"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना आणि नंदीनी +१
सगळ्याचा बाजार आणि मुलांच्या तुलने बद्दल
मला मांडायला जमले नव्हते ते नीट्पणे मांडले आहे

'गर्भसंस्कार : एक थोतांड' वाचलंत ना?? आता त्यासंबंधित ही प्रतिक्रियादेखील जरूर वाचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा.....

(यापूर्वीही एकदा गर्भसंस्कार आणि त्यानिमित्ताने आयुर्वेदाला बदनाम करणारा लेख डॉ. अरुण गद्रे यांनी लिहिला होता. त्यावरची ही पूर्वप्रसिद्ध प्रतिक्रिया आहे.)

खालील प्रतिक्रिया ही डॉ. अरुण गद्रे यांच्या 'गर्भसंस्कार एक थोतांड' या लेखावर दिलेली आहे . कृपया प्रतिक्रिया वाचण्य आधी मूळ लेख वाचा.
प्रामाणिक पणे practise करणारी मी एक सामान्य वैद्य आहे . (स्वयंघोषित नाही तर सर्टिफाइड BAMS doctor )
( प्रतिक्रिया लेखा इतकीच मोठी होईल कदाचित …वेळ असेल तर नक्की वाचा )
मी काही लेखिका नाही किंवा सामाजिक प्रश्नांवर उत्तम लिहिण्या इतपत
भाषा कौशल्य देखील माझ्याकडे नाही . या लेखावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली .
लेखकाचा प्रथमदर्शनी उद्देश आयुर्वेद नावाखाली malpractise करणाऱ्या व्यावसायिकान विरूध वाटत होता . परंतु लेख वाचताना पुढे पुढे आयुर्वेद शास्त्राची उडवलेली खिल्ली बघून डोळ्याला पट्टी बांधून हत्ती चाच्पद्णाऱ्या माणसांची गोष्ट आठवली .
सदर लेखकाला आयुर्वेद शास्त्राविषयी किती माहिती आहे हे मला माहिती नाही . नसावी असेच लिखाणावरून दिसतेय .
असो ……कहि मुद्दे जे मला खटकले त्याचे किंवा मुळातच ते चुकीचे आहेत त्याचे माझ्या दृष्टीने मी तारतम्य मांडू इच्छिते
१. गर्भासंस्काराच्या नावाखाली हजारोंची लुट काही आयुर्वेदिक व्यावसायिक म्हणवून घेणारे करतात . आयुर्वेद शास्त्राचे नाव वापरून त्यातील चिकित्सा चुकीच्या पध्हतीने वापरून निव्वळ पैसे भरणार्यांचे हे कृत्य निश्चित निंदनीय आहे.
स्वताच्या practise मध्ये consulatation आणि treatment rate याच्या मध्ये खूप तफावत असलेले doctors allopathy मध्ये हि पाहायला मिळतात . ५०००/- मध्ये हि delivery होते आणि काही पंचतारांकित हॉटेल sorry hospitals मध्ये ७०,०००/- मध्येही delivery होते . हि लूट किती भयानक आहे . so called सुशिक्षित लोक जातात ना . clinical diagnosis ला माळयावर टाकून देऊन आज किती consultants हजारोंच्या investigations बरेचदा विनाकारण करायला लावतात ना ?
आज कितीतरी fertility centres madhe हजारो लाखोची बोली लागते customised sperm sathi . लेखकाच्या भाषेत सांगायचे तर Bill Gates चे sperms घ्या Bill Gates सारखा मुलगा मिळवा असेच आहे न .
नाही माझा विषय भरकटत नाहीये तसे वाटत असेल तर मुल लेख वाचा …त्यांच्याच भरकटलेल्या काही मुन्द्यांचे हे स्पष्टीकरण आहे .
२cm चा abcess ( गळू हो ) drain करायचे १२०००/- घेणारे surgeons समाजावर खूप मोठे उ पकार करतात . लोकांची फसवणूक आज allopathy मधेही किती चालते आणि कशी याला evidence base ची गरज नक्कीच नाही हे तर मान्य आहे ना . लोकांची फसवणुक शास्त्र करत नसते मग ते आयुर्वेद असो अथवा allopathy .
फसवणूक करणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकाच्या कुठल्याही कृतीचे मी समर्थन करीत नाही .परन्तु एक लक्षात ठेवा यामुळे गर्भसंस्कार थोतांड आहे असे होत नाही .
२. ‘’ गर्भसंस्कार म्हणजे काही मंत्र म्हणणे’’ असा समज लेखकाचा झ्लाय असे लेखावरून वाटतेय . आपण मोठ्या कौतुकाने prenatal antenatal care असे जे म्हणतो ते म्हणजेच गर्भसंस्कार आहेत . गर्भिणीला आणि तिच्या बाळाला प्रसव होईस्तोवर उत्तम शारीरिक मानसिक स्वास्थ्य उपलब्ध करून देणे म्हणजेच गर्भसंस्कार होय . दर महिन्याला बाळाच्या होणार्या शारीरिक वाढीचा सविस्तर उल्लेख ग्रंथात आहे . बाळाच्या वाढीनुसार मातेच्या बदलण्यार्या गरजा लक्षात घेऊन दर महिन्याला घेण्यासाठी वनौषधी सांगितल्या आहेत .
आज त्यांचा आधुनिक शास्त्रावर निकष लावला असता त्य folic acid ,calcium and iron चा उत्तम sourse असल्याचे सिध्द झालेय .
मंत्र हा त्या काळी आश्वासन चिकित्सेचा ( positive self talk or self assurance) भाग म्हणून वापरला जात असे . गर्भधारणे मुळे स्वतःच्या शरीरात तसेच मानसिक बदलांना सकारात्मक स्वीकारता यावे याकरता धीर देण्याची ती पद्धत होती . त्या काळची सामाजिक रचना आणि स्त्रीचे त्याकाळचे गर्भ धारणेचे वयही लक्षात घेतले तर हे मंत्र स्वरूपी councieling समजण्यात अडचण वाटणार नाही . कुठलाही सुज्ञ वैद्य ‘’बाई हा मंत्र म्हणा.. बघा कसा अर्जुनासारखा पुत्र होईल ‘असे म्हणत नाही . ’ Here i mean certified ayurvedic practitioner not any self announced Ayurved Guru
परंतु मंत्रोच्चाराने सकारात्मकता वाढते . मंत्राचा गर्भाच्या मानसिक वाढीवर कसा परिणाम होतो यावर आधुनिक शास्त्रात च बराच अभ्यास होतोय . google it . त्याबाबत विस्ताराने लिहित नाही. Modern science accepts the psychology. And psychology has core belief that the intrauterine life of any person does get influenced by the behaviour and psychological condition of mother.
३. लेखकाचे हे वाक्य … समागमाच्या वेळी खोळीत अडगळ असू नये. खरेच असे काही follow karne shaky नसेल आता पण त्या काळात त्याचा significance असू शकतो . इक खडा दाखव्लातुम्ही लेखक महाशय परंतु त्याच context मध्ये असे काही उल्लेख आहेत कि जे आजही relate करतात . eg . स्त्रीची संमती असावी , शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या दोघांपैकी कुणीही स्वस्थ नसेल तर संभोग अथवा गर्भधारणा टाळावी , ब्राह्मणाच्या (the elder or wise person) सल्ल्याने निर्णय घ्यावा .. हे premarital अथवा prenatal counceilng च नाही का .. त्या कालची समाज रचना च तशी होती . त्याने गर्भ संस्कारांचे महत्व यत्किन्तिहहि कमी होत नाही
ग्रंथामधील काही श्लोक हे अतिरंजित आणि आजच्या काळात ग्राह्य वाटत नाहीत परंतु त्यामागची मूळ संकल्पना आणि हेतू आजही तितकाच अबाधित आह
त्या काळी वर्णन केलेले ग्रह पिशाच्च हे ramsay बंधूच्या भुतांशी साधर्म्य असणारे आत्मे वैगेरे असे मुळीच अपेक्षित नव्हते. डोळ्याना न दिसणारे अतिसूक्ष्मा, चित्र विचित्र आकार धारण केलेले , हवा ,पाणी वातावरणात असणारे, स्त्रिया, बालके , जर्जर यांचा सहज ताबा घेऊ शकणारे पिशाच्च असे वर्णन आहे ...जे आज आपण bacteria, virus म्हणून ओळखतो ... यापासून होणारा unexplained गर्भपात त्यात अपेक्षित आहे . TORCH , autoimmune response असे आपण ज्याला म्हणतो तेच ....फक्त हे शब्द इंग्रजाळलेले आहेत एवढेच.
४. सुश्रुतासारखे निष्णात शल्यचिकित्सक हाडाच्या गणतीत चुकले का????? ,हसू आले ……
.जन्माला आल्यानंतर ossification ( हाडे सांधण्याची प्रक्रिया) होण्यापूर्वी हाडांची संख्या ही 300 असते.
. सुश्रुत संहितेमध्ये काही मृदु अस्थींचा ( cartilages) समावेश अस्थी म्हणून केला आहे.
. छातीच्या बरगड्या ( ribs) मोजताना एका rib चे head, neck आणी shaft असे तीन वेगवेगळे भाग तीन स्वतंत्र अस्थी म्हणून गणना केली आहे .
हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर तफावत का ते कळेल आणी उलट आयुर्वेदाच्या प्रती विश्वास दुणावेल ही निश्चित.
जमले तर खरेच सुश्रुत संहिता घ्या आणि वाचा . जगातले पहिले cataract चे सविस्तर आणि कितीतरी surgery चे सविस्तर वर्णन …। अभिमान वाटेल
१. लेखकाचे वाक्य … गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो. : हो अगदी बरोबर cardiac activity disate तेव्हाच sonologist त्या पेशिसमुहाला foetus or गर्भ म्हणतात आणि गर्भधारणा निश्तित असल्याचा report देतात . तंतोतंत सांगतेय आयुर्वेद की हृदयात चेतना ( foetal heart beats/ presence of cardiac activity / जीव ) येईस्तोवर तो फक्त पेषिसमूह असतो गर्भ नाही.
२पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३. पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते.
खरोखर काही श्लोक असे का दिले असावे . वैद्यक शास्त्राचा उगम ज्या आयुर्वेद संहिता मधून झाला त्या संहिताकार चरक , सुश्रुत आणि वाग्भट यांना साधा fertility period ...ovulation phase कळली नसेल का हो ??
असे निश्चितच नाही . वरील श्लोक हे स्री आणि पुरुषास स्रीची पाळी (menstruation ) सुरु असताना संभोगापासून परावृत्त करण्यासाठी घातलेली भीती वाटते . पाळीच्या दिवसात समागम करू नये अशी साधी सुचना गांभीर्याने घ्यावी हा उद्देश दिसतो .
आजकाल patient ला कसेबसे ५ min देऊन बोलणारे gynaecologist, ''try to avoid intercourse during menstruation or first three months of pregnancy'' असा ओझरता सल्ला देतात . तो कसा आणि किती पाळला जातो याबाबत आत्मपरीक्षण करावे . त्यामुळे ग्रंथातील श्लोक हास्यापद वाटला तरी निरथक मुळीच नाहीए..नवर्याच्या जीवाची भिती घातलेली बाई आणि स्वताच्या जीवाची काळजी वाटून पाळीच्या काळात होणारा अहितकरी संभोग टाळला जात असावा . त्याचे old fashioned wrapping जरा ब्रॅंडेड बनवा आणि पटते का बघा .
गर्भसंस्कार न करताही अलौकिक व्यक्ती जन्माला आल्या . माता पोटातल्या बाळाशी पोटात असतानाच जे नाते जोडते त्याची काळजी घेते ..बालविषयी स्वप्ने बघते ( here again positive self talk or thinking) स्वताचे आचरणात बाळाच्या हिताचे बदल करते हेच तर गर्भसंस्कार होत. शहाजी राजे नसताना गर्भिणी जिजामाता उत्तमपणे राज्यकारभार बघत. पोटात असणार्या बाळाच्या रुपात त्या स्वराज्याची नांदी इच्छित. त्यानी गर्भसंस्काराचे classes attend केले का? तर नाही. परंतु त्या काळातील पध्हतीला अनुसरून गर्भिणी बाई ने आचरणात आणवायच्या गोष्टी, सोपस्कार हे होणारच गर्भसंस्काराचे class mhnje गर्भसंस्कार असा गैरसमज आहे तोवर गर्भसंस्कार म्हणजे नक्की कै ते कसे समजेल
लेखक म्हणताय की गर्भसंस्कारशिवाय संतती उत्तम होऊ शकते किंवा संस्कार करूनही हवे तसे अपत्य मिळत नाही. ठीक आहे अशी शक्यता गृहीत धरू आणि मान्य करू हवे तर . आता विचार करा, काही दशकांपूर्वी anomaly scans , periodic USGs ( sonography) , amniotic fluid analysis ...इतकेच kai त्या आधी ५० वर्षे तर बायका iron folic calcium शिवायही गुटगुटीत आणि बुधहिमान मुला मुलीना जन्म देत होत्याच ना .. मग आजच का आपण हे सगळे पाळतो. याचा अर्थ sonography करू नका असा सुद्य वाचकवर्ग नकीच घेणार नाहीत अशी मी आशा करते. लेखकाचा मुद्दा त्यांच्या च पध्हतीने मी मांडून दाखवतेय एवढेच.
गर्भासंस्कार अतीमहत्वकांक्षेला खतपाणी घालते हा मुद्दा मला मान्य नाहि . ती यक्तिपरतवे बदलत जाणारी parenting ची बाजू आहे. जी गर्भासंस्कार न करणारे पालकही आपल्या पाल्याच्या बाबतीत दाखवू शकतात .
परत एकदा मुळ मुद्दा स्पष्ट करू इच्छिते की गर्भासंस्कर करवायला हजारो रुपये खर्च करा असे ayurved किंवा आयुर्वेदाचार्य सांगत नाहित . आयुर्वेदाt वर्णन केलेली त्या काळाला अनुसरून असलेले आहार
(diet) विहार(lifestyle) औषधी( suppliments for foetus and mother), आश्वासन ( counceiling ) अशी अतिशय उत्कृष्ट ,शास्रोक्त आणी परीपूर्ण antenatal care (ANC) hoy.
आयुर्वेदशास्त्राची आज आपल्याच कडून जी हानी, बदनामी , दुर्लक्ष , गैरसमज ( ज्यामुळे फसवणारयांचे खिसे भरले जातात) आणी परिणामी आपल्याच देशात होऊ शकणार्या वैद्यक शास्त्राची प्रगति कशी आपणाच रोखतोय यावर स्वंत्र लेख लिहिता येईल ....मान्यवर लेखकानी तसा अभ्यास करून लिहिला तर मी खरोखरच त्यांची आभारी राहीन. कारण लेखणी ची धार ते जाणतात. आपल्यासारख्या प्रगल्भ लेखकानी जरूर समाजात जे उत्तम जे शास्त्रीय ,सर्वोपहिताचे आणी सर्वात महत्वाचे एकांगी दृष्टीकोन वगळून लिहलेले आहे ते पोचवावे अशी अपेक्षा आहे.
डॉ. रुपाली पानसे

पानसेंची पोस्टही बरीच पटली.
पानसेंनी लेखाला त्याच पेपरात उत्तर दिलंय का? यातून आणि बरेच अँगल समोर येतील.

सध्या तिन्ही पॅथ्या लुटीचे काम करतात ! आपली गाडी कशी पुढे जाईल यातच त्यांना स्वारस्य.
पानसेंचीही पोष्ट पटली !

गर्भसंस्कार थोतांड आहे आणि लोकं उगाच मागे जातात मान्य आहे पण

लेखात लिहिलेल्या "कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’ " ह्या वाक्याला स्मरून आधी आपल्या पॅथीबद्दल त्यातल्या जनांस बुडवणार्‍या अनेक गैर-प्रकारांबद्दल लेखकव्दयीने काही लिहिलेले असेल तर वाचायला आवडेल.

'पुरोगामी' पणा मधे दुसर्‍याविषयी न बोलता / बघता, आपल्यातला वाईटपणा आधी दूर करावा असा संकेत आहे ना म्हणे

mi_anu, हा लोकशाहीचा चौथा स्तंभ?? हे तर 'पुरोगामी दहशतवादी'.....

काल 'गर्भसंस्कार : एक थोतांड' या विषयावर दिशाभूल करणारा लेख छापल्याबद्दल आम्ही लोकसत्तेचा निषेध नोंदवलाच. मात्र; केवळ निषेध न करता आयुर्वेदाची बाजू याविषयीची बाजू मांडणारा लेखदेखील लोकसत्तेला पाठवा अशी सूचना कित्येकांनी केल्यामुळेच कित्येक ज्येष्ठ वैद्यांना तसे लेख पाठवण्यास सांगितले. त्यावर 'लेख छापणार नाही; हवं तर प्रतिक्रिया द्या.' असं उत्तर या वर्तमानपत्राकडून देण्यात आले आहे.
म्हणजे आम्ही फक्त एकच बाजू मांडत राहणार; आणि दुसऱ्यांची मुस्कटदाबी करत राहणार. ही कसली भिकार पत्रकारिता??
आधी एकांगी लेख छापायचे;वर प्रत्युत्तरे छापण्यास नकार द्यायचा. प्रा.शेषराव मोरे म्हणाले होते तो पुरोगामी दहशतवाद हाच !!
लोकसत्ता घेणे आम्ही केव्हाच बंद केले आहे; मात्र 'असा निषेध वगैरे नका नोंदवू; दुर्लक्ष करा.' असे उपदेशाचे डोस आम्हाला पाजणाऱ्या आमच्याच मार्गदर्शकांनी याबाबत विचार करावा.
लोकसत्ता.....आपली 'प्रेश्यावृत्ती' सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!!!

-वैद्य परीक्षित स. शेवडे

वैद्य पानसे यांची पोस्ट वाचली.
>>
लेखकाचा प्रथमदर्शनी उद्देश आयुर्वेद नावाखाली malpractise करणाऱ्या व्यावसायिकान विरूध वाटत होता . परंतु लेख वाचताना पुढे पुढे आयुर्वेद शास्त्राची उडवलेली खिल्ली बघून डोळ्याला पट्टी बांधून हत्ती चाच्पद्णाऱ्या माणसांची गोष्ट आठवली .>>
मलातरी यात कुठे खिल्ली जाणवली नाही.
>>आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास.
असे लेख्क द्वयीनी लिहिले आहे. खिल्ली कुठे आहे ?

लेखातला हा मुद्दा मुळीच पटला नाही. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेल्यावर फार फार तर १०-१५ मिनिटे चेकप केले जाते. त्यातही आपण काही प्रश्न विचारले तर त्याचे क्लॅरिफिकेशन दिले जाते. कोणाला वेळ आहे हो १-२ तास रुग्णाशी बोलायला?कोणत्याही स्त्रि रोगतज्ञाने 'माता संवर्धन' केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. अर्थात त्यामुळेच गर्भसंस्कार केंद्रे फोफावली आहेत. गर्भसंस्काराच्या नावाखाली मातासंवर्धन होत असेल तर काय हरकत आहे? काहीतरि बेनिफिशियल घडतय ना. >>>>> अगदी 'माता संवर्धन' करतात की ते माहित नाही Happy इथे अमेरीकेततर आहेच पण पुण्यातही गायनॅक-ओबी कडे ही सर्व माहिती दिली जाते. अर्थात रेग्युलर चेकअपच्या वेळी नाही पण वेगळं सेशन प्लॅन केलं जातं. शिवाय काही काही डॉक्टरांच्या टीममध्ये लॅकटेशन स्पेशालिस्ट, व्यायाम करून घेणार्‍या 'डॉक्टर्स' असतात, ज्यांना तुमची केस पूर्ण माहीत असते. त्याही वेगळी सेशन्स घेतात. दिनानाथ सारख्या रुग्णालयात पाचव्या सहाव्या महिन्यात हॉस्पिटलची टूर, इमर्जन्सीच्या वेळी काय करावं, कुठे जावं, वगैरे सांगणारी सेशन्स असतात. तिथेही लॅक्टेशन संदर्भात स्पेशल सेशन्स आहेत. अर्थात हे सगळं स्वतः प्लॅन करावं लागतं. पुण्यातल्या पेडी डॉक्टरांनी बाळाच्या पहिल्या आठवड्याच्या चेक-अपच्या वेळी एक तासाचं बौद्धिक घेतलं होतं आणि फक्त तुम्हीच नाही घरातल्या ज्येष्ठ व्यक्तिंनाही घेऊन या असा निरोप दिला होता.. Happy त्यात फिडींग, डायपर चेंजिंग पासून ताप, जुलाब झाल्यावर काय करावं इथपर्यंत सगळी माहिती सांगितली होता.

भारतात एक सुर बघितला की गर्भसंस्कार वगैरे गोष्टी म्हणजे फार भारी.. पण ह्या डॉक्टरांच्या सेशन्सना गेलं की 'आमच्यावेळी असलं नव्हतं.. आम्हाला इतकी पोरं झाली तेव्हा नाही कधी गेलो आम्ही कधी' वगैरे.. अर्थात घरातून योग्य तो सपोर्ट असला की प्रॉब्लेम येत नाही..

त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. >>>> ह्याबद्दल डॉक्टरांनी जरा प्रकाश टाका. बेबी सेंटर वरही कुठल्यातरी आठवड्याच्या माईलस्टोनमध्ये कान पूर्णपणे डेव्हलप झाल्याने बाळाला आता ऐकू यायला लागलं आहे, तर बाळाशी गप्पा मारा..चांगली सुदिंग गाणी मोठ्याने ऐका किंवा म्हणा वगैरे वाचल्याचं आठवतं आहे..

डॉ गायकवाड आणि डॉ. दिमा, माहितीबद्दल धन्यवाद.

ते गर्भसंस्कार वगैरे जाउदे, मला हर्पेन चे हे आर्ग्युमेंट आवडलंय-
" 'पुरोगामी' पणा मधे दुसर्‍याविषयी न बोलता / बघता, आपल्यातला वाईटपणा आधी दूर करावा असा संकेत आहे ना म्हणे"..
इट्स क्लेव्हर.
वापरण्यात येईल. चालेल का?

बाकी, नेहमीचेच. "आमच्या संस्कृतीत सगळं सगळं महान!" हे एकदा पक्कं ठरवून टाकायचं आणि तेच प्रत्येक धाग्यावर रेटायचं. म्हणजे मुद्द्यांचा प्रतिवाद करायचं कारणच उरत नाही.

डॉ रुपाली पानसेंच्या लेखात मूळ लेखातील मुद्द्यांचे कुठेही खंडन नाहिये. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील काही तज्ञ जास्त पैसे घेतात, फसवाफसवी करतात अशी सुरुवात आहे. ते खरे असले तरी त्याचा आणि गर्भसंस्कार थोतांड असण्याचा काही संबंध नाही (वैद्यकीय व्यवसायातील मालप्रॅक्टिस व इतर व्यवसायातील मालप्रॅक्टिस यांची टक्केवारी याचा काही डेटा आहे का? जर ती समसमान असेल तर तो एकूण आपल्या देशातील धंद्यातील मालप्रॅक्टिसबद्दलचा डेटा आहे, वैद्यकिय व्यवसायाबद्दलचा नसेल).

जुन्या काळी वायरस/बॅक्टेरिया माहिती नव्हते म्हणुन एम्पिरिकल डेटा/ज्ञान वापरून काही नियम बनवले. त्याला देव/पिशाच्च/भिती यांची जोड दिली. त्याने मानवजातीचा फायदाही झाला असेल. मात्र आज आता आपल्याला माहिती आहे ना की सूक्ष्म जीव म्हणजे काय, त्याने काय होते. हीच बाब इतर सर्व मुद्द्यांची. मग शास्त्राच्या प्रगतीतील पुढील पायरी वापरायची की मागची हे सुज्ञ माणसाने ठरवावे. या तर्काने आयुर्वेद थोतांड ठरत नाही तर ते कालबाह्य आहे इतकेच ठरते.

>>
मंत्राचा गर्भाच्या मानसिक वाढीवर कसा परिणाम होतो यावर आधुनिक शास्त्रात च बराच अभ्यास होतोय . google it . त्याबाबत विस्ताराने लिहित नाही. Modern science accepts the psychology. And psychology has core belief that the intrauterine life of any person does get influenced by the behaviour and psychological condition of mother.
>>
हे तर फारच दुर्दैवी तर्कट आहे. गूगल कधीपासून माहितीचा 'खात्रीशीर' स्त्रोत झाला?

लोकसत्ता त्यांनी प्रकाशित केलेल्या लेखनाच्या विरोधात असलेल्या मतांना स्थान देत नाही हे अशक्य आहे. अगदी त्यांच्या खूप वादग्रस्त ठरलेल्या अग्रलेखावरही दोन्ही बाजूच्य प्रतिक्रिया प्रकाशित केल्याच होत्या. लेख न छापता प्रतिक्रिया छापली तर मुस्कटदाबी कशी होते?

हा लेख छापला म्हणून लोकसत्तेचा निषेध हे भारी आहे.
वैद्य खडीवालेंचे एक सदर गेले वर्षभर (वा त्याहून अधिक काळ) लोकसत्तेतच प्रकाशित होत होते. त्याचे संकलन व पुस्तकही आताच प्रकाशित झाले आहे.
सो कॉल्ड उत्तरातला पहिला मुद्दा : अ‍ॅलोपथीतल्या लुटीबद्दल का बोलत नाही हे तर्कट नेहमीचेच आहे (उदा: आमच्याच सणांच्या/प्रथांच्या बाबत का, त्यांच्या का नाही Wink ) पण असे म्हणताना गर्भसंस्काराचा नावाखाली लूट मान्य केले असे नाही का होत?

आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील काही तज्ञ जास्त पैसे घेतात, फसवाफसवी करतात अशी सुरुवात आहे. ते खरे असले तरी त्याचा आणि गर्भसंस्कार थोतांड असण्याचा काही संबंध नाही. +1

लोकसत्ता बद्दल भरत मयेकर यांच्या पोस्टशी अगदी सहमत.
नेहमीच लोकसत्ता मध्ये येणारे लेख आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया वाचल्या आहेत..

"गर्भसंस्काराच्या विरोधात लिहिलंच कशाला?" असा काहींचा आक्षेप दिसतो आहे.

त्यांनी पूर्ण लेख वाचला नाही का?
लेखात हे लिहिलंयः "गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात."

आणि पुढे लिहिले आहे: "गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!"
या दुसर्‍याभागाबद्द्लच लेख आहे हा.

आणि या लेखात आयुर्वेदाची खिल्ली उडवली आहे असं काही म्हणातात. पण तसे कुठे लेखात जाणवले नाही. बहुतेक गर्भसंस्कार करणारे आयुर्वेदाच्या मुखवट्या मागे दडुन फसवणुक करताहेत, असं लिहिलं आहे.

लेखात हे लिहिले आहे: "दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे."

मग:
अ‍ॅलोपथीच्या लुटी बद्दल का लिहित नाहीत? ..
लिहायला हवे. पण कुठे? याच लेखात? म्हणजे गर्भसंस्कारातील ’मंत्राने गर्भावर परिणाम’ या विरोधात लिहायचे असेल तर आधी आजकाल अ‍ॅलोपथी डॉक्टर्स कशी लुटमार करतात वगैरे याबद्दल लिहावे आणि मगच मुद्द्याला हात घालावा?

लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब.
विश्वासर्ह क्लिनिकल ट्रायल्स चा अभाव हाच आयुर्वेदासमोरचा आज मुख्य प्रश्न आहे.

http://www.iosrjournals.org/iosr-jdms/papers/Vol14-issue2/Version-7/L014...
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3215413/
https://nccih.nih.gov/health/ayurveda/introduction.htm

याबद्दल काही पावल नुकतीच उचलली जात असल्याचं दिसतंय...

http://www.newindianexpress.com/cities/kochi/System-in-Place-to-Monitor-...
http://www.deccanchronicle.com/141121/nation-current-affairs/article/cli...
http://www.ihstuniversity.org/index.php?option=com_content&view=article&...

दुपारीच मी इथे लिहिणार होतो की चर्चा आयुर्वेदीक विरुद्ध अ‍ॅलोपेथी वर जाऊ देऊ नका.

खरे तर आयुर्वेदाला सपोर्ट करणार्‍यांनीच त्यातील थोतांड भाग उघड करून, त्याला विरोध जतवून आयुर्वेदाची प्रतिमा साफ केली पाहिजे, पण आपली रेषा मोठी दाखवायला दुसर्‍याची पुसून छोटी करायला बघणे हाच दुर्दैवाने बरेचदा आपला प्रतिवाद असतो.

अजूनही गर्भसंस्काराच्या बाजूने मुद्देसूद असे काही या धाग्यावर आलेले नाहीये !
त्यामुळे माझ्यासारखे जुजबी ज्ञान ठेवणारे सामान्य वाचक इथे गर्भसंस्काराबद्दल आपले प्रतिकूल मत बनवायच्या मार्गावर आहेत.

>>>> आणि पुढे लिहिले आहे: "गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!"
या दुसर्‍याभागाबद्द्लच लेख आहे हा. <<<<<<
असेल असेल.....
पण ते गर्भसंस्कार वगैरे जाऊद्याहो..... इथे "सेल्फ मेडीटेशन" की कायश्यास्या द्वारे स्वतःच्या बॉडीशीच संवाद साधण्यावर, बोलण्यावर भर दिला जातो म्हणे.... अन त्यामुळे दुखणी बरिही होतात म्हणे.... यावर कोणी काही प्रकाश पाडेल काय?
नै काये ना, की एकदा कळले असते की हे "मेडीटेशन" वगैरे आयुर्वेदिक मागास थोतांडे आहेत, तर मग ग्यारण्टीने विरोध करायला बरे.... जास्त खोलात जायलाच नको. अन जर आधुनिक शास्त्राचे अत्याधुनिक विद्वान मेडिटेशन मान्य करीत असेल तर लगेच त्याचा डोळे झाकुन वापर करायला हवा, नै का? Happy

लिहायला हवे. पण कुठे? याच लेखात? म्हणजे गर्भसंस्कारातील ’मंत्राने गर्भावर परिणाम’ या विरोधात लिहायचे असेल तर आधी आजकाल अ‍ॅलोपथी डॉक्टर्स कशी लुटमार करतात वगैरे याबद्दल लिहावे आणि मगच मुद्द्याला हात घालावा?

मायबोलीच काय पुर्ण सोशल मिडियावर हल्ली सगळ्यांची हीच अपेक्षा असते. तुम्ही अमुक एका त्रुटी बद्दल बोलताहात ना? मग तुमच्या त्या अमुकतमुकाचे काय? आधी त्याचे बोला... Happy

निकोप चर्चा, मग ती कुठल्याही विषयावर असो, करणे अशक्य झालेय. चांगले काहीही वाचायला मिळत नाही कारण या एका कारणामुळॅ लिहिणारेही लिहायचा कंटाळा करतात. मायबोलीवर काही चांगल्या लेखमाला या कारणामुळे बंद पडल्या. Sad

गर्भसंस्काराच्या समर्थनार्थ पोस्टी टाकणार्‍यांनी 'जे भारतीय आहे, ते टाकुन दिले जाते' अशा अर्थाच्या ओव्या रचुन आपली महान संस्कृती वगैरे या डॉ.द्वयींच्या लेखामुळे लयास जाते की काय अशी 'सायलेंट' टाहो फोडला आहे. Wink असो.

लिंबुशास्त्री या धाग्यावर येतीलच अशी खात्री होतीच. आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी आपली शेंडी परजुन टिपिकल मुक्ताफळे उधळली आहेतच. त्याची शेवटची ( 29 September, 2015 - 09:31) पोस्ट म्हणजे शस्त्र टाकुन पळालो पण पळणार्‍यांत पैला आलो अशा आविर्भावाची आहे.. हेही असोच. Wink

पराग यांनी वर लॅक्टेशन स्पेशालिस्ट वगैरे लिहिले आहे. कुठे आहेत असे स्पेशालिस्ट? मुंबईत आहेत का ? लॅक्टेशन विषयी गायनॅक थोडेफार सांगतात. प्रसूती नंतर नर्स मार्गदर्शन करतात. खरे तर गर्भसंस्कार वर्गातून या विषयी नीट माहिती दिलि गेली होती.

मंत्र सांगितले गेले होते पण त्याचबरोबर दर आठवड्याला होणारी गर्भाची वाढ याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले गेले होते. सिझेरीयन आणि नॉर्मल प्रसूती याबद्दल तपशीलवार माहिती दिली गेली होती. गायनॅक करतात का हे सगळं? हे वरचे लेखक त्यांच्या पेशंटना एक तास सिझेरीयन आणि नॉर्मल प्रसूती याबद्दल तपशीलवार माहिती देतील का?

म्हणजे वर लेखकांना वाटते तसे नुसते मंत्र पुटपुटायला सांगितले नवह्ते. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
या विषयाला अ‍ॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा रंग देणे चुकीचे आहे.

मला इतकंच म्हणायचं आहे की, जर गर्भीणी आणि तिच्या गर्भाच्या हिताच्या शिकवण्या घेतल्या जात असतील, त्या गर्भीणीला परवडत असतील तर त्या गर्भसंस्कार नाहीतर आणी कोणत्याहि अबक नावाने का घेतल्या जाईनात, अपाय तर होत नाही आहे ना?

डॉक्टर चांगला धागा सुरु केला आहे.

मी गेलो होतो अश्या एका वर्गाला (फी ७००/- दोघांची जेवण + चहा सहित). मला कुठे त्यात चुकीचे वाटले नाही. एका दिवसाचा मार्गदर्शनपर वर्ग होता.
त्यात गर्भाची वाढ प्रत्तेक महिन्याला कशी होत जाते याचा एक माहितीपट दाखवला. तुमच्या घरात येणार्‍या बाळाचे स्वागता साठी तुम्ही कश्या प्रकारे तयार रहायला हवे. त्या काळात घरातले वातावरण कसे हवे. स्त्री चा आहार काय असावा. वडिलांची जबाबदारी काय असे. कोणत्याही पुड्या विकल्या गेल्या नाहीत शतावरी कल्प वगळता. पुस्तके मात्र खुप होती.

मला वाटते विभक्त कुटुंब पद्धतीत हे मार्गदर्शन नक्कीच गरजेचे आहे. एकत्र कुटुंब असताना घरी जर जुने जाणते आजी-आजोबा असतील तर या वर्गाला जाण्याची गरज नाही ते मार्गदर्शन घरी मिळतेच.

Pages