"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचबरोबर दर आठवड्याला होणारी गर्भाची वाढ याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले गेले होते. सिझेरीयन आणि नॉर्मल प्रसूती याबद्दल तपशीलवार माहिती दिली गेली होती. गायनॅक करतात का हे सगळं? >>>>>>>>>> हो.जर आपण त्यांच्याकडे डिमांड केली तर्,,आनि त्यांच्याकडे prenatal counceilng क्लासेस असतील तर त्यात हे सगळ सविस्तर पणे सांगण्यात येत.अगदी बाळाला अंघोळ कशी घालावी,, ६ महिने- १ वर्श पर्यंत काय आहार द्यावा.हे सगळ नीट सविस्तर सांगतात.
गर्भसंस्कार च्या जवळजवळ कित्येक वर्गामधे मांसाहार टाळा अस सांगतात.ह्याउलट डॉ. रेड मीट आहारात घ्या अस सांगतात.(एच बी आनि आर्यन साथी )अर्थात आप्ल्या प्रकृरुतीप्रमाने ते आपण ठरवायच असते.आनि आपल्या सर्वांना हे माहित असेल की आर्यन ,कॅल्शियम च्या गोळ्या भारता मधे प्रत्य्के गर्भिणीला घ्यायला सांगतात.कारण आपल्या शाकाहारी अन्नातुन त्याची गरज पुर्ण होत नाही. ह्याउलट बाहेरील देशांमध्ये आर्यन गो़ळ्या घेतल्या जात नाही ,कार्ण त्याची गरज आहारातुन पुर्ण होते.

मग जर गर्भसंस्कार ह्या नावाखाली तुम्ही अमुक अन्न खाले तर चुक,, काहीतरी होईल बाळाला,,वैगरे असा प्रचार होत असेन तर नक्कीच चुक आहे.

>>त्यांच्याकडे prenatal counceilng क्लासेस असतील तर >> नसतील तर? गर्भसंस्कार वर्गात prenatal counceilng करत असतील तर?

>> गर्भसंस्कार च्या जवळजवळ कित्येक वर्गामधे मांसाहार टाळा अस सांगतात.>> मला असे सांगण्यात आले नव्हते.

अतिशय चांगला माहितीपूर्ण लेख. डॉ. कैलास धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.

खरच खुप गैरसमज आहेत अशा प्रकारचे समाजात. पण मुल जन्माला आल्यावर त्यावर घडले जाणारे संस्कार महत्वाचे हे खुप छान प्रकारे लिहीले आहे.

मी अमी आणि स_सा यांच्या पोस्ट आवडल्या.

"काहो आमच्या संस्कृतीवर घाला घालता?" असा टाहो फोडण्यापेक्षा अशा अनुभवाच्या पोस्ट / चर्चा गरजेच्या आहेत.
अ‍ॅलोपथी विरुद्ध आयुर्वेद असे वळण या धाग्याला देउ नये.

>> गर्भसंस्कार च्या जवळजवळ कित्येक वर्गामधे मांसाहार टाळा अस सांगतात.>> मला असे सांगण्यात आले नव्हते.>>>> ते माझ स्वतः च मत मी सांगितल आहे. तुमच्यासाठी लिहल नाहीये Happy

नसतील तर? गर्भसंस्कार वर्गात prenatal counceilng करत असतील तर? >>>> वरची पोस्ट परत वाचा.. असतील तर .. अस लिहल आहे मी.नसतील तर काय कराव हे ज्याच ते ठरवु शकतातच की.

आयुर्वेद किंवा मेडिटेशन या गोष्टीना विरोध नाही. फक्त त्याचे बाजारीकरण करणाच्या प्रवृत्तीला आहे.

>>>> मग जर गर्भसंस्कार ह्या नावाखाली तुम्ही अमुक अन्न खाले तर चुक,, काहीतरी होईल बाळाला,,वैगरे असा प्रचार होत असेन तर नक्कीच चुक आहे. <<<<<
असेल नसेल वगैरे मोघम नको हो....... मूळ धागा विषय कसा सु:स्पष्ट आहे ना.......
अन तरी सहज आठवले म्हणून सांगतो.... मी लहानपणा पासून ऐकत आलो आहे थोरामोठ्यांकडून की गर्भारणीने "पपई" अजिबात खाऊ नये. ऐकिव कारणे अशी की गर्भपात होतो वा व्यंग येते.
कैच्च्याकैच अंधश्रद्धा ना ह्या? हो ना... आधुनिक डॉक्टरी विज्ञान या कशास मान्यता देत नाही...!
अन काय हो?
माझाच एक मित्र, बायको गर्भार, भरपुर उपलब्ध, चविला छान म्हणून भरपुर पपया खाल्ल्या.... घरात कोणी सांगायलाही नव्हते वडिलधारे.... अन असले तरी काय हो? त्यांच्याही आधीच बुद्धिभेद झालेला असून जुन्या प्रथा/चाली/रिती म्हणजे अंधश्रद्धा असाच पूर्वग्रह असेल तर ते काय सांगणार कप्पाळ?
तर नि:ष्पन्न काय झाले की झालेले बाळाचे डोळे (पापण्या) नीट उघडत नव्हते, अतिशय उष्णतेचे विकार... (परत इथेही अ‍ॅलोपॅथी कैतरी अगम्य विन्ग्रजी भाषेतील शब्द तोन्डावर फेकुन कफवातपित्त प्रकोप व उष्णतेचा प्रकोप असले काही नसतेच, ते थोतांड म्हणून सांगतील), डोळे मिचमिचे बनलेले, कायम चिकट द्रव वहातोय, जराही उजेड सहन होत नाही, डोळे पूर्ण उघडता येत नाहीत वगैरे वगैरे... मला तर वर्णनही करववत नाही.
ही परिस्थिती, बाळ शाळकरी होऊन, पुढे कॉलेजला जाईस्तोवर टीकली. अनेक औषधोपचार झाले.

आता काये ना...... की गर्भारणीला भरपूर पपया खायला घालून मग गर्भावर होऊ शकणारे दु:ष्परिणाम सिद्ध करण्याची क्षमता/सोय/उपलब्धता आयुर्वेदाकडे नाही ना.... नाही आयुर्वेदाकडे, नाही "पपई खाऊ नका" सांगणार्‍या बुजुर्ग लोकांकडे ! मग्ग काय होते? दाखवा सिद्ध करुन नैतर माना की तुमचे थोतांड आहे.
असो.

तरीही पहिल्याच पोस्ट मधेम्हणल्याप्रमाणे, दोनही बाजुंकडे "दुकान उघडुन' बसलेले आहेत हे मात्र मला मान्य आहे.

माझ्या वरील सेल्फमेडीटेशन बद्दलच्या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नाही का?
सेल्फ मेडिटेशन हे कोणत्या तरी प्याथीचे खूळ आहे का? तसले काही असतच नाही ना?
हो, अन शिवाय ते पाश्चिमात्यांकडून भारीभारी अगम्य नविन विन्ग्रजी शब्दांद्वारे सांगितले गेले असेल, तर मग ते खरे......
कै तरी सांगा बोवा मला..... सेल्फ मेडीटेशन बद्दल.

पॅथी कोणतीही असो. रुग्णहिताचा आव आणून जागृती वा प्रबोधन या नावाखाली भय दाखवत असतील तर जास्त आक्षेपार्ह.

सेल्फ मेडिकेशन ऐकलंय. सेल्फ मेडिटेशन काय असतं? मेडिटेशन डेलिगेट करता येतं का?

लिंबूटिबू,गर्भारपणातील पपईसेवनाबद्दल livestrong.com and webmed.com तुमची कॉपी मारताहेत.

>>>>> पॅथी कोणतीही असो. रुग्णहिताचा आव आणून जागृती वा प्रबोधन या नावाखाली भय दाखवत असतील तर जास्त आक्षेपार्ह. <<<<<
कसे काय आक्षेपार्ह? नेमके कोणते आक्षेपार्ह व कोणते नाही हे कसे ठरविणार? उलगडुन सांगा पाहु.......

उद्या म्हणाल.... (म्हणू शकाल) की;
जनहिताचा आव आणुन जागृती वा प्रबोधन या नावाखाली अपघातात डोके फुटण्याचे भय दाखवुन हेल्मेटसक्ति करतात तर ती आक्षेपार्ह..... ! Proud

जनहिताचा आव आणुन जागृती वा प्रबोधन या नावाखाली वाहतुकीचे नियम न पाळल्यास रोख दंडाचे/शिक्षेचे भय दाखवुन वाहतुकीच्या कायद्याची सक्ति करतात तर ती आक्षेपार्ह..... ! Proud

जनहिताचा आव आणुन जागृती वा प्रबोधन या नावाखाली परीक्षेचे नियम न पाळल्यास नापास होण्याचे भय दाखवुन परीक्षेची व परिक्षेत बरोबर उत्तरे लिहीण्याची सक्ति करतात तर ती आक्षेपार्ह..... ! Proud

अर्रे क्काय च्चाल्लय.....

>>>> सेल्फ मेडिकेशन ऐकलंय. सेल्फ मेडिटेशन काय असतं? मेडिटेशन डेलिगेट करता येतं का? <<<<
अरे समझा करो रे.... आमच विन्ग्रजी कच्च हे..... पण कैतरी कर्तात सेल्फवर.... "मेडी" कॉमन हे...
आता तुम्हीच सांगा बरे, मेडीकेशन अन मेडीटेशन मधे फरक काय आहे? (नशिब माझे, दोनही शब्द आयुर्वेद वा त्या पाखंडी थोतांडातील नाही आहेत... )

@लिंबुटिंबु:

तुमचा मुद्धा नीट कळला नाही.
मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत. विपश्यना केल्यावर अनायसे आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच स्वयंसूचनेने आरोग्याचे फायदे झाल्याची उदाहरणे आहेत.

त्याचा इथे नेमका काय संबंध? गर्भसंस्कारात हे शिकवले जाते का?

मेडिटेशन.... ध्यान
मेडिकेशन.... इलाज... ओक्के..... धन्यवाद गुगलराव.
तर मग मला असे म्हणायचे होते वर की "मेडीटेशन" करीत स्वतःच्याच बॉडीशी कसातरी कैतरी संवाद साधित, स्वतःच्या बॉडीवर "मेडीकेशन" करतात, ते काय अस्ते? कोणत्या प्याथीमधे मोडते ते ? की तो देखिल "कल्टच"?

@लिंबुटिंबु:

मेडिटेशन ने गर्भसंस्कार असा काही प्रकार आहे का?याचे चार्जेस पण भरमसाठ असतात का?

मेडिटेशन ने गर्भसंस्कार अशी छापलेली पुस्तके भरमसाठ किंमतित विकली जातात का? लेखकाचे नाव काय?
किंवा बोर्ड लावलेली दुकाने आहेत का?

प्राणिक हीलिंग,रेकी का?

@लिंबुटिंबु

"You are the Placebo" हे Dr. Joe Dispenza यांचे पुस्तक वाचा. ते तुम्ही म्हणता त्या मेडिटेशन मध्ये नेमके मोडते.

याला कुठल्यातरी पथी मध्ये बसवून मगच त्याकडे बघण्याचा अट्टाहास कशाला हवा?

अमुक एका पथी मध्ये हे एक सिद्ध झालंय म्हणजे बाकी सगळं आपोआप सिद्ध झालं असं म्हणणं योग्य होईल का? थोडक्यात, याला पथीचं वळण द्यायचंच कशाला?

<<‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले.
गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे.>>

gynecologist & obstetrician हे काय कमी लुटतात का? यांची एका appointment ची हजारो रुपये फी असते मग ती कशी रास्त ठरते हो..... मेडीकल वाल्याचे कमिशन वेगळे.....
'सीजर करावेच लागेल नाहीतर आई किंवा मुलाला धोका आहे' असे सांगून लाखो रुपये उकळले जातात ते चालते का ?
मला वाटते यांच्या कमायीत यांना आता वाटेकरी नको असावेत म्हणून हा खटाटोप चालू असावा.

gynecologist & obstetrician हे काय कमी लुटतात का? यांची एका appointment ची हजारो रुपये फी असते मग ती कशी रास्त ठरते हो..... मेडीकल वाल्याचे कमिशन वेगळे.....
'सीजर करावेच लागेल नाहीतर आई किंवा मुलाला धोका आहे' असे सांगून लाखो रुपये उकळले जातात ते चालते का ?

///////

जय@... गायनॅकोलॉजिस्ट खोट्या अशास्त्रीय ज्ञानाचे पैसे उकळत नाही.
तो शिकला असलेली स्पेशालिटी ब्रॅन्च खोटी नाही.
गर्भसंस्कार कसे शास्त्रीय आहे? हे सिद्ध करणारी पोस्ट टाका की. विश्वास ठेवा गर्भसंस्कार पूर्णतः शास्त्रीय हे सिद्ध केलेत तर मी सुद्धा ..किंवा अखिल माबोकर त्यास पाठिंबाच देतील.

पण गायनॅक जास्त फी घेतो,अनावश्यक सीझर्स करतो म्हणून गर्भसंस्कार शास्त्रीय ठरावेत हा अट्टाहास सोडा.

>>>> पण गायनॅक जास्त फी घेतो,अनावश्यक सीझर्स करतो म्हणून गर्भसंस्कार शास्त्रीय ठरावेत हा अट्टाहास सोडा. <<<<
छे हो, तसा अट्टाहास नाहि करत आम्ही....
मुद्दा असा की, जास्त पैसे घेतात् अनावश्यक सीझर्स करतात, नको त्या चाचण्या करायला लावून फसवतात हे सूर्यप्रकाशाइतके ढळढळीत उघड सत्य असले तरी मजसारखा सामान्य बुद्धिवकुबाचा अतिसामान्य माणूस त्यामुळे अ‍ॅलोपॅथीला टाकाऊ वा खोटे ठरवायला जात नाही.
मूळात प्रॉब्लेम असा आहे की गर्भसंस्कार ही संकल्पना पूर्वापार समाजात जीवंत आहेच्चे.... फक्त त्याची "दुकानदारी" सुरू झाल्याचे दिसल्यावर मात्र अतिबुद्धिमान वकुबाचे असामान्य अ‍ॅलोपॅथीवाले, ते शास्त्रच खोटे थोतांड वगैरे बाता मारू लागलेत असे माझे प्रांजळ मत!

अरे सरळ सांगायचे ना की गर्भसंस्कार वगैरे दुकानदारी मुळे आमच्या पोटात दुखते (वा पोटावर पाय येतोय).
पण ते कसे सांगणार? तर मग घ्या आधार "अंधश्रद्धा/अवैज्ञानिक (म्हणजे काय?) - अशास्त्रीय कसोट्यांवर आधारीत भोंदू गर्भसंस्कार" अशा शब्दांच्या पिलावळीच्या जंजाळाचा.....
शब्द कमी पडत असतील तर सांगा... माझे विन्ग्रजी कच्चे असले तरी मराठी बरे आहे, जास्तीचे हवे लागल्यास अजुन शब्द देतो Proud

किंवा असेही असू शकते बरका... की पेशण्ट काय करतात की गर्भसंस्काराकडे वळतात, अन नंतर येडबंबूसारखे अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरला मानभावीपणे सेकण्ड ओपिनियन घ्यावे म्हणुन लाडे लाडे, "अहो डॉक्टर आम्ही कीनै, अमकतमकढमक करतो गर्भावर संकार होण्यासाठी, कै प्रॉब्लेम नै ना येणार त्यामुळे? " आता झाल का? असा एखाद दुसर्‍याने विचारला अस्ता प्रश्न तर सहन होईल हो, पण जी ती प्रेग्नंट पेशंट अन आगाऊ नातेवाईक येतात अन हेच्च विचारायला लागल्यावर बिचारे अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर सामुहिकरित्या वैतागत असणार ना? Wink कुणाला हो आवडेल आपल्यासमोर दुसर्‍याची स्तुती/वा दुसर्‍याच्य मागे लागलेले असणे? आक्षी सवतीमत्सरासारखे होत असणार..... नै, विश्वास बसत नसेल, तर "शास्त्रीय प्रयोग" स्वतःच करुन बघा की अर्धांगिनी समोर पुन्हा पुन्हा मैत्रीणीची स्तुती करुन बघा..... मग जे काय त्या अर्धांगिनीचे होईल, तेच या बिचार्‍या अ‍ॅलोपॅथीवाल्या डॉक्टरांचे होत असणार, नक्कीच. पेशंट पण भुक्कड लेकाचे, इकडे जुनाट मागास प्रथा/रुढींद्वारे गर्भसंस्कार वगैरे करुन घेतात, अन वर परत सुरक्षित वेदनारहित प्रसुतीकरता अ‍ॅलोपॅथीकडे जातात ते जातात, शिवाय तिथे जाऊन आपल्या भोंगळ गर्भसंस्काराच्या गोष्टींचे कौतुक सांगत बसतात...... अरे मग त्या गर्भसंस्कारवाल्यांनाच सांगायचे ना प्रसुतिकरता.... आमच्याकडे कशाला येता.... इति अ‍ॅलोपॅथीवाले... अन हे जेव्हा सन्ख्यात्मक अति होते, तेव्हा वरील सारखे लेख पडू लागतात.... हे नेहेमीचेच आहे... असो.

तेव्हा १९८० च्या सुमारास त्या लोणावळ्याच्या मनःशक्ति केंद्रात गेलो होतो, त्यांची पुस्तकविक्री पुणे रेल्वेस्थानकावर व्हायची. तेव्हाही ते "गर्भसंस्कार" वगैरे वर माहिती देतच होते, पुस्तके/शिबिरे / चर्चा या द्वारे. पण तेव्हा काळ कुत्रही विचारित नव्हत त्यांच्या प्रयत्नांना...... अन आता २०१० नंतरच्या या दशकात गल्लोगल्ली "गर्भसंस्काराची दुकानदारी" (होय, मी दुकानदारी असेच म्हणतो, काही चांगले असतीलही, पण दुकानदारीच - ते म्हणण्याकरता मला गर्भसंकारच खोटॅ असे ठरवायची गरज भासत नाही) जोमात सुरू झालेली बघितल्यावर मात्र बर्‍याच अ‍ॅलोपॅथीवाल्यांची समाजसुधारणेची "भावना " जागृत झाली असे माझे प्रांजळ मत.

दुकानदारी
>>

अस कितीस मार्केट असाव गर्भसंस्कार च? आणि गायनक किंवा तत्सम डॉक्टर मंडळींच्या व्यवसायच? दोघांची तुलना झाली तर समजू शकेल कितपत आकर्षक आहे गर्भसंस्काराच मार्केट!

गर्भसंस्कार वाले सिझेरिन करून देणार असतील तर(च) ह्यांच मार्केट हलेल पंत! आणि गर्भसंस्कार केले तर सिझेरिनची वेळ येणार नाही, असा कोणता दावा (मेडीकलजर्नल मध्ये संमत झालेला Happy ) असेल तर आपला मात्र अनुमोदन की गर्भसंस्कारवाल्यांनी दुसर मार्केट हलवलं!

अनिरुद्ध, मार्केट किती याची आकडेवारी अवघड आहे, पण कमी आहे असे गृहित धरणे लक्षात आले म्हणूनच "जेलसी" चा मुद्दा मी नंतर अ‍ॅड केलाय. (अहो समान व्यवसायातील पुजेला आलेल्या पुजार्‍याकडे दुसर्‍या पुजार्‍याच कौतुक केल तरी पहिल्याच माथ ठणकतय..... Proud
एका दुकानदाराला त्याच्याकडे नसलेली वस्तु दुसरीकडे कुठे मिळेल विचारले, तर एकजण उत्तर देत नाही,
इथे तर काय? एका दुकानदाराला त्याच्याकडे कधीच असणार नसलेल्या गर्भसंस्कारादीक गोष्टीचे "कौतुक" ऐकायला लागते.... मग किती पेटणार माथे? समझा करो याऽर... )
अन कमी असलेले गर्भसंस्कारांचे मार्केट माऊथ पब्लिसिटीद्वारे झपाट्याने वाढायला कितिकसा वेळ लागेल? तर त्या गर्भसंस्कारांच्या माऊथ पब्लिसिटीवर काऊंटर अ‍ॅटॅक म्हणुनही पेपर/मिडीयाचा वापर होत असेलही.... कुणी सांगाव? Wink
तुलना योग्य नाही, पण खाजगी ट्युशन/क्लासेसबद्दल जशी ओरड ठराविक काळाने बघायला मिळते तसाच काहीसा हा "गर्भसंस्कारांबाबतचा" प्रकार आहे असे समजण्यास वाव आहे.

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण

गायनॅकोलॉजिस्ट खोट्या अशास्त्रीय ज्ञानाचे पैसे उकळत नाही.<< म्हणुन तो फसवणुक करत नाही असे नाही.
गर्भसंस्कार हा प्रकार थोडासा तसाच. काहिजण लुट म्हणुन चालवतात तर काही प्रबोधन करण्याच्या उद्देशाने.

मुद्दा फसवणुकीचा आहे की शास्त्रीय/अशास्त्रीय ज्ञानाचा?? गर्भसंस्कार हे विज्ञानशास्त्राने सिद्ध झालेले आहेत कां?? मी ते मंत्र वगैरे बाबतीत बोलतोय,

की गर्भसंस्कार ही संकल्पना पूर्वापार समाजात जीवंत आहेच्चे >> अरेरे, तरीदेखिल भारतात एकही स्टीव्ह जॉब्स्/बिल गेट्स्/झुकरबर्ग झाला नाही?? शिवाजी महाराज देखिल एखादेच??

आणि मुळात गर्भसंस्कारांची व्गैरे गरज का पडावी? लिंबुशास्त्रींच्या मते नंतर संघाचे संस्कार झाले की ते अपत्य पुढे संस्कारीच होणार. आणि मग युरोपियन वेट्रेस सारख्या कमेंट्स टाकुन आपले संस्कार दाखवत फिरणार, नाही का हो लिंबाजी पंत?

Pages