माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...

Submitted by rar on 17 November, 2015 - 00:13

आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्‍या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art ! अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.
ही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....

हे काही बुकमार्क्स....

आणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स

पतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...

The 'नूज ' is all over the 'न्यूज' ...

प्रेयर्स फॉर पॅरीस

हे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.
Turkey Doodle

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्त !!!!

अशक्य भारी आहे हे

मी देखिल गिरमिटायचा प्रयत्न करून बघतो आता....

टी बॅग च्या खोक्यामधल्या डिव्ह्यायडर पासून बुकमार्क बनवण्याची कल्पना खूपच भारी आहे.

तू माधव आचवल वाचले आहेस का? मला ही प्रस्तावना वाचून माधव आचवल आठवले.

छान काढली आहेस चित्रे. पतझडचे फेसबुकावर पाहिले होते. ह्यातली सगळीच डुडल्स वाटत नाही कारण त्यांना निश्चित एक नाव आहे. जसे की फुलपाखरु, हत्ती, बाहुली, झाड हे डुडल्समधेच येतात का?

बादवे, ते गाणे फारच सुरेख आहे ज्युलीमधले. .. माय हार्ट इज बीटींग कीप सम रीपीटींग!!!

नं. २ चं झाड, मांजर आणि बुकमार्क्स आवडले. तुला मेंदीही चांगली काढायला जमत असेल ना?

Pages