lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ?

Submitted by Asawari D on 30 July, 2015 - 06:57

lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ? Specially Health related issues sathi barech doctors hech suchavtat.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या भारीच की. Happy

पण आजकालच्या पिढीवर हेच व असेच संस्कार करतात येतील का? तर याचे उत्तर नाही असेच येते. एक शंका म्हणुन विचारतो की तुझा मुलगा किंवा मुलगी वरील १ ते १० मधल्या किती गोष्टी करतात?

असे का ते माहीत नाही. तेच लाईफस्टाईल बदलली त्यामुळे असेल. आपल्या वेळी टीव्ही, फोन, मोबाईल, नेट, मिडीया असली माणसांना माणसापासुन तोडणारी साधने नव्हती. संवाद होता. असो.

तर आजकालच्या लाईफस्टाईलमुळे होण्यार्‍या त्रासामुळे त्यात काय बदल करणे गरजेचे आहे हा धाग्याचा मुळ मुद्दा आहे.

आता गाडीला, घराच्या प्रवेशद्वारावर लिंबू मिरची लावण्याऐवजी लिंबुनानांची ही पोस्ट प्रिंट पेस्ट करून जातायेता मनोभावे वाचावी :स्मितः

लिंबुटिंबू :दिवे घ्या:

लिंबूटिंबू उत्तम पोस्ट.

सध्याच्या पिढीला खालील गोष्टी सहज शक्य आहेत -
१. लवकर झोपून लवकर उठणे. त्यासाठी लेट नाईट आऊटिंग्ज, चॅट्स, नेट, फोन, सोशल मीडियावर जरा आवर घालावा लागेल.
२. दिवसातून शरीराला आवश्यक तेवढे भरपूर पाणी पिणे. पाणी घोट घोट व सावकाश पिणे. साधारण तापमानाचे किंवा कोमट पाणी पिणे.
३. नैसर्गिक वेग (मलमूत्र) न रोखणे. वैयक्तिक स्वच्छता पाळणे व सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरूक असणे.
४. बाहेरील खादाडीवर नियंत्रण. बाहेरील खाण्यास गत्यंतर नसले तर आहारात मोड आलेली कडधान्ये, फळे, सलाद इत्यादी गोष्टी आवश्यक प्रमाणात ठेवणे.
५. नियमित वैद्यकीय तपासणी व दुखणे अंगावर न काढता त्यावर इलाज.
६. नियमित व्यायाम. किमान रोज थोडे चालणे.
७. नैसर्गिक स्रोतांचा काळजीपूर्वक वापर. निसर्गाला आपण कशा प्रकारे वाचवू व समृध्द करू शकतो याचा विचार व त्यानुसार कृती.
८. रोज संधी मिळेल तेव्हा भरपूर हसणे. कारण न मिळाल्यास स्वत:शीच मोठ्याने हसणे.
९. दिवसातून इतर कोणाचे किमान एक काम तरी कसलीही अपेक्षा न ठेवता करणे.
१०. नवनवीन ओळखी, मित्रमैत्रिणी जोडत राहाणे. जुन्यांच्या संपर्कात राहाणे.
११. आवडते संगीत ऐकणे. एखादा छंद जोपासणे.

लिंबूटींबू, मस्त पोस्ट. खूप आवडली. तुम्ही ज्या सहजपणे ती लिहिली आहे ते वाचून तुम्ही त्यातील गोष्टी करत असाल याची खात्री वाटते आहे.

अरुंधती तुझी ही पोस्ट आवडली. Happy

केपी, आताच्या लाईफ स्टाईल मधे ही लिंबूटींबू यांनी लिहिलेल्या गोष्टी फॉलो करणे खूप काही कठीण आहे असे वाटत नाही.

कठिण नाही आहे पण लिंब्याच्या पालकांसारखे आपल्या पाल्यांना या सवयी लावता येतील का हा विचार करतोय. Happy (खाण तशी माती असल्याने स्वतः केले पाहीजे त्याकरता. Proud )

विप, अकु, छान तपशील. Happy

>>> खोटेपणा करायचा नाही, दुतोंडीपणा करायचा नाही हेही घालायला हवे <<<
मंजुडी, अगदी बरोबर, विषय/व्यक्ति/तत्व याचेशी प्रामाणिक रहाणे, कलागती न लावणे/इकडचे तिकडे न करणे, अशा बाबी देखिल येऊ शकतील, नै का?

>>>> एक शंका म्हणुन विचारतो की तुझा मुलगा किंवा मुलगी वरील १ ते १० मधल्या किती गोष्टी करतात? <<<<<
कान्द्या, माझ्यापरीने मी त्यांना शब्दाने उपदेश करीत व स्वतःच्या आचरणातुन शिकविण्याचा प्रयत्न करतो. त्यातले जितके घेण्याची त्यांची क्षमता असेल तितके ते घेतील. पैकी:
१) जेवढी भूक आहे त्यापेक्षा दोन घास कमीच जेवायचे. <<<< मुलगा स्वतःच पोळीभाजी वगैरे करतो/करु शकतो. अन्नाचि किंमत कळली आहे. तब्येतीकरता उगाच भरपेट ओकारी येईस्तोवर जेवू नये हे त्याला माहित आहे.

२) अन्न हे पूर्णब्रह्म. <<<< आता स्वतःच करतो म्हणल्यावर जे काय ज्या काय चवीचे होईल ते संपवावेच लागते ना? सबब, चवी वगैरे असल्या तरी त्यांचे लाड तो करत नाही. मात्र कधी मधी बाहेरून (खिशात पैसे असले तर) पावभाजी वगैर आणतो.

३) रात्री लौकर निजायचे, पहाटे लौकर उठायचे. <<<< हे तो करीत नाही.

४) कोणतेच काम करायला लाजायचे नाही. <<<<<< काही बाबतीत आगाऊपणा/आळशीपणा करतो, पण लाजत नक्कीच नाही. मी करीत असलेल्या कोणत्याही कामात "मी बोलावल्यासच" माझी मुले येऊन सहभागी होतात. न लाजता. मात्र अजुनही "स्वतःहुन्"पुढे होऊन मदत करणे त्यांच्या अंगवळणी पडलेले नाही.

५) चोरी करायची नाही, <<<<< बेसिक शिकवण आहे, आजवर न पाळलेली कधी आढळले नाही. आमचे बारीक लक्ष असते.

६) जे करायचे ते पूर्ण जीव ओतून करायचे. <<<< सर्वच बाबतीत त्यांना हे शक्य होते असे नाही, मात्र आवडीच्या बाबी जसे की बासरी शिकणे/सराव, चित्रकला इत्यादी बाबतीत मन लावुन करतात. ऑफिस कामातही नियमाविरुद्ध काही चालत नाही.

७) कपडे निटनेटके स्वच्छ हवेत, <<<< याबाबत परिस्थितिच त्यांना बरेच काही शिकवुन जात आहे, मला वेगळे कष्ट घ्यावेच लागत नाहीत.

८) कोणत्याही गोष्टीचा पुरेपुर वापर (पुनर्वापर) <<< याबाबत शिकविण्यास बराच वाव आहे.

९) महत्वाचे म्हणजे कुणा दुसर्‍याकडे बघुन त्याचा हेवा करायचा नाही, <<< पूर्वी याबाबत शिकविण्यास बराच वाव होता, आता नाही. परिस्थितीचे/वास्तवाचे भान त्यांना समजावुन सांगितल्यावर इर्ष्या/हेवा/मत्सर यावर ते बर्‍यापैकी काबू मिळविताहेत असे जाणवते. जे आहे त्याचा त्यांना अभिमान आहे व समाधानही व जे नाही ते भविष्यात मिळवू शकू अशी आशा व आत्मविश्वास.

१०) लास्ट बट नॉट् लीस्ट, काम केल्याने माणूस मरत नाही <<<<<< अवघड काम आहे. हल्लीच्या पिढीच्या आळसा पुढे, व लहानपणी घरात त्यांचे सोबतीने काम करवुन घेण्याची रचनाच हल्ली नसल्याने अंगमेहनतीची कामे करण्यात मागे, पण चुचकारल्यास्/बोलावल्यास/गरज समजावुन सांगितल्यास सदैव हजर.

कुंडलीशास्त्र दृष्ट्या प्रत्येकाची जडणघडण वेगवेगळी असते, पण किमान तत्वाच्या/रहाणीमानाच्या बाबतीत सारखेपणा आणता येऊ शकतो. अशी असंख्य उदाहरणे आमचेपुढे मागच्या पिढीतील होती.
सध्या कमी काय पडत असेल, तर आम्हीच अशी उदाहरणे आमच्यातुनच पुढच्या पिढीसमोर मांडायला कमी पडतो.

खरे तर मी धाग्याच्या मूळ पोस्टीला हसण्यावारी नेऊन विनोदी ढंगाने मांडणार होतो, पण जेव्हा लिहायला (टायपायला) सुरुवात केली, तेव्हा, मूळ विषय वरवर हसण्यावरती नेण्याचा नसून खरोखर गंभीर आहे हे उमगले व वरील मजकुर आपोआप सुचत गेला, मांडला गेला.
"कै तरी तुम्हाला कै पण प्रश्न पडताहेत" अशी आधी ठरविलेली धाग्याच्या विषयाची थट्टा उडविणे मला जमलेच नाही. Happy

मनापासुन धन्यवाद!!!!! माझ्य्या अपेक्शे पेक्शा बरेच बदल माला सुचवलेत याबद्द्ल.

limbutimbu- Specialy thanks.

mala vatla hota ha dhaga kadhtana koni kay vichar kartil, pan ata tar saglach vichar karayla lavnari uttar milalit.

अरुंधती- तुमचे उत्तर मला खूप पत्लेत.

१. लवकर झोपून लवकर उठणे. त्यासाठी लेट नाईट आऊटिंग्ज, चॅट्स, नेट, फोन, सोशल मीडियावर जरा आवर घालावा लागेल.

२. रोज संधी मिळेल तेव्हा भरपूर हसणे. कारण न मिळाल्यास स्वत:शीच मोठ्याने हसणे.

हेल्त रिलेटेड इश्युज असतील तर सहसा डॉ. लोकं लाईफस्टाईल चेंज करा हे सांगतात त्याबद्दल माहिती हवी आहे ना? खरं तर प्रत्येक माण्साचे हेल्त इश्युज वेगळे असतात त्यामुळे आपल्या लाईफस्टाईल मध्ये नेमके कुठले बदल करायचे हे ते डॉ. लोकच नीट सांगू शकतील पण सहसा आपल्या सध्या आहेत त्या खाण्याच्या पद्धतींमध्ये, राहण्याच्या पद्धतींमध्ये (बैठी वर्सेस अ‍ॅक्टीव) जर अमुलाग्र म्हणतात तसे बदल सुचवले गेले असतील तर त्याला लाईफ्स्टाईल चेंज म्हणता येतील.
लिंबुचा नं १ वाला मुद्दा थोड्याफार प्रमाणात सोडला तर त्यापुढचे कुठलेही मुद्दे (विचार म्हणून चांगले असले तरी) रेलेवंट वाटत नाहीत.

>>> लिंबुचा नं १ वाला मुद्दा थोड्याफार प्रमाणात सोडला तर त्यापुढचे कुठलेही मुद्दे (विचार म्हणून चांगले असले तरी) रेलेवंट वाटत नाहीत. <<<
(मी वाटच बघत होतो अशा काही वाक्याची... फक्त आयडीचा अंदाज चूकला माझा Proud )
बाकी मुद्देही रिलेवंट आहेत.
लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही निव्वळ भौतिक काय कसे जगता उठता बसता इतकेच नसून, तुमची विचारपद्धती, तत्वे, अपरोक्ष भान, हे काय कसे आहे यावर तुम्ही भौतिकरित्या काय करता त्याचे गुणावगुण मिळणे अपेक्षित असते. फार दूर कशाला, नेहेमीचे काही खायचे, तर त्याकरताही यमनियम घातलेले आहेत जसे की काय जेवा व जेवताना बोलू नये, दु:खदायक/त्रासदायक/भितीदायक विचार करू नये इत्यादी. आता आमच्या इथले विज्ञाननिष्ठ नक्किच म्हणू शकतिल की बोललो जेवताना, पाहिले भितीदायक, केला गैरविचार तर काय बिघडते हे "प्रयोगशाळेत" सिद्ध करुन दाखवा, मग्ग बोला. यावर काय बोलणार कप्पाळ?

मुद्दा असा की तुम्ही कोणतीही जीवनपद्धती आधीची बदलुन नविन अनुसरायचा प्रयत्न केलात तरी तसे अनुसरण्यासाठी मूळात तुमच्यात तितके इच्छाशक्ति/उमेद्/उत्साह असावा लागतो, जो एकतर सवईने आणावा लागतो, जन्मतः असावा लागतो किम्वा दारू/तत्सम अंमली पदार्थांच्या सेवनाने उसना आणता येतो. या उपायातिल कोणता भाग स्विकारता यावरच तुम्ही सध्याच्या जीवनपद्धतीत आमुलाग्र राहुदेच, साधा बदलही करणार /करु शकणार की नाही हे ठरते. या उपायातील "सवय" या शब्दामागे "शिस्तबद्ध" हा शब्द जोडला, की वरील दहाही मुद्दे चपखल लागू पडतात.
असो. खूप गहन आहे हे समजावुन सांगत बसणे. पटले तर घ्या, नैतर सोडून द्या.

जीवनपद्धती बदलणे म्हणजे कालचा शर्ट/लंगोट बदलुन आज नविन घालण्याइतके सोपे नसते इतके जरी कळले तरी पुरेसे आहे.
आजवर जगलेल्या पद्धती/सवई पेक्षा वेगळे जगताना शरिरास/मनास्/बुद्धिस तोशिस पडते, व ती सहन करण्याचा लहानपणीचाच पूर्वानुभव असेल, तर ते सहजसाध्य होते, अन्यथा, फोमच्या गादी ऐवजी कापसाच्या गादीवर झोपुन जीवनपद्धतीत केलेला बदल देखिल माणसास मानसिक्/शारिरीक दृष्ट्या असह्य होऊ शकतो, फायदा मिळणे दूरच.
अन म्हणुनच, वरील दहा, किम्वा तत्सम मुद्दे जर आधिच आचरणात असतील, तर जीवनपद्धती बदलणे अवघड जात नाही, जर नसतील आचरणात, तर यावर मनन/चिंतन करुन शक्याशक्यता अजमावुन मगच जीवनपद्धति बदलणेचा विचार केला गेला पाहिजे.
अहो आम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी पायी फिरा सांगितले तर ते जमत नाही, व न जमण्याची कारणे बघितलीत तर वरील दहाही मुद्दे अचूक चपखल बसतात हे लक्षात येईल.
निश्चय, सातत्य, दृढनिष्ठा हे शब्द केवळ शब्दकोषात शोभेकरता ठेवायचे नसून, प्रत्यक्ष आचरणात आणायचे असतात, ते आणता येत असतील, तरच जीवनपद्धतीत सकारात्मक बदल सहजगत्या करवुन घेता येतो. वरील दहा (वा तत्सम) मुद्दे, याच निश्चय, सातत्य, दृढनिष्ठा (नोट, मी श्रद्धा हा शब्द वारपत नाहीये) यांची जोपासना लहानपणापासूनच होण्याचे दृष्टीने जी आचारपद्धति वापरली पाहिजे, माझ्या लहानपणि मोठी माणसे जी आचारपद्धती करवुन घेत होते, तिचे मी फक्त वर्णन केले आहे, व पोस्टच्या सुरवातीलच सांगुन टाकलय की धाग्याचा प्रश्न मला पडत नाही, कारण माझ्या पालकांनी माझ्यावर लहानपणीच केलेले संस्कार. ते कोणते? तर ते दहा मुद्दे.
असो.

यात अजुन मी पुढील भागाकडे वळतच नाहीये की जीवनपद्धती "स्वतःहून" बदलणे, वा "परिस्थितिने" तुम्हाला जीवनपद्धती बदलायला भाग पाडणे.
वरील दहा (व तत्सम) मुद्दे अंगिकारलेले नसतील, अन "परिस्थितीने तुम्हांस जीवनपद्धती" बदलवणे भाग पाडले असेल, तर माणसाची हालत शब्दातीत खराब होते.
साधे उदाहरण की कामानिमित्त दूरगावी/दूरदेशी जाऊन काही दिवस जरि रहायचे तरी तेथील निव्वळ खाद्यसंस्कृतीतल्या बदलाशी शारिरीक/मानसिकदृष्ट्या जुळवुन न घेता आल्याने माणसांनी नोकर्‍याच सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. खाद्यसंस्कृतीतला बदलही झेपत नसेल, तर जीवनपद्धतीतील बदल वगैरे बाबी फार लांबच्या राहिल्या हो.
तशा त्या लांबच्या वाटू नयेत म्हणुन मूलभूत्/पायाचि तयारि म्हणुन वरिल दहा (व तत्सम) मुद्दे.

बाकी डॉक्टरही असे भारी असतात की मोघम सांगुन मोकळे होतात, म्हणे जीवनपद्धति बदला...
आता एका वाटीतील तिखटामिठाचा चविष्ट रस्सा चमच्याने "ओरपुन" झाल्यावर दुसर्‍या वाटीतील श्रीखंडात चमचा बुचकळुन चमच्या श्रीखंड चाखतमाखत खाण्याइतके सोप्पे आहे का जीवनपद्धति बदलणे?

डॉ. भारी असतात>>>>>> Lol

मी आधीही म्हंटलय लिंबु, विचार म्हणून चांगले असले तरी स्वच्छ कपडे घाला, खोटं बोलू नका, कुठल्याही कामाची लाज बाळगू नका ह्या गोष्टींचा फिजिकल हेल्त इशुजशी काय संबंध? हे विचार अगदी तंतोतंत आचरणात आणणार्यांना सुद्धा हेल्त इशुज असू
शकतात जे प्युअरली फिजिकल चेंजेस करुनच आटोक्यात आणले जाऊ शकतात.

धन्यवाद, स्वाती२ , वरी

वैद्यबुवा, थोडक्यात समजावु पहातो की ते मुद्देही कसे लागु पडतात.
तब्येतीच्या व अन्य अनेक कारणांमुळे गेल्या वर्षी मी सायकल चालवायला सुरुवात केली.
आधीच्या लाईफस्टाईलप्रमाणे १९९२ पासून मी स्वयंचलित दुचाकीच वापरतो आहे. ती माझी "लाईफस्टाईल" सलग २२ वर्षांची. या लाईफस्टाईलमधे मी कधीही सायकल चालवली नाही.
डॉक्टरांनी सांगितले म्हणुन नव्हे, तर परिस्थितीने मला ही लाईफस्टाईल बदलविण्यास भाग पाडले व स्वयंचलित दुचाकीवरुन सायकलवर येणेजाणे भाग पडले.
आता जवळपास गेले वर्षभर मी रोजच्या रोज ऑफिसला येताजाता सायकल वापरतो आहे. (अपवादात्मक परिस्थिती वगळता).
हा बदल स्विकारणे इतके सहजसाध्य होते असे तुम्हांस वाटते काय?
माझ्या मते, व माझ्या अनुभवानुसार अनेकानेक कारणांमुळे जीवनपद्धतीतील हा बदल स्विकारणे अवघडच नव्हे तर अशक्यप्रायही होते.
१) बावीस वर्षात सायकल न चालविल्यामुळे रस्त्यावरुन तोल सावरत सायकल चालविण्याचा, चढ चढुन जाण्याचा वगैरे आत्मविश्वास गमावलेला.
२) मी आत्ताच ५०+ असल्याने व निरनिराळ्या शारिरीक व्याधी/विकार बाळगुन असल्याने सायकल चालविणेच काय, हातातुन नेणेही मजकरता कष्टप्रद होते.
३) गेल्या पंचवीस वर्षात बदललेल्या सामाजिक परिस्थितीत, "सायकलने ऑफिसला जाणे" हे तद्दन उल्लुपणाचे/नादानपणाचे तसेच नादारीचे लक्षण केव्हाच मानले जावयास लागले आहे, तेव्हा तसे जाताना मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी "लाज वाटणे" स्वाभाविकच.
४) उत्साहाच्या भरात सुरवातीस आठवडा, दोन आठवडे वा महिनाभर जाणे वेगळे अन सातत्याने जात रहाणे वेगळे.

अन तरीही मी ते कसे करु शकलो, कारण वर आधी मांडलेल्या मुद्यातील,
क्र. १) जेवढी भूक आहे त्यापेक्षा दोन घास कमीच जेवायचे. <<< यामुळे स्लिम होतो, फायदा झाला.
क्र. ३) रात्री लौकर निजायचे, पहाटे लौकर उठायचे. <<<< यामुळे स्वयंचलित दुचाकीच्या तुलनेत सायकलला लागणार्‍या जास्त वेळेची तरतुद होऊ शकली
४) कोणतेच काम करायला लाजायचे नाही. <<<<<< सायकलने कामावर जाणे, हे देखिल एक कामच. यामुळे सायकलने जायला लाजलो नाही,
६) जे करायचे ते पूर्ण जीव ओतून करायचे. <<<< या सवईमुळे, सायकलही मन लावुन चालविली. ती कशी चालविणे योग्य याचाही अभ्यास केला, करतोय, एक्स्पर्ट्सना विचारतोय.
७) कपडे निटनेटके स्वच्छ हवेत, <<<< या सवईमुळे, सायकलने जाऊनही मी ऑफिसमधे नीटनेटक्या कपड्यात हजेरी लावु शकतो, त्याची काळजी घेतो. पावसाळ्यातही सायकलने जातोयेतो.
८) कोणत्याही गोष्टीचा पुरेपुर वापर (पुनर्वापर) <<<< सध्याची सायकल मुलाची शाळेच्या वेळची. तो वापरत नसल्याने गंजत पडून होती. ती मुलाकडूनच त्याच्या खर्चाने दुरुस्त करवुन घेतली व वापरली. त्यास गिअर नव्हते ते बसवुन घेतले
९) महत्वाचे म्हणजे कुणा दुसर्‍याकडे बघुन त्याचा हेवा करायचा नाही, <<< हे तर सर्वात महत्वाचे. १९९८ मधे स्वतःच्या कारने जाणारा लिम्ब्या, २०१४ मधे सायकलने जाउ लागताना, तेव्हाचे दुचाकीवर असणारे चारचाकीने येताना दिसत असताना कुणाच्याही मनात हेवा/मत्सर उत्पन्न होणार, पण निव्वळ सवयीने त्यावर मात करीत तटस्थ व स्वतःबद्दलही त्रयस्थ भुमिका घेऊ शकलो.
१०) लास्ट बट नॉट् लीस्ट, काम केल्याने माणूस मरत नाही <<<< यावर तर दृढविश्वास असल्याने वडिलांचे हे वाक्य आठवित आठवितच सायकल चालवित राहिलो, सुरवातीस तब्येतीला झेपेल इतकेच थोडे अंतर, मग थोडे जास्त, असे करीत आज वर्षानंतर १००+ किमी जायची क्षमता बाळगुन आहे. जी वर्षापुर्वी सायकल हातात धरुन नेण्याचीही नव्हती.
(अर्थात जीवनपद्धतीत सायकल आणताना मला मायबोलिवरील एक्स्पर्ट सायकलिस्टच्या मोलाच्या सल्यांचा, त्यांच्या अनुभवाचा फारच उपयोग झाला हे सांगणे नलगे)

आता मला सांगा की, वरील मूलभूत १० मुद्दे (व तत्सम बाबी) जीवनपद्धतीत बदल करण्यास कशाकाय रिलेव्हंट नाहीत?

>>> स्वच्छ कपडे घाला, खोटं बोलू नका, कुठल्याही कामाची लाज बाळगू नका ह्या गोष्टींचा फिजिकल हेल्त इशुजशी काय संबंध <<<<

वैद्यबुवा... अहोऽऽ....
>>>> स्वच्छ कपडे घाला, <<<<< हेल्थ इश्युजशी सगळ्यात जवळचा संबंध, पटत नसेल तर कुठल्याही व्हीडी वाल्या त्वचारोगतज्ञाला विचारा Proud

>>>> खोटं बोलू नका, <<<<< तुम्हाला माणुस दुसर्‍याशी खोटे बोलतो तितकेच माहित असावे. पण माणुस स्वतःशीच खोटे बोलून स्वतःच्याच मनाचे/बुद्धिचे समाधानही करत राहू शकतो. याचाही हेल्थ इश्युशी भरपुर संबंध आहे. मला काहि होतच नाही/झालेले नाही असे स्वतःच्या मनाचे व लोकांचे समाधान करीत तरीही दुखणी शेवटच्या स्टेजपर्यंत/स्टेजमधेही अंगावर तशीच वागविणारी किती उदाहरणे दाखवू? या उदाहरणात हार्टअ‍ॅटॅकचे दुखणेही वर्ज्य नाही बर्का!

>>>> कुठल्याही कामाची लाज बाळगू नका <<<<< वरच्या पोस्टमधे उदाहरण दिलच आहे.
तरी सांगतो, अहो, नेहेमीच्या पेक्षा वेगळे कपडे घालणे देखिल "अवघड" होऊन बसते लाजेमुळे, तेव्हा हेल्थ इश्युकरता जीवनपद्धती बदलताना कपडेपट बदलायची वेळ आली तर महाकर्मकठीण होऊन बसते. टाईट जीन्स वापरु नका, सैल कपडे घाला म्हणले तरी कित्येकांना ते ही जमत नाही. असो.

लिंब्या, भौ माझी चूक झाली अन तुझ्याशी चर्चा करायला आलो!! फट्ट म्हणता हातभर पोस्ट डकवलीस. Lol
विषय काय, गाडी चाललीये कुठं, कशाचा कशाशी ताळमेळ नाही. त्यात धागाकरतींनाच तुझे विचार पटत आहेत (टोटली इर्रेलेवंट आणि ओढून ताणून संबंध जोडलेले असले तरीही) त्यामुळे आता म्या पामराला तू कशाला भिक घालशील?

येतो.... Lol

लिम्बूदा.... १००% पटले

बरे सत्य बोल यथा तथ्य चाला असे समर्थांनीच लिहून ठेवलेले आहे. पूर्वासूरींनी सगळे समजावून सांगितलेले असतानाही आपण ते आचरणात आणत नाही हा आपला कर्मदळीद्रीपणाच

lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे <<<< एकादी गोष्ट तात्पुरती बदल न करता कायमस्वरूपी बदलणे..
उदा.. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी/व्यायाम जास्त हे वजन कमी होईपर्यंत करून मग पूर्वव्रत असे न करता तो बदल यापुढे आयुष्याच्या अंतापर्यंत करायचा..

विषय काय, गाडी चाललीये कुठं, कशाचा कशाशी ताळमेळ नाही. त्यात धागाकरतींनाच तुझे विचार पटत आहेत (टोटली इर्रेलेवंट आणि ओढून ताणून संबंध जोडलेले असले तरीही) त्यामुळे आता म्या पामराला तू कशाला भिक घालशील? >> Lol

लिंबूचे विचार चांगलेच आहेत पण बुवांच्या >>लिंबुचा नं १ वाला मुद्दा थोड्याफार प्रमाणात सोडला तर त्यापुढचे कुठलेही मुद्दे (विचार म्हणून चांगले असले तरी) रेलेवंट वाटत नाहीत<< या वाक्याला +१

ईंजिनीअरींगच्या नावाखाली कॉम्प्युटर बडवत कारकूनी करणार्‍यांनी देखील बरीच काळजी घ्यावी लागते.
उदाहरणार्थ,

१) झेपेल तेवढेच काम करणे. कॉम्प्युटर हे एक मशीन असते पण तुमचे शरीर नाही.

२) एकाच जागी बसून सीट उबवू नये. दर तासाला कामानिमित्त उठणे होत नसेल तर टॉयलेटलाच जाऊन यावे.

३) दर २०-२५ मिनिटांनी आजूबाजूच्या फिमेल कलीगला हात तर लागणार नाही ना याची काळजी घेऊन बसल्याजागी थोडीफार कवायत करून घ्यावी.

४) जॉबला लागल्यापासून तुम्हाला चहा-सिगारेटचे व्यसन लागले असेल तर याचाच अर्थ तुम्हाला कामाचे स्ट्रेस येत आहे असा होतो.
तसेच चहा सिगारेटची जराही गरज भासत नसेल तर तुम्हाला कामाचे व्यसन लागले आहे असे समजावे. आणि हे जास्त घातक आहे.

५) स्मार्टफोनचा वापर कमीत कमी करा. कामही कॉम्प्युटरवर आणि छंदही लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर पाळाल तर डोळ्यांचे हाल कराल. किंबहुना अतिवापराने डोकेही गरगरते हा स्वानुभव.

६) दुपारी जेवण झाल्यावर लगेच कामाला बसू नका. जेवताना वातावरण जसे आनंदी असावे तसे पचनक्रियाही रिलॅक्स मूडमध्येच एंजॉय करावी. बाहेर एखादा फेरफटका मारून यावा. किंवा बाहेर कडक उन्ह वा मुसळधार पाऊस असेल तर जागेवरच थोड्या गप्पा माराव्यात. काही नाही तर डेस्कवर डोके ठेवून एक पॉवर नॅप घ्यावा.

७) नाईट शिफ्टमध्ये काम करू नका किंवा शक्य तितके टाळा. कारण रात्री जागणे आणि दिवसा झोपणे हे माणसांसाठी अनैसर्गिक आहे. घुबड असाल तर गोष्ट वेगळी.

शेवटचे आणि सर्वात महत्वाचे,
कामाचे खूप टेंशन येईल तेव्हा मायबोली उघडून माझे जुनेपुराणे धागे वाचत जा. जर तुम्ही ते सहन करू शकता तर जगातले कुठलेही काम तुम्हाला झेपेल हा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. Happy

लिंबूंचे विचार अनुकरणीय आहेत, आवडले.
तुमचा सायकलचा उपक्रमही आवडला.

सायकलवर येणे आणि तो उपक्रम राबवत राहणे हे फार महत्त्वाचे. शंभर किमी धाव करू शकता म्हणजे उत्तम शारिरीक तयारी आहे. या सर्वांमागचे विचारही आवडले आहेत.
जीवनशैली सहजतेने बदलत नाही. ती जाणीवपूर्वक बदलावी लागते.
तुम्ही ते करून दाखवले आहे.

योग उपक्रम सुरू केल्यास साधारणपणे एकंदर पॉझिटिव्हिटी वाढते असा माझा अनुभव आहे.
सातत्याने योगासने करत राहणे हा अतिशय उपयुक्त जीवनशैली बदल आहे.

Pages