Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेली ४ वर्षे मी पुणे
गेली ४ वर्षे मी पुणे रेनीगुंठा ट्रेनच प्रवास करते (मुलीला ट्रेन प्रवास खुप आवडतो). मला रात्रीचं जेवण आणि सकाळ चा नाश्ता घेऊन जावा लागतो. त्यामुळे दुपारच्या जेवणाचं मी नाही सांगू शकत. मी जनरली अंड्याची भुर्जी (जी सुकी तर असते पण खाताना कोरडी वाटत नाही), पोळी आणि फोडणी देऊन केलेली मुगडाळ खिचडी, थोडं काकडी गाजर कापून नेते. सकाळ च्या नाश्त्याला sandwich करते. टोमॅटो, काकडी, टोमॅटो सॉस (पिचकू), बटरचे क्युबज् किंवा मेआओनिजचं पिचकू सारखं पाकिट मिळतं ते घेते, चटणी सुद्धा घेते. AC असल्याने खराब होत नाही. एक सुरी/चाकू, एक प्लेट टोमॅटो काकडी कापण्यासाठी. Sandwich room temperature ला खात असतो त्यामुळे खाताना हे काय गार खातोय असं होत नाही. फक्त ब्रेड जरा शिळा होतो. पण बेकरीतून संध्याकाळ च्या लॉट मध्ये निघणारा घेतला तर बरा असतो. लेक ७ वर्षाची असल्याने jam पण घ्यावा लागतो (तो पुढच्या प्रवासात उपयोगी येतो).
जेवायला काहीही घ्या पण जरा चटपटीत आणि आवडीचे पदार्थ घ्या, कारण गार झालेले पदार्थ आवडीचे/चटपटीत असतील तरच खावेसे वाटतात. सटरफटर , वरचा खाऊ पण घ्या, रिकाम्या वेळी भुक लागते.
योकू यांनी सांगितलेलेही महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून पुण्यात पोहोचेपर्यंत वेळ काढायला उपयोगी पडेल.
Extra tip
माझी मुलगी ५ वर्षे २ महीन्यांची असल्यापासून स्वतंत्र बर्थ वर झोपते. एक ५मीटर दोरी मी तिच्या बर्थला बांधते. बर्थला तशी सोय असते. |X| अश्या प्रकारे बांधायची. मुलं सेफ. त्यांना छान झोप लागते आणि आपणही निवांत झोपू शकतो. मुलगी ४ वर्षाची असताना माझ्या बर्थला बांधली होती. दोरीच्या support मुळे दोघीही एकाच बर्थवर छान झोपलो. (टिप: मी overweight आहे)
पावसाळा असल्याने पदार्थ
पावसाळा असल्याने पदार्थ नासायची भिती कमी आहे.
आम्ही हे घेतो,
लहान इडल्या पोडीच टाकून परतून,
घट्ट लावलेले दही( जरासे दूध मिक्स करून),
भोपळ्याची थालीपीठं( मऊ रहातात),
अळू वडी/ कोथींबीर वडी/बाकरवडी ( न तळता, बेक करून प्रवासात ),
लंचबॉक्स ( गरम रहावे म्हणून) मध्ये पातळ खिचडी रात्रीच्या जेवणाला,
आवळा पाक/आले वडी( घरीचबनवलेली), प्रवासात पोटाला बरी),
तयार चहा पाकिटे , तिखट शेव,
काही फळं( जी कडक रहातात सफर्चंद, वगैरे)
थर्मास मध्ये गरम दूध फक्त त्या रात्रीकरता, आणि गरम पाणी( थर्मास कमीत कमी १० तास गरम राहिल असा घ्यावा) निघताना पाणी भरावे.
आमच्याकडे जेवल्यावर सुद्धा चहा पितात तेव्हा तेवढं दूध घेतो.
पाण्याच्या बाटली. आणि रोजचे सामान( विक्स, बाम, वगैरे)
उद्यानला pantry नसल्यामुळे
उद्यानला pantry नसल्यामुळे मंडळींना already कसं होणार ची काळजी आहे. >> हे वाक्य वाचून उद्यानला आणखी काहीतरी असेल ना असा प्रश्न डोक्यात आला.

माझी मुलगी ५ वर्षे २
कांदा चटणी रेसिपी awesome आहे नक्की करणार. पण गूळ नाहिये रेसिपीत!
दूध आणि कॉफी साठी अमूल कूल
दूध आणि कॉफी साठी अमूल कूल आणि कूल कॅफे वापरू.
इडली टिकेल का नाही नक्की माहीत नव्हतं त्यामुळे इथे ते कळलं.
हो उद्यान ला बाकी सोयी आहेत.
हो उद्यान ला बाकी सोयी आहेत. कर्नाटका एक्स्प्रेस, कुर्ला आणि मुंबई एक्स्प्रेस ला pantry आहे. फक्त उद्यान ला नाहीये.
But why train if flight was
But why train if flight was cheaper? Just curious to know!
मुलाला जायचंच होतं. गेल्या
मुलाला जायचंच होतं. आम्हाला सगळ्यांना ट्रेन आवडते. सासऱ्यांना तर एसी बोगी सुद्धा आवडत नाही, स्लीपर क्लास हवा असतो. कारण एसीत कोणी एकमेकांशी बोलत नाही. त्यांना गाडीत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गप्पा मारायला आवडतं. गेल्या बऱ्याच ट्रिपना वेळेअभावी शक्य नव्हतं झालं नव्हतं. आता सुद्धा तीनच दिवस पुण्यात आहोत. पण जाताना ट्रेन शक्य आहे. ऑफिस पूर्ण करून मग अपरात्रीचे विमान घेऊन जे बहुतेक एखाद तास लेट होते, झोपेचं खोबरं होतं. त्यापेक्षा गाडीत झोपायचं. एकत्र सिनेमे पहायचे, Board gameस खेळायचे, जमली तर पुस्तकं वाचत. ट्रिपमध्ये ट्रिप
<त्यांना गाडीत ह्या टोकापासून
<त्यांना गाडीत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गप्पा मारायला आवडतं. > गुजराती आहेत का ते?
नाही! ओळखी, लोकसंग्रह आणि
नाही! ओळखी, लोकसंग्रह आणि माणसं आवडतात त्यांना.
एक सुरी/चाकू, एक प्लेट टोमॅटो
एक सुरी/चाकू, एक प्लेट टोमॅटो काकडी कापण्यासाठी. Sandwich room temperature ला खात असतो त्यामुळे खाताना हे काय गार खातोय असं होत नाही. --- good idea
रागावू नका, पण तुम्ही ट्रेन
रागावू नका, पण तुम्ही ट्रेन प्रवासासाठी खाण्याची जितकी तयारी करताय, तितकी फक्त गुजरात्यांनाच करताना पाहिलंय. No offence meant because they are also proud of it. Enjoy your train journey.
तसं नाही भरत., एक तर लहान
तसं नाही भरत., एक तर लहान मुलं असली की सवयच लागलेली असते सोबत भरपूर प्रमाणात खाणं पिणं घेण्याची
दुसरं म्हणजे मजा येते या प्लॅनिंगमध्ये ( मला तरी). मीही भरपूर खाणं पिणं सोबत घेते प्रवासात.
घर ते घर प्रवास 23-24 तासांचा
एक तर लहान मुलं असली की सवयच
एक तर लहान मुलं असली की सवयच लागलेली असते सोबत भरपूर प्रमाणात खाणं पिणं घेण्याची -----+1
दुसरं म्हणजे मजा येते या प्लॅनिंगमध्ये ( मला तरी). मीही भरपूर खाणं पिणं सोबत घेते प्रवासात.---- +1
काहीतरी वेगळं करायचंय! इडली नक्की नवा item असणार आहे. कधीच प्रवासात घेतली नव्हती
दडपे पोहे, वडा पाव (वडे घरी
दडपे पोहे, वडा पाव (वडे घरी करुन घ्या) , केक, हान्डवो (हा भाजलेला असल्याने टिकेल) फाफडा, साखी ,खाकरा,भडन्ग, इडली, भाकरी-तिळ चटणि
प्रवासात खा खा होतेच! तेव्हा सगळ खराब व्हायच्या आत सपेल,
वडा पाव (वडे घरी करुन घ्या) -
वडा पाव (वडे घरी करुन घ्या) --- हे मला जमलं तर तो डांसच करेल, मी पण
माझ्या रेसिपीने बटाटा भाजी
माझ्या रेसिपीने बटाटा भाजी भरलेला स्टफ्ड बनपाव करा. बेकिंग आहे त्यात.
माझ्याकडे करन्जीचे सारण उरले
माझ्याकडे करन्जीचे सारण उरले आहे, म्हण्जे कोरडे सारण आहे. करन्जीशिवाय दुसरे काय करता यील?
भोपळ्याची थालीपीठं( मऊ रहातात
भोपळ्याची थालीपीठं( मऊ रहातात), > देवीका, हे कसं करतात? लाल भोपळ्याचं ना? किती टिकतात?
कांदा चटणी रेसिपी awesome आहे
कांदा चटणी रेसिपी awesome आहे नक्की करणार. पण गूळ नाहिये रेसिपीत! >> राजसी मी गुळ घातला होता
पण रेसिपीत लिहिला नाही, इथे लगेच चिडवतात मला किती साखर/गुळ खाते म्हणून. 
कांदा चटणी रेसिपी करून बघितली
कांदा चटणी रेसिपी करून बघितली. खुप आवडली. धन्यवाद दक्षिणा.
मी थोडी साखर आणि चिंच पण घातली होती.
बर्नर काळा न करता वांगी भाजता
बर्नर काळा न करता वांगी भाजता येतील का? अल्यूमिनियम foil मधे भाजता येतात का?
हो, येईल की. तेल लावुन
हो, येईल की. तेल लावुन फॉइलमध्ये गुंडाळुन भाजता येईल.
कांदा चटणी रेसिपी करून बघितली
कांदा चटणी रेसिपी करून बघितली. खुप आवडली. धन्यवाद दक्षिणा.
मी थोडी साखर आणि चिंच पण घातली होती. >> __/\__ धन्यवाद. आमच्या कमळू ला सान्गेन आवर्जुन.
कांदा लसुन चटणी नक्की करुन
कांदा लसुन चटणी नक्की करुन पाहणार.
ही चटणी सॉलिड टेस्टी झाली
ही चटणी सॉलिड टेस्टी झाली होती. एकदम चाटपूस संपली:) मजा आली ह्या चटणीमुले. बाकी पहिल्यांदा इडली न्यायचा अनुभव पण छान होता. इडली-चटणी(खोबऱ्याची), मसाला-पुरी, श्रीखंड आणि कांदा-लसूण चटणी इतकंच नेलं. पुऱ्या जास्त झाल्या म्हणून भात प्रकार नेला नाही. बाकी बिस्कीट आणि शेव-चुरमुरे, रेडिमेड मुरक्कु मधला वेळेस. काही विकत घ्यावे लागले नाही. चहा मात्र घेतला, अमूल कूल प्यायला सगळ्यांनी नकार दिला. मी सकाळी उठायच्या आधीच पब्लिक विकतचा चहा घेऊन, पिऊन, तरतरीत होऊन बसली होती.
ज्वारीच्या पीठाचे कोण कोणते
ज्वारीच्या पीठाचे कोण कोणते पदार्थ करता येतील ? ( भाकरी, थालीपीठ व शेंगोळे सोडुन, कारण हे नेहेमी होते)
हो, येईल की. तेल लावुन
हो, येईल की. तेल लावुन फॉइलमध्ये गुंडाळुन भाजता येईल.>> धन्यवाद राया. करून बघते.
ज्वारीच्या पीठाचे कोण कोणते
ज्वारीच्या पीठाचे कोण कोणते पदार्थ करता येतील ? ( भाकरी, थालीपीठ व शेंगोळे सोडुन, कारण हे नेहेमी होते) >>> सीमा नी ज्वारीच्या पिठाचं पिठलं सांगीतलेल आहे. नेहेमीप्रमाणेच करायचं. मी एकदा केलं होतं. लसूण खरपूस तळून वगैरे मस्त लागतं.
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडीही मस्तच होते. कणकेपेक्षा जास्त टेस्टी लागते.
सढळ हाताच्या तेलावर नेहेमीप्रमाणे कांदा-मिरचीची फोडणी करून शेंगदाणे खरपूस करायचे आणि मग पेशन्स ठेवून पीठ भाजायचं. खमंग सुवास पसरला की मग ताक/ चिंचेचं पातळ पाणी घालून शिजवायचं. एकदम भारी प्रकार बघा. हिरवीगार कोथिंबीर वरून. रवीवारच्या सकाळच्या नाश्तात केला की पार दुपारच्या १२३०-१ पर्यंत पोट गप बसतं
काही लोक्स यात लसूणही घालतात.
Pages