Submitted by Asawari D on 30 July, 2015 - 06:57
lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ? Specially Health related issues sathi barech doctors hech suchavtat.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर अनु. लाईफस्टाईल आणि
बरोबर अनु. लाईफस्टाईल आणि तदनुषंगाने येणारं पीअर प्रेशर हे प्रत्येकानं स्वत:पुरतंच मर्यादित ठेवावं. कुटूंबातल्या इतर व्यक्तींवर ते लादू नये. मी असं करते,.तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही करा असंच मुलांशीही वागलं पाहिजे.
धागा रूळ सोडता सोडता पुन्हा रूळावर येतोय. तरीही पीअर प्रेशर हा लाईफस्टाईलचा एक भाग आहे. त्यावर तपशीलात चर्चा करायला वेगळा धागा उघडावा का?
इथे Health related issues
इथे Health related issues साठी lifestyle Changes ची चर्चा चालू आहे ना , मग त्यात 'बर्थडे पार्टी' वैगरे कुठून आली.
अरे हो खरंच, त्या दवणीय
अरे हो खरंच, त्या दवणीय बर्थडे प्रतीसादाच्या ओघात विषय तिथे गेला, परत बॅक टु हेल्थ आणा.
जीवनशैलीत बदल असे करा: १)
जीवनशैलीत बदल असे करा:
१) व्यायाम सुरू करा व रोज करा. ह्यात एअरोबिक्स कार्डिओ घाम गाळणे, वेट ट्रेनिन्ग. व योग ह्यांचा
समावेश असावा. वजन जास्त असल्यास ते कमी करा.
२) आहारतज्ञाच्या सल्ल्याने आहारात योग्य ते बदल करा. व ते कायम ठेवा.
३) ताण कमी करण्यासाठी उपाय करा.
४) घरचे लोक, मुले ह्यांच्यासाठी वेळ काढा.
५) एखादा छंद जोपासा.
६) कामातील आनंद व पैसा ह्याचे गणित जमते का ते विचार करून बघा व पावले उचला.
इतके सो पे आहे हे. गाडी कुठे मंगळापरेन्त जाउन आली .
आशुडी, धन्यवाद उलगडून
आशुडी, धन्यवाद उलगडून सांगितल्याबद्दल. कळले नीटपणे.
)
मी_अनु, अगदी परफेक्ट/अचूक मुद्दा.
(बायदिवे, पीयरप्रेशर न घेणारे बहुतेकवेळा "पुणेरी बाण्याचे" अस्तात असा अनुभव आहे
पण, जीवनशैली बदलायची, अगदी आमुलाग्र बदलायची वेळ कोणत्याही कारणाने (वैद्यकीय सल्ल्याने/परिस्थितीमुळे) आली, तर हा "पीयर प्रेशरचा" मुद्दा कळीचा ठरू शकतोय.
खरेच, पीयर प्रेशर वर तपशीलात चर्चा हवी.
कारण, आदर्शवत वाटणार्यांचे अनुकरण, अन झुंड करते म्हणून मी ही करतो/करावे लागते हे प्रेशर यात फरक असेलच तर तो समजुन घ्यायचा आहे.
Pages