एअर फ्रायर

Submitted by मी अमि on 29 October, 2015 - 06:27

कुणी air fryer वापरतं का? कितपत उपयोगी आहे. पदर्थाला तेल लावून त्यात ठेवतात का?

स्वच्छ करण्यास कटकटीचे आहे का?

रॉबीनहूड | 29 October, 2015 - 06:43
इथे अयर फ्रायरचे सर्व डेमो आहेत आणि तुलनाही..

https://www.youtube.com/results?search_query=air+fryer+demo+

नंदन | 29 October, 2015 - 06:45
हा दुवा उपयोगी पडावा: http://www.misalpav.com/node/33408

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण एअर फ्रायर बघतोय, जाहिरातीवरुन तर असं वाटतय की हलकसं का होईना पण तेल लावून ठेवावं लागत असणार. जर कुठे डेमो बघायला मिळाला तर बरं होईल.

काही कळालं तर लिहतोच या धाग्यावर.

उशा हॅलोजेन अवन असा सर्च मारा यूट्यूब वर. ते जास्त छान्न आहे. व विकास खन्ना प्रमोट करतो सध्या . काही उशाचे प्रो डक्ट घेतले तर त्याला भेटता येइल अशी काही स्कीम आहे.

हॅलोजेन अवन मध्ये पण एअर फ्रायर ऑपरेशन अवेलेबल आहे. एकूण फार मस्त प्रकार आहे.
काचेचे मोठे भांडे आहे. व झाकणा त हॅलोजेन दिवा आहे.सोनेरी ग्लो येतो. मी त्यात फक्त एक चिकन बनवले एकदा व एकदा पास्ता. वेळच होत नाही. डेमो जरूर बघ

थोडं तेल लावावं लागतं. त्या फिलीप्स च्या जाहिरातीत मोठ्या तेलाच्या डब्याऐवजी अगदी छोटी तेलाची बाटली लागते असं दाखवतात.

मी एका देशी कंपनीचं एअर फ्रायर वापरतो. त्यात ओले पदार्थ ठेवता येत नाहीत. पापड, कुरडया, वेफर्स किंवा तत्सम पदार्थ उत्तम होतात. अजिबात तेल लावावं लागत नाही.

२ वर्ष वापरला फिलिप्सचा एअर फ्रायर. तेल लावून ठेवण्याऐवजी स्प्रे येतो तो उत्तम. ऑइल स्प्रे मध्ये आपण वापरतो तेच तेल घालून थोडेसे स्प्रे करून घ्यावे.

अमा हॅलोजन अव्हन पाहिला होता पुर्वी. पण आकाराने मोठा वाटला होता. या अव्हन साठी मायक्रोवेव्ह अव्हन प्रमाणे वेगळी भांडी घ्यावी लागतात का?

स्वच्छ करायला त्रासदायक नाही ना?

देशी कंपन्यांचे फ्रायर बरेच स्वस्तही आहेत.

उषाचा हॅलोजन मीही पाहिलेला, खुप आवडलेला. पण त्याच किंमतीत उषापेक्षा जास्त क्षमतेचा ओटीजी घेता येतो. दोघेही तेच काम करतात. फरक निश्चीतच आहे पण फार थोडा. जागा खुप कमी आहे उषात.

रायगड, ओवन मध्ये पदार्थ भाजले जातात. फ्रायरमध्ये ते तळल्यासारखा फिल येतो. दोघांत फरक नक्कीच आहे. आपण जर बाहेरुन पदार्थ आणुन, जसे चिकन नगेट्स वगैरे, ओवन मध्ये भाजले तर फरक पडत नाही कारण नगेट्सम्ध्ये आधीच भरपुर तेल असते. मी नगेट्स तळत नाही तर ओवनमध्ये भाजुन देते खायला. पण समोसे घरी केले आणि ओवनमध्ये भाजले तर तळल्याची चव येत नाही. फ्रायरमध्ये तेल लावुन समोसे ठेवले तर ती चव ब-यापैकी येते. अर्थात मी फक्त डेमो पाहिलाय. एवढे तळणे होत नाही म्हणुन घ्यायचा विचार केला नाही.

पण आकाराने मोठा वाटला होता.>>हॅलोजन अवन खरेच आकाराने फार मोठा आहे. म्हनजे विकत घेतल्यावर मला खोके स्कूटरवर घरी आणता आले नाही. व रिक्षा भाडे द्यावे लागले दुकानातल्या स्टाफला. काचेचे भांडे घमेले टाइप आहे.
पण मग वन्स यू गेट इट होम ते वापरायला फारच सोपे आहे. ओट्यावर ठेवले तर बरीच जागा व्यापते.
घनक्षेत्र. व वर ठेवले तर मला एकटीला ते उचलून खाली काढता येत नाही. मी काही रोज बेकिंग करत नाही त्यामुळे फार वापर नाही.

तथापि, मोझरेला चीजचे मेल्ट होणे, पास्ता सॉस बबल होणे वगैरे फार मस्त होते. चवीत फरक पडतोच. रेसीपी मूळ बिल ऑफ मटेरिअल व राउटिंग नुसार होते.

मुलगी इंटरनेट वर बघून रेसीपी बनवते. तिला जुगाड मेंटालिटी आव्डत नाही. म्हणजे रेसीपी त
बेकिन्ग लिहीले असेल तर बेकिंगच करणार. तव्या वर झाकण ठेवून किंवा मावेत करणार नाही.

बाल+स्र्री हट्ट!!! म्हणून तेव्हा ती खरेदी झाली.

वेगळी भांडी नाही लागत. काचेची बेक वेअर चालतात.

एयर फ्रायर घ्यायचा विचार चालू आहे. उपयोगी चीज दिसते आहे.
संजीव तुम्मा ( वा रे वा डॉट कॉम )या शेफने यू ट्यूबच्या स्पॉन्सर्ड चॅनेल्वरून याच्या रेसिपीज दिल्या आहेत त्या उपयोगी असून त्याच्या वर्किन्ग वर प्रकाश टाकणार्‍या आहेत
चिकन
https://www.youtube.com/watch?v=DosjRtIxuEg
वेज समोसे
https://www.youtube.com/watch?v=OWkzaLWtAhw
एका टीस्पून तेलात आख्खा पदार्थ म्हणजे विलक्षणच वाटतेय

मते नोंदवावीत , अनुभव लिहावेत.

फिलिप्स आणि इतर - खास करून देशी कंपन्या , किमतीत बराच फरक आहे. कोणता चांगला हे अनुभवी लोकांनी सांगितले तर बरे.

http://www.misalpav.com/node/33408 वाचल्यापासून मलाही एअर फ्रायर घ्यायचा मोह होतोय. लेखिकेने गुलाबजाम आनि मेदूवडे केले त्याचे अनुभवही वेगळ्या धाग्यात दिलेत.

मला पण एयर फ्रायर इंटरेस्टिंग वाटतोय. परवा बेड, बाथच्या कॅटलॉगमध्ये बघितला. फिलिप्सचा आहे. काम कसं करतो, जागा किती लागेल याचा काहीच अंदाज नाही पण.

जागा नाही जास्त लागत . कळशी एवढी पुरेशी आहे. वरची यू ट्यूबची लिंक पाहिल्यावर जागेचा अंदाज येऊ शकतो....

फिलिप्सचा एअरफ्रायर घेऊन - १. तो लगेच बिघडला, २. पदार्थ करायला फार वेळ लागतो कारण एका वेळी दोन-तीन नगच करता येतात, अशा दोन तक्रारी पाचसहाजणांकडून ऐकल्या आहेत.
माझ्याकडच्या देशी एअरफ्रायरमध्ये साबूदाणा वडा करता येत नाही, पण पापडपापड्याफ्रायम्सकुरडया असलं उत्तम होतं. किंमतही अगदी कमी.

माझ्याकडच्या देशी एअरफ्रायरमध्ये>>> ब्रँड सांग की. पापड वगिअरे मायक्रोवेवमध्ये ठेवल्यासारखेच होतात की वेगळी चव येते?
मुख्य तळण हे पापड आणि भज्यांचंच असतंय, ते जर एअर फ्रायरमध्ये जमत असेल तर घेण्याचा विचार अक्रता येईल.

माझ्याकडचा ब्रेण्ड स्नॅक-मेकर आहे. हे म्हणजे फिनॉल नाव असलेल्या कंपाऊंडसारखं झालं. Proud
http://www.tradeindia.com/fp820707/Popcorn-Or-Snack-Maker.html अशासारखं दिसतं. किंमत रुपये १२००. मी यात कबाब, फ्रेंच फ्राईज इत्यादी पदार्थ केले आहेत. चव उत्तम राहते.

मी एका देशी कंपनीचं एअर फ्रायर वापरतो. त्यात ओले पदार्थ ठेवता येत नाहीत

>>
वर वाह शेफच्या यू ट्यूब देमोमध्ये मॅरिनेटेड चिकन, फिश्,समोसे असे ओलसर पदार्थ केलेले दिसतात. अगदी लिक्विड पदार्थ म्हण्जे ग्रेव्ही , आमट्या बनवता येत नसाव्यात. म्हणजे ज्याला हलावावे , ढवळावे लागते अशा पदार्थाला उपयोगी नाही. पण ओव्हनमध्येही असेच असते ना? मला घ्यायचा आहे पण मायक्रोवेव्ह आणि फ्रायर याच्या फायद्यातला फरक मला अंतःपुरात कन्व्हिन्स करता येत नाहीये. त्यामुळे गनीमांचा विरोध आहे.प्लीज हेल्प मी Happy बहुधा कोरडेच पदार्थ खावे लागतील का?

हे स्नॅक मेकर माझ्याकडे सुद्धा आहे. चिनूक्स तू त्यात कबाब फ्रेंच फ्रायज कसे केलेस. सविस्तर सांगू शकशील का? कबाब आणि फ्रेंच फ्राय्ज केल्यावर त्याची स्वच्छता कशी करता येते हेही सांग.

वेल,
मी रेडी टू कूक कबाब आणि फ्रेंच फ्राईज आणले होते. ते ओले, म्हणजे त्यातून काही ओघळेल, असं काही नव्हतं.
माझा स्नॅक मेकर पाण्याने धुता येत नाही. मी तो टिश्यू पेपरनं स्वच्छ करतो.

हुडा,

तुम्हांला समोसे वगैरे त्यात करता येतील असं वाटत नाही. आकार फारसा मोठा नसल्यानं अगदी ओल्यासुक्याचा प्रश्न आला नाही तरी एकावेळी एक समोसा होईल. फिलिप्सच्या एअर फ्रायरमध्येसुद्धा एकावेळी जास्त नग करता येत नाहीत.

बटाटे वडे किंवा भजी यात करता येणार नाहीत. त्यांचे कव्हर वाहते असते. गरम तेलाने ते बद्ध होते आणि त्याचा आकार कायम राहतो. एअर फ्रायर मधे ते शक्य नाही. कव्हर कोरडे केले ( म्हणजे कचोरी सारखे ) तर करता येईल. यात करायचा पदार्थ आपला आकार राखणारा असावा. किंवा केकसारखा मोल्ड वापरलेला असावा.

Robin hood,
I was talking about the snack maker I have, not the air fryer.

Pages