अशी हि अदलाबदली - ओटसचे मोदक बदलून "चॉकोनटी बार"( चॉकलेट, कोकोनट आणि नट्स)

Submitted by देवीका on 27 September, 2015 - 12:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बदलून,

दूधी = डार्क चॉकलेट(मी ८५% कोको घेतलेय) त्याच प्रमाणात
गूळ = खजूर ठेचून त्याच प्रमाणात

१) एक वाटी ओट्स्
२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) एक वाटी चॉकलेट वितळवून
४) अर्धी वाटी खजूर ठेचून
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) एक वाटी पाणी
९) मीठ
१०) तेल

क्रमवार पाककृती: 

१. चॉकलेट डबल बॉयलर मध्ये वितळवून घ्या.
२. एक वाटी पाणी उकळून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला खजूर टाकून लगेच पाच मिनिटाने काढून घ्या. पाणी निथळायला पेपर टॉवेल वर ठेवा. लगदा असा होइल. Happy
३. तूपात आधी आवडता सुका मेव्याचे मिक्स परतून बाजूला काढून ठेवा.
४. मग त्याच तूपात खजूर परतून घ्या. ओले खोबरे हि त्यातच टाकून परता. पाणी राहिले नाही पाहिजे.
५. ओटस नुसतेच कोरडे परतून मग वाटून घ्या. मला वाटून आवडतात. तुम्ही तसेच टाकू शकता.
६. सर्व चॉकलेटमध्ये टाकून एकत्र करा. चॉकलेट कोमट असतानाच करा. मीठ शिवरा आणि वेलची पूड टाकून एकत्र करा.
७.एका अ‍ॅलयुमिनियम शीटला तेल लावून घ्या. शीट चारी बाजूने मुडपून टीन सारखा आकार द्या जितक्या जाडीचे बार थापाल तशी. आणि वरील सारणाचा थर लावून फ्रीज मध्ये थंड करा.

chocobar.jpgchocobar2.jpg

वाढणी/प्रमाण: 
कितीही खा.
अधिक टिपा: 

ह्यात पाहिजे ते टाकू शकता.

ड्राईड कॅनबेरी, फ्लॅक्स सीडस, काजू, तीळ,कलिंगडाच्या बीया,बदामाची पूड, बेदाणे, शेंगदाणे(भाजून) वगैरे वगैरे.

माहितीचा स्रोत: 
एका पुस्तकात फक्त चॉकलेट बार रेसीपी होती ती बदलून.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी.