युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाव आधी भाजून घेऊन आयत्यावेळी कुकरमध्ये गरम करता येतात. जास्त माहितीसाठी इथेच झालेली चर्चा शोधा जरा.,>>>>
https://www.maayboli.com/node/33502?page=1
हे बघा

मी सगळे पाव एकदमच बटर लावून अवन मधे करते गरम. साधारण ३००-३५० डि फॅ ला १५-२० मिनिटे पुरतात. जेवणाची बाकी तयारी , पावाभाजी गरम करणे इ. होईपर्यन्त पाव तयार.

पावाची लादी मधे कापा... म्हणजे एका वेळि ६-८ पावांना बटर लावून भाजता येतं .. मोठ्या आकारचा तवा पाहिजे मात्र... माझ्याकडे आयताक्रूती मोठा ग्रीडल पॅन आहे त्यावर सोपे जाते . मी पण असंच करते..

प्राची, लिंकबद्दल धन्यवाद ! कुकरमध्ये वाफवायच्या युक्तीबद्दल अंधुकस आठवत होतं . पण शुअर नव्हते .

मैत्रेयी , ओव्हनची आयडिया चांगली आहे . सोपे वाटतेय .करून बघेन .

अमित , अंजली थँक्स

मी सगळे पाव एकदमच बटर लावून अवन मधे करते गरम. साधारण ३००-३५० डि फॅ ला १५-२० मिनिटे >> चिवट किंवा चामट नाहि होत का? Uhoh

उलट फ्रेश बेक केल्यासारखे होतात मस्त लुसलुशीत >>> हो हो. मी पण इथे मायबोलीवरच वाचून एकदा ट्राय केले, ते इतके मस्त झाले की आता अवनमध्येच करते. अवनमध्ये करायचा अजून एक फायदा की बटर करपल्याचा वास रेंगाळत नाही अजिबात.

अग नाही, उलट फ्रेश बेक केल्यासारखे होतात मस्त लुसलुशीत. >>> हो पण ते थोडाच वेळ ना? समजा खायला उशीर झाला किंवा करुन ठेवले तर ते नक्कीच चिवट होणार. अगदी मऊ लुसलुशीत पोळी सुद्धा गरम केली आणि ठेवुन दिली तर, तिचा पापड होतो. दक्ष, तुझी शंका रास्त आहे, माझाही तोच अनुभव आहे.

अवनमध्ये करायचा अजून एक फायदा की बटर करपल्याचा वास रेंगाळत नाही अजिबात. >>> हो हा नक्कीच प्लस पॉइंट आहे.

काल युट्यूब वर तंदूरी रोटी वरचा व्हिडीओ बघितला टोस्टर वापरून ... आज आलूपराठे व रोटी दोन्ही करून बघितले. मस्त झाले. मला थंड व लूळी भाकरी आवडत नाही आता भाकरीसाठीही टोस्टर वापरीन. भाकरी आधी करून ठेवून जेवतेवेळी टोस्ट करून खाता येईल. एकावेळी दोन टोस्ट होतात...
https://youtu.be/N5ajKshECSs

तापमान तापमापकाने मोजलं नाही आणि हाताने 'फील' केलं तर रिलॅटिव्ह असतं. भारतात सभोवतालचे तापमान जास्त असल्याने फरक 'जाणवत' नसेल.

आंबा हाताला थंड लागला की तो पूर्ण पिकला ही खूण आहे आमची. जोपर्यंत गरम लागतोय तोपर्यंत तो तयार नाही.

हो कणिक गरम लागतेच.

लोकहो, धन्स. एका मैत्रिणीने उगाच किडा सोडला होता डोक्यात कि कणिक कोमट लागली म्हणजे सोडा वगैरे काही तरी घातला असेल. म्हणून मग लाडक्या मायबोली वर धाव घेतली आणि नेहमीप्रमाणे दिलासा मिळाला. मुंबईतला देशपांडे ह्यांचा टेस्ट फॉर लाइफ आटा मिळाला आहे आणि पोळ्या फार छान होत आहेत. मे बी मुंबईतल्या लोकांना माहिती असेल.
ममोताई, नवीन माहितीसाठी स्पेशल धन्यवाद.

सोडा बिडा अजिबात नाही. अ‍ॅज आरारा सेज, एक्झोथर्मिक रिअ‍ॅक्शन.
'रसायनशास्त्रातील ९९९९ गोष्टी' या मीर प्रकाशनाच्या पुस्तकात अती बारीक पावडरींच्या एनर्जी मुळे स्फोट झाल्याची उदाहरणेही आहेत.

https://www.wired.com/2008/03/the-explosive-t/

कणिक नुकतीच दळलेली असो वा आधीची, विकत आणलेली असो वा दळून आणलेली, घराच्या गव्हाची असो वा विकतच्या गव्हाची... भिजवताना हाताला कोमट लागतेच!
आ रा रा म्हणत आहेत त्याप्रमाणे ही उष्मात्यागी अभिक्रिया होते पाण्याच्या संपर्कात आल्यावर!

>>काल युट्यूब वर तंदूरी रोटी वरचा व्हिडीओ बघितला टोस्टर वापरून
टोस्टर वर कसा व्हिडीओ बघितला? Happy स्मार्ट टोस्टर.

राखी Lol

इन्टरेस्टिंग आयडिया आहे टोस्टर वापरायची, करून पहायला हवं रोट्या कोरड्या होतात की कसं.
पारंपरिक तंदूरी रोट्या करतानाही कोरड्याच भाजतात का?

Pages