युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाळतांदूळ निम्मंनिम्मं करून त्यात भोपळा, कच्चं केळं, बटाटा, बारीक चिरलेली पालेभाजी, गाजर, रताळं, दुधी अशी कुठलीतरी भाजी किसून घालायची आणि या सगळ्याची मऊ पातळसर खिचडी शिजवायची. वरून छोटा चमचाभर साजूक तूप. किंचित लिंबू पिळून.
कधीतरी या खिचडीवर तुपाची फोडणी करून त्यात अदपाव चिमूट हिंग आणि जिरेपूड घालायची. घरी केलेल्या बिनतिखटाच्या, कमी मसाल्याच्या भाजीचा रस किंवा त्याच्या फोडी मऊ करून या खिचडीत घालून भरवायच्या.
दलिया आणि डाळीची वरीलप्रमाणेच भाज्या खिचडी करून.
धिरडी, उपमा, उकड, दूधगूळपोहे, एक चमचा सातूचं पीठ पाण्यात किंवा दुधात कालवून चिमूटभर साखर घालून, इत्यादि
केळं आणि सर्दीचा संबंध नाही. रोज एक केळं खाल्लेलं तब्बेतीला (सोसतं आहे का हे आधी बघून) उत्तम.
आणि आपल्याच खाण्यातलं खाणं हवंय यापेक्षा चांगली आणखी कुठली गोष्ट असणार? जे काही घरी रांधलेले खातो (तिखट मसालेदार नसलेलं) ते सगळे घालून बघायचे.
नाचणीसत्वात आधीच साखर असेल तर अजिबात वरून घालू नकोस. मिट्ट गोड असतं ते. शक्यतोवर साखरविरहित आणायचं. साखर मीठ जितकं कमी घालाल तेवढं चांगलं.

मालती कारवारकरांचं वंशवेल हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवणे Happy

योकु मी मुलीला नाचणी सत्वा मध्ये खारीक पुड घालून देते . साखरेची गरज नाही. सत्व पण घरीच करते . शक्यतो विकतचे आणू नकोस.
सद्या ऊन नसल्यामुळे सत्व ताटात ठेवून चिलर ट्रे मध्ये ठेवल्यास चांगले सुकते

नाचणी सत्व घरी कसं करायचं ते योजाटा.
वरून साखर खाणं बंद केलं मी त्याचं. त्याचं नेहेमीचं शिजवलेलं खाऊन झालं की माझ्याबरोबरच त्याची पण एक लहान ताटली घेतोय सध्या. पोळीच्या तुकड्याचे नखाएवढे तुकडे, कधी चिमूट्भर भात असं वेगळं देतो त्याला. सध्या चिवडून हातात घेऊन मग खायचा ट्राय करतो; कधी जमतं कधी नाही, कधी नुसतीच पळापळी; पण त्याला आवडतंय ते दिसतं आहे.

Aaj basundi karaychi aahe. Ganapati sathi prasad mhanun. Kuni pedhe takale aahe ka basundi madhe? Changale lagel ka?

मी भारतातून २ डझन स्टील च्या वाट्या घेउन आले डिस्पोजेबल वापरावे लागू नये म्हणून. त्या वाट्यांना आतून स्टिकर चिकटवलेले आहेत. ते सहज अजिबात निघून येत नाहीत. नखाने खरवडून एकेक करून काढण्यात फार वेळ जातो. कुणाला काही युक्ती माहित आहे का जेणेकरून ते स्टिकर एकदम सहज पील ऑफ होतील?

वाट्या भिजत घाला तासभर. ओल्या स्टिकर वर फडक्याने डिश वाॅशर फडक्याने घासा चिकट पणा सहीत निघेल.
२४ वाट्यांसाठी अंदाजे वेळ १५~२० मिनिटे.

ओल्या स्टिकरचा कागद वरचे वर निघाला अन डिंक खाली चिकटलेला राहिला, तर नेलपॉलिश रिमूव्हर उर्फ अ‍ॅसिटोन किंवा रबिंग अल्कोहोल वापरून तात्काळ निघेल. रबिंग अल्कोहोल ऐवजी एकादा रद्दी/नावडता परफ्यूम्/स्प्रे/आफ्टरशेव चालतो, अन नाहीच तर थोडी व्होडका वापरा.

पाफा, २४ वाट्या मिळून २४ थेंब लागतील हो. २४ मिलि पण नाही.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 16 September, 2018 - 21:30
>>>>
सरजी बुंद बुंद से सागर बनता है. महीने के आखिरमे/ अडिनडी मे यही सागर किसी की नैया पार लगायेगा.

हेयर ड्रायरनं त्या स्टिकर्सवर ब्लो केलं तरी पटकन निघून येतात.
>>>
हेच लिहायला आलेले, फार पटकन निघतात, विना त्रास आणि घरातली कुठलीही व्यक्ती हे काम करू शकते

तेलाने निघतात स्टिकर्स आणि त्यांचा गोंद.
रॉकेल बेस्ट असायचं त्यासाठी - पण इथे जाऊच दे, भारतात देखील आता ते सहजी उपलब्ध असतं की नाही काही कल्पना नाही.

तेल आणि बेकिंग सोडा मिक्स करायचा. आणि स्टिकरला चोळायचा. अगदी सेकंदात निघतो कागद. नंतर गरम पाण्याने वाटी धुवुन काढली कि जराही ट्रेस रहात नाही.
किंवा goo Gone एकदम इफेक्टिव्ह . कुठेही क्लिनिंग सेक्शन मध्ये बॉटल मिळेल.

केवढ्या युक्त्या आलेल्या आहेत. मी हलकेच गॅस वर गरम करणे, हेयर ड्रायर्ने स्टिकरवर ब्लो करणे ह्या सर्वात आधी ट्राय करीन मग सीमाने लिहिलेले goo Gone आणीन.
सर्वांना धन्यवाद!

चकल्या मऊ पडल्या आहेत. जेव्हा पीठ भिजवलं तेव्हा पाणी जास्त झालं म्हणून घरची थालिपिठ भाजणी घातली थोडी. पण फारच मऊ पडल्या आता ओव्हन मधे बेक मोड वर ठेऊन पाहू का ?

खरवस करण्यासाठी गायीच्या दुधाचा चीक विकत आणला. छोटा पोर्शन बनवला पण त्याला विअर्डसा वास आणि चव आहे. दूध/चीक ताज आहे हे नक्की. आता उरलेल्या पाऊण लिटर चिकाच काय करता येईल? त्यामध्ये इक्वल क्वांटिटी साधं दूध घालून तो अलमोस्ट दीड लिटरचा मामला आहे. दोन लोकांमध्ये संपणारही नाही.

मऊ पडल्या आता ओव्हन मधे बेक मोड वर ठेऊन पाहू का>>> पुन्हा बेक करु नका. करपतील. गरम प्रिहीटेड ओव्हन मधे ठेवा.

थँक्स, sonalisl. साखर, केशर आणि जायफळ पावडर वाया घालवण्यापेक्षा दूध वाया घालवणं ठीक वाटलं. ओतून देते मी सिंकमध्ये.

अरे देवा!

अहो,
१. खरवसाला दुधासारखा वास येत नाही. तो वेगळाच वास असतो. शरीराच्या प्रत्येक स्त्रावाला (यात दूधही आले) स्वतःचा असा वास असतो. हा दुर्गंध नसतो. वेगळा असला, तरी नासका नसेल तर तो खरवसाचाच वास असू शकतो. अगदी गायीच्या दुधाचा वास म्हशीच्या दुधापेक्षा वेगळा अन उग्र असतो.
२. खरवस पहिल्या दिवसाचा नसेल तर त्यात दूध घालायची गरज नाही.

 गायीच्या दुधाचा चीक विकत आणला---माझ्या माहितीप्रमाणे चीक विकत घेतला / विकला जात नाही, गाईसाठी धान्य वै द्यायची पध्दत असते. गवळी पण चीक विकत नाहीत.

Pages