कॉन्टॅक्ट लेन्स

Submitted by गजानन on 11 December, 2015 - 05:04

कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्यांच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणी / त्रास / उपाय यावर चर्चा करण्यासाठी...

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. इब्लिसने एकदा काही पोस्ट लिहिली होती side effects बद्दल >> या धाग्याची लिंक मिळेल का?

लेन्स कधी वापरल्या नाहीत पण गेली ३० वर्षे चष्मा वापरत आहे, कधीतरी इच्छा होते पण कॉम्पुटर (८-१० तास), वाहन हाकणे या मुळे टाळत आहे.
२०-२०-२० चा formula नेहेमी वापरतो, अर्थात त्यामुळे ऑफिस मध्ये हा गैर समज पसरला आहे की उगाच वेळ काढत असतो. Happy

अर्थात त्यामुळे ऑफिस मध्ये हा गैर समज पसरला आहे की उगाच वेळ काढत असतो. स्मित
<<
त्यांना Computer Vision Syndrome गूगल करून दाखवा.

*

नताशा,
दुपारी लंच अवरमधे लेन्स काढा, जेवण/टीपी करताना चष्मा लावा. पुन्हा काम करायला सुरुवात करताना लेन्स परत लावा. असे का करावे, याचे स्पष्टीकरण मी वर दिलेले आहे.

मला आय मेकप करायला खुप आवडतो. पण लेन्स घातल्या कि शक्यतो करु नये असे वाचले आहे आणि चष्मा घातला तर मेकप झाकला जातो.

आता फ्रेमलेस चष्मा वापरुन बघायला हवं.

येथे उपयुक्त असेल असे विविध brands, दर, प्रकार, वापर, शेअर करा, जे फार उपयोगी होईल. आपण वापरत असलेल्या ब्रँड, किंमत, आपल्या डेली वापर ect अतिशय उपयुक्त होईल.

मे मध्ये डोळे तपासले, दुचाकीवरुन जाता येता डोळ्यात पाणी येते आणि साहेबाने साध्या डेस्कटॉप वर दाखवलेल्या एक्सेल मधले काही रो दुहेरी दिसायला लागले होते तेव्हा. दोन्ही डोळ्याना -०.५ नंबर निघाला. उजव्या डोळ्याला सिलींडर आणी ४५ डिग्री अ‍ॅक्सीस आणी डाव्याला नुसते -०.५.आणि डोळ्यात घालायला ड्रॉप दिले.लगेचच टायटन आय+ मधून उत्साहाने चष्मा आणला(चित्रांगदा आणि माझे लुक्स यात फक्त ती जाहीरात करत असलेल्या टायटन आय+ चष्म्याचाच फरक आहे असे मला वाटत असल्याने डोळे तपासणे बरोबर होतेच!! Happy )
चष्मा उत्साहाने लावला. दुचाकी चालवताना बरं वाटायला लागलं. पण डेस्कटॉप समोर बसल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यात धूसर दिसायला लागलं आणि कधीकधी डोळ्यासमोर पांढरे पंखे फिरतात असं पण वाटायचं. चष्मा वापरणं परत बंद केलं. आणि छान वाटायला लागलं.
पण आता परत सकाळी उठल्या उठल्या डाव्या डोळ्याला एकदम धूसर दिसायला लागलं.
ऑफिस मध्ये गांगर आयनेशन वाल्यांनी फुकट तपासून दिलेला नंबर पण सेम होता(सुदैवाने वाढलेला नव्हता.)
आता लेन्सकार्ट मध्ये जाऊन बॉश अँड लाँब प्युअर व्हिजन २ एच डी नावाची लेन्सेस ६ फक्त डाव्या डोळ्याची (तिथला माणूस सिलींडरीकल आणि अ‍ॅक्सीस नंबर ला लेन्सेस बद्दल जरा साशंक दिसला.त्यामुळे उजवा डोळा सध्या पेंडिंग ठेवला आहे.) ऑर्डर करुन आलेय.
लेन्सकार्ट आणी बॉशलॉम्ब देव करो आणि ती लाभोत. दुचाकी चालवताना वापरणार नाहीये. ऑफिसातले काही तास वापरण्याचा विचार आहे. कोणाचा प्युअर व्हिजन वाल्या लेन्सेस चा अनुभव आहे का? साइट वर २३ रिव्ह्यूज खूपच गुडी गुडी होते.

हो, भरत मयेकर, चुकुन झालं होतं खरंतर ते. लेन्स काढली पण ती तशीच चिकटुन राहीली हाताला आणि हात साबणाने धुतल्यावर लेन्स दिसली. साफ केली तरीही म्हणावी तशी साफ झाली नव्हती ती. डोळ्यात लावली आणि थोड्या वेळाने सारखं पाणी येऊ लागलं डोळ्यातुन,. घरी जाईपर्यंत डोळा चांगलाच लाल भडक झाला होता. दुसर्‍या दिवशी बुबुळावर एक छोटा पांढरा ठिपका दिसु लागला होता आणि २-३ दिवसात तो मोहरीइतका झाला. आय स्पेशालिस्टने त्या ठिपक्यातला थोडासा भाग सुईने काढुन टेस्टिंगसाठी पाठवला. लेन्सेस चेक केल्या तेव्हा इन्फेक्टेड निघाल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी बुबुळावर एक छोटा पांढरा ठिपका दिसु लागला होता आणि २-३ दिवसात तो मोहरीइतका झाला. >>> मला मायक्रोबायॉलॉजी प्रॅक्टिकलमध्ये पेट्रिडिशमध्ये कल्चर इनॉक्युलेट करुन बॅक्टेरियल कॉलनी वाढवत असू ते आठवलं. आज इनॉक्युलेट केलं की उद्या कॉलनी तयार होवून ठिपके दिसत.

हो गजानन. औषधांनी वगैरे डोळा झाला बरा. पण त्या सगळ्याची इतकी भिती बसली की लेन्सेस नको वाटायला लागल्या. जरी अधुन मधुन वापरल्या तरी खुप काळजीने वापराव्या लागतात.

लेसिकचा विषय घरी काढला तेव्हाच तंबी मिळाली मातोश्रींकडुन. आणि 'चाळीशीनंतर पुन्हा नंबर येतोच, त्यामुळे फायदा नाही' हा विचारही होताच मागे. म्हणुन लेसिकलाही काट मारली. मस्त रिमलेस चष्मा वापरते आता.

लेन्सेस च्या डबीत टाकायच्या सोल्युशन मध्ये साबण असतो आणि तो डोळ्यात जाऊन त्रास होतो असं दि मां नी लिहीलं होतं.मग डबीत असेल तर थोडं डॉळ्यात जाईलच ना डबीतली लेन्सेस डोळ्यात जायला?
ख्रिसमस च्या सुमाराला लेन्स मिळेल.जरा एक्सायटेड आणि साशंक दोन्ही आहे. सुट्टी असल्याने जरा घरीच घालून वावरायला वेळ मिळेल.
लेन्सेस स्वच्छ करायला ते डबीतलं सोल्युशन, आणि डोळ्यात टाकायला टीअर ड्रॉप, कधीतरी अगदी अडचणीत लेन्स सोल्युशन जवळ नसलं तर अक्वागार्ड च्या पाण्याने लेन्सेस धुतली तर चालतात का?

योडी,
तो पांढरा ठिपका प्र च ण्ड धोकादायक असतो. असं काही झालं तर ताबडतोब लेन्स घालणे बंद करून नेत्रतज्ञांना दाखवा.

याच कारणासाठी व्यवस्थीत सूट झालेली लेन्स डोळ्यात असतानाच अचानक टोचू लागली, तर लेन्समागे काही कचरा गेला आहे किंवा डोळे येऊ घातले आहेत असे समजावे. अशावेळी लेन्स बाहेर काढून स्वच्छ क्लीन करून पुन्हा घालावी. याने टोचणे बंद नाही झाले, तर नेत्रतज्ञास दाखवा. (काँटॅक्ट लेन्स टेक्निशिअन नव्हे.)
*

मी_अनु,

आर-ओ/अ‍ॅक्वागार्ड पाणी योग्य नव्हे. नॉर्मल सलाईन, अथवा रिंगर लॅक्टेट नामक 'सलाईन' चालेल.
वेटिंग सोल्युशन किंवा आजकालची ऑलपरपज सोल्युशन्स डोळ्यात गेलीत तरी त्रास होत नाही.

योडी, ओके.

लेन्सेस च्या डबीत टाकायच्या सोल्युशन मध्ये साबण असतो आणि तो डोळ्यात जाऊन त्रास होतो असं दि मां नी लिहीलं होतं.मग डबीत असेल तर थोडं डॉळ्यात जाईलच ना डबीतली लेन्सेस डोळ्यात जायला? <<< सोल्युशनमधला साबण एकदम डायल्युटेड / डोळ्यांना कमी अपायकारक असावा. कारण लेन्स डोळ्यात टाकल्यावर थोडसं चुरचुरतं पण नंतर नॉर्मल वाटतं.

अक्वागार्ड च्या पाण्याने लेन्सेस धुतली तर चालतात का? <<< पाण्याने धुतल्यावर लेन्स थोडी खरखरीत झाल्यासारखे वाटते.

सुरुवातीला एखाद्यावेळेस रात्री लेन्सेस डोळ्यातून काढणे पूर्ण विसरले जाऊ शकते (माझ्या बाबतीत झालेले). तेंव्हा मोबाईलात रिमाईंडर सेट करणे उत्तम.

प्र च ण्ड धोकादायक असतो.>>
हो दी मा.. आय स्पेशालिस्ट म्हणाले होते, कि आणखी २-३ दिवस आला नसतात तर डोळा बाद झाला असता.

पाण्याने धुतल्यावर लेन्स थोडी खरखरीत झाल्यासारखे वाटते.
>>
हार्ड वॉटर असतं ते लेन्ससाठी.

टिअर ड्रॉप काय प्रकार आहे ते बघून विकत घ्यायला पाहिजे लेन्स आल्यावर
>>
अनु, लेन्सेसने ड्राय आईज वाटत असतील तरच टीअर ड्रॉप घे विकत. काही त्रास नसेल तर गरज नसते टी ड्रॉ ची. लेन्सेस मॉईस्ट रहाण्यासाठी असतात टी ड्रॉ..

उप्स ! किती भितीदायक वाटताहेत लेन्सेस ही माहिती वाचल्यावर. मी १२ / १४ वर्षे वापरत होते. तेव्हा इतकं माहित असतं तर वापरल्या असत्या कि नाही कोणास ठावुक. लेसिक नंतर पण ( ९ वर्ष) डोळे occasionally dry होणं याशिवाय काही त्रास नाही किंवा अजुन जवळ / लांबचा नंबर नाही. पण इथली माहिती वाचुन धुकधुक होते आहे. Sad

दीमा, एक विनंती आहे. हल्ली बर्‍याच लहान वयात डोळ्यांना नंबर येतो. लोक आहाराच्या बाबतीत हल्ली सतर्क असतात त्यामुळे व्हिटॅमिन A युक्त आहार घेतला जात असेल. पण तरी नंबर येण्याला विविध प्रकारचे स्क्रिन्स कारणीभूत असतीलच. पण तरी नंबर येणं टाळण्यासाठी किंवा डिले करण्यासाठी काय करावे ते सांगाल का? आलेला नंबर वाढू नये म्हणून काय करावे? मला चाळिशीचा नंबर आला आहे. अजून दूरचा नंबर नाही.

हा काँटॅक्ट लेन्सचा बाफ असल्याने ही माहिती देण्यास हा बाफ योग्य नाही, तरी अजून दुसर्‍या कुठल्या बाफवर माहिती देऊ शकलात तर बरं होईल.

डोळेवाला >>> Lol नाही हो! मायबोलीकर म्हणून हक्काने विचारतोय आम्ही Happy

धन्यवाद.

(अती अवांतर-)ते टेस्ट ला नेहमी एकच चित्र का वापरतात ही वाट दूर जाते वालं?
घड्याळांमध्ये १०-१० वाजलेले दाखवण्यामागे गोष्ट आहे तसं काही आहे का?

योडे! भयंकर वाटलं वाचून.
डोळेवाला >> Lol सांगा हो. मला विशेषत: लहान मुलांसाठीच विचारायचं आहे. कुठून तरी मोबाईल मिळवतातच हातात.

कुठून तरी मोबाईल मिळवतातच हातात
>>
अगदी अगदी गं!! आमच्याकडे तर रात्रीही हवाच असतो मोबाईल. २ दिवसापुर्वीच मोबाईल स्क्रीन लहान मुलांसाठी घातक आहे असं दाखवत होते बातम्यांमध्ये.

दीमांच्या गणेशोत्सव बीबीमध्येच हा किस्सा लिहिणार होते पण तेव्हा विसरले.

आमच्या कंपनीमध्ये सर्वच पीसींचा डेस्कटॉपवर कंपनीचा लोगो असलेला वॉलपेपर ठेवला होता. एका शहाण्यानं बदलून जंगलवगरेइ टाईपमधला केला. बॉसनं सहज कारण विचारलं. तत्परतेनं "वो हमेशा स्क्रीन को देखले आयज टायर्ड होता है. ग्रीनरी देखा तो आयज रीलॅक्स होता है!"

कपालबडवती!!!

ग्रीनरी देखा तो आयज रीलॅक्स होता है! <<< विनोदाचा भाग वगळता, खरेच स्क्रीनवर हिरवळ पाहिल्यावर डोळ्यांना रिलॅक्स्ड वाटत नाही का, कारण शेवटी डोळ्यांसाठी सगळा उजेड आणि अंधाराचा / रंगांचा खेळच ना?

गजाभाऊ, त्या हिरवळीवरून परावर्तित होणारा इलेक्ट्रिक लाईट आणि निसर्गातल्या हिरवळीवरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश यांचा खेळ असावा बहुतेक.

टाईम पास म्हणून ऑनलाईन व्हिजन टेस्ट घेऊन पाहिल्या.
http://www.essilor.com/en/EyeHealth/LensesForYourVision/TestyourEyes/Pag...
मायोपियाची टेस्ट विशेष नाही वाटली. बाकी चांगल्या आहेत.

Pages