'द मार्शिअन' च्या निमित्ताने - सिनेमा आणि विज्ञान

Submitted by हायझेनबर्ग on 16 October, 2015 - 14:27

रिडली स्कॉट आणि ख्रिस नोलन, अँडी विअर आणि किप थॉर्न ह्यांचा कामांच्या तुलनात्मक अभ्यासाबद्दल अगदी वर वर जरी माहिती असेल तरी द मार्शिअन आणि इंटरस्टेलार ह्या सायफाय सिनेमांमधून दर्दी रसिकांना नेमकी किती खोलीची अनुभूती मिळणार आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर कुठलं नाणं खणखणीत वाजणार आहे हे सांगता येणं फार अवघड जाऊ नये.
स्कॉट आणि नोलन ह्यांच्या कामाची शक्य असली तरी वीअर आणि थॉर्न ह्यांच्या कामाची तुलना करण्याचा हा प्रयत्न नाही आणि तशी ती शक्य ही नाही कारण एक यशस्वी कथा/कादंबरीकार आणि दुसरा गाढा शास्त्रज्ञ, पण तरी सगळ्यांना जोडणारा एक समान धागा म्हणजे त्यांनी आपली पॅशन, व्यासंग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनातल्या खगोल+विज्ञाना बद्दलचा सुप्त जिव्हाळा सिनेमाचे हवन देवून जागृत केला त्या जिव्हाळ्याला आपण कॅमेराच्या रंगीबेरंगी चौकटीतून बाहेर काढून विज्ञानाच्या कसोटीवर नियमांचे घण घालून ज्ञानाच्या कोंदणात जडवणे. (फारंच अलंकारिक भाषा झाली का, हरकत नाही, अ‍ॅडमिनने मायबोलीवर नवा 'विज्ञान' विभाग काढून दिला आहे त्यातला पहिलाच लेख म्हणून थोडी लिटररी लिबर्टी घेऊनच टाकतो Proud )

तर ह्या धाग्यातून सिरियस सायफाय म्हणून गणल्या गेलेल्या सिनेमांमधल्या त्या गोष्टी ज्या वैज्ञानिक कसोट्यांवर नापास होतात त्यांचा ऊहापोह आणि त्याबद्दलची चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो सिनेमा, प्रदर्शित झाल्याचे वर्ष, त्यातला स्पेसिफिक सीन, संबंधित वैज्ञानिक नियम वा सिद्धांत वा फॅक्ट, जमल्यास त्याबद्दलची प्रकाशित माहिती असे नमूद केल्यास एक चांगला संचय होऊ शकतो. सिनेमांमधल्या काही अनाकलनीय वा समजावयास कटीण गोष्टींमागचे विज्ञान सांगायचे असल्यास त्याचेही स्वागतच आहे.

माझ्यापासूनच सुरूवात करतो,
ऊदाहरणार्थ
२०१५ च्या 'द मार्शिअन' मधले पहिल्या सीन मधले विंड स्टॉर्म, मंगळावरच्या वातावरणाची घनता आणि त्याचा दाब पृथ्वीवरच्या वातावरणाच्या मानाने नगण्य आहे, म्हणजे पृथ्वीवर ५०० किमी प्रतितास वाहणारे वारे (सँडी वादळामध्ये वार्‍याचा कमाल वेग १७० किमी/तास होता) मंगळावर अतिशय सौम्य हवेची झुळूक असण्याईतपतच जाणवतील न जाणवतील. त्यामुळे मार्क वाटनी आणि त्याच्या क्रूला ज्या वादळाचा तडाखा बसला तो प्रसंग खरंच घडून येणं वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे.

अजूनही काही प्रसंगांबद्दल लिहिणाअर आहे पण सायफायच्या चाहत्यांकडून ह्यात अजून भर पडेल अशी अपेक्षा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Science fiction is better off emphasizing role of science ingrained into the fabric of our society rather than just using science as a tool for some cool effects. Cool things are also necessary to an extent in order to inspire, but at the same time it should show science as something more than a gadget according to me. Agree with Heizenberg on that. (Sorry for writing in English, maabo doesn't work on phone for some reason.)

भास्कराचार्य, अगदी बरोबर.
सायफाय म्हणजे अंगावर येणारे स्पेशल इफेक्ट्स असे निर्माता दिग्दर्शक आणि प्रेक्षक, दोघांनाही वाटते.

हायझेनबर्ग.. ते तंत्र अजून काही वर्षात खुप रुळेल, असे वाटतेय का ? त्यानंतर ड्रायव्हींग पण नव्याने शिकावे लागेल, बहुतेकांना.

द मार्शन पाहिला.
सुंदर आहे पण ढोबळ चुका खुप वाटल्या.

इतका संयतपणे विज्ञानाला धरून राहिलेला चित्रपट पण शेवटी हाताला भोक पाडून आयर्न मॅनपणा का केला हे कळले नाही.
हेच करायचे तर मार्क एक साधी उडी मारून पण करू शकला असता ना. हलकासा जोर आणि तो मातृयानाकडे सहजतेने गेला असता. स्पेस सुटला भोक पाडायची काय गरज होती हे कळलेच नाही. ते किती डेंजरस आणि कोणताही ताबा न ठेवता येणारे.
तद्दन हॉलिवुडपणा - पण त्याक्षणी चित्रपट गृहात तो सिन भारी वाटला होता.

इतक्या मोठ्या ग्रहावर त्याला इतके पिटुकले जुने यान कसे काय सापडते? ते पण जिपिएस सारखी कोणतीही साधने हाताशी नसताना.
(बरे ठिक सापडले असेल बुवा... पण त्याची उतरण्यासाठी वापरलेली हवाई छत्रीही त्याला तशीच लावलेली?
कसे शक्य आहे? वादळात यान त्या छत्रीमागे भेकांडत नाही का जाणार उडून परत? त्यांनीच वादळ दाखवले आहे म्हणून हा प्रश्न)

इतक्या मोठ्या मिशनवर संपर्काची एकच यंत्रणा असते? काहीच बॅकअप कम्युनिकेशन सिस्टिम न देता असे मिशन प्लान केले जाईल? Mars Reconnaissance Orbiter तोवर कामातून गेलेले असेल का? आणि तसे असेल तर त्याची जागा दुसरे काही घेईल ना. खरे तर असतेच, त्यामुळेच तर ह्युस्टनची ती सुंदर मुलगी त्याच्या हालचाली पाहात असते ना? कम्युनिकेशन इतका क्रिटिकल फॅक्ट्र इतका ढोबळपणे सोडून दिला जाईल का?

यानाला ताडपत्री वगैरे वापरणे बाष्कळ वाटले. ओएच अँड एस इश्यु इतके सहजतेने पार केले असतील असे वाटत नाही.
अंतराळात मार्कचे कन्व्हर्टिबल यान पोहोचल्यावर शेकडो स्क्रू त्याच्या अवतीभवती फिरताना दिसतात.
वजनाचा इतका मोठा प्रश्न असताना इतके किलो दोन किलो स्क्रू कुणी अंतराळयानात मोकळे टाकून देईल का?
त्यातला एखादा आदळला हेल्मेटच्या काचेवर मग?
काय झेपला नाही तो सिन.

स्पेस वॉक -
माझ्या अंदाजाने कोणताही स्पेस वॉक हा पुर्णपणे योजनाबद्ध असतो.
अचानक टिम लिडला सुचले म्हणून स्टेशनवर घ्यायला गेल्या सारखा नसतो.
इथे कॅप्टन अचानक उठते आणि रिक्षा करून जावे तशी मार्क ला घ्यायला गेल्यासारखी जाते.

फक्त बटाटे खाऊन आणि आहार अगदी कमी करूनही मार्क आपले तब्येत अगदी म्हणजे अगदीच उत्तम राखतो बरंका!
ते बटाटे नक्की सुपर प्रोटिन्स फुड वाले असणार! Happy त्याचे महिनोंमहिने 'पॉझिटिव्ह' असणे ह्युमन वाटत नाही. इतके ऑडस असल्यावर काहीच डिप्रेस होणार नाही का अंतराळवीर? पण असेल बुवा माणूस असाही म्हणून सोडले.
मंगळावर त्याला त्याच्या लॅपटॉपला लॉग इन आणि पासवर्ड टाकावा लागतो. खरोखर? मंगळावर असे प्रोजेक्ट असेल तर लॉग इन आणि पासवर्ड? आणि सहकार्‍याच्या पर्सनल लॅपटॉपवर मात्र सोईस्कर रित्या लॉग इन आणि पासवर्ड लागत नाही. Happy
गाणी फक्त कॅप्टनच ऐकते? बाकी कुणीच गाणी आणत नाही? तत्कालिक विनोदासाठी ठिक पण झेपत नाही.

असले प्रकार केल्याने इतका सुंदर चित्रित झालेला चित्रपट शेवटाला वाट लावून गेला असे वाटले.
या पेक्षा ग्रॅव्हिटी हा चित्रपट त्यामानाने कमी चुका असलेला होता.

वरील पैकी माझे काही चुकीचे असेल तर प्लिज करेक्ट मी!
असो
बाकी चित्रपट खुप छान आहे नक्की पाहावा असा. बहुतेक गोष्टी मार्कच्या तोंडून मस्त विषद केल्या आहेत.

चित्रपट सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काढला होता की पी एच डी थिसिस म्हणून सबमिट केला होता?

माझी करमणूक झाली. माझ्याजवळ तशी बरीच पुस्तके आहेत, मला ज्ञान हवे असल्यास मी ती पुस्तके वाचतो, सिनेमाला जात नाही.

बाकी हा चित्रपट बघून बर्‍याच जणांची करमणूक झाली असणार, कारण बर्‍यापैकी गल्ला जमला म्हणे. पी एच डी नाही मिळाली तरी चालेल. ती घेऊन काही इतके पैसे मिळत नाहीत. आता तुम्ही काढा वाटेल तेव्हढ्या चुका.

जसे पी एच डी वाले लोक पैशासाठी पी एच डी करत नाहीत, करेस्तवर फारसे पैसे कमवत नाहीत,( सिनेमाच्या मानाने, (असा आपला माझा समज आहे)) अशी टीका त्यांच्यावरहि करता येईल.

पण या टीकेमुळे बर्‍याच जणांना माहित नसलेल्या गोष्टी कळल्या असतील हाहि फायदा आहेच.

मायबोली झिंदाबाद, टीका केली तरी वाचनीय असते.

हायझेनबर्ग, धन्यवाद.

आपण एकटे राहिलोय हे मार्कला कळल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया एका सामान्य माणसा सारखी असेल असे वाटलेले, पण तो असामान्य निघाला. ४ वर्षे तगुन राहण्याची मानसिक तयारी केली तरी माणुस कुठेतरी कधीतरी एकटेपणामुळे ढेपाळेल असे वाटलेले पण तसे कुठेही दाखवले नाही.

चित्रपट सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काढला होता की पी एच डी थिसिस म्हणून सबमिट केला होता? >> +१
डिस्कवरी, अ‍ॅनीमल प्लॅनेट यांच्या डॉक्युमेंटरीजही या पेक्षा जास्त करमणुक करतात.
मला या चित्रपटाशी रिलेटच नाही करता आले. त्यांचे स्वतःचेच आत्ममग्न असल्यासारखे काही चालु होते.

मध्यंतरानंतर जसजसा शेवट जवळ येत चालला तले सगळे पैसे वाया गेले ही भावना बळावत गेली.

ते चायनीज लोकं नक्की काय तंत्रज्ञान देतात नासाला ते कळलेच नाही?
कोणत्याही देशातल्या शास्र शाखेत काम करणा-या लोकांना दुभाषा लागेल एवढे ईंग्रजीचे अज्ञान कसे अशु शकते?

या पेक्षा आपल्या युवराजांकडुन एस्केप वेलोसिटीचे गणित समजुन घेतले असते तरी जास्त मनोरंजन झाले असते!

हा बीबी वाचल्यानंतर मी ग्रॅव्हीटी परत एकदा बघितला.

पहिल्यांदा बघितला होता तेव्हा चित्रीकरणाचे गारुड झाले होते. ते खासच आहे. अगदी तिच्या डोळ्यातील प्रतिमाही बघण्यासारख्या आहेत.

पण अंतराळवीर म्हणून मला ती कमकुवत मनाची वाटली. ( एवढ्या तेवढ्या आपटण्याला विव्हळत होती. Happy )
प्रशिक्षणाच्या दरम्यान एका कामात आपण कायम अयशस्वी झालो होतो असे ती सांगते, मग अश्या व्यक्तीची अंतराळवीर म्हणून निवड होऊ शकेल का ?

चायनीज स्पेस स्टेशनवर जायला ती एक अग्निशामक वापरते. तेवढ्याने तिला योग्य दिशा आणि योग्य तितकाच पुश मिळू शकेल का ?

शेवटी ज्यावेळी ती समुद्रात उतरते, त्या वेळचे जळते गोळे सोडा पण तिचे पॅराशूटही कुठल्याही मिलिट्रिला दिसत नाही ? त्याचा पाठलाग किंवा शोध घेत कुणीच कसे येत नाही ?

अर्थात या माझ्या शंका आहेत. इथे नीट उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.

दिनेश अग्निशामक दिशा देईल असे वाटते. पण ते योग्य दिशा देईल का हा प्रश्न आहेच. पुशचा प्रश्न नाही कारण अवकाशात हलकासा पुशपण गती द्यायला पुरेसा ठरेल.

शेवटचे प्रश्न तसे मलाही अनुत्तरीत सोडलेले वाटले. मुळात रेडियो संभाषण सगळे उपग्रह नष्ट झाल्याने थांबलेले असते ते सुरु कसे होते? ती नक्की कुठे उतरते? चीनी अवकाशस्थानकातून खाली येते म्हणजे चीन मध्ये उतरली असावी. चीन मध्ये उतरली असेल तर मग अमेरिकन आवाज कसा येतो रेडियोवर?
असे प्रश्न येतात.
परंतु चित्रपटात कथेला वेग इतका जबरदस्त आहे की त्या क्षणी हे प्रश्न येतच नाहीत.
या चित्रपटात आपल्याला विचार करायला वेळच मिळत नाही!

त्यातही मला वाटते की चित्रपट काहीसा स्पिरिच्युअल लेव्हलला आहे. त्यात मानवी आयुष्य या विश्वात किती कमकुवत आधारांवर टिकलेले आहे हे अधोरेखित करायचा प्रयत्न आहे असे मला वाटले. त्यातले काही आधार हे बुद्धाची मुर्ती, गंगेचा उल्लेख, गुराख्याचे नवीन जन्मलेले बाळ आणि त्याचा आवाज या सगळ्यातून ते सूचीत होत गेले आहे. हे आधार भौतिक नाहीत पण जीवन राहणार आहे हे सूचीत करत राहतात. या विचारातून कुणी ना कुणी जगण्याचा आधार मिळवला आहे, हे दिसत राहते.

अंतराळवीर कमकुवत आहे आणि ती परिपुर्ण नाही. त्यामुळेच चित्रपट बहुदा जास्त भिडला होता. कारण ते मानवी आहे आणि तेच द मार्शियन मध्ये (मला) दिसले नाही...

द मार्शन मध्ये पाथ फाईंडर टिम चे वय वाढतच नाही. Happy
ते लोक २०३० मध्ये सुमारे सत्तर वगैरे वर्षांचे असायला हवेत ना?

त्या पाथ फाईंडरला तर खरे हवाई छत्री नव्हतीच ना?
आपण सगळ्यांनी नाही का त्याच्या उतरण्याचा अ‍ॅनिमेटेड व्हिडियो पाहिला होता.
छत्री सुटते, आणि त्या बबल रॅप सारख्या मोठ्या फुग्यांचा त्रिकोन आदळून उसळ्या घेत गडगडत जातो मग त्यांची हवा जाते आणि ढॅणटॅढेन... फाईंडर त्याचे सौर पंखे उघडतो.
Happy

छत्री नव्हतीचे रे तिथे मार्क!

हो निनाद, बुद्ध, गंगा वगैरे उल्लेख मलाही जाणवले. ग्रॅव्हीटीचा ओपनींग शॉट पण सुंदर आहे.
सँण्ड्रा आवडतेच ( कितीतरी वर्षे बघतोय, ती तशीच दिसतेय ) पण मला वाटले, अंतराळवीरांची निवड होताना ते मनानेही किती कणखर आहेत, ते बघितले जात असावे.

चित्रपट बघून बरेच दिवस झाल्याने पुरेशा खात्रीशीरपणे आठवत नाही. पण बहुतेक सांड्रा कुठल्यातरी शास्त्रशाखेतील शास्त्रज्ञ असते. अवकाशातील निर्वात, गुरुत्वाकर्षणरहित वातावरणात त्या विषयाचे संशोधन करण्यासाठी ती स्पेस स्टेशनला आलेली असते. स्पेसवॉक तिच्या जबाबदारीत अंतर्भूत नसतो पण काही बिघाड झाल्याने तिला मदतीसाठी बाहेर यावे लागते. तिचे त्यात पुरेसे प्रशिक्षण झालेले नसते आणि त्या प्रशिक्षणात काही चाचण्यांमध्ये तिला पुरेसे गुण मिळाले नसतात.
काही काळानंतर मानव स्पेस टुरिझम किवा अवकाश वसाहतीचा मार्ग अवलंबेल असे सध्या चित्र आहे. तेव्हा सगळेच मनाने खंबीर असतीलच असे नाही. शिवाय ती खरच खंबीर आहे आणि स्वत:च्या मानसिक शक्तीवरच ती स्वत:चा जीव वाचवते. पण मधल्या काळात मानवी मनाच्या सर्व गुणदोषांचा तिच्यावर परिणाम असणारच ना?
त्याव्यतिरिक्त सांड्राच्या एकुणात मी पाहिलेल्या चित्रपटावरून तिने तसे वागणे मी चित्रपट पाहण्याआधीच गृहीत धरलेले Wink

Pages