lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ?

Submitted by Asawari D on 30 July, 2015 - 06:57

lifestyle Changes करने मन्जे नेमके काय करावे ? Specially Health related issues sathi barech doctors hech suchavtat.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक धाग्यावर स्वतःची प्रसिद्धी करून ऋन्मेष मोदीकाकांच्या सेल्फींच्या विक्रमांनाही मागे टाकणार आहेत.
मस्तं! आणि पुढिल प्रसिद्धीकरिता शुभेच्छा ऋन्मेष!

२) मी आत्ताच ५०+ असल्याने व निरनिराळ्या शारिरीक व्याधी/विकार बाळगुन असल्याने सायकल चालविणेच काय, हातातुन नेणेही मजकरता कष्टप्रद होते.>>>>

लिंबु भौ, पहिले १० मुद्दे पाळुन हे असे झालेच कसे ?

मलातरी वाटत होत की एवढे चांगले जिवन जगणारे, विचार करणारे शारिरीक व्याधी/विकार मुक्त असतिल पण जौच दे.
आणि ५०+ म्हणजे काही जास्त नाही.

लिंबूंचे विचार अनुकरणीय आहेत, आवडले.
ऋन्मेऽऽष उत्तम पोस्ट.

जीवनशैली सहजतेने बदलत नाही. ती जाणीवपूर्वक बदलावी लागते.<<<<+१

योग उपक्रम सुरू केल्यास साधारणपणे एकंदर पॉझिटिव्हिटी वाढते असा माझा अनुभव आहे.<<<+१

मी जी जीवन शैली पाळतो ती अशी
-सकाळी ६ वा उठणे
-उठल्यावर माझी व हिच्या कॉफीची तयारी करणे
-स्काळचा शास्त्रीय संगीताचा राग लावणे
- ३० ते ४५ मि व्यायाम किंवा चालणे( एकटा व्यायाम- चालणे doghe मिळून)
- आल्यावर कॉफी व पेपर
-आघोळ - साधारण ८ ते ८ -१५
-पूजा
-निवृत्तीनंतर ३ तास कॉलेजात शिकवतो
-जाताना आणि येताना उत्तमोत्तम संगीत ऐकतो ( एकूण वेळ १ तास)
- साधा नाश्ता ( पोहे, उपमा, टोस्ट, इडली---- पण माफक)
- १२-३० जेवण ( मित व साधे . तळकट वर्षातून २ दाच)
- २० मि वामकुक्षी,
- दुपारी वाचन वा मॅनेजमेंट कॉलेजात लेक्चर
- ४ ते ७ भाषांतर
-७ च्या सुमारास देऊळ वा श्लोक
-नंतर ए़खादे सिरियल
-8 30 nantar jewaN naahee
- ९ ते ११ वाचन वा संगीत
महिन्यातून काही दिवस संगीत मैफील, नाटक, सिनेमा क्लब इ.
खायला आवडते पण माफक
अजूनही बरेच लिहिता ये ईल
-मह्त्त्वाची ::::::बहुतेक सर्व लाईटली घेतो !!!!!!!

रेव्यु, उत्तम दिनक्रम जीवनशैली आहे. Happy

जाताना आणि येताना उत्तमोत्तम संगीत ऐकतो ( एकूण वेळ १ तास)
>>>
यावरून एक आठवले, जर हा प्रवास ट्रेनचा असेल तर मी स्वत: वा माझ्या बरोबरच्यांना हेडफोन लावून गाणी ऐकू नका असे बजावतो. कारण ट्रेनच्या खडखडाटात गाणी व्यवस्थित ऐकू यायला हेडफोनचा आवाज वाढवावा लागतो. तो त्रास कदाचित तेव्हा लक्षात येत नाही पण त्याचा लाँग टर्म इफेक्ट कानावर नक्की पडू शकतो.

दर २०-२५ मिनिटांनी आजूबाजूच्या फिमेल कलीगला हात तर लागणार नाही ना याची काळजी घेऊन बसल्याजागी थोडीफार कवायत करून घ्यावी.<<<< Lol

ऋन्मेष, चांगले मुद्दे, खास करुन दहा दहा तास बैठे काम करणार्‍यांसाठी.

>>>लिंबु भौ, पहिले १० मुद्दे पाळुन हे असे झालेच कसे ? <<<
निसर्गचक्र, पहिले दहा मुद्दे पाळले म्हणजे "रोग/व्याधी/विकार" होतच नाहीत असा दावा मी कुठेही केलेला नाहीये. दहा मुद्दे जगण्याच्या मूलभूत शिस्तचे आहेत, ते आत्मसात असतील, तर जीवनशैली बदलणे अवघड जात नाही, हे पहिल्याच पोस्टमधे विदीत केले आहे.
वैद्यबुवा, संबंध नाही हे तुमचे म्हणणे असू शकते. पण तरी परत सांगतो, पहिल्याच पोस्टमधे मांडलेले मुद्दे, "जीवनशैली" मग कोणत्याही कारणाने का असेना, बदलायची असेल, तर मूलभूत शिस्त असायला हवी त्यापैकी मला ज्ञात असलेले "काहीच" मुद्दे मी मांडलेत, जेणेकरुन जी काय जीवनशैली ज्या काय कारणाने बदलायची असेल, तर ते अवघड जात नाही सहजसाध्य होते. पण तुम्हांस मानसिक/शारिरीक दृष्ट्या विशिष्ट शिस्तीची सवय "जीवनशैली बदलायला गरजेची वाटतच नसे", वा आकलत नसेल, तर त्याला माझा नाईलाज आहे.
बाकीच्या हातहातभर पोस्ट्स, या निव्वळ विस्तारुन समजावुन सांगण्यासाठी. मी कुठेही विषयाला सोडून लिहीलेले नाही.
असो. पटत नसेल, तर सोडून द्या हे आधीच सांगितले आहेच.

>>>> एकादी गोष्ट तात्पुरती बदल न करता कायमस्वरूपी बदलणे.. <<<
हा एक मुद्दाही महत्वाचा आहे.

>>>>> योग उपक्रम सुरू केल्यास साधारणपणे एकंदर पॉझिटिव्हिटी वाढते असा माझा अनुभव आहे. <<<<
योगाचे बाबतीत मला काहीच ज्ञान नाही. पण ऐकीव माहितीनुसार, योगासने केल्याचा उपयोग होतो. अर्थात माझ्यामते, परत, हा एक जगण्याच्या शिस्तीचाच भाग होतोय, नाही का?
आधी करीत नसल्यास, व नव्याने सुरु केलेले असल्यास मात्र "सातत्याने योगासने करत राहणे हा अतिशय उपयुक्त जीवनशैली बदल आहे" हे सर्वस्वी मान्य.

परवा टीव्हीवर त्या का रे दुरावाच्या जय नामक नायकाबरोबर त्याच्या टीमची मुलाखत चालू होती, अन बहुतेक जण अगदि कौतुकाने हुरळून जात सांगत होते की आम्ही पहाटे २/३ पर्यंत तरी जागतोच, अन मग सकाळी उठायला दहा वाजतात. बर हे जागणे म्हणजे थर्डशिफ्ट संपवुन घरी येणे नव्हे, तर घरातच गप्पागोष्टींपत्तेखेळ्वगैरे बाबींकरता जागणे. ही एक जीवनशैली असू शकते, नै का?

योग उपक्रम सुरू केल्यास साधारणपणे एकंदर पॉझिटिव्हिटी वाढते असा माझा अनुभव आहे.<<<+१ >>>

अगदी योग असच काही नाही , पण माझा अनुभव - कुठलाही व्यायाम .
मध्यंतरी प्रोफेशनल आणि पर्सनल कारणांमुळे बरच नैराश्य आलं होतं .
सहज बदल म्हणून - एरोबिक्स चालु केलं . हळूहळू जाणवू लागलं - शारिरिक आणि मानसिक फीटनेस वाढतोय.
नैराश्यातून बाहेर निघायचे छोटे छोटे मार्ग सापडू लागले . मन दूसर्या गोष्टींमध्ये गुंतवता येउ लागलं .

कालांतराने एरोबिक्स बन्द झाल.
शरिराला आणि मनाला "कम्फर्ट झोन" मधून बाहेर काढण्यासाठी वेगवेङळे व्यायामाचे प्रकार चलु असतात मग आता .

२- ३ महिने सकाळी चालणं करून झालं . ४ महिने झुम्बा करून झाला . ४ महिने नविन खेळ शिकुन झाला .
आता सुर्यनमस्कार चालु करायचे आहेत. आता पावसानंतर परत मॉर्निंग वॉक चालु करेन काही दिवस .

हल्ली आणखी एक स्ट्रेस्स बस्टर सापडला आहे .
लेकाची ड्रॉईग बूक आणि क्रेयॉन्स घेते आणि रेडीमेड चित्र असतात ती रंगवत बसते .
मन जरा शांत होते आणि ताजेतवाने वाटते .

लेकाची ड्रॉईग बूक आणि क्रेयॉन्स घेते आणि रेडीमेड चित्र असतात ती रंगवत बसते .

ओ तो ओरडत नाय काय तुमच्या नावाने ???????

स्वस्ति- लेकाची ड्रॉईग बूक आणि क्रेयॉन्स घेते आणि रेडीमेड चित्र असतात ती रंगवत बसते
खरच याने मला पन बर वातत.
thank you for your guidance.

हल्ली आणखी एक स्ट्रेस्स बस्टर सापडला आहे .
लेकाची ड्रॉईग बूक आणि क्रेयॉन्स घेते आणि रेडीमेड चित्र असतात ती रंगवत बसते .
मन जरा शांत होते आणि ताजेतवाने वाटते .>>

बेस्ट!
एकदम भारी उपाय आहे.

स्वस्ति, भारीच मजेशीर पण सोपे व खात्रीचे उपाय आहेत हो तुमचे. Happy
असे उपाय मी पण करुन बघत असतो, अन ते सीझनप्रमाणे बदलत असतात, अन मग घरचे बोम्बाबोम्ब करतात की "एकना धड भाराभर चिन्ध्या" करतो म्हणून. Proud पण मी तिकडे लक्षच देत नाही.

तुमच्या पोस्टमुळे अजुन एक मुद्दा मिळतोय, तो म्हणजे आहे त्याच जगण्यात जरा वेगळ्या नाविन्यपूर्ण रितीने जगु पहाणे व त्यातुन आनंद मिळवणे. Happy
(नाविन्याची आवड बहुतेक सगळ्यांनाच अस्ते फक्त राशीगत स्वभावानुसार कमीजास्त इतकेच. )

फक्त राशीगत स्वभावानुसार कमीजास्त इतकेच.
<<
लिंबारामा,
फारावर्षांपूर्वी मेमरीच्या धाग्यावर तुमास्नी पोस्ट लिवली होती, की तुम्ही बाकीचं बरं बोलता, पण मधेच ते अध्यात्म, ज्योतिष, बिग्रेड वगैरे आणून पचका करता Wink
राशीचा काय संबंद हो?

लाईफस्टाईल चेंज करणे म्हणजे काय हे गुगळून पाहीलं तर सहजच समजेल. अगदी व्याख्येनुसार नको असल्यास लोकांचे अनुभव छान आहेत. माझ्या वडिलांमुळे घरात निसर्गोपचाराचा अंमल आपोआप चालू झाला. पण खूपच छान वाटतंय. मेडीकल रीजन अस्सल्याने लाईफस्टाईल चेंज करायची असल्यास असे जाहीर सल्ले मात्र टाळा. अभय बंग यांचं माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग तुम्ही वाचलं असेल तर मग जास्त खोलात जाण्याची गरज नाही.

लाईफस्टाईल का बदलायची हे तुम्ही स्पष्ट केलेलं नाही. एक जुनी पोस्ट गंमत म्हणून...

ज्या काळात दवणीय संस्कार चहू बाजूंनी होत होते त्याच काळात दूरदर्शनवर एक लघुकथा दाखवली गेली होती, जनमदिन म्हणून. त्यात गरीब घरचा मुलगा (शिक्षकाचा) मोठ्यांच्या घरी वाढदिवसाला जातो आणि मग तिथले गिफ्ट्स, केक, पेस्ट्रीज, फुगे इ कधीही न अनुभवलेलं सारं हवच म्हणून वडीलांकडे हट्ट धरतो. यांचा वाढदिवस म्हणजे सर्वांच्या पाया पडणे, देवापुढे तेलवाती करून नमस्कार करणे, पूजा करणे इत्यादी. फारतर नवीन कपडे एव्हढंच. रात्री मुलाच्या हट्टावर खुसफुस होत राहते. उगीच पाठवलं असं आई म्हणते.

मग मुलाचा वाढदिवस येतो. बाबांनी आश्वासन दिलेलं असतं की असा वाढदिवस करूयात की लक्षात राहील. त्या दिवशी नवे कपडे नेसून मुलांना घाटावर नेलं जातं. तिथे पूजाअर्चा झाल्यावर ब्राह्मणांना, गरीबांना दान धर्म केला जातो. दिवसभर चांगले संस्कार होतील असे उपक्रम राबवले जातात आणि शेवटी अनाथाश्रमामधे फळं आणि वापरलेले कपडे, पुस्तकं. काही नवे कपडे असं सगळं घेऊन त्या मुलांसोबत वाढदिवस केला जातो. बाबा सांगतात की या मुलांसोबत कुणीच येत नाही खेळायला. मुलाला देताना आनंद होत असतो. देण्यातला आनंद कळतो.

झालं या फिल्मचा एव्हढा परिणाम झाला की प्रत्येक वाढदिवसाला हे सगळं केलंच पण पुतणी झाली तेव्हां तिच्याही वाढदिवसाला ते करू पाहीलं तेव्हां घरच्यांचा विरोध झाला. मग मन खट्टू झालं. मग माझ्या मुलांच्या वेळी हक्काने केलं. पण मुलांच्या चेह-यावर ते टिव्हीतलं समाधान काही दिसेना. त्यांना आलेल्या गिफ्ट्स उघडून पाहताना जी गंमत वाटत होती ती यात कुठेही नव्हती. मग गपगुमान इतर सगळे करतात तसं वागायला लागलो. हळूहळू दवणीय भूतही मानगुटीवरून उतरलं. अजूनही मुलांवर संस्कार वगैरे झटके आले तर त्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त टाळूनच ते करतो.

काळाबरोबर चालताना दवणे, पालेकर मंडळींना टाटा, बाय बाय केलाच पाहिजे.

>>>> राशीचा काय संबंद हो? <<<<
नाविन्याच्या आवडीच प्रमाण व वास्तवात उतरविणे याचे प्रमाण राशीनुसार बदलते आहे.
यात मिथुन रास सगळ्यात जास्त अवखळ, चपळ, व सतत काहीतरी नविन लागते, नविन सुरु केले की आधीचे जुने होउन सोडुन दिले जाऊ शकते. व मिथुनेबाबत हा जुने सोडून नविनच्या मागे लागण्याचा कालखंड शब्दशः दोनचार तास ते दोनतिन महिने इतक्यात मोजावा लागतो.
तर मकर कुंभ वगैरे भारदस्त राशीत "नविन" असे काही फारसे नसतेच, व काही नविन आले समोर तर त्यासही ते जुने करुन वापरतील. असो. हा ज्योतिषाचा धागा नाही हे खरे, पण जीवनशैली बदलताना, व्यक्तिच्या राशीगत स्वभावाचा विचार करुन मगच काय करा/करु नका असा सल्ला द्यावा लागतो, त्यामुळे मी सहजच राशीचा उल्लेख केला.

खडी साखर
विचार बरेचसे पटले.
अजून घरात असलेल्या लहान मुलाचा वाढदिवस भरमसाठ पैसे खर्च,एव्हेंट कोऑर्डिनेटर,टॅटूवाला,डॉमिनोज मध्ये वगैरे करत नाही, इन्लॉज +आई बाबा आणि दिर जाऊ कुटुंब असे बाहेर जेवायला जातो फक्त त्या दिवशी, आणि मोठी वस्तू गिफ्ट म्हणून आणतो.
पण लहान मुलांना 'बर्थडे पार्टी' याचे अप्रूप असते, आणि माझ्या बर्‍याच मैत्रिणी मी मुलीची हौस मारते असे म्हणतात. आणि सोसायटीत 'बर्थडे करतात हो, आपल्या मुलांना बोलावत नसतील, आपण पण नको बोलावायला' असे गैरसमज पसरत आहेत त्यामुळे आता एखादा बर्थडे बॅश करावा अशा विचारात आहे.

लाईफस्टाईल चेंज करणे याचे कारण व परिणाम थोडंफार पीअर प्रेशर मधे आहे असं वरच्या काही प्रतिसादात दिसून येतंय.

>>> पीअर प्रेशर <<< म्हणजे काय आशुडी? <<<

अरे तू सर्वज्ञ असून तुला माहित नाही? काहीही हं....

>>> अरे तू सर्वज्ञ असून तुला माहित नाही? काहीही हं.... <<<
सर्वज्ञ????? Rofl .... अगदी गहिवरुन की कायससं म्हणतात ते झाल माझ....

नीरजे, मी मराठीतून "सर्वज्ञ" (की काय म्हणतात) ते बहुधा आहे.
इंग्रजीचा गंधही नाही हो मला....
आता पियर प्रेशर चे आधी स्पेलिन्ग बनवा, ते बरोबर बनेलच याची खात्री नसतेच, कारण इन्ग्लिशभाषेच्या तृटी (ज्या अन्य धाग्यांवर चर्चिल्या गेल्यात), अन मग ते गुगलवर डकवा, सर्च करा, डॉक फाइलमधे शिफ्टसेवन दाबुन अर्थ पहा वगैरे करण्या पेक्षा आशुडीलाच विचारणे योग्य नाही काय?

>>> असे माझे निरीक्षण आहे. असा त्यातला विनोद आहे. <<<
आता तुझे काही एक निरीक्षण आहे, तर त्या निरीक्षण असण्यात विनोद काय होतोय? बहुतेक सग़ळेच निरीक्षण करतात Proud त्यात विनोदि काये?

(घे, सोलुन दिलेले संत्र खाऊन चोथा न गिळता टाकुन दिला.... Wink )

पीअर प्रेशर हा फारच हाय फाय शब्द झाला थोडक्यात लाजेकाजेस्तव किंवा लोकलाजेस्तव किंवा लोक करतात म्हणून तरी आपण अमूक गोष्ट या नाही तर त्या प्रमाणात करायलाच पाहिजे असे वाटणे. हळूहळू ते वाटणे एक ओझे बनू लागते. उदा. मुलाच्या शाळेत सगळी मुले एक्स कंपनीचे बूट वापरत असतील तर सहा आठ महिन्यांनी का होईना आपण तसले बूट घ्यायला स्वत:ला भाग पाडतो. आणखी एक उदा वर mi_anu यांच्या प्रतिसादात आहे.

पीयर प्रेशर वर चार आणे:
पीयर प्रेशर न घेणारे, किंवा ते धुडकावून लावून आपल्याला पाहिजे तेच करणारे ट्रेंड्सेटर असतात जगात, पण त्यांच्या मुलांना ते धनुष्य पेललं नाही आणि आत्मविश्वास खच्ची झाला तर मुलं जन्मभर दोष देतात.

Pages