कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे

Submitted by मामी on 11 August, 2015 - 15:19

आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले

या भागात मात्र भरपूर प्रचि आहेत. पॅसिफिकचे सगळे नखरे दाखवायचे आहेत ना?

४ जुलै. आज रोडट्रिप वर निघायचा दिवस. एलेला रामराम करायचा दिवस.

सकाळी उठून गाठोडी बांधली. पोराटोरांना तयार केलं. खाणीपिणी उरकली आणि लक्षात आलं की सामान अवाढव्य झालंय. गाडीत ठेवणार कसं आणि कुठं?????? प्रसंग बाका होता. पण कसं कोण जाणे, मधल्या सीटच्या पायाखाली असलेल्या दोन कंपार्टमेंटस आणि सगळ्यात मागे सामान ठेवायच्या जागेत आम्ही आमच्या अचाट कल्पक बुद्धीनं ते बसवून दाखवलं. अगदी पहिल्यांदा ड्रायव्हरला दिसत नव्हतं. पण सामान रीअ‍ॅरेंज करून तिथेही पोकळी निर्माण करून दाखवली. फक्त मागचं दार उघडताना साधारण तीन लोकं सामान पकडायला उभे असले की काम होणार होतं.

आता गाडीच्या मुख्य भागात सात मंडळी, एक खाऊची पिशवी, एक थर्माकोलचा आईसबॉक्स (त्यात पाणी आणि कोल्ड्रिंक्स आणि वारुण्या) आणि एक कचरा बॅग असे ऐवज दिसत होते. ठळक ठळक कचरा जरी कचरा बॅगेत गेला तरी खाल्लेला प्रत्येक खाऊ प्रेमानं गाडीलाही भरवला जात होता हे अगदी उघड होतं. हा कचरा पुढे लॉस आल्टोसमध्ये गेल्यावर व्हॅक्युम क्लिनरनं काढला.

भल्या पहाटे असे साडेअकराला म्हणजे तसं पाहिलं तर आमच्या वेळेआधीच निघालो होतो. पीसीएचला लागलो :

पहिला थांबा - टुमदार सांता बार्बरा आणि ४ जुलैची परेड

नंतर थांबलो सॉल्वँगला. हे एक डॅनिश शहर आहे. फार सुंदर. घरं, दुकानं सगळ्यावर डच संस्कृतीचा प्रभाव.

संध्याकाळ होत आली आणि आम्हाला प्रचंड भूक लागली होती. एका कोणत्यातरी गावात शिरून एक थाई रेस्टॉरंट पकडून जेवलो. आणि मग आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. त्या दिवशी सॅन सेमियन ला मुक्काम होता. रात्र झाल्याने ४ जुलैची आतषबाजी ठिकठिकाणी दिसत होती. आम्ही जेमतेम मोटेलवर आलो, खोल्या ताब्यात घेतल्या आणि ताणून दिली.

आमच्या सॅन सेमियनच्या खोलीतून दिसणारे दृष्य. पॅसिफिकच्या दिसतोय ना?

दुसर्‍या दिवशी पुन्हा लवकर बाहेर पडलो. कालचा बराचसा रस्ता आतून जात होता. आज मात्र पॅसिफिकची विविध रुपं बघायला मिळणार होती.

एके ठिकाणी सील्स वाळूत पहुडले होते. इतका घाण वास येत होता त्यांचा.

रगेड पॉइंट नावाच्या एका जागी तर इतका सुरेख व्ह्यू पॉइंट होता. त्या वेळी नेमका माझा फोन कार मध्ये राहिला होता. त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीयेत. रायगड कडे असतील. तिला टाकायला सांगते.

बिग सर मधल्या एका सुंदरशा सुवेनिअर शॉप मधून

हे सुवेनिअर शॉप अतिशय सुरेख वस्तुंनी खचाखच भरलं होतं. कितीतरी भारतीय वस्तूही होत्या त्यात - लखनवी कुरते, उशांचे अभ्रे, देवांवर पुस्तकं आणि हनुमानाचा पुतळाही होता. मी आणि बहिण तन्मयतेनं इथल्या वस्तू न्याहाळत होतो. तर बहिणीचे थोरले चिरंजीव कंटाळले. "आई, there is nothing here. It is all junk." अशी मोठ्या आवाजात आकाशवाणी केली. बापरे, दुकानातलं सगळं पब्लिक - अगदी विक्रेत्या बायकांसकट - काय धो धो हसलंय. धाकट्याला तर प्रवास सुरू केल्यापासून केव्हा एकदा हॉटेलवर पोहोचतोय अशी ओढ लागलेली. प्रवास सुरू झाल्यापासून एकच धोशा "Are we almost there?" हॉटेल नाहीतर डिपार्टमेंटवर जाणे हे त्यांच्या आयुष्यातलं एकमेव ध्येय होतं. डिपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट. आम्ही चुकीचं बोलत असून ते म्हणताहेत तो शब्दच बरोबर असाही त्यांचा आग्रह होता. बरं आम्हाला हसायचीही चोरी. आम्ही हसलो की त्यांचा घोर अपमान होत असे. शेवटी आम्हालाही तोच शब्द आवडला. आम्हीही आमच्या घराला डिपार्टमेंट म्हणायला लागलो.

एका ठिकाणी पाण्यात पाय बुडवले.

पाणी एकदम स्वच्छ

संध्याकाळी मॉनरेला पोहोचलो. हे ही एक छोटसं पण सुरेख शहर आहे. इथे पॅसिफिक ओशन नाही पण त्याचाच भाग असलेला मॉनरे बे आहे. आम्ही अगदी अ‍ॅक्वेरियमच्या जवळच हॉटेल घेतलं होतं. त्यामुळे ते अगदी शहरात होतं. हॉटेल समोरच एक भारतीय रेस्टॉरंट. दोन तीन भारतीय दुकानं. बे एरीयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत याची झलक होती ती.

मॉनरे :

इथला अ‍ॅक्वेरियम छान आहे म्हणतात. पण खरंतर इतकाही काही उच्च नव्हता. सॅन फ्रान्सिस्कोच्या सिटीपासमध्ये मॉनरे किंवा सॅन फ्रान्सिस्को चा अ‍ॅक्वेरियम असा ऑप्शन असतो. आम्ही इथे पैसे भरून अ‍ॅक्वेरियम पाहिला आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन सिटी पास घेतला. तो सिटीपास इथेच घेऊन टाकला असता तरी चाललं असतं.

पाच तारखेला मॉनरेला राहून दुसर्‍या दिवशी अ‍ॅक्वेरियम, जेवण वगैरे अगदी आरामात उरकून आम्ही प्रस्थान ठेवलं आणि साधारण ४.३०-५.०० वाजता साराटोगाला आतेबहिणीकडे आलो. रात्री तिच्याकडे डिनर करूनच मग अगदी उशीरा आमच्या लॉस आल्टोसच्या डिपार्टमेंटमध्ये दाखल झालो.

(क्रमशः)

पुढचे भाग -

कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा.. डोळे निवले अगदी ! पीसीएच हा माझा सर्वात आवडता रस्ता आहे. ! ते मॉनरे भारी दिसतंय.. बघते कुठे आहे वगैरे.. तू एल ए मधून डिरेक्टली सान्ता बार्बरालाच गेली.. सॅन्ता मोनिका वगैरे नाही लागले का? की नंतर घेतला हायवे वन?

ही रीक्षा माझ्या पीसीएच भटकन्तीची..

फक्त मागचं दार उघडताना साधारण तीन लोकं सामान पकडायला उभे असले की काम होणार होतं.>>>:हाहा:
बाकी पीसीएच अगदीच आवडता... हा भागसुद्धा छानच ! 17-Mile Drive नाही केला का?

मामी, त्या फिश हॉपर रेस्टॉरंटमशे जेवलात की नाही? तिकडे माश्याच्या अप्रतिम डिशेस मिळतात. व्हेजीटेरीअन पास्ता वगैरेपण ऑप्शन असतो. मॉनरेमधे संध्याकाळच्या वेळी किनार्‍यावरून आणि त्या मार्केटच्या रोडवरून फिरणं एकदम छान अनुभव.

वॉव.. सुंदर फोटू.. मस्तं..

मामे फ्रिस्को डाऊन टाऊन ला फिशरमन्स व्हार्फ ला जाऊन क्लॅम चौडर सूप ट्राय केल्तंस कि नै??
फ्रिस्को सर्वात आवडतंय माझं.. क्लायमेट वाईज,

हा हाईवे तोच आहे का जो आयरन मॅन २ मधे दाखवला आहे (स्टार्क तेव्हा पेपर पॉट्स साठी स्ट्रॉबेरीज विकत घेतो)

मला नक्की सीन आठवत नाहीये. पण टोनी स्टार्कचे घर मालिबूला(पीसीएच जवळ आहे) दाखवले आहे व एक प्रसिद्ध जागा आहे पीसीएचची ती आहे पहिल्या भागात. तो फोटो टाकते नंतर.

धन्यवाद लोक्स!

सॅन्ता मोनिका वगैरे नाही लागले का?

>>> बस्के, सांता मोनिका वगैरे आधीच दोनदा झालं होतं. मग वेळ वाचवायला सुरवातीला फ्रीवे घेतला.

फिश हॉपर रेस्टॉरंटमशे जेवलात की नाही? >>>> अंजली, मी तरी नाही जेवले. आमच्यातली बाकीची मंडळी जेवली का ते माहित नाही. दोन वेगळ्या गृपात फिरत होतो सकाळी. आणि नेक्स्ट टाईमाकरता काहीतरी आकर्षण हवं ना? Wink

मॉनरेमधे संध्याकाळच्या वेळी किनार्‍यावरून आणि त्या मार्केटच्या रोडवरून फिरणं एकदम छान अनुभव. >>> हो अंजली. आम्हीही मस्त फिरलो असेच संध्याकाळी. Happy

मामे फ्रिस्को डाऊन टाऊन ला फिशरमन्स व्हार्फ ला जाऊन क्लॅम चौडर सूप ट्राय केल्तंस कि नै?? >>> वर्षुताई, जितके वेळा फिशरमन्स वार्फवर गेलो तितके वेळा खाल्लं ते क्लॅम चाउडर इन सावर डो ब्रेड बोल.

पण खरं तर जे क्लॅम चाउडर मी युनिव्हर्सल आणि कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचर मध्ये खाल्लं ते चवीत सॅन फ्रान्सिस्कोच्या क्लॅम चाउडरपेक्षा नक्कीच उजवं होतं.

सोन्या>> हो अगदी अगदी. मला तोच शॉट आठवला.

मस्त फोटो आणि निळाई. परेड क्युट. मी ह्या रस्त्या बद्दल खूप रम्य स्वप्ने पाहिलेली आहेत. पर वो किस्सा फिर कभी.

आहा, मस्त फोटो.. अफाट निळाई पाहुन डोळे निवले.

रच्याकने, दुस-या फोटोचे वर्णन वाचताना फोटोत लाल ड्रेसमधली मामीच आहे असे क्षणभर वाटले.. (क्षणभर कशाला, जितक्या वेळा फोटो पाहिला तितक्या वेळा तसेच वाटले Wink )