lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ?

Submitted by Asawari D on 30 July, 2015 - 06:57

lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ? Specially Health related issues sathi barech doctors hech suchavtat.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर्स जे सुचवतात त्याचा तपशील डॉक्टर्सच देणार ना? Happy

=====================================

स्वतःहून काही बदल करता येतात. मी केलेले काही बदलः

१. रोज चालतो
२. घरातल्यांना जाणीवपूर्वक व अधिक वेळ देतो.
३. पोषक गोष्टीच खातो. आधीप्रमाणे नमकीन, बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे प्रकार आता खात नाही.
४. दररोज कोणालातरी एक लहानशी मदत करतो.

बदलायला हवे आहेत पण बदललेले नाहीत / बदलू शकलेलो नाही असे भागः

१. अल्कोहोल व धूम्रपान ह्यापासून दूर जाणे
२. फोनवरील संभाषण अधिक मैत्रीपूर्ण करणे

(मी फोनवर फार काळ बोलू शकत नाही. चिडचिड होते. ती स्वरात डोकावते. मग माणसे दुखावतात)

सध्या जे सुचले ते लिहिले.

Thank you ...changala salla dilayt. specially दररोज कोणालातरी एक लहानशी मदत करतो.

झोपायच्या, जेवायच्या, व्यायामाच्या वेळांम्धे , घटकांमधे चांगले आरोग्यपूर्ण बदल करणे.

रावी...Dhanyavad.

He badal me already karayla survat keliy.

Job sobaat he badal karne jara avghad jatay .

Pan badal karne avashak ahe.

नियमित व्यायाम. अगदी रोज,खुप वेळ नाही शक्य झाले तरी रोज १० मिनिटे सुर्यनमस्कार तरी करावे. हे अर्थातच वय आणि प्रकृतीला झेपेल यावर अवलंबून आहे.
बेफिं नी सांगितल्याप्रमाणे रोज चालणे व पौष्टिक आहाराचा समावेश. ताजी फळे,पालेभाज्या आणि मोड आलेले कडधान्य इ.
दिवसभरातून स्वतः साठी किमान अर्धा तास तरी द्या म्हणजे त्या वेळी अगदी तुम्हाला जे आवडते ते करता येईल किंवा तुमचे छंद जोपासता येतील. त्यामुळे ताणतणाव काही प्रमाणात कमी होतात.

मला फारसे बदल करावे लागलेच नाहीत कारण आईवडिलांनी लहानपणीच अत्यंत कडक्क शिस्तीमधे वाढवलेले. तेव्हांच्या सक्तिने लावलेल्या सवई आज फार उपयोगी आहेत हे कळतय.
पैकी काही बाबी.....
१) जेवढी भूक आहे त्यापेक्षा दोन घास कमीच जेवायचे. पानात काहीही टाकायचे नाही, व टाकावे लागेल इतके हावरटासारखे घ्यायचे नाही/वाढु द्यायचे नाही. अगदी भान्ड्यात पाणीही तितकेच घ्यायचे जितकी तहान आहे. जेवण संपल्यावर भांड्यात पाणी शिल्लक ठेवलेले चालायचे नाही. (नंतर भांडीकुंडी उचलणार्‍यांहातुन सांडू शकते ते होऊ नये ही अधिकची बाब).
२) अन्न हे पूर्णब्रह्म. जेवण जीभेच्या चोचल्याकरता नव्हे तर शरिर धारणेकरता आहे, जीभ फक्त सहाय्यापुरती. चवीचे चोचले नाहीत. अमकेच आवडते तमके आवडत नाही, अन इतकेच पाहिजे त्यापेक्षा कमी नको/जास्त नको असली थेर चालणार नाहीत. (नैतर पानावरुन उठुन जायचे लग्गेच अन उपाशी रहायचे ही ऑर्डर असायचि)
३) रात्री लौकर निजायचे, पहाटे लौकर उठायचे.
४) कोणतेच काम करायला लाजायचे नाही. अमकेच काम फक्त माझे/माझ्या लायकीचे, बाकी तुच्छ वा अशक्य असे चालणार नाही. प्रयत्न करायचाच. नाही जमले, हरकत नाही, पण प्रयत्न देखिल न करता हातावर हात ठेवून बसायचे नाही.
५) चोरी करायची नाही, फुकटचे खाणे/मिळवणे म्हणजे पाप, ते करायचे नाही. (कसलीच कुणाकडेही) भीकही मागायची नाही. (यामुळेच मी गेल्या दहा वर्षेपर्यंत, देवाकडेही काय मागायचे नाही याच वृत्तीचा होतो. कारण देवाकडे काही मागणे ही देखिल भीक मागणेच अशी धारणा. मग नंतर कळू लागले कि आईकडे काही मागणे ही जशी भीक नाही तशीच ती देवाकडे काही मागणे म्हणजे ही नाही.)
६) जे करायचे ते पूर्ण जीव ओतून करायचे. अर्धवटपणा/धांदरटपणा/घायताडलेपणा/वेंधळेपणा नको. हातचे राखुन करणे नको.
७) कपडे निटनेटके स्वच्छ हवेत, पण अमक्याच प्रकारचे, तमक्याच मेकचे वगैरे बयादि नाही. कपडा लज्जा रक्षणापुरता असतो, तितकेच महत्व त्याला द्यायचे. अगदी गबाळे राहु नये, पण उगाच शाईचा डाग पडला, इथे उसवला, तिथे रफु केला, इकडे काचला, तिकडे इस्त्री नाही वगैरेमुळे फेकुन द्यायचे नाहीत.
८) कोणत्याही गोष्टीचा पुरेपुर वापर (पुनर्वापर) केल्याखेरीज ति गोष्ट अशीच फेकुन द्यायची नाही.
९) महत्वाचे म्हणजे कुणा दुसर्‍याकडे बघुन त्याचा हेवा करायचा नाही, वा द्वेष/मत्सरही जाग्रुत होऊ द्यायचा नाही. जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाचे जगत असतो, त्याला जगु द्यावे, आपण तसे का नाही म्हणून रडत बसू नये. इतकेच वाटत असेल, तर अधिक कष्ट करावे, अधिक प्रयत्न करावे व बाबी मिळवाव्या, पण फुकाच्या इर्षेपोटी काहीही करू नये.
१०) लास्ट बट नॉट् लीस्ट, काम केल्याने माणूस मरत नाही हे पक्के लक्षात ठेवायचे व कामात गुंतवुन घ्यायचे. बारीकसारीक दुखण्यांचा बाऊ न करता शरीरास न लाडावता जगायचे.

माणसाचे बहुतेक सर्व प्रश्न स्वतःबद्दलच्या "अवास्तव-अतिरंजित स्वतःस कमसर लेखणार्‍या वा वाढीव महत्व देणार्‍या" कल्पनांमुळे निर्माण होतात. स्वतःबद्दल, अर्थात स्वतःच्या कर्तुमकर्तुम शारिरिक/मानसिक/बौद्धिक/आर्थिक शक्तिबद्दल वास्तव ज्ञात असेल, तर अडचण नसते, पण तसे नसेल, तर माणूस कायमकरता "असमाधानी/चिडचिडा/निराश/अतिउत्साहित वगैरे" होतो/रहातो. या मानसिक स्थितीचा प्रतिकुल परिणाम त्याच्या शरिरावरही होऊ लागतो. म्हणून शरीर ठणठणीत हवे, तर आधी मन कणखर व वास्तवाला सामोरे जाणारे बनवा.
मग ते कसे बनवावे? तर असलेल्या जीवनशैली विचारधारेला बदलुन बघावे. जगणार तेच, खाणार तेच, झोपणारही तिथेच, पण ते देखिल वेगळ्या पद्धतिने जगुन पहावे. हा बदल हवाहवासा वाटला, तर आत्मसात करावा, नकोसा वाटला तर सोडून द्यावा.

अजुन बरेच सांगता येईल. पण वरील बाबी करु लागल्यास शारिरिक्/बौद्धिक्/मानसिक शांतता लाभु लागते असा स्वानुभव आहे.

limbutimbu अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं.
क्रमांक १० \ ,₹₹₹₹₹£££€€€$$$$$

छान पोस्ट लिंबूकाका,
क्रमांक 9 चे आचरण हजारात एकाला जमावे, पण तसे वागायचे प्रयत्न तरी सर्वांनी करावेत.

पण माझ्यामते आजच्या जमान्यात तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायची असेल, तर
ग'फ्रेंड चेंज करावी.

प्रत्येक मुलाची लाईफस्टाईल ए बी सी अशी काहीतरी फिक्स असते.
गर्लफ्रेंड येते आणि त्याची एक्स वाय झेड करून टाकते.
तुम्हाला पुन्हा फिरून एबीसी करायची असेल तर फक्त ब्रेक अप करावा.
आणि त्याहून चेंज करायची असेल तर दुसरी ग'फ्रेंड शोधावी.
पण यात तुमची लाईफस्टाईल के एल एम एन ओ पी काहीही हं श्री होऊ शकते त्यासाठी तयार राहावे.

लिंबुटिंबू मस्त पोस्ट

मला आवडलेलं आणखी एक वाक्य (भाषांतरीत)

सकाळचा नाश्ता सम्राटासारखा, दुपारचं जेवण राजासारखं आणि रात्रीचं जेवण दरिद्री माणसासारखं.

पोस्ट आवडल्याचे आवर्जुन सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy
बस्के, घ्या की सेव्ह करुन उपयोगि असेल तर.

>>> तिच्यात मॉडिफिकेशन करायची वेळ आली तर काय-काय कराल? <<<<
दीडमा... सुयोग्य प्रश्न.
पण उत्तर अवघड नाही. आजचीच गंमत बघा. आज गुरुपौर्णिमा. सगळे जग आपापल्या गुरू/देवदेवता/माणसे यांचेकरता फुले/उदबत्या/हार/निरांजने वगैरे वापरुन स्तोत्रेवगैरे म्हणून शक्य व माहित त्या त्या सर्व प्रकारांनी गुरुचे स्मरण पूजन करताहेत. छान वाटते. बहुतेक शाळांतूनही आज निरनिराळे कार्यक्रम असतात.
संघ, सनातन वगैरे संस्थांमधे गुरुदक्षिणा अर्पण असते. जो तो आपापल्या परीने जितकी श्रद्धा असेल तितके करीत रहातो.
मी सकाळी उठलो. लिम्बीने आदेश सोडला की आज गजानन महाराजांची लहान पोथी वाचलीच पाहिजे.
वाचली.
मग लिंबी म्हणाली, की आज ऑफिसला जाताना थोडी फुले घेऊन जा, साहेबांना दे. मी बर म्हणले.
निघताना तिला सांगितले की फुले नेत नाही पण चॉकलेट घेऊन जातो. सगळ्या स्टाफलाच देईन. प्रत्येकाकडूनच काहीना काही शिकलोय ना? लिंबीलाही कल्पना आवडली. आणि आत्ता सकाळी तसेच केले.

आधीचे स्तोत्रपठण, दिवाउदबत्ती लावणे वगैरे एक प्रकारचे जगणे
आज त्यात थोडा अधिकचा बदल करुन, निव्वळ एखाददुसर्‍या व्यक्तिला गुरु समजुन्/मानुन्/स्विकारुन काही एक न करता, या जगातील यच्चयावत सजीवनिर्जिव बाबींकडून आपण प्रत्यही काही शिकतच असतो, त्याचे गुरुदक्षिणेचे प्रतिक म्हणुन ऑफिसमधिल सहकार्‍यांना एकेक चॉकलेट (किस्मी चा रु.२/- बार) दिले.
फार काही करायला लागलय का "वेगळे जगायला"?

माणसाला अजुनही दोन प्रकारे आनंद मिळू शकतो.
एक म्हणजे "आज मला काय मिळाले (लाभ झाला)" यातुन,
दुसरे म्हणजे "आज मी दुसर्‍यांस काय दिले (त्यागले)" यातुन.
दोनही आनंद श्रेष्ठ प्रकारचेच आहेत. पण दुर्दैवाने माणुस फक्त पहिल्या प्रकारातच आनंद सुखसौख्य समाधान शोधू पहातो. व विशिष्ठ नात्यातिल (मातापिता-अपत्ये / प्रियकर-प्रेयसी /नवरा-बायको/गुरु-शिष्य इत्यादी) विशिष्ठ कालखंड सोडला, तर देणे/त्यागणे हातुन घडतच नाही व त्या आनंदाला माणुस मुकतो.
जगण्यातील पद्धत बदलताना/ नविन आत्मसात करताना, "आज माझेकडून निरपेक्षरित्या दुसर्‍याकरता काय केले गेले" याचाही विचार करुन कृती करीत गेल्यास दुसर्‍या प्रकारचाही आनंद मिळू शकतो.

.

लिंबूकाका, पोस्ट मस्त आहे.
त्या मुद्यांमध्ये खोटेपणा करायचा नाही, दुतोंडीपणा करायचा नाही हेही घालायला हवे.
आणि हा धागा आदर्श वागणे-बोलणे कसे असावे ह्याकडे वाटचाल करतोय, तो आधी आदर्श जीवनपद्धतीवर वळवायला हवा.

Pages