१. कद्दू / काशिकोहळं
२. कणिक
३. गुळ
४. तळण्यासाठी तेल
५. शिजवण्यासाठी जरासं पाणी
तर....
लगित दिस झाले मनात व्हत हि रेश्पी टाकाचं..
पुण्याहून घरी आली तवा बोंड खा चे हाय, बोंड खा चे हाय याची भुणभुण लावलीच होती आईच्या मांग पण नेमी गावावरुन घरी आणतो ते कवळे संपले व्हते म्हणुन जरा दमानं व्हत काम.. पण गणेशचतुर्थी झाल्यावर आईसोबत बाजारात चक्कर टाकल्यावर हवं तसं कवळं / काशिकोहळ दिसलं अन लगेच एक बुक केल आपलं हे खरेदी करुन टाकलं (ऑनलाईन कामाचा तोटा )..
बाबो फुकटात मिळणार्या येवडूश्या कवळ्याले ५० रुपे मोजताना लय जीवाकडं आलतं पण का करावं..अडला हरी न... असो.. तर खाली सांगतो त्याप्रमाणं करा..
१. पयले एक काशिफळ घ्या .. ( युजर फ्रेंडली रेश्पी देतेय.. आप बी क्या याद रखोगे )..
२. त्याची साल खरवडून घ्या म्हणजे छिलुन घ्या..
३. त्याचे मोठ्ठाले तुकडे करुन कुकर मधे अगदी थोड पाणी (बुडी लागू नये म्हणुन टाकतो तेवढ) टाकुन ३ शिट्ट्या होऊ द्या..
४. कुकर थंड झाल्यावर ते तुकडे एका कोपरामधे काढून त्यातल पाणी झारुन घ्या.
५. शिजलेल्या तुकड्यांना स्मॅश करुन घ्या.. फोटोत दिलेल्या काशिफळाला जवळपास अर्धा किलो गुळ लागेल. अर्धा किलो गुळ किसुन त्यात घाला आणि साधारण छोटे छोटे भज्याएवढे बोंड तयार करता येईल इतपत त्यात कणीक घालुन मिसळा. मी आणलेलं काशिफळ जवळजवळ १ ते सव्वा किलोचं होत ज्यात मला दिड ग्लास कणिक टाकावी लागली.
६. तळणासाठी घेतलेल तेल कढईत कडकडीत तापवा आणि त्यात भज्याएवढ्या आकाराचे बोंड टाका. लालसर खरपुस तळून घ्या. थोडेसे थंड झाल्यावर खायला घ्या.
१. गरमगरम तोंडात घालु नका रे बा. पुडचे चार दिस कशाचीच चव लागणार नाई.. चिपकुन बस्ते बर.. सांगितलं नाई म्हणुन म्हणानं नाई तं..
२. शिळे लय म्हणजे लय्यच टेश्टी लागते.
३. कराले लागणारा येळ खाण्यात पुर्रा वसुल होउन जाते..
गुलगुले मुसुलमान ईदला
गुलगुले मुसुलमान ईदला करतात.
जागूने बोरं नावाचा एक पदार्थ दिला होता... त्याचा फोटो अगदी सुंदर होता
अबे!! लैच झकास!! महालक्ष्मी
अबे!! लैच झकास!! महालक्ष्मी च्या राशित कोण्या सालदारानं कवळं ठेवलं का आमची बुडी राशी च्या ज्योनाला बनोत जाय बोंड! एक ज़माना होता जवा महालक्ष्म्या लैच जोरात असत आमच्या इकळे राशीचे ज्योन २ २ दिवस चाले तवा
Pages