ग्रीन राईस/ फ्राईड जीरा राईस

Submitted by सीमा on 22 September, 2015 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती अख्खा सव्वा कप कप
जीरे पाव कप
पालक २ कप
हिरव्या मिरच्या आवडीनुसार पातळ चिरून,
हिरवी ढब्बु मिरची,
कांद्याची पात (असेल तर)
पातळ लांबडा कांदा चिरुन
हिरवे फ्रोझन वाटाणे,
तमाल पत्र ४/५
मिरे अख्खे ८/१० दाणे
दालचिनी २/३ तुकडे
लवंगा २/३ ऑप्शनल
वेलची २/३ ऑप्शनल
तेल्/तुप

क्रमवार पाककृती: 

तांदुळ धुवुन निथळत ठेवून त्याचा अगदी कोरडा,फडफडीत भात करून घ्यावा. मी मायक्रोवेव्ह मध्ये करते. २० मिनिटात भात होतो आणि अगदी फडफडीत भात होता.
हा भात म्हणजे जीरा राईसच पुढच व्हर्जन आहे. सो त्यानुसार भात करून घ्यावा.
तेल साधारण २/३ पळी आणि दोन चमचे तुप मिक्स करून गरम करावे. त्यात सर्व अक्खे मसाले घालून शेवटी जीरे टाकावेत.
सर्व भाज्या परतून घ्याव्यात. भाज्या फ्राईड राईस सारख्या कच्च्याच ठेवायच्या.
भाज्या परतल्या कि भात मिक्स करून चविनुसार मीठ घालावे. एक वाफ आणुन वरून एक दोन चमचे तुप सोडावे.
भात तयार आहे.
प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

ह्या भाताला फ्राईड जीरा राईस म्हणता येईल. थोडक्यात फ्राईड राईस आणि जीरा राईसचे काँबो.
भाज्या हव्या तशा बदलू शकता. मी कधी कधी मेथी, कोथिंबीर, बारीक फरसबी पण घालते.
पालक ,वाटाणे,सिमला मिरची मस्ट आहे.
सर्व प्रमाण अम्दाजे दिल आहे. परत केला कि अ‍ॅक्युरेट प्रमाण देवून अपडेट करेन रेसीपी.

माहितीचा स्रोत: 
MP ची मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतोय. धन्यवाद रेसीपी टाकल्याबद्दल.
आज थोड्या प्रमाणात करुन बघते, जमलाच तर मग जास्त प्रमाणात करता येईल.

मी केव्हापासून विचार करतोय , नक्की कोणते दोन जिन्नस बदलले? गणेशोत्सव इफेक्ट. तो चालू असेतो नेहमीच्या पाककृती लिहायला बंदी आहे - हुकुमावरून.

साधना, चिरून टाकला तर बरचं. आमच्याकडे मी बेबी स्पिनॅच आणते त्यामुळ नाही चिरत.
फोटो आणि प्रमाण आज उद्या करून अपडेट करते.

पावभाजी किंवा पनीरच्या भाजीबरोबर वगैरे बरोबर असा सौम्य चविचा पण तरीही फॅन्सी भात छान जातो. करुन बघाच एकदा.
भाज्यांच प्रमाण हव तस कमी जास्त करुन घ्या.फक्त हिरव्याच भाज्या घाला म्हणजे झाल.

भरत Happy चालवून घ्या यावेळेपुरत.

काल करुन पाहिला मस्त झालेला. नवर्याने उद्याच्या पार्टीसाठी पावभाजीसोबत हाच भात ठेवायला सांगितला आहे Happy

धन्यवाद सीमा Happy

फक्त तीन किलो तांदुळ आणि १ किलोभर भाज्या हे प्रमाण बरोबर होईल ना ?
आणि एव्हढ्या प्रमाणात भाज्या परतताना त्यांना पाणी सुटेल असं वाटतय मला तसेच एव्हढा भात मिक्स करताना कणी मोडण्याचीही शक्यता आहे. काय खबरदारी घेऊ शकते. थोडं थोडं घेऊन मिक्स करायला अजिबात वेळ मिळणार नाही. Happy

सायो पाव वाटी अल्मोस्ट. कारण जीरा राईस आहे ना. Happy
केल गं अपडेट.
निलसन भाज्या जर का भरभर परतल्यास तर नाही अज्जिब्बात पाणि सुटणार. पालक शेवटी घाल. आणि लगेच भात घाल. अगदी मोठा पॅन किंवा कढई घे. परतायला ऐसपैस जागा पाहिजे. पातेल्यात परताता येत नाही. आणि आपला तळण्याचा झारा असतो तो वापर. त्याने भात तुटत नाही. झाकण ठेवू नकोस तयार भातावर.

अगदीच मोठ भांड नसेल तर भाज्या शिजवून घे आणि परातीत मिक्स करून घे भात आणि मग परत गरम कर ऐनवेळी. काही प्रॉब्लेम येत नाही.

मी वरती बेदाणे लिहिले नाहीत. ते ही मस्त लागतात ह्या भातात.

सीमा तू अमेरिकेत आहेस ना? मग फोटो काढायची सोय नाही का? Happy फोटो शिवाय कृती अपुर्ण वाटते सीमाताई.

इथे तमिळ लोक पुदीना राईस आणि कढीपत्याचा राईस करतात. तोही हिरवा दिसतो छान.

कृती छान.

फोटो काढण्यासाठी भात करायला लागेल ना? की अमेरिकेत चालतं त्याशिवाय? या अमेरिकावाल्यांचं काही सांगता येत नाही ब्वा.

मस्त पा.कृ. जीरा राईस नुसता खाल्ला जात नाही, त्यासोबत डाळ असावी लागते.पण भाज्यांमुळे हा राईस नुसता खायलाही बरा वाटेल असं वाटंतंय.

करुन बघेन.

लेकाला डब्यात राईस व्हरायटीज आवडतात. ही एक अ‍ॅडीशन.

धन्यवाद.