डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 17 July, 2015 - 17:21

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

images (3).jpgइस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)

download (1).jpg

बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)

इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

images (4).jpg

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -

" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)

पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

images (5).jpgबौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -

" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)

दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -

भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)

भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात

"इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

images.jpg

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .

झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

images (7).jpg

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

images (6).jpg

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)

images (8).jpg

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .

१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .

download (2).jpg २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे . कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :

"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith

मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

डॉ अभिरम दिक्षित

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिरामजी तुमचा हा लेख बहुचर्चित आहे. पण वाचताना काहीतरी वेगळी जाणीव झाली. नेमकं सांगता येत नाही.
आता प्रतिसाद वाचतो .

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम..
पं प्र मोदिंच्या चष्म्यातून इस्लाम असा पण एक धागा येवु दे ना? किंवा संघाच्या चष्म्यातून इस्लाम ....
गोधरा हत्याकांड वागैरे टाळुन. >>>> म्हणजे 'चिकन टिक्का मसाला' ची रेसीपी चिकन शिवाय द्या असं झालं की राव ते...! Happy

मोदी संघ गुरुजी .... यांच्य नजरेतुन इस्लाम असा लेख ते लिहिणार नाही.

पाहुण्याच्या काठीने साप मारणे हा लबाड हेतू मग साध्य कस होणार ?

पाहुण्याच्या काठीने साप मारणे >

दुर्दैवाने असाच काहीसा प्रकार झालेला दिसत आहे. अनेक वर्षांपूर्वी हे पुस्तक वर वर चाळलं होतं. त्यात पाकिस्तानची निर्मिती का झाली याचा वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष इतिहास आहे. धर्मांतरासाठी केलेलं कुठल्याही धर्माचं विश्लेषण हा विषय त्यात दिसत नाही. तर हिंदू आणि मुस्लीम यांचा पक्ष कोर्टातल्या प्रामाणिक वकिलाने समोर ठेवावा आणि दोन्ही पक्षांच्या समर्थनार्थ आणि विरोधातलं विश्लेषण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

या पुस्तकातला एकच एक पक्ष समोर ठेवणं हे पुस्तकाच्या उद्देशाला हरताळ फासणारे आहे. दोन्ही पक्ष समोर ठेवण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवे. नेटवर ते उपलब्ध आहे.

प्रस्तावना : एक लेख माबोवर शेअर करावासा वाटला. त्याचा आणि या लेखाचा थेट संबंध नाही, पण इथे शेअर करणे विषयाला धरून होईल यात शंका नाही. लेखकांनी मागेच परवानगी दिलेली आहे, पण नाव वापरू नये अशी विचित्र अट घातल्याने नावाशिवाय चिकटनक्कल सादर करत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------

वेचक वेधक महापुरूष

सध्या दिवस सोन्याचे आलेत. म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे महापुरुषांवर एकमत झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या माऊलीने बाबासाहेबांचे हे जयंतीवर्ष धडाक्यात साजरे करावे असे ठरवले. तर कट्टर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसने ही आम्ही पण मागे नाहीत हे दाखवतांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जातील असं जाहीर केलं आहे.

गंमतच आहे. आपल्याकडे १०० या अंकाला जास्त महत्व आहे की १२५ ? जयंतीवर्ष १०० व्या वर्षी करायचं की १२५ व्या वर्षी ? १९२४ साली संघाचं शतकी वर्ष सुरू होतंय. या वर्षात संघाला महत्वाची भेट म्हणजे भारत हे हिंदूराष्ट्र व्हायला हवंय. पण त्यासाठीची टोटल जमवतानाजे प्रमुख अडथळे ठरतात त्यातला मुख्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना मानणारा समाज.

तीस वर्षांपूर्वी जेव्हां मशीद पाडली तेव्हां जे ध्रुवीकरण सुरू झाले त्य़ाला खीळ बसलेली आहे. पण त्यातली बरीचशी मतं आजही टिकून आहेत. तेव्हां बाल्यावस्थेत असलेली पिढी आज कुठला विचार करते त्याचं आवरण हिंदुत्ववादी मसाल्याला लावूनही टोटल जमेना, तेव्हां साम, दाम, दंड आणि भेद असे सारे उपाय योजत या निवडणुकीत बहुमत मिळवलं. पण राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी आपला अजेण्डा बाजूला ठेवावा लागला आहे. राज्यसभेत जर बहुमत हवं असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेश जिंकणं भाग आहे. याच दोन राज्यांची जातीय गणितं अत्यंत किचकट आहेत.

उत्तर प्रदेशातला विजय हा चमत्कार नव्हता हे सिद्ध करण्यासाठी अजून दोन वर्षे आहेत. पण त्यासाठी आधी येणा-या बिहारच्या निवडणुका या वेळी चित्रं स्पष्ट करणार आहेत. दिल्ल्लीच्या विजयावरून आडाखे बांधणारे तज्ञ नंतरच्या काळात कुठेही दिसणार नाहीत. बिहारच्या निवडणुकांसाठी मतपेढीच्या बेरजा वजाबाक्या कधीच्याच सुरू झालेल्या आहेत. भाजपने लोकसभेला पास्वान यांना सोबत घेऊन दलित मतांची बेरीज केली, त्याचा तडाखा आधीच वेगवेगळं लढणा-या इतरांना बसला. त्यामुळंच नितीशकुमार महादलित हे कार्ड खेळले आणि मांझींना दलितांचा सर्वात मोठा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी थेट पायउतारच झाले. नितीशकुमारांची ही खेळी भारतीय राजकारणातली अलिकडच्या काळातली सर्वात धूर्त खेळी म्हणावी लागेल. त्याचं कौतुक धूर्तोबा पवारांनीही केलं. कारण त्यामुळे दलित मतांमधे फूट पडून पास्वानांना शह बसणार होता इतकंच नाही तर पास्वानांवर नाराज असलेल्या दलित गटांना नवा मसीहा मिळाल्याने ही बेरीज नीतीश यांच्या बाजूला होणार होती. दोन्ही परिस्थितीत नुकसान भाजपचं होणार होतं. त्यामुळेच लालूंनी नीतीश यांच्यासोबतच कुठल्याही परिस्थितीत निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं.

या परिस्थितीत भाजपला बिहार जड जाणार आणि बिहारचा किल्ला पडला तर २०१७ मधे उत्तर प्रदेशात विपरीत संदेश जाणार हा धिका ओळखून भाजपने मांझी यांनाच आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्या नशीबाने मासा गळाला लागलाही. आता मांझी यांना हवा देत पास्वान यांनाही शह दिला जाईल जेणेकरून त्यांची बार्गेनिंग पॉवर आटोक्यात राहील असा हिशेब भाजपने केला.

याच बरोबर दीर्घकाळचं धोरण म्हणून दलित आणि मुस्लीम यांनी एकत्र येऊ नये म्हणून बाबासाहेबांचा वापर मुस्लिमांविरुद्ध करण्याची योजना नागपुरात आखली गेली. गेली काही वर्षे बाबासाहेब आणि गांधीजी एकत्रच होते, बाबासाहेबांना गांधीजींनी घटना लिहीण्यासाठी बोलावले असा अपप्रचार कॉंग्रेस करत होती. या प्रचाराला भुलून बाबासाहेब न वाचणारे रिपब्लीकन पक्षाचे मतदाते आपापल्या नेत्यांच्या आवाहनावरून कॉंग्रेसला विजयी करत. रिपब्लीकन राजकारण संपूर्णपणे राखीव जागांच्या भोवती फिरणारे असल्याने हा प्रश्न चिघळत ठेवण्यात कॉंग्रेसने धन्यता मानली. प्रश्न सुटला तर समाज मत देत नाही हे कॉंग्रेसचे साधे तत्त्वज्ञान आहे. गेल्या काही वर्षात कॉंग्रेसकडून नेत्यांना बरंच काही मिळतं पण आपल्याला काहीही मिळत नाही हे मुस्लीम आणि दलित या गटांच्या लक्षात आल्याने हे गट कॉंग्रेसकडून दूर गेले. त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेसची एकहाती सत्ता संपुष्टात आली. मधल्या काळात बसपचा झालेला उदय हा पैलूही आहेच. बसपने वेळोवेळी भाजप आणि कॉंग्रेसला मदत करत आपले अस्तित्त्व वाढवले. कांशीराम यांच्यानंतर मात्र कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षाने बसपला संपवण्यासाठी छुपी युती केली. बसप कमजोर झाल्यानंतर भाजपने सपाचे पंख छाटायला सुरूवात केली. कॉंग्रेसचा त्याला पाठिंबा होता. कारण सपा, बसपा नाहीसे झाले तर कॉंग्रेसचं पुनरुज्जीवन होऊ शकतं.

आता बसपा साफ झाली आहे तर सपा हाफ झाली आहे. पण मुस्लीम मतं कॉंग्रेसकडे वळू नयेत यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. हैद्राबादच्या बंधूंना हाताशी धरून मृतप्राय असलेल्या एका संघटनेत जान भरून मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण हे स्वतंत्त्र राहील आणि त्यांना दलितांची साथ मिळून बेरीज होऊ नये यासाठी बाबासाहेबांचे प्रेम या पक्षाला आणि त्याच्या माऊलीला आले आहे.

त्यासाठी बाबासाहेबांचे विचार मांडताना बाबासाहेबांचे हिंदू धर्माबद्दलचे चिकीत्सक विचार, दलित, शोषीत, कामगार, स्त्रिया यांच्या उत्थानासाठी केलेलं चिंतन या सर्वांना फाट्यावर मारून थॉट्स ऑन पाकिस्तान या प्रासंगिक ग्रंथातील वेचक भाग तेव्हढा उचलून त्यावर चर्चा घड्वण्यासाठी संघातून बाहेर पडल्याचे नाटक करणा-या तथाकथित न्य़ुट्रल विचारवंतांकडून बाबासाहेबांच्या नजरेतून मुस्लिमांचे विश्लेषण किंवा बाबासाहेबांचे पाकिस्तानसंबंधीचे मत अशा मथळ्यांखाली भंपक लेख प्रखाशित होऊ लागले आहेत.

पण त्या निमित्ताने या लेखांवर आलेल्या मजेशीर प्रतिक्रिया वाचणे हे मनोरंजन ठरतेय. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवत बाबासाहेब न वाचलेल्या पण कॉंग्रेसच्या शिकवणुकीनुसार गांधीजी आणि बाबासाहेब हे समांतर असल्याचा भ्रमात राहणा-यांची गोची झालेली आहे. या लेखाला उत्तर द्यावे तर थॉट्स ऑन पाकिस्थान वाचावे लागेल. एव्हढा वेळ कुठे आहे ? कधी संघाकडून येणा-या तर कधी कॉंग्रेसकडून येणा-या फोटोशॉप्ड पोस्टी आपल्याच मेंदूतून आल्याच्या थाटात फिरवणे आणि चर्चेत अडचण झाली की शिवराळ भाषेत समोरच्याला माघार घ्यायला लावणे यापलिकडे वैचारीक चर्चा असते हे माहीतच नसलेल्या सेनाछाप निळ्या सैनिकांची पंचाईत केविलवाणी आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे धूर्त लोक विरोधही करता येईना आणि सत्यही मांडता येईना अशा कात्रीत सापडून लेखाच्या उद्देशावर हरकत घेत आहेत. उद्देश साफ नाही हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही. पण शक्य असूनही थॉट्स ऑन पाकिस्तानचे दोन्ही पक्ष अभ्यासपूर्ण रीतीने वाचकांच्या समोर ठेवण्य़ाची कॉंग्रेसची तयारी नाही.

लोकांचे अज्ञान हेच आपले भांडवल हा कॉंग्रेसच्या राजकारणाचा जस पाया आहे, तसाच अज्ञानी लोकांना ज्ञानी असल्य़ाचा भ्रम निर्माण करून त्या गुंगीत मुस्लीम द्वेषाच्या पायावर ध्रुवीकरणाचा अजेन्डा रेटत नेणे आणि त्याला राष्ट्रवादाची फोडणी देत राहणे हा संघाचा अजेण्डा आहे. त्यासाठीच मग वल्लभभाई पटेल गौरवीकरण, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंह यांच्यावर मालकी दर्शवणे हे उपद्व्याप संघ करत आलेला आहे. त्यात आता बाबासाहेबांची भर पडली आहे. मोदींनी तर गांधीजींचीही भर घातली आहे.

या दोन नेत्यांवर संघाचं प्रेम किती आहे हे गांधीजींबद्दलचे जे फोटो पूर्वी मेलमधून, नंतर ऑर्कुटद्वारे आणि आता फेसबुक, व्हॉट्स अप द्वारे शेअर होतात त्यामुळं कळून आल्याशिवाय राहवत नाही. २ ऒक्टोबरला सुटी द्यायची जिवावर आल्याने सालों को झाडू मारने का काम लगाता हुं असा मनात विचार करून उत्सवी सफाई अभियान सुरू केल गेलं. सफाई बद्दलचं हे प्रेम सावरकर जयंती किंवा गुरुजी जयंतीलाही दाखवता आलंच असतं की.

बाबासाहेबांवर होणारे जुनेच आरोप एकत्रित करून लिहीलेल्या पुस्तकाच्या बातम्या उत्साहात दाखवत त्या पुस्तकाच्या लेखकाला अरूण शौरींना केंद्रात त्या कामगिरीची बक्षिसी म्हणून केंद्रात मंत्रीपद देऊन आपले प्रेम भाजपने त्याच वेळी जाहीर केले होते ज्या काळात बाबासाहेबांची शंभरावी जयंती होती. याच काळात सहा डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनालाच बाबरी मशिद पाडून हा दिवस इतिहासातला काळा दिवस म्हणून साजरा केला जाईल असा प्रचारही करण्यात कॉंग्रेस आणि भाजपने आपापली क्षमता सिद्ध केलेली आहे.
सध्या या सर्वांना महापुरुषांचे प्रेम आले असले तरी ते वेचक, वेधक आणि निवडक आहे हेवेसांनल.

( अनामिक )

Thoughts on pakistan वाचायचे कष्ट घ्यायचे नाहीयेत म्हणून सगळा आळशीपणा चाललाय.

-गा.पै.

लबाड कोल्हया,

इराण-इराक मध्ये कित्ती सुंदर एकी होती ना ८० च्या दशकात? आज सीरीयापासून पाकिस्तानापर्यंत दिलजमाईच्या कित्तीकीत्ती बहारदार मेजवान्या झडताहेत! मोगल,आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही राजवटी अगदी जानी दोस्त होत्या एकमेकांच्या!

आ.न.,
-गा.पै.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/gujarat-withdraws-dr-ambed...

डॉ. आंबेडकरांचे पुस्तक अभ्यासक्रमातून बाद

ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद

हिंदू धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचं कारण देत गुजरात सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक शालेय अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

'राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक न्‍याय विभागानं बाबासाहेबांच्‍या १२५व्‍या जयंतीचं औचित्य साधून पाचवी ते आठवीच्या मुलांना हे पुस्तक अभ्यासासाठी ठेवलं होतं. या पुस्तकावर आधारित राज्‍यस्‍तरीय प्रश्नोत्तर स्‍पर्धा घेण्याची सरकारची योजना होती. मात्र, पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर ते मागे घेण्यात आलं आहे. 'पुस्तकातील काही मजकुरामुळं प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ते योग्य नव्हतं. त्यामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

आक्षेपार्ह काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. त्यावेळी झालेल्या सामूहिक धर्मांतरादरम्यान आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. 'हिंदू धर्म हा असमानतेवर आधारित आहे. हिंदूंच्या परंपरा आणि दैवतांचा आम्ही त्याग करतो,' अशी घोषणाही आंबेडकरांनी केली होती. या सर्व प्रतिज्ञांचा समावेश पुस्तकात होता. त्यावरच आक्षेप घेण्यात आला होता.

चार लाख छापल्या; अर्ध्या वाटल्या!

गुजरातमधील दलित विचारवंत पी. ए. परमार यांनी लिहिलेलं हे पुस्तक अहमदाबादेतील 'सूर्या प्रकाशन'नं प्रकाशित केलं आहे. आतापर्यंत पुस्तकाच्या चार लाख प्रति छापण्यात आल्या असून त्यातील बहुतांश वितरितही करण्यात आल्या आहेत.

काही नमुनेदार प्रतिक्रिया

nitindeolekar, Pune यांचे म्हणणे आहे :
मुस्लिम धर्मा-विरुद्ध काही बोलण्याची हिंमत आहे का? उठता बसता नुसता समतेचा जप करण्यापेक्षा साधा सर्वांना "समान नागरी कायदा" करून दाखवला असता तरी जरा बर झालल असत..

Shubhangi Vijay Chavan, Unknown यांचे म्हणणे आहे :

पुस्तक शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यापेक्षा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो फक्त वगळावा जेणेकरून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत.

SUSHIL KUMAR, J यांचे म्हणणे आहे :
'राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक न्‍याय विभागानं बाबासाहेबांच्‍या १२५व्‍या जयंतीचं औचित्य साधून पाचवी ते आठवीच्या मुलांना हे पुस्तक अभ्यासासाठी ठेवलं होतं. या पुस्तकावर आधारित राज्‍यस्‍तरीय प्रश्नोत्तर स्‍पर्धा घेण्याची सरकारची योजना होती. मात्र, पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर ते मागे घेण्यात आलं आहे. 'पुस्तकातील काही मजकुरामुळं प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ते योग्य नव्हतं. त्यामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. त्यावेळी झालेल्या सामूहिक धर्मांतरादरम्यान आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. 'हिंदू धर्म हा असमानतेवर आधारित आहे. हिंदूंच्या परंपरा आणि दैवतांचा आम्ही त्याग करतो,' अशी घोषणाही आंबेडकरांनी केली होती. या सर्व प्रतिज्ञांचा समावेश पुस्तकात होता. त्यावरच आक्षेप घेण्यात आला होता.
सहमत(1)असहमत(4)बढ़िया(0)आक्षेपार्हउत्तर द्या

SUGATA PYNE, यांचे म्हणणे आहे :
हिंदू धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचं कारण देत गुजरात सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक शालेय अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. 'राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक न्‍याय विभागानं बाबासाहेबांच्‍या १२५व्‍या जयंतीचं औचित्य साधून पाचवी ते आठवीच्या मुलांना हे पुस्तक अभ्यासासाठी ठेवलं होतं. या पुस्तकावर आधारित राज्‍यस्‍तरीय प्रश्नोत्तर स्‍पर्धा घेण्याची सरकारची योजना होती. मात्र, पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर ते मागे घेण्यात आलं आहे. 'पुस्तकातील काही मजकुरामुळं प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ते योग्य नव्हतं. त्यामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. आक्षेपार्ह काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ सा
सहमत(0)असहमत(1)बढ़िया(0)आक्षेपार्हउत्तर द्या

Meghraj Khedkar, Unknown यांचे म्हणणे आहे :
वेस्ट बेंगल चीफ मिनिस्टर ममता बॅनेर्जी विल बे अम.Cंग ते प्र.Cमिनेंट फिगर्स आत अ टी पार्टी तो बे हेल्ड ओन् वेडनेसडे वेर सेवरल .Cपोसिशन पार्टीस अरे एक्सपेक्टेड डिसकस वेस तो एन्षूर डिफीट .Cफ ते ब्ज्प इन ते कमिंग बिहार असेंब्ली एलेक्षन्स. रिपोर्ट्स सैद ते मीटिंग विल बे हेल्ड आत ते डेली रेसिडेन्स .Cफ नॅशनलिस्ट क.Cंग्रेस पार्टी .Cर न्क्प चीफ शरद पेव्र. .Cपोसिशन स्ट.Cलवर्ट्स लाइक समजवादी पर्थयस मुलायम सिंघ यादव अँड डेली चीफ मिनिस्टर अरविंद केजरिवल रेप्रेज़ेंटिंग ते आम आदमी पार्टी विल अटेंड ते मीटिंग. जनता दल(उ) चीफ अँड बिहार चीफ मिनिस्टर . नीतीश कुमार अँड रॅशट्रियीआ जनता दल सुप्रिमो लालू प्रसाद विल सेंड देयर पार्टी रेप्रेज़ेंटेटिव्स. ड्यूरिंग अ डिन्नर मीटिंग आत केजरिवाल्स रेसिडेंसेओन तुएस्डायनिघत, ते आप कनव्नर वाज़ रिपोर्टेड्ली पर्स्यूयेडेड बाइ बॅनेर्जी तो अटेंड ते मीटिंग. बूट क.Cंग्रेस, विच इस कंटेस्टिंग ते बिहार एलेक्षन्स अस अ पार्ट्नर .Cफ ते ज्ड(उ) हास नॉट बे

catnspa, यांचे म्हणणे आहे :
वादग्रस्त भाग वगळण्यात काहीही चुक नाही. जसे इतर धर्मीयांच्या अती नाजूक भावना दुखऊ नये म्हणून सगळी सिक्युलर मंडळी पुढे पुढे करत असतात तर हिंदूंच्या ही भावना आहेत आणि त्यांना पण धक्का लागू नये याचीही काळजी आता सगळ्यांना घ्यावीच लागेल... हिंदूंनी खूप अपमान सहन केले आहेत... कोणीही उठावे आणि हिंदून बद्दल वाईट बोलावे हे आता चालणार नाही... तेव्हा जो भाग प्रकाशित करायचा तो कुणाला दुखावणारा नसेल याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी ...

Santanu, Bargarh यांचे म्हणणे आहे :
गुजरात सरकारच्या सामाजिक न्‍याय विभागानं बाबासाहेबांच्‍या १२५व्‍या जयंतीचं औचित्य साधून पाचवी ते आठवीच्या मुलांना हे पुस्तक अभ्यासासाठी ठेवलं होतं.
अपेक्षित होते.
Vedant, Maharashtra यांचे म्हणणे आहे :
हे तर होणारच होते कारण गुजरातमध्ये सध्या राष्ट्रीय सेवक संघाचे प्रतिरूप सरकार सत्तेवर आहे आणि तेही मोदी सारख्याच्या आशीर्वादाखाली मग दुसरे काय होणार? हि ह्यांची सर्वधर्म समभावाची व्याख्या आणि समान नागरी कायद्याचे पुरुस्कर्ते. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे नेहमीच वेग वेगळे आहेत हे सिध्द होत आहे.

Prag Dange, Hind यांचे म्हणणे आहे :
पराचा कावळा नको. आधी प्रॉब्लेम काय झाला ते समजून घ्या. पुस्तक अभ्यासक्रामातून काढलेले नाही, री-प्रिंटिंगला दिले आहे.
(Prag Dange ला उत्तर)
Vinay Hate, Mumbai यांचे म्हणणे आहे :
रप्रीटींग मध्ये आक्षेपार्ह म्हणून, बाबांचे शब्द गाळले तर जाणार नाहीत

Roshan Dalwai, Doha यांचे म्हणणे आहे :
म्हणजे आता झाली खरी प्रत्यक्ष आणि अधिकृत सुरूवात दडपशाहीला!!

No name, Mumbai यांचे म्हणणे आहे :
आक्षेप घेण्यासारखे काय आहे त्यात? जे सत्य आहे ते छापायला भीती कसली? म्हणजे तुमच्या सोयीचे तुम्ही छापणार. आणि जे तुमच्या गैरसोयीचे आहे ते तुम्ही वगळणार. वाह!!! कर नाही त्याला डर कशाला?

मघाशी मोबाईलवरून त्रास झालेला अपलोड करताना... क्षमा असावी.

काही लोकांचं काय चाललय कळेना, त्यांना जे विचारत नाहीत त्यांना एका प्रोफाईलने इग्नोर करायचं, मेगाबायटी पोस्टी(ओळखू येणा-या_ आयडीने सर्वावर पाणी फिरवायचं. असोच.मोफत मनोरंजन आहे .. आपलं काय गेलं ?

डॉ. साहेब, नेताजि बोस ह्यांचि मुस्लिम बांधवांबद्दलची मते वाचायची आहेत तुम्हि पुर्वि लिहलेला एक लेख वाचनात आला होता.मनावर घ्या इथे तो लेख प्रसिध्द करा.

भाजपाकडे करिश्माई राष्ट्रिय प्रतिक असलेला नेता नाही.त्यामुळे कधि त्यांना सरदार आठवतात तर कधी नेताजी.नेताजी हे सर्वधर्मसमभावात तेव्हाच्या सार्या नेत्यांना मागे टाकायचे.

शेवटच्या पानावर या लेखाचं मुद्देसूद खंडन करण्यात आलेले आहे.

उर्वरीत मुद्द्यांपैकी बौद्ध धर्माचा विनाश का झाला याबद्दल लेखकाने लेखात दिलेला मजकूर हा भ्रमित करणारा आहे. बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी पुष्यमित्र शृंगाने बौद्ध भिक्खूचे शीर आणल्यास सोन्याच्या मुद्रांचं इनाम ठेवलं होतं. दहा हजार बौद्ध भिख्खुंची कत्तल झाली. उर्वरीत पौर्वात्य देशात पळून गेले. पुष्यमित्र शृंग म्हणजे ज्याने सम्राट अशोका चा नातू सम्राट बृहद्रथ याची कपटाने हत्या करून आपलं राज्य प्रस्थापित केलं तो सेनापती.

सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पाने मधे ते कन्फर्म केलेले आहे. अर्थात त्यांनी पुष्यमित्र शृंगाला हिरो बनवून टाकला आहे. बाबासाहेबांप्रमाणे तटस्थ लिखाण नाही ते.

या आक्षेपांची उत्तरे बाबासाहेबांचे जावई डाॅ‌. आनंद तेलतुंबडे यांनी "बाबासाहेबांची मुस्लिमविषयक विचार" या पुस्तकात सविस्तर दिलेले आहेत.
माझ्या या लेखातही उत्तर सापडेल -
https://wp.me/paYsiz-4f

तसेच यावर माझं भाषणही ऐका -

https://youtu.be/KHVpw70Slkg

चिडीया चुग गयी खेत

आता विचार करून काय फायदा ?

अभीराम नही अभीसेक्युलर है

हे डॉ. दिक्शित अमेरिकेत होते ना ? भारतात परतले का ? करोनामुळे परतले की मोदींच्या हिंदुराश्त्राच्या प्रेमाने परतले ?

ब्रिटिश पण गेले,मुघल पण गेले,पाकिस्तान पण निर्माण झाला,गांधी जी पण आता नाहीत आणि dr Ambedkar पण नाहीत.
1945=50 स्थिती आता नाही.
सर्व बदललं आहे.
महापुरुष आणि त्यांच्या विचारांवर आता ची पिढी बिलकुल चालत नाही.
उथळ विचाराचे महापुरुषांचे पाठीराखे खोलात जावून विचार करू शकत नाहीत.
आणि 99% लोकांना महापुरुषांच्या शिकवणीत बिलकुल रस नाही.
आहे तो फक्त उथळ पना.
त्या मुळे इथे चालली चर्चा च व्यर्थ आहे.
राजकीय फायद्या साठी महापुषांचा फक्त उपयोग राजकीय फायदा आणि जयंती साजरी करण्यासाठी च होतो.
आता भारताला इतिहासात डोकवयच गरज नाही.
आताच्या स्थिती ला अनुसरून च राजकीय मत असली पाहिजेत.
महान व्यक्ती ची पुस्तक पण कोण वाचत नाही.
काही मोजकेच लाखात वाचत असतील तर असतील.
इथे जे प्रतिसाद येत आहेत त्या मधील एकाने पण कोणतेच पुस्तक वाचलेले नाही.फक्त गूगल जे search करून दाखवेल हेच ह्यांचे ज्ञान आहे.

ते नथुरामाने कि कुणितरी दशमुख रावण काढुन कार्टुन काढले होते, त्यात ते १० लोक कोण आहेत ? नेहरु गांधि तर दिस्तात सहज, बाबासाहेब नेताजिहि आहेत का ?

Pages