बोगनवेलीचं फूल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

boganwel.jpg

मागच्या रविवारी बंगलोरच्या इंदिरानगरच्या प्रशस्त अश्या रस्त्यावर स्वांतसुखाय भटकंती करताना घेतलेलं प्रकाशचित्र.

मस्त..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

खुपच अप्रतिम!!..

कुठला camera वापरता??...मस्त आले आहे खरच!!

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

छान

आहा!!
मागच्या जांभळ्या मखमलीवर ती नाजूक पांढरी फूलं कसली खुलून दिसतायत!!!
सुरेख..!!
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला
कित्येकासी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

वाव विश्वास बसत नाहीय...
माझ्याकडे कॅमेरा आहे, आता फोटो कसे घ्यायचे ते कोणीतरी सांगा प्लिज.. इथले एकेक फोटो पाहुन हेवा वाटतोय...

आयटे, हा फोटो असाच घेतलास की नंतर फोटोशॉपमध्ये काही केलस??

ती दोन फुले अगदी जाहिरातीतील कानातल्या कुड्यांसारखी जवळजवळ बसलीत..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

खुप म्हन्जे खुपच छान !

सही !

  ***
  '... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'

  अहाहा... इतकं सुंदर फुल आणि ते ही बोगनव्हिलियाचे! पानांच्या ओंजळीत पकडलेले दोन चिमुकले जीवच जणु..! सुंदर फोटोग्राफी!

  xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
  भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
  xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

  अभिप्राय देणार्‍या सर्वांचे खूप खूप आभार! धन्यवाद मंडळी!:)
  >ती दोन फुले अगदी जाहिरातीतील कानातल्या कुड्यांसारखी जवळजवळ बसलीत..> Proud
  साधना, फोटोशॉप वापरलय गं.. Happy कॅमेरा आहे ना? काढायला लाग मग फोटो. काढता काढता शिकशील, मॅन्युअल वाच पाहू कॅमेराबरोबर आलेलं!
  जपनमधले केदार, Nikon D60 आहे कॅमेरा.

  मस्त आलय. ती दोन फुले सुरेख दिसत आहेत. पण फोटोशॉप वापरलेले कळत आहे त्यामुळे त्याच नैसर्गीक एफेक्ट गेला आहे असे मला वाटते.

  केपी, मी शिकतेय रे फोटोशॉप अजून... Happy
  चुका जरुर सांगत जा..

  आय टी
  अप्रतीम फोटो!

  सुरेख आलाय फोटो .. फक्त framing wise तो फुलांचा पांढरा भाग मध्ये असता तार अजून चांगलं वाटलं असतं असं वाटतंय .. डाव्या बाजुची जागा रिकामी वाटतेय .. चू. भू. दे. घे. .. Happy

  छान!!!

  छान. मला फुलातली ती दोन फुले (पांढरी) पण आवडली.

  आहा काय मस्त आलाय ग फोटो, कॅमेरा घेऊन मीपण फिरते पण फोटो काढायला नजरच हवी. Happy

  साधना, चिन्नु, sas, रुनी, भाग्या खूप आभार Happy
  भाग्या, ती पांढरीच फुलं असतात. ते बाजूच्या मोठ्या रंगीत पाकळ्या कीटकांना आकर्षित करायला नं?
  श्यामली, Happy
  सशल, आभार, आणि अगदी मध्येच एवढं चांगलं नसतं दिसलं.... Happy

  आयटे फोटो सुरेख आलाय, बोगनवेलाचं फुल जवळून खूपदा पाहीलंय पण
  तुझ्या फोटोइतकं सुंदर ते कधीच जाणवलं नाही. Happy

  पुछाअशु!

  धन्यवाद दक्षिणा Happy
  जरासं वेगळ्या पद्धतीनें केलेलं ब्लॉगवर टाकलं इथे.

  खुप सही आला आहे फोटो Happy

  आयटे, फोटो खरंच छान आलाय.

  आता बॉटनीत शिकलेल्या 'स्पेशल फ्लोरल मॉर्फॉलॉजीला' स्मरून....
  बोगनवेलीचं फूल बराच काळ 'मॉर्फोलॉजिकल पझल' होतं. रंगीत 'पाकळ्या' ह्या फुलाचा भाग नसून मॉडिफाईड पानं आहेत. त्यांना 'ब्रॅक्ट' (bract) म्हणतात. बर्‍याच फुलांचा देठ हा अश्या ब्रॅक्ट्मधून निघतो. (ती फुलं 'ब्रॅक्टेट' असतात.) एरवी (साधारणतः) ब्रॅक्ट हिरवा आणि पानांच्या तुलनेत फारच छोटा असतो. पण त्याचं काही खास कारणासाठी रुपांतर होऊ शकतं. बोगनवेलीतला ब्रॅक्ट फोलिएशिअस म्हणजे पानासारखा नसून 'पेटलॉइड' किंवा पाकळीसारखा आहे. परागीकरणासाठी कीटकांना आकर्षित करायला कामी येत असावा. (तेव्हडं नक्की आठवत नाही.)

  मृ,
  छान माहीती दिलीस. अजून एक छोटं रोप असतं त्याचं नाव नाही माहीती पण त्याची पानं लाल होतात, तो प्रकार काय?

  छान्....ते बोगनवेलीचे फुल एवढे सुंदर आधी नाही वाटले कधी..आणि ते आतले पांढरे फुल तर निट पाहीलेच नव्हते !
  मझ्यामते लोकांना जे ऊघड्या डोळ्यांनी निट दिसत नाही...ते दाखवुन द्यायची कला म्हनजे फोटोग्राफी !
  ती जमलिये Happy

  प्रीती, मृ, प्रकाश धन्यवाद.
  दक्षिणा, तू क्रोटन म्हणतेस का?

  Pages