'द मार्शिअन' च्या निमित्ताने - सिनेमा आणि विज्ञान

Submitted by हायझेनबर्ग on 16 October, 2015 - 14:27

रिडली स्कॉट आणि ख्रिस नोलन, अँडी विअर आणि किप थॉर्न ह्यांचा कामांच्या तुलनात्मक अभ्यासाबद्दल अगदी वर वर जरी माहिती असेल तरी द मार्शिअन आणि इंटरस्टेलार ह्या सायफाय सिनेमांमधून दर्दी रसिकांना नेमकी किती खोलीची अनुभूती मिळणार आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर कुठलं नाणं खणखणीत वाजणार आहे हे सांगता येणं फार अवघड जाऊ नये.
स्कॉट आणि नोलन ह्यांच्या कामाची शक्य असली तरी वीअर आणि थॉर्न ह्यांच्या कामाची तुलना करण्याचा हा प्रयत्न नाही आणि तशी ती शक्य ही नाही कारण एक यशस्वी कथा/कादंबरीकार आणि दुसरा गाढा शास्त्रज्ञ, पण तरी सगळ्यांना जोडणारा एक समान धागा म्हणजे त्यांनी आपली पॅशन, व्यासंग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनातल्या खगोल+विज्ञाना बद्दलचा सुप्त जिव्हाळा सिनेमाचे हवन देवून जागृत केला त्या जिव्हाळ्याला आपण कॅमेराच्या रंगीबेरंगी चौकटीतून बाहेर काढून विज्ञानाच्या कसोटीवर नियमांचे घण घालून ज्ञानाच्या कोंदणात जडवणे. (फारंच अलंकारिक भाषा झाली का, हरकत नाही, अ‍ॅडमिनने मायबोलीवर नवा 'विज्ञान' विभाग काढून दिला आहे त्यातला पहिलाच लेख म्हणून थोडी लिटररी लिबर्टी घेऊनच टाकतो Proud )

तर ह्या धाग्यातून सिरियस सायफाय म्हणून गणल्या गेलेल्या सिनेमांमधल्या त्या गोष्टी ज्या वैज्ञानिक कसोट्यांवर नापास होतात त्यांचा ऊहापोह आणि त्याबद्दलची चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो सिनेमा, प्रदर्शित झाल्याचे वर्ष, त्यातला स्पेसिफिक सीन, संबंधित वैज्ञानिक नियम वा सिद्धांत वा फॅक्ट, जमल्यास त्याबद्दलची प्रकाशित माहिती असे नमूद केल्यास एक चांगला संचय होऊ शकतो. सिनेमांमधल्या काही अनाकलनीय वा समजावयास कटीण गोष्टींमागचे विज्ञान सांगायचे असल्यास त्याचेही स्वागतच आहे.

माझ्यापासूनच सुरूवात करतो,
ऊदाहरणार्थ
२०१५ च्या 'द मार्शिअन' मधले पहिल्या सीन मधले विंड स्टॉर्म, मंगळावरच्या वातावरणाची घनता आणि त्याचा दाब पृथ्वीवरच्या वातावरणाच्या मानाने नगण्य आहे, म्हणजे पृथ्वीवर ५०० किमी प्रतितास वाहणारे वारे (सँडी वादळामध्ये वार्‍याचा कमाल वेग १७० किमी/तास होता) मंगळावर अतिशय सौम्य हवेची झुळूक असण्याईतपतच जाणवतील न जाणवतील. त्यामुळे मार्क वाटनी आणि त्याच्या क्रूला ज्या वादळाचा तडाखा बसला तो प्रसंग खरंच घडून येणं वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे.

अजूनही काही प्रसंगांबद्दल लिहिणाअर आहे पण सायफायच्या चाहत्यांकडून ह्यात अजून भर पडेल अशी अपेक्षा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आणि खबरदार कोणी रजनीकांत आणि तत्सम भारतीय सिनेमांना हा विज्ञानाचा चष्मा लावून बघण्याचा प्रयत्न केला तर, त्या सिनेमांमधून दाखवलेले सगळे समांतर विश्वाच्या नियमांप्रमाणे चालणे, नियम जे अजून सांप्रत मानवजातीच्या मेंदुच्या आकलनापलिकडे आहेत Lol

हायझेनबर्ग मस्त धागा. इंटरेस्टिंग माहिती दिली आहेत.

केवळ वैज्ञानिक कसोट्यांवर फसलेले प्रसंग लिहिण्यापेक्षा योग्य वैज्ञानिक तत्वांचा चपखल वापर केलेले प्रसंगही लिहिले तर धागा सर्व समावेशक होईल असं वाटतं. त्या निमित्तानं आम्हाला वैज्ञानिक ज्ञान ही मिळेल.

अर्थात धागा तुमचा आहे त्यामुळे आग्रह नाही.

खबरदार कोणी रजनीकांत आणि तत्सम भारतीय सिनेमांना >> खलास! मोठ्या आशेने आलो होतो Happy

जोक्स अपार्ट, मस्त धागा. मामींशी सहमत.

ग्रॅविटी,इटर स्टे लर मध्ये पण अशाच भरपूर चुका आहेत. वेळ काढून लि हिते पण मजा येते साय फाय बघायला. मी फॅन. साय फाय सिनेमांची.

केवळ वैज्ञानिक कसोट्यांवर फसलेले प्रसंग लिहिण्यापेक्षा योग्य वैज्ञानिक तत्वांचा चपखल वापर केलेले प्रसंगही लिहिले तर धागा सर्व समावेशक होईल असं वाटतं. त्या निमित्तानं आम्हाला वैज्ञानिक ज्ञान ही मिळेल. >> हो हो चालेल की.. पळेल सुद्धा! सिनेमाच्या संदर्भाने विज्ञानावर चर्चा झाली म्हणजे झालं.

साधना ते बटाट्याची झाडं मरण्याचा प्रसंग टेक्निकली नीट एक्स्प्लेन केला गेलेला नाहीये हे खरं..
त्याचं कारण असं, मार्स वर वातावरणाचा दाब नसल्याने आणि तापमान सबझीरो थंड असल्याने पाणी लिक्विड फॉर्म मध्ये राहू शकत नाही. मार्कने जे शेत लावलेलं असतं ते प्रेशर कंट्रोल्ड लॅब मध्ये लावलेलं असतं. तुम्ही म्हणाल नुसते प्लास्टिकचे शीट वापरून कसे काय प्रेशर मेंटेन करणार तर त्याचे कारण वरती लिहिले तेच. त्यामुळेच मार्क दरवेळी आतमध्ये आला की 'प्रेशर स्टॅबिलाईझ्ड' ची वॉर्निंग कम अनाऊंसमेंट तुम्ही सिनेमात बर्‍याच वेळा ऐकली असेल.
तर जेव्हा त्याची लॅब प्रेशर डीस्टॅबिलाईझ झाल्याने ऊध्वस्त होते तेव्हा, सबझीरो टेंपरेचर, रेडिएअशन ला एक्सपोज झाल्यामुळे झाडं आणि बटाटे आणि सगळं ऑर्गॅनिक मटिरेअल क्षणात डेड झालं. मार्क केवळ त्याचा सूट घातलेला असल्याने बचावला अन्यथा त्याचे बॉडीली फ्लुईड इंप्लोड होवून तो सुद्धा अतिशय भयानक रित्या स्वर्गवासी झाला असता. सिनेमामध्ये सूट प्रेशर अ‍ॅडजस्ट करतो असं सांगितलं आहे पण हे खरंच शक्य आहे का हे सांगणे अवघड.
अजून एक म्हणजे रेडिएशनचा महत्त्वाचा भाग 'सूट आहे ना' हे कारण देवून दूर्लक्षित केला आहे पण समजा असा एखादा माणूस वर्षभर मार्सवर राहून पृथ्वीवर जिवंत परत आला तरी त्याला किमान शेकडो प्रकारच्या कॅन्सर्सना तोंड द्यावं लागेल.
अजून एक मार्क त्याच्या यानातले हायड्रेझिन फ्युएल काढून त्याला ऑक्सिजनची फोडणी देवून जीव धोक्यात घालून पाणी तयार करतो, पण नासाच्या क्युरिऑसिटी रोवरने नुकतेच सिद्ध केल्याप्रमाणे तुम्ही तिथल्या १ घन मातीतून १ लीटर पाणी अतिशय सोप्या पद्ध्तीने बनवू शकता. पण पुस्तक आणि सिनेमा बनवतेवेळी हा शोध लागला नसल्याने पाणी बनवण्याचा सीन सिनेमात आला आहे.

मार्क शेवटी टार्प ने कव्हर केलेल्या कन्व्हर्टिबल शिप (?) मधून उड्डाण करतो मार्स वरून आणि शेवटचं काही अंतर तर सुट ला भोक पाडून पूर्ण करतो .. त्यातलं ( त्यातलंच काय बरचसं विज्ञान) कळलंच नाही .. पण चांगली करमणूक झाली पिक्चर बघून ..

बाकी कसलं ते माहित नाही पण ज्या रोव्हर मधून मैलोन् मैल प्रवास करतो त्याच्या बॅटरीचं लाईफ सेव्ह करायला ( हिटींग सिस्टीम ला पर्याय म्हणून) प्लुटोनियम आणून ठेवतो त्यात ..

(मी स्पॉयलर्स देत असेन तर कृपया मज अज्ञानी पामरास सांगा .. थांबवते ..)

प्रतिसाद द्यायला वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व.

रेडिएशन ओह...पृथ्वी सोडली रे सोडली की अंतरिक्षात तुम्ही नाना प्रकारच्या रेडिएशनला एक्स्पोज होणारच. गॅलॅक्टिक कॉस्मिक रेज, वेगवेगळे चार्ज्ड आणि सब ऑटोमिक पार्टिकल्स असंख्य गोष्टी. अंतरिक्ष ही अतिशय होस्टाईल जागा आहे. पृथ्वीवरचे वातावरणाचे कवच, ओझोनचा थर आणि सगळ्या मह्त्त्वाचे म्हणजे पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड सदैव अश्या खतरनाक किरणांपासून आपला बचाव करत असतात. त्या मॅग्नेटिक फील्ड (चुंबकीय क्षेत्र) च्या अनुपस्थितीत हायड्रोजन आणि हिलिअम पासून बनलेला आणि सदैव धुमसत असलेला सूर्य प्रकाशाबरोबरच एक्स आणि गामा किरणांचा महाभयानक स्त्रोत आहे. ही किरणे ह्युमन डीएनए कायमचे बदलू शकतात. (हिरोशिमा, नागासाकी आठंवतंय ना Sad )

मार्सचं वातावरण आणि त्याचं अतिशय कमकुवत मॅग्नेटिक फील्ड (पृथ्वीला ऊत्तर दक्षिण ध्रूव आणि त्यांनी डीफाईन केलेलं ग्लोबल मॅग्नेटिक फील्ड आहे, जे पूर्ण पृथ्वीभोवती चादरीसारखं पसरलेलं आहे) त्या घातक किरणांपासून कुठलेही संरक्षण देत नाही म्हणून तिथे रेडिएशनचा प्रचंड धोका आहे.

मार्क शेवटी टार्प ने कव्हर केलेल्या कन्व्हर्टिबल शिप (?) मधून उड्डाण करतो मार्स वरून आणि शेवटचं काही अंतर तर सुट ला भोक पाडून पूर्ण करतो .. त्यातलं ( त्यातलंच काय बरचसं विज्ञान) कळलंच नाही .. पण चांगली करमणूक झाली पिक्चर बघून .. >>> सशल, आपण पृथ्वीवर अतिशय स्पीड ने गाडी चालवली की आपल्याला जोरात हवा लागते, कारण आपण वातावरणाचा जाड थर (हो दिसत नसला तरी) भेदून पुढे जात असतो, आणि हा थर आपल्याला विरोध करतो. समजा आपण गाडीच्या काचा ऊघड्या ठेवून ७० मैलच्या स्पीडने प्रवास केला तर हवा आता घुसून गाडीला ७० च्या स्पीड गाठण्यासाठी विरोध करेल. आत घुसलेली हवा आणि तिचा दाब , गाडीतल्या लूज गोष्टी कागद वगैरे ऊडवून लावेल, पण काचा बंद ठेवल्या तर आत घुसू पाहणार्‍या हवेचा दाब काचेवर पडेल, जो पेलण्यास त्या समर्थ आहेत. पण जर समजा गाडीच्या बाहेर वातावरणाचा थरच नसेल तर काचा ऊघड्या ठेवल्या काय किंवा बंद केल्या काय आत बसलेल्या माणसाला काहीही कळणार नाही. कारण गाडीत घुसण्यासाठीए हवाच नसेल. त्यावेळी तुम्ही काचा बंद असलेली गाडी किंवा कनवर्टिबल चालवली तरी तुमचे केस सुद्धा ऊडणार नाहीत. मार्सवर तसेच आहे. वातावरण आणि त्याचा दाब पृथ्वीच्या मानाने नगण्य. म्ह्णून आकाशाच्या दिशेने ऊडणारे यान बंदिस्त असले किंवा कनवर्टिबल त्याने फरक पडणार नाही. पण यानाचे वजन जास्त असल्यास मंगळाच्या ग्राविटी पासून सुटका करून घेण्यासाठी त्याला जास्त ईंधन खर्च करावे लागेल आणि मार्क वाटनी कडे ते लिमिटेस असल्या कारणाने जर ते मध्येच संपले तर तो त्याला घ्यायला आलेल्या क्रू पर्यंत पोचू शकणार नाही म्हणून त्याच्या यानाचे वजन अनावश्य्क गोष्टी काढून टाकून कमी करणे जरूरी असते. ज्यात त यानाची कंट्रोल मेकॅनिझम आणि पुढचे सुरक्षा कवच काढून टाकतात. एवढ्या स्पीडमध्ये ऊडाल्यानंतर नगण्य का होईना असलेल्या वातावरणाचा दाब आणि हवा रोखण्यासाठी टार्प पुरेसे असते.

शेवटचं काही अंतर तर सुट ला भोक पाडून पूर्ण करतो . >> ती मार्कची शेवटची 'लीप ऑफ फेथ' असते. अंतराळात तरंगतांना आपल्या शरीराला दिशा देण्यासाठी स्पेससूट मध्ये हवा बंदिस्त करून ठेवलेली असते. हवा भरलेला फुगा त्याचं तोंड न बांधता सोडून दिला की जसा पुढे जातो, तीच आयडिया. फक्त ते हवेच प्रेशर रिलिज करणे कंट्रोल्ड असते, पण मार्कचा सूट स्पेसवॉक साठीचा सूट नसतो. जेव्हा मार्कचं यान आणि हर्मीस दोन्ही यानं अजून जवळ येणं अशक्य असतं आणि कमांडर लूईसचा दोर संपलेला असतो तेव्हा स्पेस वॉक करण्याची रिस्क, जगण्यासाठी ऊतावीळ मार्कलाच घेणं जरूरी असतं. ती रिस्क अश्यासाठी की जसा प्रेशर रिलीज केल्यानंतर फुगा कुठल्याही दिशेने ऊडू शकतो तसे सूटला होल पाडल्यानंतर जर मार्क हर्मीसकडे न जाता अंतराळात दुसर्‍याच दिशेला फेकला गेला तर.

पण जर समजा गाडीच्या बाहेर वातावरणाचा थरच नसेल तर काचा ऊघड्या ठेवल्या काय किंवा बंद केल्या काय आत बसलेल्या माणसाला काहीही कळणार नाही. कारण गाडीत घुसण्यासाठीए हवाच नसेल. त्यावेळी तुम्ही काचा बंद असलेली गाडी किंवा कनवर्टिबल चालवली तरी तुमचे केस सुद्धा ऊडणार नाहीत. मार्सवर तसेच आहे. #/// बरोबर , बॉमबे टु गोवा मार्गावर पण असच वातावरण आहे Proud

मुवीमध्ये Rich Purnell नावाचे एक पोरगेलेसे पात्रं आहे जो हर्मीस क्रूला लवकरात लवकर मार्सजवळ पोचण्यासाठी पृथ्वीजवळ येवून 'स्लिंग शॉट' घेण्यास सुचवतो. ती आयडिया खरोखरंच एका जुनियर सायंटिस्ट ने नासाच्या युरेनस पर्यंत पोचलेल्या 'वोयेजर' साठी सुचवली होती आणि जी वापरून वोयेजरचा ट्रॅवल टाईम कैक वर्षांनी कमी करण्यात यश आले होते.

खरंच, इतक्या छान आणि सोप्या रितीने समजावल्यामूळे या बाबी अगदी सहज लक्षात येताहेत. चित्रपट आधी बघितला असता तर कळले नसते.

वर जसा पाण्याचा प्रसंग, शोध लागायच्या आधी चित्रीत झाल्याने आता अर्थहीन वाटतो, त्याच्या उलटही घडत असेल ना ? म्हणजे एखादा लेखक केवळ आपल्या प्रतिभेने एखाद्या गोष्टीची कल्पना करत असेल आणि मग कालांतराने तो शोध खरेच लागत असेल.

मला इथे दोन चित्रपट आठवताहेत. एक लिमिटलेस.. यात एक गोळी घेऊन मेंदूच्या पूर्ण क्षमतेने वापर करता येतो असे दाखवलेय. अर्थात त्या गोळीचे साईड इफेक्ट्सही दाखवलेत ( २४ तासच त्याचा प्रभाव राहणे, त्याची सवय जडणे, अकाली म्हातारपण येणे ) अशी एखादी गोळी कदाचित भविष्यात निर्माण होईलही.

दुसरा चित्रपट , सोर्स कोड. यात बराच जखमी झालेला पण मेंदू जागृत असलेला एक सैनिक आणि त्याच्या मदतीने घेतलेला गुन्हेगाराचा शोध अशी कथाकल्पना आहे. हा चित्रपट म्हणून मला खुप आवडतो. शेवटही फार सुंदर आणि काव्यात्म आहे. पण असे कधी घडेल याची शक्यता मात्र कमी वाटते. ( आय होप, हे चित्रपट इथल्या विषयाच्या व्याप्तीत बसताहेत. )

मस्त धागा आहे आणि छान पोस्टस.
मार्शियन बघायचाय अजुन.

<<म्हणजे एखादा लेखक केवळ आपल्या प्रतिभेने एखाद्या गोष्टीची कल्पना करत असेल आणि मग कालांतराने तो शोध खरेच लागत असेल.>> एक उदा. -> ज्युल व्हर्नचं ट्वेंटी थाउजंड लिग्ज अंडर द सी (1870) यात आलेले पाणबुडीचे वर्णन काळाच्या बरेच पुढचे होते आणि नंतर काही दशकांनी त्याप्रकारचे शोध लावले गेले होते. इथे त्यातल्या इतर काही शोधांबद्दलही आहे

ग्रॅव्हिटी या नितांत सुंदर आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर असलेल्या चित्रपटात
कोवलस्की चा मृत्यु ही मोठी गफलत वाटली.
जर कोवलस्कीचा प्राणवायू संपत आला आहे तर तो डॉ.स्टोन च्या मागेही जाऊ शकत होता. किंवा यानापर्यंत आत येऊ शकत होता. त्यासाठी फक्त डॉ.स्टोन ने एकदा हलकेसे खेचणे आवश्यक होते.
हे सर्व सोडून तो थेट आत्महत्या करतो हे पटलेच नाही. त्यातही तो इतका विवेकी असताना.

अजून एक गफलत म्हणजे आंतरराष्ट्रिय अवकाश स्थानक, हबल आणि चिनी अवकाश स्थानक हे एकाच पट्यात असल्या सारखे दाखवले आहेत. ते ही सगळे अशा एकाच रेषेत की रशियन यानाचा कचरा या सर्वांना भेदत जातो.
माझ्या माहिती प्रमाणे हे एका रेषेत नाहीत - नसतात.

असाच एक भन्नाट चित्रपट म्हणजे 'ल्यूसी'. स्कार्लेट जॉन्सन आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या भूमिका असलेला.
यात दाखवलेले CPH4 या ड्रग्ज बद्दल कळाल्यावर तर डोके भंजाळून गेले होते. हा कन्सेप्टच भन्नाट वाटला होता.
एरवी मनुष्य प्राणी हा मेंदूच्या क्षमतेच्या ६-८% वापर करतो तर डॉल्फिन २०%. जर कुणाला १००% क्षमता वापरता आली तर काय?? यावर हा चित्रपट आहे. CPH4 हे ड्रज्ग(?) मातेकडून गर्भाला ६व्या आठवड्यात मिळते. याद्वारे नवजात गर्भाच्या मेंदू चेतायला मदत होते. याच ड्रगचे कृत्रिमरित्या उत्पादन करून विकताना, ल्यूसीला अनावधानाने ओवरडोस होतो आणि त्यानंतर ज्या काही घटना घडतात त्या खरचं चक्रावून टाकणार्‍या आहेत.

यानंतर हे ड्रग्/एंझायम खरेच अस्तित्वात आहे का? खरेच अशा ड्रग चे उत्पादन कृत्रिमरित्या करणं शक्य आहे का यावर जालावर भरपूर चर्चा आहे.

ल्यूसी चित्रपटाबद्दल माहिती --> ल्यूसी

CPH4 बद्दल दिग्दर्शक आधिक माहिती या दुव्यावर--> CPH4

यातीलच एक वाक्य...

---

Tell me about the drug that makes Lucy superhuman. Is that based on anything real or is that entirely a fiction?

ANS : - It’s totally real. It’s not a real name. CPH4 is a name that I invented, but it’s a molecule that the pregnant woman is making it after six weeks of pregnancy in very, very tiny quantities. But it’s totally real, and it’s true that the power of this product for a baby is the power of an atomic bomb. It’s real. It’s totally real. So it’s not a drug in fact, it’s a natural molecule that pregnant women produce.

मला असाच द हॉलो मॅन पण आठवतोय. ( याचे २ किंवा ३ भाग आले होते ) अदृष्य माणूस हि कल्पना नवीन नाही. अगदी किशोर कुमारच्या मिस्टर एक्स पासून अनिल कपूरच्या मिस्टर इंडीया पर्यंत वापरलीय ती.

या हॉलो मॅन मधे त्याला थोडा वैद्यकिय टच दिलाय. एका इंजेक्शनने एक माणूस हळू हळू अदृष्य होत जातो. पण दुर्दैवाने त्याचा अँटी डोस काम करत नाही.
असे काही औषध अजून तरी नाहीच निघालेले, पुढे येईल का ते सांगता येत नाही. पण या चित्रपटातले व्हिज्यूअल इफेक्ट्स अप्रतिम होते.

मूळात एखादी वस्तू अदृष्य करण्यात एखाद्या ड्रगपेक्षा दृष्टीभ्रम किंवा संमोहनाची मदत घेता येईल असे वाटते. ताजमहालच हाय लिबर्टीचा पुतळा पण असा गायब केला गेला होता. डायनॅमो या जादूगाराचाही तसा प्रयोग होता. त्याने स्वतःलाच गायब केले होते.

निदान माझ्यासाठी तरी हॉलोमॅन, ल्यूसी हे साय-फाय नसून केवळ फँटसी मुवीज आहेत, क्षणिक थ्रिलशिवाय फार काही हाती लागत नाही त्यातून. असे डझनावारी सिनेमे दरवर्षी येतात. अश्या मुवीजचं सगळ्यात मोठ्ठं ऊदाहरण 'अवतार'.
माझ्या दृष्टीने सायफाय मुवी थॉट प्रोवोकिंग असणं अतिशय जरूरी आहे. दुर्दैवाने स्टार ट्रेक, स्टार वॉर्स मुळे "साय-फाय = स्पेस रिलिटेड" सिनेमा असं एक लॉजिक लोकांच्या डोक्यात फिट्टं बसलं आहे. काही अंशी ते खरंही आहे पण त्यालाही 'बॅक टू द फ्यूचर', मॅट्रिक्स, इन्सेप्शन, डिस्ट्रिक्ट ९, ज्युरासिक पार्क सारखे अनेक सन्माननीय अपवाद आहेत.

निनाद - ग्रॅविटी मला फार अपील झाला नवह्ताच त्यामुळे लवकरंच तो विस्मरणात गेला. पुन्हा बघणं जमल्यास तुम्ही सांगितलेल्या सीन बद्दल नक्की लिहिन.

दिनेश,
१९६८ मध्ये आलेल्या (२००१ - अ स्पेस ओडीसी) मध्ये तुम्हाला स्काईप, विडिओ चॅटिंग, ईंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ऑडिओ कमांड कंट्रोल्ड सूपर काँप्यूटर वगैरे वगैरे अगणित गोष्टी बघायला मिळतील. १९६८ च्या ह्या सिनेमाची निर्मितीमुल्ये ईतकी ऊच्चं आहेत की २०१० मध्ये हा सिनेमा निघाला होता असे मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर पटकन विश्वास ठेवाल.
१९८९- च्या बॅक टू द फ्यूचर २ मध्ये २०१५ मध्ये आयफोन, विडिओ कॉन्फरन्सिंग, फिंगर प्रिंट/ रेटिना बेस्ड अ‍ॅक्सेस अश्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात असतील असे दाखवले आहे.

बॉमबे टु गोवा मार्गावर पण असच वातावरण आहे फिदीफिदी >> श्री काही 'स्पेशल पदार्थ' वापरून तुम्ही ही अवस्था घरबसल्या अनुभवू शकता, त्यासाठी बॉम्बे-गोवा हायवे वर जाण्याची गरज नाही Proud

अंगरखा घालुन अद्रुष्य होणं हि फँटसी न रहाता रियॅलिटी होउ शकते.

फोल्डेबल डिस्प्लेज काहि दिवसांनी स्मार्ट फोन्मध्ये दिसु लागतील. तिच टेक्नॉलॉजी मोठ्या स्वरुपात वापरुन (अंगरखा मेड ऑफ फोल्डेबल डिस्प्ले), चार एच्डी कॅमेरे, चार पोझिशन्सला लावुन, लाइव फिड अंगरख्यावर डिस्प्ले केलं तर टेक्नीकली अंगरखा घालणारा माणुस अद्रुश्य भासु शकतो... Happy

बॉमबे टु गोवा मार्गावर पण असच वातावरण आहे फिदीफिदी >> श्री काही 'स्पेशल पदार्थ' वापरून तुम्ही ही अवस्था घरबसल्या अनुभवू शकता, त्यासाठी बॉम्बे-गोवा हायवे वर जाण्याची गरज नाही >>> हायझेनबर्ग ( ते आधीच चमनच बरं होत सोप सुटसुटीत :फिदी:) ते वाक्य बॉम्बे टु गोवा सिनेमात बच्चन आणि मंडळी बसच्या बाहेर मुंड्या काढून गाणं म्हणतात पण त्यांचा एकही केस उडत नाही ह्या विषयी होतं. असो.

अ स्पेस ओडीसी.. बघायचा आहे कधीचा. अवतार मलाही आवडला नव्हता, पण त्याची एवढी हवा होती, कि तसे म्हणणेच अपराध होते, त्या काळात. बाकी सायफाय म्हणजे स्पेस, लेझर च्या तलवारी, असा समज आहे खरा.

राज, त्या टेक्नीकची कल्पना करुन एका बाँड पटात कार गायब केली होती ना ? तो प्रकार थोडाफार आवाक्यातला वाटतोय खरा.

बाकी आपल्याकडे ( भारतात ) ऐतिहासिक चित्रपट फार होतात पण भविष्याचा वेध घेणारे फारच कमी.. लव्ह स्टोरी २०५० हा सन्माननीय अपवाद Happy आठवतोय का हरमन बावेजा ?

राज, हॉलो मॅन मध्ये कुठले तरी सीरम बॉडीमध्ये ईंजेक्ट करून माणसाला अदृष्य बनवणे आणि नंतर त्यांने ईतरांच्या बेडरूमध्ये घुसणे, नावडत्या लोकांचे खून करणे वगैरे (जी मला वाटते ९५% लोकांनी 'मी अदृष्य झालो तर' अश्या निबंधात लिहिली असती Lol ) अशी चीप कृत्ये चालू केली की त्याला 'रोग अ‍ॅसेट' ही पदवी बहाल करून त्याचा खतमा करणे हाच घिसापीटा हॉलिवुडी मसाला फॉर्म्युला आहे. त्या मुवी मागे १% ही सायन्स फिक्शन नाही ..आहे ती केवळ फँटसी.

तुम्ही जे म्हणता तसे टेक्निक आता जॅग्वार आणि लॅंड रोवर गाड्यांमध्ये वापरून साईड पिलर अद्रुष्य करण्याचे प्रयत्न चालू आहेत, जेणेकरून ड्रायवरला ३६० अंशातून बघता येईल. हा विडिओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=GsrAbnTJjtw

श्री Uhoh माझ्या बुद्धीचा दोष मला तुझ्या प्रतिसादाचा रोख कळाला नाही. आता हसलो तर बरे दिसणार नाही म्हणून फक्त Happy

Pages