.
दुसरा फायदा : स्पॅन ऑफ व्हिजन वाढला. आता कधी चष्मा लावून बाहेर गेलं की कळतं , जिना उतरताना पायर्‍या बघायच्या असल्या तर मान झुकवावी लागतं. लेन्समध्ये पापण्या झुकवून माफक नम्रता दाखवून काम चालतं.

आता बायफोकल लेन्सचा त्रास : बारीक अक्षरांतलं लेन्सने वाचायला त्रास होतो. संध्याकाळी तर न्युजपेपरएवढ्या टाइपातलं वाचायलाही.
लिहिताना पेपर आणि डोळ्यांमधलं अंतर कमी असलं तर विचित्र वाटतं.

ट्रेनमध्ये चढता उतरताना चष्मा पडायची भीती असे>>>
हे ठीक आहे, पण ट्रेन मधे हवा लागून डोळ्यात काही जायची भिती असते. त्यामुळे गॉगल शिवाय वाहत्या हवेच्या (:)) ठिकाणी मी नुसत्या लेन्स घालून नाही जाऊ शकत. एकदा आले तेव्हा पूर्णवेळ डोळे बंद ठेऊन प्रवास करावा लागला. (आमच्या रस्त्याला गर्दी कमी असते त्यामुळे खिडकीच्या आसपास बसायला मिळते). शिवाय उन्हात फिरतानापण नुसत्या लेन्सवर नाही फिरत मी. काळ्या होणार्या चष्म्याची सवय असल्याने बहूदा. ऑफीसमधे घेऊन येते अशा वेळी आणि घालते. स्वतः गाडी चालवत येते तेव्हा काचा बंद करून येता येत असल्याने घरातूनच लेन्स घालून निघते.

मला ६वी पासुन लागलेला चष्मा दरवर्षी वाढत वाढत कॉलेजपर्यंत मायनस ८ & ९ झाला होता. Sad तेव्हाच्या माझ्या डॉ.ने सांगितल्याप्रमाणे हार्ड लेन्स नंबर वर नियंत्रण ठेवायला मदत करतात म्हणुन सॉफ्ट लेन्सच्या मागे न लागता त्रास झाला तरी हार्ड लेन्सच वापरल्या. योग्य ती काळजी घेत, अगदी १५ वर्ष. बर्‍यापैकी comfortably. कचरा, धुळ गेली की प्रचंड त्रास व्हायचा पण तेवढंच. बाकी चष्म्याचे इतके तोटे* होते कि तो कधीकधी होणारा त्रास सहन केला. (*स्पोर्ट्सला अडथळा, पावसात टु व्हिलर चालवताना येणारा वैताग, स्विंमिंगच्या वेळेस दिसायला होणारा त्रास, फ्रेम घेतल्यावर १५ दिवसात न आवडेनाशी होणे इ इ इ इ इ खुप सारे तोटे)

१३-१४ वर्षांनी हळुहळु पापण्या सतत लेन्सच्या काचेरी कडेला घासुन घासुन जाडसर झाल्या. सतत सुजलेल्या, झोपेतुन उठल्यावर दिसतात तशा जड ( droppy eyelids) झाल्या होत्या. त्या सतत नशील्या दिसणार्‍या डोळ्यांना वैतागुन मी परत डॉ. कडे गेले. पण आता परत एकदा चष्म्याला स्विच ओवर करा किंवा लेसर सर्जरी हे दोनच उपाय होते. अनेको वर्ष लेन्स वापरल्यामुळे चष्मा परत नकोच्च होता. शिवाय तेव्हा डॉ. इब्लिस भेटले नव्हते, म्हणुन लेसर सर्जरीचे disadvantages माहित नव्हते. Wink

माझ्या ophthalmologist वरचा विश्वास आणि लेसर क्लिनिक ने दाखवलेल्या रोझी पिक्चर्स मुळे मी सर्जरी करुन घेतली. ( डिसक्लेमर होताच कि ७ च्या वर जेवढा नंबर आहे तो कदाचित राहु शकतो. माझा नंबर ९ आणि १० होता, सो -२ & -३ रहाणार हे गृहित धरलं होतं. ) पण चक्क पुर्ण नंबर गेला. एकदम शुन्य नंबर. आता बिना चष्मा आणि लेन्स शिवाय स्वच्छ दिसणं किती सुखाचं असतं ते कळालं. लेन्सचं टोचणं, कचरा गेला कि प्रचंड होणारा त्रास, रिकरिंग खर्च, ऐन महत्वाच्या दिवशी लेन्स हरवणं ( कॉलेजच्या क्रिकेट टीमच्या वाइस कॅप्टन बरोबरची डेट मिस झाली होती एकदा Wink ) या सगळ्या व्यापातुन मुक्तता मिळाली कायमची. आता ११ वर्ष झाली सर्जरी होवुन अजुनही मला जवळ किंवा लांबचा नंबर नाही. आता उलट आहे कि वेस्टर्न फॉर्मल वर स्मार्ट दिसतात म्हणुन झिरो नंबरचे ग्लासेस वापरते कधी कधी. Wink

डॉ. इब्लिसने एकदा काही पोस्ट लिहिली होती side effects बद्दल , तेव्हापासुन थोडी धाकधुक आहेच, पण बघु तेव्हा.

सो तात्पर्य असं कि लेन्स वापरुन फायदे तोटे आहेत. अर्थात आता लेन्सपुर्वी पेक्षा बेटर क्वालिटी असतात आणि Dos & Don'ts बद्दल पण चांगलीच माहिती आहे जी तेव्हा फारशी नव्हती. Wink

नोटस :
१. सर्जरी खर्च : ११ वर्षांपुर्वी २५०००/- पण इन्शुअरन्स क्लेम करता येतो. कारण ७ पेक्षा जास्त नंबरसाठी केलेली सर्जरी कॉस्मेटिक समजली जात नाही. मेडिकल म्हणुन कन्सिडर करतात.
२. आता माझे eyelids नॉर्मल झाले आहेत. डोळे मोठे आणि सुंदर ही दिसतात Wink सर्जरी मुळे काहीही फरक दिसत नाही. अपवाद - अती लॅपटॉप वापरला तर आणि अती उन्हाळा असला तर डोळे कोरडे पडतात. पण टिअर ड्रॉप्सने चालुन जातं आहे.
३. वरच्या सगळ्या वर्षांच्या यादीचे हिशोब करत बसुन माझं वय जाणण्याचा प्रयत्न करु नये. I am 21 yrs permanently. Lol

हो गॉगल मस्ट आहे. पण क्वचित गॉगलमधूनही डोळ्यात धुळीचा कण गेलाय. पण त्यासाठी मला कधी लेन्स काढून डोळे धुवायची वेळ आली नाही. बहुतेक वेळा डोळाअ भळभळ वाहून दोनेक मिनिटांत त्रास संपायचा.

लेन्स लावत असाल, तर त्यांची रिकामी डबी आणि आपला चष्माही सोबत कॅरी करायला हवा.

शिवाय नखं नीट कापलेली हवीत.

<वरच्या सगळ्या वर्षांच्या यादीचे हिशोब करत बसुन माझं वय जाणण्याचा प्रयत्न करु नये. I am 21 yrs permanently. हाहा>

हो , मलाही पाळण्यात असल्यापासून चष्मा आहे. Wink

काँटॅक्ट लेन्स आणि मेकअप.

१. काजळ.
लेन्स असो वा नसो. काजळ हे अंजन नाही. ते "डोळ्यात" भरायचे नसते. काजळ हे धातूच्या सळईने, (वा आजकालच्या पेन्सिलीने) पापणीच्या केसांच्या लाईनच्या बाहेरच्या बाजूला रेखायचे असते. (जुन्या हिंदी पिक्चरच्या हिरॉईन्स आठवा)

पापणीचे केस व डोळा यांच्या दरम्यानच्या 'इंटरमार्जिनल स्ट्रिप'वर कधीही काजळ/किंवा मेकअपचे कोणतेच केमिकल लावू नये.

(हे स्पेसिफिकली आजकाल काजळ लावलं नाही तर ज्युनियर कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळतच नाही असं समजणार्‍या मुलींसाठी.)

२. आय शॅडो, मस्कारा इ.

कोणताही मेकप, औषध, (अगदी हवेतले प्रदुषणकर्ते केमिकल) इ. लेन्सच्या संपर्कात आले, तर 'सॉफ्ट' उर्फ गॅस परमिएबल लेन्स ते आत खेचून घेते, व लेन्सची पारदर्शकता कमी होते, प्लस, ते केमिकल अश्रूंसोबत वाहून न जाता तुमच्या डोळ्याला इजा करीत तिथेच राहते.

तेव्हा.

स्वच्छ धुतलेल्या चेहर्‍यावर आधी लेन्स लावा.

मग मेकअप चढवा.

मेकअपमधील कोणताही घटक लेन्सला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या.

कार्यक्रम संपल्यावर संपूर्ण मेकअप उतरवा. : क्लीन्सिंग मिल्क, फेसवॉश इ. सोपस्कार झाल्या नंतर स्वच्छ हातानी लेन्स काढा.

10.gif

हे स्पेसिफिकली आजकाल काजळ लावलं नाही तर ज्युनियर कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळतच नाही असं समजणार्‍या मुलींसाठी>> दीमा, मस्तच Lol

फर्स्ट हँड एक्स्पिरीयन्स-

मी २००९ मधे लॅसिक केली ( लेफ्ट आय - ७.५ Sph+Cyl & Right Eye - 4.5 Sph & Cyl) असे दोन्ही नंबर्स होते.
आता जर कोणी मला विचारलं तर मी स्पष्ट नाही म्हणेल
१) डॉ. नी आधीच सांगितलं होतं की लेफ्ट चा नंबर पूर्ण नाही जाणार -१.५ पर्यंत राहीलच पण तरी तो गेला होता. म्हणजे तो ० झीरो झाला होता दोन महिने पर्यंत. नंतर तो पुन्हा वाढायला लागला २०१० ते २०१५ मधे आता सध्या पुन्हा -३.५ वर स्थिर झाला आहे. वर्षातून दोनदा कंपल्सरी चेक करतो
२) राईट आय चा सुद्धा नंबर पुन्हा आला तो पण सध्या -३.५ आहे, स्थिर आहे सध्या.
३) आता माझे वैयक्तिक मत लॅसिक केली नसती तरी चालले अस्ते- नंतर डॉ. तात्याराव लहाने यांना पण भेटलो होतो ते १००% विरुद्ध होते लॅसिक च्या. बाकी ज्याची त्याची ईच्छा.

शुभेच्छा!

अजून एक
ड्राय आईज आणी ग्लेअर सेंसीटीव्हिटी प्रचंड वाढते, प्रामुख्याने तुम्ही जेव्हा हायवे ड्राईव्ह करतात तेव्हा जास्त तीव्र वाटते.

आफ्टर सर्जरी, कमीत कमी एक महिना नाईट ड्राईव्ह शक्यतो टाळावे, ईव्ह्न डे लाईट सुद्धा खूप तीव्र वाटतो.

सातवीपासून माझ्या एकाच डोळ्याला नंबर होता .नेहमी चष्मा लावायची नाही.त्यामुळे-.५ पासून -२.५ पर्यंत वाढत गेला.सिलेंड्रिकल नंबर असल्याने डोकं दुखायचे. लेन्स वापरायची. पण वर्ष-दीडवर्षातच तीनदा लेन्स गहाळ/खराब झाल्याने परत चष्म्यावर स्थिरावले.पण फार कमी चष्मा लावला गेला. कालांतराने ३३-३४ वर्षात दुसर्‍या डोळ्यालाही नंबर आला.तो थोडा वाढलाही.
मी लेसर सर्जरीच्या(अकारणच) विरोधात होते.नंतर २ सहकारी आणि माझी फिजिओथेरेपिस्टनी सर्जरी करून घेतल्यावर मलाही करून घ्यावीशी वाटली.कारण डोकेदुखी/डोळेदुखी.अगदी माझ्याकडून ९०% ठरवले गेलेही.पण मायबोलीवरील एका धाग्यातील डॉ.इब्लिस यांच्या प्रतिसादामुळे आणि माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी रद्द केले.

मुळात वयाच्या १८ वर्षांपर्यंत लेन्स लावायला डॉक्टर विरोध करतात हेच बघितलं आहे. आणि सर्जरीसाठीही.
मला शाळेतच चश्मा लागला. नंबर मात्र बराच स्टेबल होता/आहे. दहा-बारा वर्षांनी चश्म्याला/ नाक-कानावर सारखं ओझं बाळगायला कंटाळून बाहेर वावरताना लेन्स वापरायला सुरूवात केली. आजवर कधीही कुठलाही त्रास झालेला नाही. लेन्सची काळजी मात्र नीट घेते. कुठलाही आय मेकप कधीच करत नाही. इतर वेळा प्रवासात, फील्डवर सगळीकडे लेन्सेस अगदी पिदडवल्या आहेत. फक्त त्या घालून कधी डुलकी काढत नाही.

सर्जरीचा विचार कधीही मनात सुद्धा आलेला नाही. उगाच कशाला डोळ्यावर नको ते उपाय? काय चश्मा लावला म्हणून दिसण्यात्/व्यक्तीमत्वात फरक पडतो असं मला मुळीच वाटत नाही. मुळात ज्या सर्जरीचे दूरगामी परिणाम माहित नाहीत ते करण्याची मला हिम्मत नाही. आणि ती इतके पैसे खर्च करावी या अशी जीवनावश्यक गोष्ट तर मुळीच नाही.

>>वयाच्या १८ वर्षांपर्यंत लेन्स लावायला डॉक्टर विरोध करतात हेच बघितलं आहे

इथे अगदीच उलट स्थिती बघितली आहे. मूल एकूणच जबाबदारीनं वागणारं, डोळ्यांचं हायजीन समजून घेऊन लेन्सेसची नीट काळजी घेणारं असेल तर अगदी ८-९ वर्षांपासून काँटॅक्ट्स प्रिस्क्राइब करणं सुरू करतात. माझा मुलगा वयाच्या बाराव्या वर्षीपासून काँटॅक्ट लेन्सेस लावायला लागला. आधी महिन्यातून एकदा बदलाव्या लागणार्‍या लेन्सेस वापरल्यावर आता गेली ५-६ वर्षं 'वन अ डे' वापरतोय. नो कंप्लेन्ट्स.

काँटॅक्ट लेन्सेस वापरल्यामुळे मायोपिया वाढायचा थांबेल अशी (काँट्राव्हर्शिअल)थिअरी वाचली होती. पण तसं काही झालं नाही. नंबर व्यवस्थीत वाढला.

मुलांसाठी काँटॅक्ट्सचा विचार करत असाल तर जमल्यास हा लहानसा लेख वाचा.
http://www.allaboutvision.com/parents/contacts.htm

खुप छान माहिती आहे इथे. मला लेन्स लावावाश्या वाटताहेत पण आता चंष्मा चेहर्‍याला शोभतो, असे मित्र आणि लेक म्हणतात, म्हणून विचार सोडून दिला.

असो, सहज म्हणून लिहितो, माझा पुतण्या आणि भाची, दोघांचे डोळे जन्मता निळसर होते. वर्षभर तोच रंग होता. त्यांच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो अजून आहेत, पण नंतर दोघांच्या डोळ्याचे रंग बदलले. पुतण्याच्या ग्रे झाला तर भाचीचा डार्क ब्राऊन. त्यांनाही त्याचे नवल वाटतेय. मला काळजी कारण माऊ आणि घारूमावशी असे म्हणता येत नाही आता त्यांना Happy

मुळात वयाच्या १८ वर्षांपर्यंत लेन्स लावायला डॉक्टर विरोध करतात हेच बघितलं आहे. आणि सर्जरीसाठीही. >>
हो. मी पण लेन्स १८ नंतर लावायला लागले, ते याच नियमामुळे. लेसर सर्जरी बरीच उशीरा आणि मेडिकल रिझन्स साठी केली, पण तिथेही हा नियम लिहिला होता.

आफ्टर सर्जरी, ईव्ह्न डे लाईट सुद्धा खूप तीव्र वाटतो. >> अगदीच असं नाही, पण कडक स्वच्छ ऊन असेल तर मात्र डोळे मिचमिचे करुनच पहावं लागतं, किंवा सन ग्लासेस तरी. कडक उन आणि अतिशय हवा असेल तर डोळ्यात पाणी येत रहातं. ११ वर्षं झाली तरी याबाबतीत डोळे खुप सेन्सिटीव आहेत. नाइट ड्राइवचा त्रास मात्र मला होत नाही.

मला जवळ आणि लांबचा नंबर अजुन तरी नाही आणि मनसोक्त आय मेकअप करता येतो, हे दोन फायदे लेन्स वापरणं सोडुन दिल्याचे.

पापणीचे केस व डोळा यांच्या दरम्यानच्या 'इंटरमार्जिनल स्ट्रिप'वर कधीही काजळ/किंवा मेकअपचे कोणतेच केमिकल लावू नये.
>> ह्य बद्दल थँक्स Happy

मी जवळ जवळ दोन वर्षे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतेय. सुरुवातीला yearly disposable आणि आता monthly disposable. monthly disposable चांगल्या वाटल्या.

मी ही अनेक वर्षे लेन्सेस वापरते आहे. आता तर डोळ्यात लेन्सेस आहेत हेच लक्षात रहात नाही. मी Bausch & Lomb च्या मन्थली डिस्पोझीबल वापरते. अक्शरशः १२/१४ तास ही वापरते.

Pages