एअर फ्रायर

Submitted by मी अमि on 29 October, 2015 - 06:27

कुणी air fryer वापरतं का? कितपत उपयोगी आहे. पदर्थाला तेल लावून त्यात ठेवतात का?

स्वच्छ करण्यास कटकटीचे आहे का?

रॉबीनहूड | 29 October, 2015 - 06:43
इथे अयर फ्रायरचे सर्व डेमो आहेत आणि तुलनाही..

https://www.youtube.com/results?search_query=air+fryer+demo+

नंदन | 29 October, 2015 - 06:45
हा दुवा उपयोगी पडावा: http://www.misalpav.com/node/33408

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिलिप्सच्या एअर फ्रायरमध्येसुद्धा एकावेळी जास्त नग करता येत नाहीत.
>>
फिलिप्स अयर फ्रा. मध्ये माशांचे स्लाईस समोसे, चीज पकोडे याम्चे एकापेक्षा अनेक नग ठेवलेले दिसतात.

हं, ब.व. होणार नाहीत ही शंका होतीच, पण कदाचित खेकडा भजी करता येतील, कारण ती तेवढी ओली नसतात. मेदूवडे कसे केले असतील?

मिपावर वाचलं आत्ता, डोनट मोल्डमधे मेदूवड्याचं पीठ ओतून ए. फ्रा. मधे मे.व करता येतात. मग तसे मफिन ट्रेमधे ब.व. पण होतील!

एअर फ्रायर वापरलाय, खालील पदार्थांसाठी

मॅकिन्सचे - फ्रेंच फ्राईज, नगेट्स, आलू टिक्की, व्हेज फिंगर्स इ.

चिज चिली टोस्ट
ग्रील्ड सॅंडविच
गराडू (कंदाचे काप)
पिझ्झा
सर्व प्रकारचे काप (बटाटा, कंद, सुरण)
कटलेट्स
टिक्की
चिज बाॅल
समोसे
शेव
चकल्या

करंज्या
केक, मफिन्स
गुलाबजाम

सांडग्या मिरच्या तळणे
चिवड्यासाठी दाणे तळणे
दाणे भाजणे

उत्तम रिझल्ट
मला आवडला ... एअर फ्रायर एकदम हीट आमच्याकडे.

फायदे

तळण प्रचंड कमी तेलात होते
वेळ कमी लागतो
बाहेरचे तळकट शेव चकलीसारखे पदार्थ घरच्या घरी कमी तेलात केले जातात

तोटे
पुरया होत नाहीत
बटाटा भजी होत नाहीत
चिली टोस्टसारखे पदार्थ एकावेळेस दोनच होतात

या पदार्थांची चव तळल्यासारखी नसते. तशी चव, न तळता, कोणतंही उपकरण देऊ शकणार नाही, हे माझं मत. पण जी चव येते ती मला आवडली.

रॉबीनहूड,

आता नविन मा.वे. येतात उदा. Samsung MC28H5015VB, ज्यात "स्लिम-फ्राय" फंक्शन आहे. It uses upto 80% less oil as in air-frier.

यात तुम्ही बरेच पदार्थ, जसे कि fries, wedges, nudgets, आलु-टिक्की, etc करता येतात. या ओव्हन मधे Microwave, grill and Convection असे तीन मोड्स आहेत.

---
कानडा

डब्बा बिर्याणी प्रकार आवडला नाही , पटला नाही

मूळ भात जर दुसरीकडे शिजवून घ्यायचा आहे , तर उरलेली प्रोसेसही त्यावरच होईल की

सगळे घालून म्हणजे खिचडीसारखे , आधीच तांदळात घालून पाणी घालून ठेवले तर बिर्याणी होईल का ??

फ्रोजन पदार्थ आयत्यावेळी गरम करुन घ्यायला एअर फ्रायर बेस्ट आहे. मावे मध्ये पदार्थ आतुन गरम होतो त्यात तो अंतर्बाह्य ड्राय होऊन जातो. आवन गरम करे पर्यंत भूक धरवत नाही. तव्यावर पदार्थ सपाट नसेल तर गरम करता येत नाही. आणि तो ग्रॅज्युअल गरम होतो. सगळ्या बाजूनी एकाच वेळी भाजल्याचा जो इफेक्ट/ फ्लेवर असतो तो मिळत नाही. शिवाय उलटत बसायला लागतं. ए.फ्रा. मध्ये एका वेळी दोन माणसांना एका सर्विंगला पुरतील इतके पदार्थ होतात. फ्रोजन साबुदाणा वडे, पालक भजी, मटार करंजी, चिकन विंग्ज, पंजाबी समोसे, मसाला डोसा, उत्तप्पा, हॅलपिनो पॉपर्स, फ्राईज, बर्गर पॅटी असं सगळं छान गरम होतं. फ्रोजन नान गरम करुन बघितली पाहिजे. कच्चे मेथीचे पराठे गरम करायला गेलो तर तो प्रयत्न अगदीच फसला.

https://www.maayboli.com/node/75347 ह्या धाग्यावर कालच मी एअर फ्राय केलेल्या कचोरीचे फोटो टाकले आहेत. एकदम खुसखुशीत होतात.
मला पण खुप उपयोगी वाटतो एअर फ्रायर. तळणीचे खूप तेल वाचते.

माझ्याकडे वोर्टॅक्स चा आहे. मोस्टली फ्रोजन पदार्थातले चिकन नगेट्स, फ्रोजन फ्राईज,कोथिंबीर वडी, आळू वडी यात चांगले होतात.
बाकी ताज्यामधे कटलेट्स, ग्रिल्ड वेज /पनीर , साबुदाणा वडा (माझ्यामते चिवट होतो, लगेच खाल्ला तरी ) यासाठी उपयोग करते. एकदा भजीचा प्रयोग केला. पिठ अगदी ओलसर नव्हते केले. बेसन अल्मोस्ट कांद्याला चिकटून राहिल इतपतच. चांगली झाली होती. पण तळण्याची ती शेवटी चव नाहीच येत. बहुतेक बिर्याणीसाठीचा कांदा यात मस्त होईल.

येस भगवतीची मिळतात. कालच उडपीचे फ्रोजन मेदूवडे आणले आहेत ते पण एफ्रा करून पाहिन कसे लागतात. वाईट कशाला लागतील म्हणा Wink

साबुदाणा वडा (माझ्यामते चिवट होतो, लगेच खाल्ला तरी ) >> वेगळा साबुदाणा वापरुन बघा.
माझ्या कडे क्युझिनचा आर्ट ए फ्रा आहे. साबुदाणा वडा तर तळल्यापेक्षा जास्त चांगला होतो असं घरातल्यांच आणि काही मित्रमंडळाच मत आहे.
आमच्या कडे तरी आता सा वडा तळून कोणी मागणार नाही. खाली ए फ्रा मधल्या सा. वड्याचा फोटो देते.

साबुदाणा कोणत्या ब्रॅन्डचा आहे त्यावर चिवट होईल का नाही ठरत असावं आमच्या इथे देवी ब्रॅन्डचा साबुदाण्याचं काहीही बनवलं तरी असच चिकट किंवा चिवट होत.. कधीही चांगल बनत नाही.

1DF39E16-86A1-4D71-B3DC-99891151CFAC.jpeg

अमितव, एवढं फ्रोझन खाता? जहाजावर असल्या सारखं.

साबुदाणा वडा तर तळल्यापेक्षा जास्त चांगला होतो असं घरातल्यांच आणि काही मित्रमंडळाच मत आहे. >> जे ब्बात.

धन्यवाद अन्जुताई, मानव
अंजली, लक्ष्मी किंवा उपास ब्रॅन्ड. फोटोतले वडे उपास ब्रँड साबुदाण्याचे आहेत.

मला आवडला ... एअर फ्रायर एकदम हीट आमच्याकडे. >>> मिनू ब्रँड कोणता आहे?

साबुदाणा वडा तो ही न तळलेला इतका छान होऊ शकतो हे वाचूनच एअर फ्रायर घ्यावासा वाटतोय, कोणता ब्रँड घ्यावा? ऍमेझॉन वर ४००० पासून २४००० पर्यंत आहेत पण कोणता घ्यावा? ध्याग्यावर ज्यांच्याकडे फ्रायर आहे त्यांनी प्लीज आपले अनुभव शेअर करा .

एअर फ्रायर मधे भुईमूगाच्या शेंगा भाजता येतात का..? >> यायला हव्यात. तुम्हालाच प्रयोग करुन बघावे लागतील तुमच्या एफ्रा नुसार.
मी ३५० फॅ वर ६-७ मि पहिल्यांदा लाउन बघितल्या असत्या.
दाणे ३५० वर ४-४ मि लाउन चांगले भाजून होतात.

साबुदाणे चांगले फुलतात एफ्रा मध्ये,........

Avantarababt सॉरी.पण मावेमध्येही डिंक फुलवून पहिला आहे.मस्त फुलतो.साबुदाणे ट्राय नाही केले.१चमचा tupachi सा.खिचडी मावेत मस्त होते.
एअर फ्रायर मध्ये चव तळल्यासारखी लागते का?

Pages