कॉन्टॅक्ट लेन्स

Submitted by गजानन on 11 December, 2015 - 05:04

कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्यांच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणी / त्रास / उपाय यावर चर्चा करण्यासाठी...

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीमा आणि संदिप एस, लॅसिकच्या माहितीबद्दल धन्यवाद!
माझा नेत्रतज्ज्ञ डॉक्टर लॅसिकसाठी खूप मागे लागला आहे. परवा अ‍ॅन्युअल हेल्थ चेकपसाठी ढापण लावून गेले तर तिथल्या नेत्रत्ज्ज्ञाने डोळे तपासले नाहीतच, नुसतंतहे वाचता येतंय का, ते वाचता येतंय का अशी साक्षरतेची तपासणी केली आणि लॅसिक करून घेण्याविषयी १०० सेकंद लेक्चर दिले. एकतर माझा मेडिक्लेम लॅसिक कव्हर करत नाही, आणि इतके पैसे (पदरचे) घालून १००% खात्री नसेलच तर कशाला हवी आहे लॅसिक. मी मन्थली डिस्पोझेबल लेन्सवर आनंदी आहे.

मध्यंतरी मला (एकूण शरीरालाच) कोरडेपणाचा त्रास होऊ लागला होता). त्यात डोळ्यांना जास्त जाणवत होता कोरडेपणा. म्हणजे डोळे झोंबणे/ हुळहुळणे/ गरम होणे वगैरे त्रास नव्हता, पण डोळ्यात लेन्स घातल्या की डोळे लालभडक होऊन जायचे. आणि हा लालपणा पुढचे तीन चार दिवस राहायचा. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने महागडे तीन -चार ड्रॉप्स दर दोन तासांनी घालत होते. त्याकाळात पूर्ण तीन महिने फक्त ढापण लावत होते. मग उन्हाळा सरल्यावर एकदा धीर करून लेन्स लावून पाहिल्या, दिवसभर वागवून पाहिल्या. तीन-चार दिवस सतत वापरूनही काही त्रास झाला नाही म्हणून मग पुन्हा नियमित वापरायला सुरूवात केली.
तर ह्याविषयी दीमांच्या तत्त्वात बसत असेल तर त्यांनी लिहिल्यास वाचायला आवडेल.

मी गेले अनेक वर्ष लेन्सेस वापरते. सध्या मन्थली डिस्पोझीबल वापरत आहे.

जानेवारीत नविन करायच्या आहेत. गेल्या महिन्यापासुन चाळीशीचा चष्मा लागला आहे असे वाटत आहे. त्या संदर्भात काही विचारायचे होते
बाय फोकल लेन्स असतात का?
कोणी वापरल्या आहेत का?
असल्या तर नेहमीच्या लेन्स पेक्षा किती महाग असतात?
वापरायला काही वेगळ्या असतात का?

मी आधी , फक्त लांबचा नंबर होता तेव्हा सेमी सॉफ्ट वापरल्यात.
या बायफोकल गेली तीन वर्षे वापरतोय. त्यामुळे माझ्यासाठी हा फरक सेमी सॉफ्ट आणि सॉफ्टमधला आहे.
वापरात म्हटलं तर काही फरक नाही.

फक्त लेन्सची आतली बाहेरची बाजू ओळखणं हे ट्रिकी आहे.

ओके.

फक्त लेन्सची आतली बाहेरची बाजू ओळखणं हे ट्रिकी आहे.>> त्याच्यासाठी एक ट्रिक असते. लेन्स एका कडेने किंचीत चिमटल्यावर इन्वर्ड फोल्ड झाली तर ती आतली बाजू, आऊटवर्ड फोल्ड असेल तर लेन्स उलटी आहे, ती सुलट करून घ्या. ही ट्रिक बायफोकलला लागू होते का माहिती नाही.

पण लेन्स ला आत बाहेरच्या बाजू का असाव्या?
फक्त नंबर ची पारदर्शक प्लॅस्टिक्/काच तुकडा आहे ना?
(माझ्या लेन्स एक महिना वापरुन पाहण्याच्या निश्चयात रोज नव्या नव्या अडचणी कळत आहेत या धाग्यावर Happy )

पण लेन्स ला आत बाहेरच्या बाजू का असाव्या?>> जी बाजू बुबुळाला चिकटवायची तीच चिकटली पाहिजे. नाहीतर सॉफ्ट लेन्स असली तरी ती डोळ्याबाहेर येऊ शकते.
म्हणजे उदा. समजा लेन्स उलटी घातली असेल आणि आपण रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे आहोत, बाजूने बस किंवा तत्सम वाहन जोरात गेले तरी त्या वार्‍याने लेन्स बाहेर येऊ/ पडू शकते. जरी प्रतिक्षिप्त क्रियेने डोळे मिटले गेले तरीही.

http://www.allaboutvision.com/contacts/faq/inside-out.htm

तुम्ही अनु, १०-१२ दिवस तर लेन्स डोळ्यात घालायची, काढायची प्रॅक्टिस करण्यात जातील. एकदा ते जमलं की पुढे लेन्स डोळ्यांत आहेत की नाहीत तेही लक्षात राहणार नाही.

लेन्सची आतली बाहेरची बाजू ओळखणं हे ट्रिकी आहे.
<<
मंजूडींचे उत्तर बरोबर आहे.

*

तर ह्याविषयी दीमांच्या तत्त्वात बसत असेल तर त्यांनी लिहिल्यास वाचायला आवडेल.
<<
नक्की काय प्रश्न आहे? तो समजला तर उत्तर देता येईल.

मला माझ्या डॉकनी पण हाच सल्ला दिलाय. नो लेसिक. दर वर्षी २दा नंबर मात्र चेकून घेतो.
ज्यांना चश्मा जड वाटतो त्यांनी फायबर च्या लेन्सेस ट्राय नाही केल्या का? चश्मा अगदीच हलका होतो. त्याला नीट जपावं मात्र लागतं कारण तुलनेनी फायबर वर ओरखडे लवकर पडतात.

योकु, तुला चिमटा...

लेन्सेस चुकुन साबणाने धुवुन डोळ्यात लावल्या आणि डोळा निकामी होईपर्यंत वेळ गेल्यावर लेन्सेसचा नाद सोडुन दिला. फायबरचा रिमलेस चष्मा वापरते सध्या. नो वजन नो झंझट.. आता थोडी लेन्सेसची इच्छा डोकं वर काढतेय पुन्हा. पण डोळे कोरडे पडण्याचा त्रास मलाही होतो नेहमी. आर्टीफिशल टिअर ड्रॉप्स, लेन्स सोल्यकेस, केस हे सगळं कॅरी करा, ४-५ तासांनी लेन्स काढुन लावा ह्याचाही कंटाळा आहेच..

कोरडे डोळे होणार्‍या काँप्युटर वापरकर्त्यांना बाप्पाचा मेसेज दिलाय की यंदाच?

(संबंधितांनी लिंक शोधून दिली तर बरं होईल. गणेशोत्सवातून गायब दिसते आहे.)

दीमा, माझा हा त्रास/ प्रश्न - <<डोळे झोंबणे/ हुळहुळणे/ गरम होणे वगैरे त्रास नव्हता, पण डोळ्यात लेन्स घातल्या की डोळे लालभडक होऊन जायचे. आणि हा लालपणा पुढचे तीन चार दिवस राहायचा.>>

लेन्स घातल्यावरही नाही, लेन्स घातल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी झोपून उठल्यावर डोळे लालभडक झालेले असायचे.

बरं, डेली/ मंथली डिस्पोजेबल मध्ये कोणत्या चांगल्या आणि परवडेबल आहेत?? मी कुठेतरी जातानाच लेन्सेस लावते त्यामुळे मंथली डिस्पोजेबल कंपल्सरी महिन्याभराने फेकुन द्याव्या लागतला, अगदी एकदा वापरल्या तरी..

कोरडे डोळे होणार्‍या काँप्युटर वापरकर्त्यांना बाप्पाचा मेसेज दिलाय की यंदाच?>>>

ही च्या लिंकः

http://www.maayboli.com/node/55600
आरोग्याचा श्रीगणेशा! - माऊस कसा चालवायचा.

त्यामुळे मंथली डिस्पोजेबल कंपल्सरी महिन्याभराने फेकुन द्याव्या लागतला,
<<
मंथली डिस्पोजेबल रोज वापरल्या तर दोन महिने धकून जातात. Wink
एकदा वापरून नीट क्लीन करून ठेवल्या असतील तर पुन्हा वापरायला हरकत नाही.

कोरडी पडलेली लेन्स सलाईन टाकून ठेवले तर थोड्यावेळाने मऊ पडते, पुन्हा वापरता येऊ शकते.

*

डोळ्यात लेन्स घातल्या की डोळे लालभडक होऊन जायचे. आणि हा लालपणा पुढचे तीन चार दिवस राहायचा.

<<

लेन्स टाईट फिट होते आहे, प्लस गॅस परमिअ‍ॅबिलिटी कमी पडते आहे.
सोबत चुळचूळ होत असेल तर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन असू शकते.

डॉ.नी न तपासता या प्रश्नाचे उत्तर सांगणे कठीण आहे.

डॉ.नी न तपासता या प्रश्नाचे उत्तर सांगणे कठीण आहे.>> ह्म्म्म!!

लेन्स टाईट फिट होते आहे, प्लस गॅस परमिअ‍ॅबिलिटी कमी पडते आहे.>> ओक्के! पुन्हा असं काही झाल्यास डॉक्टरांना ह्या अनुषंगाने प्रश्न/ उपाय विचारता येतील.

योकु, आताच्या चष्म्याची भिंग तशीच लाइटवेट आहेत. पण जेव्हा चष्मा लागला तेव्हा तशी मिळत नव्हती किंवा अवाक्यात नव्हती.

योडी, साबणाने लेन्सेस धुतल्या? Uhoh

दीमा, दोन महिने चालतात हे खरं सांगताय का? पुढे डोळा मारलाय तुम्ही.

तशा वापरल्या तर म्हणजे - एक डोळा बंद करून तर दोन महिने जाणारच की दोन लेन्स. डॉ असल्याने दीमांनी शॉर्टहँड मधे लिहीले हेच. Proud

नाही. तो अनहापिशल किंवा "जुगाड" सल्ला आहे, म्हणून डोमा.

यासाठीचे पुढे अड्ड्यावर लिहित आहे.

दीमा,
धन्यवाद हे लिहिल्याबद्दल. मला शंका होतीच की अशी ठरवून एका महिन्यात कशी काय एक्स्पायर होणार लेन्स? मी मला त्रास होईपर्यंत वापरते. १२ जोड्या २ वर्षं चालतात. बॉश अँड लाँब मंथली डिस्पोजेबल सॉफ्ट लेन्सेस. रोज १२-१६ तास वापरते. एखाद्या रवीवारी वगैरे चष्मा. पण मला चष्मा वापरायला अजिबात आवडत नाही. ड्रायव्हिंग करताना, पावसात, पूल-शॉवरमध्ये तर चष्मा अगदीच त्रासदायक. लेन्सनी व्हिजन स्पॅन वाढतो आणि चष्म्यापेक्षा फार फार फार क्लिअर, शार्प दिसतं . त्यामुळे लेन्स घातल्याशिवाय मला झोपेतून जागं झाल्यासारखंच वाटत नाही. दहा-बारा वर्षं झाली वापरुन.

ज्यांना लेन्स फार कटकटीच्या वाटतात त्यांच्यासाठी: एकदा सवय झाली की लेन्सेस अर्ध्या मिनिटात लागतात. आणि दहा सेकंदात निघतात. आणि रोज ३० सेकंद अजुन लागतात सोल्युशनने साफ करायला. बस्स. पण त्याची सवय होईपर्यंत जर तुम्ही रोज लावल्या नाहीत, तर तुम्हाला त्याची सवय कधीच होत नाही. मग प्रत्येकवेळी १०-१५ मिनिटं लागतात लेन्स लावायला. शिवाय डोळ्यातून पाणी, लालभडक डोळे, डोळ्यात खुपणं वगैरे प्रकार झाले की मग माणुस अजुनच डिमोटिव्हेट होतो.

काही दिवस वापरल्या की त्या आपल्या डोळ्यांचाच एक भाग असल्यासारख्या बनतात. मग आपण प्रतिक्षिप्त क्रियेनी डोळे चोळणे वगैरे आपोआपच करत नाही.

बाप्पावाली लिंक शोधून दिल्याबद्दल सोनू. तैंना धन्स!
हे ते चित्र :

*

@ नताशा.
>>
ज्यांना लेन्स फार कटकटीच्या वाटतात त्यांच्यासाठी: एकदा सवय झाली की लेन्सेस अर्ध्या मिनिटात लागतात. आणि दहा सेकंदात निघतात. आणि रोज ३० सेकंद अजुन लागतात सोल्युशनने साफ करायला. बस्स. पण त्याची सवय होईपर्यंत जर तुम्ही रोज लावल्या नाहीत, तर तुम्हाला त्याची सवय कधीच होत नाही. मग प्रत्येकवेळी १०-१५ मिनिटं लागतात लेन्स लावायला. शिवाय डोळ्यातून पाणी, लालभडक डोळे, डोळ्यात खुपणं वगैरे प्रकार झाले की मग माणुस अजुनच डिमोटिव्हेट होतो.
<<

अगदी परफेक्ट सांगितलं आहेत. सवय झाली, की चष्मा लावतो तितक्या सहजतेने लेन्स लावता येते.

पण.

१. अतिपरिचयात अवज्ञा नको. काही तरूण मुलं चक्क जिभेवर ठेवून लेन्स ओली करून लावणे (कारण सोल्यूशनची बाटली सोबत वागवायचा कंटाळा) असे उद्योग करतात, जे अत्यंत धोकादायक. तसेच ६ तास वापर अर्धातास विश्रांती हे लक्षात ठेवावं.

२. लेन्स क्लिनींग करताना, तळहातावर लेन्स ठेवून दुसर्‍या हाताच्या बोटाने तंबाखू मळल्यासारखी अ‍ॅक्शन करत नीट चोळून धुवावी, जेणेकरून प्रोटीन डिपॉझिशन कमी होते. डोळ्यात घालण्याआधी व काढल्यानंतर लेन्स क्लीन केलीच पाहिजे.

सोल्युशन ची बाटली सोबत ठेवायची गरजच नाही. लेन्सकेस मध्ये फ्रेश सोल्युशन ठेवायचं आणि ती डबी घेऊन फिरायचं.
६ तास वापर अर्धातास विश्रांती हे लक्षात ठेवावं.>> हे कसं जमवायचं? मी जेवढा वेळ जागी असते, तेवढा पुर्ण वेळ लेन्स डोळ्यात असतात.

लेन्स क्लिनींग करताना, तळहातावर लेन्स ठेवून दुसर्‍या हाताच्या बोटाने तंबाखू मळल्यासारखी अ‍ॅक्शन करत नीट चोळून धुवावी, जेणेकरून प्रोटीन डिपॉझिशन कमी होते. डोळ्यात घालण्याआधी व काढल्यानंतर लेन्स क्लीन केलीच पाहिजे.>> बरोबर. मी लेन्स लावयाच्या आधी आणि काढून ठेवताना दोन्ही वेळ अशी क्लीन करते. करावीच लागते. नाहीतर प्रोटीन डिपॉझिशननी ती धुसर होते.

Pages